Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला महाअधिवेशनात मनुस्मृतीचे दहन !

  • ग्रंथ जाळल्याने त्यातील तेजस्वी विचार कधीही नष्ट होत नाहीत, हेही न कळणारे हिंदुद्वेष्टे ! आजपर्यंत हिंदुद्वेष्ट्यांनी अनेकदा मनुस्मृति जाळली; पण तिचे महत्त्व उत्तरोउत्तर वाढतच गेले, हे लक्षात घ्यावे ! 
  • विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता जाळपोळीचा मार्ग अवलंबणारे हिंदुद्वेष्टे ! त्यांची ही कृती असहिष्णुताच नव्हे का ? सरकार दोषींवर काय कारवाई करणार आहे ? 
  • प्राचीनतम हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन आज सर्व जग भारताकडे आशेने पहात आहे. त्यामुळे इंग्रज-निर्मित जातीद्वेषी राजकारणाची री ओढणार्‍यांनी स्वार्थ सोडून देऊन स्वहित आणि राष्ट्रहित साधावे ! 

     नागपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात राज्यस्तरीय महिला महाधिवेशनात सहभागी झालेल्या महिलांकडून मनुस्मृति या हिंदूंच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले. 

या महिलांचे म्हणणे होते की, 
१. इतर मागास प्रवार्गाला (ओबीसी) संविधानाने दिलेले अधिकार मिळालेले नाहीत. हा समाज अजूनही संवैधानिक अधिकारापासून वंचित आहे. महिलांची स्थिती तर त्याहून बिकट आहे. (इथेच संविधानाचे न्यूनत्व लक्षात येत नाही का ? ओबीसी महिलांची स्थिती बिकट असती, तर या महिलांना परिषद घेऊन, हिंदूंचा धर्मग्रंथ जाळण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? - संपादक) 
२. मनुस्मृति जाऊन संविधान लागू झाले, तरी अजूनही समाजमनावर मनुस्मृति ठाण मांडून आहे, असा दावा आयोजकांनी या वेळी केला. (लक्षावधी वर्षांपूर्वीचा ग्रंथ जनमानसाच्या मनात आहे, यावरूनच त्या ग्रंथाचे अद्वितीयत्व लक्षात घ्यायला हवे. - संपादक) 
३. छायाचित्रापुरते हे दहन होऊ नये, तर महिलांनी वडाची पूजा आणि इतर कर्मकांड करणे बंद करावे. मनुस्मृतीला आता मनातून तिलांजली द्या, असे आवाहन सुशिला मोराळे यांनी या वेळी केले. (आज धर्माचरणाअभावीच समाज आणि राष्ट्र अधोगतीकडे जात आहे. धर्माचरणामुळे समाज नीतीमान होण्यास साहाय्य होऊन तो संयम, त्याग आदी गुण अंगीकारतो आणि समृद्ध राष्ट्राकडे वाटचाल करतो. - संपादक) 
४. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी आहेत. ते तेली जातीचे नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असतांना गाझी ही त्यांची जात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केली. (ही आहे परिषेदेतील सहभागी महिलांची जात्यंधता ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn