Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आरती गुरुमाऊलीची ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
आरती गुरुमाऊलीची (टीप १) आरती माऊलीची ।
आरती गुरुमाऊलीची आरती माऊलीची ॥ धृ. ॥
दावियला ‘गुरुकृपायोग’ । 
अष्टांग साधना असे त्यात ॥
षड्रिपू निर्मूलन असे मुख्य ।
मन हो निर्मळ होई त्यात ॥ १ ॥
अनेक साधक झाले संत ।
स्थापण्या सर्वत्र हिंदु राष्ट्र ॥
केला अनिष्ट शक्तींचा निःपात ।
सर्व साधकांच्या रक्षणार्थ ॥ २ ॥
गुरुमाऊली, होऊ कसे उतराई ।
श्री. अरुण खोल्लम
ठेवूनी मस्तक तव चरणी ॥
झालो मी कृतार्थ माऊली ।
घेशी मजसी तुजपाशी ॥ ३ ॥
टीप १ - परात्पर गुरु डॉ. आठवले
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सिंहासनावर बसलेले छायाचित्र पाहून वरील आरती आपोआप सुचली.)
- श्री. अरुण खोल्लम, पुणे (५.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn