Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्विस बँकांमध्ये खाती असणार्‍या काही भारतियांची नावे मिळाली !

         नवी देहली - भारत सरकारला स्वित्झर्लण्डमधील बँकांमध्ये खाती असणार्‍या काही भारतियांची नावे मिळाली आहेत. यात शेअर मार्केटमध्ये ३ आस्थापने आहेत. तसेच रिअल इस्टेट आस्थापनाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, देहलीत रहाणार्‍या माजी सरकारी अधिकार्‍याची पत्नी, दुबईत स्थायिक झालेला इनव्हेस्टमेंट बँकर, भारतातून पळून गेलेला व्यापारी अन् त्याची पत्नी आणि संयुक्त अरब अमिरातच्या एका आस्थापनाचा यात समावेश आहे. तसेच काही उद्योगपतींचीही नावे आहेत. काही वर्षांपूर्वी ते भारतात रहायचे; पण आता विदेशात स्थायिक झाले आहेत. या लोकांनी पनामा आणि ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमधील आस्थापनांची नावे देऊन स्विस बँकेमध्ये खाती उघडली आहेत.
         गेल्या आठवड्यात भारत आणि स्वित्झर्लण्ड यांनी एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे २०१८ नंतर दोन्ही देशांतील खात्यांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यापूर्वीही स्वित्झर्लण्डने काही खात्यांची माहिती भारताला दिली होती. या खात्यावरून संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn