Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अघोषित संपत्तीवर ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड बसणार !

आयकर कायद्यात पालट 
करण्याचा प्रस्ताव संसदेत सादर !
         नवी देहली - २८ नोव्हेंबरला केंद्र सरकारने संसदेत आयकराच्या कायद्यात पालट करणारा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार ५०० किंवा १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांद्वारे बँकेत काळा पैसा जमा केल्यास त्यावर ३० टक्के कर, १० टक्के दंड आणि ३३ टक्के अधिभार लावण्यात येईल. हा अधिभार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जमा होईल. नोटाबंदीच्या प्रक्रीयेच्या कालावधीत अघोषित रकमेविषयी योग्य खुलासा न करणार्‍यांवर ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड लावण्यात येणार आहे.
         या कायद्यानुसार परिवारातील सर्व सदस्यांच्या खात्यांची चौकशी केली जाणार आहे. जर८ नोव्हेंबरनंतर अडीच लाखांच्या मर्यादेपेक्षाअधिक किंवा तितकीच एकूण रक्कम या सर्वखात्यांमध्ये भरली गेली असेल, तर त्याचीहीचौकशी करण्यात येणार आहे. याविषयी योग्य खुलासा न केल्यास ४० टक्के कर आणि ३३ टक्के दंड भरावा लागणार आहे.
         पूर्वी एकाच वेळेला ५० सहस्र रुपये भरल्यास पॅन कार्डची माहिती द्यावी लागत होती. त्यामुळे नागरिक ५० सहस्रांहून अल्प रक्कम भरत होते. आता हा नियम पालटून वर्षाला एकूण १० लाख रुपये भरणार्‍यांना पॅन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn