Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सोलापूर येथे प्रबोधन आणि हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार या उद्देशाने सादर केलेल्या पथनाट्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

पथनाट्य सादर करतांना कार्यकर्ते आणि ते पहातांना नागरिक
     सोलापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी घेण्यात येणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी चौकाचौकात प्रबोधनात्मक पथनाट्ये कार्यकर्त्यांकडून सादर करण्यात येत आहेत. त्यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पथनाट्यांमध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची आवश्यकता यांविषयी प्रबोधन करून प्रशिक्षणाचे प्रकारही दाखवण्यात येत आहेत. या वेळी हिंदूंना जागृतीपर आवाहनात्मक गीतही सादर करण्यात येते. २८ ठिकाणी पथनाट्ये सादर करण्याचे नियोजन केले आहे. पथनाट्यानंतर कोपरा सभा घेऊन सभेची माहिती देऊन धर्मसभेला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

     
भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख
निमंत्रण स्वीकारतांना (उजवीकडून दुसरे)

पालकमंत्री नामदार विजयकुमार देशमुख
निमंत्रण स्वीकारतांना (उजवीकडेे)
     क्षणचित्रे - रिक्शाचालकांनी सभेच्या प्रसाराचे फलक रिक्शावर लावण्यासाठी मागून घेतलेले पाहून एका चौकातील रिक्शाचालकानेही ते मागून घेतले. 
मान्यवरांना सभेचे निमंत्रण !
     समितीच्या वतीने येथील भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री नामदार विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे, भाजपचे गुरुशांत धुत्तरगांवकर, भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ आणि माजी सैनिक संघटनेचे सुभेदार बाबुराव पेठकर यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.    

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn