Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशात धर्मांधांनी २ मंदिरांना आग लावली !

भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना 
यांना लज्जास्पद ठरणार्‍या घटना ! बांगलादेशातून हिंदूंचा 
संपूर्ण वंशसंहार होण्याची तेथील धर्मांध जशी वाटत 
पहात आहेत, तशी भारत सरकार वाट पहात आहे का ?
        ढाका - बांगलादेशात होबिगांज जिल्ह्यातील बुल्ला या गावी असलेल्या बाराबराई मंदिराला २७ नोव्हेंबर या दिवशी रात्री धर्मांधांनी आग लावल्याने मंदिराची आणि मूर्तींची मोठी हानी झाली. त्याच रात्री श्री. अमरेंद्र रॉय यांच्या दुर्गा मंदिरालाही आग लावण्यात आली.
        बराबराई मंदिराला लागलेली आग अग्नीशमन दलाने विझवली. याआधी ३० ऑक्टोबर या दिवशी इस्कॉनच्या मंदिराला आग लावण्यात आली होती. त्याविषयी मंदिराच्या सेवकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या प्रकरणी २०-२५ धर्मांधांची नावे देण्यात आली होती. स्थानिक राजकीय नेत्यांनी मंदिर सेवकावर दबाव आणून ती तक्रार मागे घेण्यास सांगितले होते; मात्र सेवकाने तसे करण्यास नकार दिल्याने सूडापोटी बराबराई मंदिराला आग लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. 
        या घटनेची माहिती मिळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रबिंद्र घोष यांनी माधवपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यास संपर्क करून घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. 
        अधिवक्ता घोष यांनी या संदर्भात हिंदूंच्या मंदिरावर होणार्‍या वाढत्या आक्रमणाविषयी चिंता व्यक्त करून मंदिर आणि अल्पसंख्य हिंदूंच्या संरक्षणासाठी शासनास त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn