Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर २०१६ या मासातील दुसर्‍या पंधरवड्याचा आढावा !

१. धर्माभिमान्यांचा धर्मकार्यातील सहभाग !
१ अ. आंदुर्ले आणि साळगाव येथे आदर्श श्रीकृष्ण प्रतिमा फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! : सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी नरकासुर प्रतिमांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसली. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले आणि साळगाव येथील धर्माभिमानी हिंदूंनी नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पराभूत नरकासुराचा उदोउदो करणार्‍यांसमोर विजयी श्रीकृष्णाच्या प्रतिमेची मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग दोन वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     आंदुर्ले आणि साळगाव येथे श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून नंतर श्रीकृष्णाची प्रतिमा सजवलेल्या चारचाकी गाडीत ठेवून फेरी काढण्यात आली. आंदुर्ले येथील फेरीचा प्रारंभ कापडोसवाडी येथे श्री. सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी श्री. दत्तप्रसाद सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेच्या पूजनाने झाला. साळगाव येथे पू. (सौ.) माई नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पूजनानंतर दोन्ही ठिकाणी श्रीकृष्णाची प्रतिमा सजवलेल्या चारचाकी गाडीत ठेवून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ असा नामजप करत फेरी काढण्यात आली. या फेरीत अनेक ग्रामस्थ उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. फेरीच्या मार्गात ठिकठिकाणी थांबून फेरीचे प्रयोजन, तसेच नरकासुराच्या प्रतिमा बनवणे, त्यांची स्पर्धा घेणे यांचे दुष्परिणाम यांविषयी प्रबोधन करण्यात आले.
     या वेळी श्री देवी आंदुर्लाई मंदिरात राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला अनुमाने ८० धर्माभिमानी हिंदू, तसेच जिज्ञासू उपस्थित होते.
१ अ १. लोकप्रतिनिधींचे अभिप्राय ! : केसरी (सावंतवाडी) येथील पंचायत समिती सदस्य श्री. राघोजी सावंत यांना संपर्क झाला असता ते म्हणाले, ‘‘आजचे युवक श्रीकृष्णाने नरकासुराला मारले म्हणून नरकासुराच्या प्रतिमेचे दहन मौजमजा म्हणून करतात; पण श्रीकृष्णाने सांगितलेल्या धर्माचरणाच्या कृती मात्र करत नाहीत.’’ 
२. समितीच्या प्रदूषणकारी फटाके आणि चिनी फटाके 
यांच्या विरोधातील चळवळीला पोलीस अधिकारी आणि व्यापारी यांचा पाठिंबा ! 
२ अ. ‘लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणखी प्रयत्न आवश्यक आहेत. शासनाने कृती करण्याआधीच नागरिकांनी चिनी फटाके घेणेच सोडून दिले, तर शासनाला नाईलाजास्तव या फटाक्यांवर बंदी घालावीच लागेल. तुमचे कार्य खूप चांगले आहे. ‘चिनी बनावटीचे आणि देवतांचे चित्र असलेले फटाके घेऊ नका’, असे सांगून आम्ही आमच्याकडे अनुज्ञप्ती (परवाना) नूतनीकरणासाठी येणार्‍या व्यापार्‍यांचे प्रबोधन करू, असे आश्‍वासन कुडाळ येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डी.जी. बखारे यांनी दिले. 
२ आ. ‘तुमचे कार्य पुष्कळच चांगले आहे. प्रबोधनाने परिवर्तन होऊ शकेल. तुमच्या कार्यक्रमांना आम्ही नक्की येऊ. मी स्वत: मुलांसाठी फटाके आणत नाही. या अभियानाला नक्कीच सहकार्य असेल’, असे आश्‍वासन देवगड येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी दिले.
- श्री. हेमंत मणेरीकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn