Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तुळजापूर येथे निवडणूक अधिकार्‍यांनी कह्यात घेतलेली रक्कम सांगली अर्बन को-ऑप. बँकेची अधिकृत रक्कम ! - गणेशराव गाडगीळ

      सांगली, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - सांगली अर्बन को-ऑप. बँकेची मराठवाड्यातील परभणी आणि माजलगाव येथील शाखांची रोख ६ कोटी रुपये रक्कम ही १४ नोव्हेंबर या दिवशी तुळजापूर येथे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कह्यात घेतली. वास्तविक ही रक्कम बँकेची अधिकृत रक्कम होती, तसेच त्या समवेत बँकेची सर्व कागदपत्रे, अधिकृत अधिकारी, विमा, तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. असे असतांना काही प्रसिद्धीमाध्यमांत या रकमेविषयी आणि बँकेच्या संदर्भात अफवा पसरवल्या गेल्या. तरी या संदर्भात बँकेचे ग्राहक, नागरिक यांनी तुळजापूर येथे निवडणूक अधिकार्‍यांनी कह्यात घेतलेली रक्कम सांगली अर्बन को-ऑप. बँकेची अधिकृत रक्कम होती, हे लक्षात घ्यावे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्री. गणेशराव गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संचालक श्री. शैलेंद्र तेलंग, श्री. हरिदास कालीदास, तसेच अन्य उपस्थित होते.
     श्री. गाडगीळ पुढे म्हणाले, ‘‘आमच्या बँक राज्यातील १० जिल्ह्यांत ३५ शाखांद्वारे गेली ८१ वर्षे कार्यरत आहेत. ज्या शाखांकडे अतिरिक्त रोख रक्कम असते ती अन्य विभागाकडे आणली जाते. अशाच प्रकारे मराठवाड्यातील अतिरिक्त असलेली रक्कम सांगली येथील मुख्य कार्यालयाकडे आणण्यात येत होती. या ६ कोटींच्या नोंदी शाखांच्या कॅशपुस्तकात आहे. केवळ सुरक्षा रक्षक उपलब्ध न झाल्याने तो गाडीत नव्हता. या गोष्टी संबंधित अधिकार्‍यांना कागदोपत्री पटवून देऊन ही रक्कम लवकरच बँकेच्या कह्यात येईल.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn