Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची मुसंडी !

राज्यात भाजप क्रमांक १ वर 
     मुंबई, २८ नोव्हेंबर - राज्यातील मिनी विधानसभा म्हणून गणल्या गेलेल्या १४७ नगरपरिषदा आणि १८ नगरपंचायती यांचे निकाल लागले असून गत निवडणुकांच्या तुलनेत भाजप-शिवसेना महायुतीने राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात अनेक नगरपालिकांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे गड ढासळले आहेत. या वेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट झाली होती, यात सगळ्यात अधिक भाजपचे ५२ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भाजप ५१, शिवसेना २५, काँग्रेस २४, राष्ट्रवादी काँग्रेस १४, तर इतर स्थानिक आघाड्या २८ नगरपरिषदांमध्ये विजयी झाल्या आहेत. 

 राज्यातील अन्य घडामोडी... 
१. परळी-वैजनाथ नगरपरिषदेत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाने ३३ पैकी २७ जागा जिंकल्या असून भाजपच्या पदरात केवळ ४ जागा पडल्या आहेत. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे मोठ्या मतांनी विजयी झाल्या आहेत. 
२. सिंधुदुर्ग-कोकणात नारायण राणे यांनी परत वर्चस्व मिळवले आहे. देवगड नगरपालिकेत काँग्रेसचे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उमेदवारांनी सर्वच्या सर्व म्हणजे १७ जागा जिंकल्या आहेत. ३. शहादा नगरपालिका निवडणुकीत एम्आयएम्चे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेतील २४ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा या एम्आयएम्ने जिंकल्या आहेत. येथे भाजपला ७, शिवसेनेला ४, काँग्रेस 
३, राष्ट्रवादी काँग्रेसला १, तर १ अपक्ष निवडून आला आहे. (केवळ धर्मावर आधारीत राजकारण करणार्‍या एम्आयएम् पक्षाचे उमेदवार निवडून येणे हे धक्कादायक आहे ! - संपादक) 
४. वर्धा-आर्वी नगरपरिषदेत भाजपने २३ पैकी २३ जागा जिंकल्या. 
५. रोहा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पोटपोडे अवघ्या सहा मतांनी विजयी झाले आहेत. संतोष पोटफोडे यांना ४ सहस्र ३५४, तर अपक्ष उमेदवार समीर शेडगे यांना ४ सहस्र ३४८ मते पडली आहेत. 
६. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून सेनेला १७, भाजपला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला, तर २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे श्री. राहुल पंडित हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. 
७. जळगाव येथे १२ नगरपालिकांपैकी ४ जागी भाजप, ३ शिवसेना, अन्यांना ३ जागा मिळाल्या आहेत. २ जागी निकाल लागणे बाकी होते. 
८. कराड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. तेथे नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या रोहिणी शिंदे या विजयी झाल्या आहेत. 
९. सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीने २२ जागा मिळवत सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नगर विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ६ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी सौ. माधवी कदम या विजयी झाल्या आहेत. सातारा शहरात सनातन संस्थेचे हितचिंतक आणि भाजपचे श्री. विजयकुमार अजित काटवटे हे विजयी झाले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn