Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मडगाव (गोवा) येथे झालेल्या अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत पुरो(अधो)गामी वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार

     मडगाव (गोवा) येथील रवींद्र भवन येथे पुरो(अधो)गाम्यांची अभिव्यक्ती दक्षिणायन परिषद १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत विविध वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार पुढे देत आहोत.
केवळ हिंदूविरोधासाठी स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेल्या आणि 
८० कोटी हिंदु लोकसंख्या असलेल्या या देशावर मूठभर पुरोगामीच 
स्वतःची तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी अन् राष्ट्रवादी विचारसरणी लादत आहेत !
(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र देशासाठी घातक !’ - स्वाती जोशी
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९२० वर्षापासून हिंदु राष्ट्राचा विचार मांडला आहे. हिंदु राष्ट्र देशासाठी घातक आहे आणि बुद्धीजिवींसाठी हे एक आव्हान आहे. वीर सावरकर यांनीही हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतांना हिंदु राष्ट्रात इतर धर्मियांना रहाण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. गोळवलकर गुरुजी यांचीही विचारसरणी एकांगी आहे आणि या ठिकाणी दुसर्‍या विचारसरणीला स्थान नाही, असे हिंदुद्वेषी विचार पुरो(अधो)गामी स्वाती जोशी यांनी व्यक्त केले. परिषदेत १९ नोव्हेंबर या दिवशी ‘देशभक्ती, राष्ट्रवाद आणि मानवता’ या विषयावर स्वाती जोशी बोलत होत्या.
     स्वाती जोशी पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदुत्ववादी संघटना त्यांचे विचार इतरांवर लादण्यासाठी पुढील क्लृप्त्या करत असतात. या संघटना प्रथम ‘हिंदु सोडून इतर (म्हणजे अल्पसंख्यांक) आपले शत्रू आहेत’, असे भासवतात आणि त्यांच्या विरोधात द्वेष पसरवतात. गुजरातमध्ये २००२ या वर्षी झालेली दंगल याचे बोलके उदाहरण आहे. ‘हिंदु सोडून इतरांपासून स्वतःचे संरक्षण म्हणजे राष्ट्रप्रेम’ असे वातावरण निर्माण करतात. सध्या विविध विद्यापिठांमध्ये होत असलेल्या घडामोडी पुरो(अधो)गाम्यांना आशेचा किरण वाटत आहे. कन्हैया कुमार यांनी सामाजिक न्यायासाठी उभारलेली लढाई हे याचे एक उदाहरण आहे.’’ (राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेला ‘देशके तुकडे होंगे’ म्हणणारा कन्हैया आशेचा किरण वाटणार्‍या पुरोगाम्यांची विचारसरणी आणखी काय वेगळी असणार ? अशा राष्ट्रघातकी प्रवृत्तींना देशातून हाकलून लावावे, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे ! - संपादक)
अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत जाणवलेला विरोधाभास
      परिषदेत एका सभागृहात चाललेल्या चर्चासत्रात वेद, वैदिक संस्कृती हे थोतांड असल्याचे चर्चासत्रातील वक्ते सांगत होते, तर दुसर्‍या सभागृहात चालू असलेल्या चर्चासत्रात वक्ता त्यांचे सूत्र मांडण्यासाठी उपनिषदांचा दाखला देत होते.
असे आहे, तर सहस्रो वर्षांचा इतिहास लाभलेल्या वेदांचे साधे 
भाषांतरही करू न शकणारे पुरोगामी तेवढे शहाणे आहेत, असे म्हणायचे का ?
(म्हणे) ‘वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार म्हणणारे वेडे !’ - रावसाहेब कसबे
     वेदांमध्ये काहीच तत्त्वज्ञान नाही. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार म्हणणारे हे वेडे आहेत. वेदांचे मी भाषांतर केलेले आहे. उपनिषद हा एक चांगला ग्रंथ आहे. या देशात क्रांती आणि प्रतिक्रांती असेे चक्र अनेक दशकांपासून चालू आहे. जेव्हा नामदेवांनी भक्ती आंदोलन चालू केले, तेव्हा नामदेव वरचढ होणार म्हणून ज्ञानेश्‍वराला पुढे करण्यात आले. यालाच ‘जातीव्यवस्था’ म्हणतात. या वेळी रामदासांनी प्रतिक्रांती केली, असे जात्यंध उद्गार पुरो(अधो)गामी रावसाहेब कसबे यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी ‘धार्मिकतेच्या विरोधात लढा’ या विषयावर बोलतांना काढले. (ज्येष्ठ असलेल्या संतांविषयी किमान आदरार्थी बोलण्याचीही सभ्यता न पाळणे, हेच पुरोगामीत्व आहे का ? - संपादक)
काश्मीरप्रश्‍न सोडवण्यावर जम्मू येथील पुरो(अधो)गामी 
खलीद हुसेन यांची मानवतेच्या नावावर पाकप्रेमी आणि देशद्रोही उपाययोजना
(म्हणे) ‘काश्मीरमधील पाकिस्तानचा हिस्सा 
पाकिस्तानला देऊन टाकणे हाच काश्मीर समस्येवरील उपाय !
अशा फुटीरतावाद्यांना पाकमध्ये कायमचे हाकलून लावणे, 
हाच खरे तर काश्मीर समस्येवर सर्वांत रामबाण उपाय आहे !
     काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी काश्मीरमधील पाकिस्तानचा हिस्सा पाकिस्तानला देऊन टाकला पाहिजे. पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये वहाणारी नदी ही सीमा मानून नदीच्या दुसर्‍या बाजूचा भाग पाकिस्तानला, तर नदीच्या उर्वरित बाजूचा भाग भारताने घ्यावा. ‘ग्लेशियर’च्या (हिमकड्यांच्या) प्रदेशात ज्या ठिकाणी जेथे गवतही उगवत नाही, तेथे पहार्‍यांसाठी भारताने सैनिक नेमले असून हे हास्यास्पद आहे, असे अभ्यासहीन अन् पाकधार्जिणे उद्गार खलीद हुसेन यांनी परिषदेत ‘काश्मीर - गोळ्यांच्या पलीकडे’ या विषयावरील चर्चासत्रात मांडले. या चर्चासत्रातील अन्य एक सदस्य तथा काश्मीर येथील शफी शौक यांनीही उपरोल्लेखित विचारांशी सहमत असल्याचे म्हटले.
खलीद हुसेन यांचे आतंकवादी बुरहान वानी याला समर्थन
     आतंकवादी बुरहान वानी हा चांगल्या घरण्यातील मुलगा होता. त्याचे आई-वडील सुशिक्षित आहेत. त्याच्या मोठ्या भावाला आतंकवादी बुरहान वानी लहान असतांना मारण्यात आले आणि या घटनेमुळे बुरहान वानी आतंकवादी गटात सहभागी झाला. बुरहान वानी याला का मारण्यात आले ? तो चांगला नव्हता, तर त्याच्या मरणाला २ लक्ष लोकांची गर्दी का जमली ? (हुसेन यांच्यासारखे फुटीरतावादी जर आतंकवाद्यांच्या मृत्यूनंतरही एकत्र जमून शासनावर दबाव आणतात, याचा अर्थ ‘आतंकवादी चांगला होता’, असे म्हणायचे कि ‘त्याचे समर्थक वाईट आहेत’, असे म्हणायचे ? याकूब मेननच्या हत्येनंतरही अशाच प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते ! आतंकवाद्यांना समर्थन देणारे लक्षावधींच्या संख्येने आहेत, हे देशासाठी लज्जास्पद आहेत ! - संपादक)
      खलीद हुसेन यांनी भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांना ‘मुशर्रफसाहब’ असे संबोधित केले.
हिंदू संतांच्या वक्तव्यानंतर कधी दंगली झाल्या, ते पालेकर यांनी सांगावे ? 
विखारी फुत्कार काढणार्‍या मुल्ला-मौलवींवर नाही, तर हिंदू संतांवर नाहक 
टीका करणारे, पाकप्रेमाचे भरते आलेले पालेकर चित्रपटांतून काय दाखवत असतील ?
चित्रपट आणि नाटके यांना ‘सेन्सॉरशिप’ करण्यालाच आव्हान देणे आवश्यक ! 
- अमोल पालेकर, चित्रपट निर्माता
     मडगाव - बाबा रामदेव बोलल्यानंतर दंगली होतात; मात्र त्यांना बोलण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत आणि केवळ चित्रपट निर्मात्यांना ‘सेन्सॉर बोर्डा’चे नियम लागतात. हा कोणता न्याय आहे ? चित्रपट निर्माते करण जोहर यांनी कायदेशीरदृष्ट्या पाकिस्तानच्या कलाकाराला घेऊन चित्रपट काढला आणि या चित्रपटालाही विरोध झाला. पंतप्रधान मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिठी मारू शकतात आणि चित्रपट निर्मात्यांना मात्र बंधने का ?, असा प्रश्‍न चित्रपट निर्माते अमोल पालेकर यांनी उपस्थित केला. ते २० नोव्हेंबर या दिवशी ‘सेन्सॉरशिप’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. या चर्चासत्राचे प्रमुख पद आत्मजित सिंग यांनी भूषवले. या चर्चासत्रात पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांचीही उपस्थिती होती.
धर्मद्रोही अमोल पालेकर यांचे हनुमानाचे अवनाम करणारे वक्तव्य
      मी ‘मारुतीच्या हाती शॅम्पेन’ या नावाने एक चित्रपट काढला आणि चित्रपटाच्या नावामुळे याला विरोध झाला. ‘हा चित्रपट देवाच्या विरोधात आहे. त्यामुळे हा चित्रपट दाखवू देणार नाही’, असे विरोधकांचे म्हणणे होते. आज अनेकांच्या भावना तकलादू झाल्याने त्यांच्या भावना लगेच दुखावतात. आपण यातून यशस्वी माघार घेण्यासाठी चित्रपटाचे नाव पालटून ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ असे केले. (धर्मशास्त्र जाणून न घेता केवळ हिंदूविरोधासाठी अशी कृत्ये करणार्‍यांचे चित्रपट पहायचे का, हे आता हिंदूंनी ठरवावे ! - संपादक)
रत्नमाला दिवकर यांचे ‘उचचली जीभ अन् लावली टाळ्याला’ अशा प्रकारचे वक्तव्य !
(म्हणे) ‘मासिक पाळीच्या कालावधीत महिलांना 
दिल्या जाणार्‍या वागणुकी संदर्भात कायदा करणे आवश्यक !’
     स्त्रियांना मासिक पाळी ही निसर्गाने दिलेली देणगी आहे; परंतु मासिक पाळीच्या नावाखाली स्त्रिला समाजात दुय्यम वागणूक दिली जाते. पाळीच्या नावाखाली तिची घराच्या एका कोपर्‍यात बसवून छळवणूक केली जात आहे. तिने तीन दिवस आंघोळ नाही किंवा कोणत्याही वस्तूला स्पर्श करायचा नाही, अशी अट घातलेली असते. या स्त्रियांचा मानसिक छळ केला जातो. या पार्श्‍वभूमीवर नेपाळच्या धर्तीवर भारतातही मासिक पाळीच्या विरोधात कायदा होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मासिक पाळीच्या विरोधात गोव्यात काम करणार्‍या रत्नमाला दिवकर यांनी केले. (स्त्रियांच्या मासिक धर्माच्या कालावधीत त्यांच्या शरीरात वाढलेल्या रज-तम गुणांचा इतरांना त्रास होऊ नये, तसेच त्या कालावधीत तिला विश्रांती मिळावी, या कारणाने या कालावधीत महिलांनी अन्यत्र कुठेही स्पर्श करू नये, असे शास्त्र सांगते ! हिंदु धर्माने यात महिलांची सोयच पाहिलेली आहे ! हे लक्षात न घेता पुढारलेपणाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करण्याचा अधिकार दिवाकर यांना कुणी दिला ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn