Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कार्तिक दीपोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले !

नांगनूर येथे प.पू. प्रणालिंग स्वामी 
यांना हिंदु धर्म रत्न पुरस्कार प्रदान ! 

(मध्यभागी) प.पू. प्रणालिंग स्वामी यांना हिंदु धर्म रत्न पुरस्कार
प्रदान करतांना (डावीकडे) ह.भ.प. श्रीधर महाराज आणि (उजवीकडे) श्री. किरण दुसे

        नांगनूर (जिल्हा बेळगाव), २८ नोव्हेंबर (वार्ता.) - कार्तिक मासानिमित्त येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिरात मोठ्या उत्साहात कार्तिक दीपोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रम झाले. २० नोव्हेंबरला सायंकाळी ६.१५ वाजता विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्रणालिंग स्वामी, ह.भ.प. श्रीधर महाराज, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि धर्माभिमानी श्री. राजेश आवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. या वेळी येथील श्रीराम सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या वतीने प.पू. प्रणालिंग स्वामी यांना ह.भ.प. श्रीधर महाराज आणि श्री. किरण दुसे यांच्या हस्ते हिंदु धर्म रत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
        राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ अहोरात्र झटणार्‍या मान्यवरांना येथील श्रीराम सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या वतीने प्रतीवर्षी हा पुरस्कार दिला जातो. त्याप्रमाणे प.पू. प्रणालिंग स्वामींना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, भगवद्गीता असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
        या वेळी ह.भ.प. श्रीधर महाराज म्हणाले, खर्‍या अर्थाने येथे दिवाळी साजरी होत आहे; कारण साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा, असे आपल्या धर्मामध्ये मानले जाते. प.पू. प्रणालिंग स्वामी हे समाजासाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात. समाजात गरीब मुलांना शिक्षण आणि निवास यांची सोय व्हावी, यासाठी मठात विनामूल्य वसतीगृहाची व्यवस्था चालू केली आहे. त्याचसमवेत समाजातील तरुणांना आपली संस्कृती समजावी आणि त्याचे संवर्धन होण्यासाठी स्वामीजी विविध शिबीर घेत असतात. या सर्व कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिल्याविषयी आम्हाला आनंद होत आहे.
        श्री. राजेश आवटे यांनी मानपत्राचे वाचन केले, तर श्री. किरण दुसे यांनी ११ डिसेंबरला कोल्हापूर येथे होणार्‍या हिंदु धर्मसभेची माहिती दिली. सूत्रसंचालन श्री. सातापा पारित यांनी केले. या वेळी धर्माभिमानी सर्वश्री दयानंद कोगळ, पुरुषोत्तम पोवार, रोहित तोडकर, अमोल गुरव, संदीप कांबळे आदी उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn