Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नदीपात्र माझे घरच आहे, असा विचार केला, तर नद्या प्रदूषणमुक्त रहातील ! - प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. दीमकराव मोरे

     पंढरपूर - पंढरपुरातील चंद्रभागेप्रमाणेच आपल्या गावाच्या शेजारून वाहणार्‍या नदी किंवा ओढ्याला चंद्रभागा मानावे. तेथे घाण टाकू नये. नदीपात्र हे माझे घरच आहे, असा विचार केला तर सर्वच नद्या प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ रहाण्यास साहाय्य होईल, असे उद्गार सुप्रसिद्ध जलतज्ञ डॉ. दीमकराव मोरे यांनी काढले.
     एकादशीच्या पूर्वसंध्येला, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एम्आयटी पुणे, भारत आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने झालेल्या चंद्रभागेच्या आरतीच्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माईर्स एम्आयटीचे संस्थापक-अध्यक्ष आधुनिक वैद्य विश्‍वनाथ कराड उपस्थित होते.
     ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्याकाळी मंदिरे आणि इमारतींचे बांधकाम त्यामध्ये आपला जीव ओतून काम केले जात होते. त्यामुळे त्या अजूनपर्यंत टिकून आहेत.
वारकर्‍यांचे वर्तन आदर्श हवे ! - ह.भ.प. अनिल पाटील महाराज
      सोलापूर - माळकरी ही परमार्थातील पहिली पायरी असून वारकरी हा त्या प्रवासातील मुक्काम आहे. माळकरी माळ बाहेरून घालतो, पण अंतःकरणाची शुद्धी केल्याशिवाय वारकरी होता येत नाही. वारकर्‍याचे वर्तन, त्याचे आचरण आदर्श असायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. अनिल पाटील महाराज यांनी केले. लिंगैक्य सिद्रामप्पा मल्लप्पा हत्तुरे यांच्या ११ व्या पुण्य स्मरणानिमित्त हत्तुरे नगर येथे आयोजित केलेल्या ‘अखंड हरिनाम सप्ताहा’ निमित्त ते बोलत होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn