Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या यशस्वीतेसाठी आयोजित बैठकीत ५५ धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचे मार्गदर्शन ऐकतांना धर्माभिमानी
     सोलापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी साखरपेठ येथील हिंगुलआंबिका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह ५५ धर्माभिमानी उपस्थित होते. अनेकांनी सभेला पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी अनेक धर्माभिमान्यांनी मनोगत व्यक्त केले. धर्मसभेच्या प्रसाराविषयी रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांनी माहिती दिली. 

  वाहनफेरीच्या आयोजनात कृतीशील होणारे धर्माभिमानी !
     समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी सभेचे स्वरूप आणि आवश्यकता यांची माहिती सांगितली. त्यांनी वाहनफेरीच्या आयोजनाचे सूत्र उपस्थित केल्यावर 'बजरंग दलाचे श्री. सिद्राम चरकूपल्ली आणि श्री. योगीराज जडगोनार यांनी वाहनफेरीसाठी २५० वाहनांची व्यवस्था करू', असे सांगितले. 
मान्यवरांची मते 
     माजी नगरसेवक बापू ढगे म्हणाले, "हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे कार्य करतांना साधनेचे बळ अल्प पडल्याने आम्हाला यश मिळाले नाही. राष्ट्र-धर्माचे कार्य साधना म्हणून केल्यास यश दूर नाही. धर्मसभेमध्ये सर्व हिंदु बांधवांनी पुष्कळ संख्येने सहभागी व्हावे." शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण म्हणाले, "हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे. सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक सर्वतोपरीने प्रयत्न करतील." 
 बैठकीतील धर्माभिमान्यांचा निर्धार 
     ७५ बैठका घेणार; ४०० भित्तीपत्रके रिक्शांना, तर ३०० शहरात लावणार; सभेच्या २ दिवस अगोदर साहित्यांची ने-आण करण्यासाठी ३ वाहने उपलब्ध करणार; सभेसाठी लागणार्‍या नक्कल प्रती विनामूल्य उपलब्ध करून देणार; वाहनफेरीसाठी ३०० युवकांना घेऊन येणार; ४०० रिक्षांना भगवे झेंडे लावणार. 
     या वेळी श्री. सुनील घनवट बोलत असतांना बांग चालू झाली. त्या वेळी ते म्हणाले, "आपल्याला दिवसातून अनेकदा बांग ऐकावी लागते. अनधिकृतरित्या चालू असलेले भोंगे कायद्याने बंद व्हायला होण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करायला हवी." 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn