Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक आणि हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांची राष्ट्र अन् धर्मद्रोही पार्श्‍वभूमी !

आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर केंद्रशासनाने ५ वर्षांची बंदी घातली आहे. अनेक जिहाद्यांनी नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊन आतंकवादी कारवाया केल्याचे समोर आले आहे. नाईक यांनी जिहादचा पुरस्कार करण्यासमवेतच अनेक वेळा हिंदु धर्माच्या विरोधात धादांत खोटी आणि निराधार विधाने करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेेत. तसेच अनेक वादग्रस्त विधानांसाठी ते कुप्रसिद्ध आहेत. त्याचा वेध घेणारा हा लेख !
डॉ. झाकीर नाईक अशा मुसलमान धर्मगुरूंधील एक आहेत, ज्यांचा प्रभाव नवीन पिढीतील मुसलमान युवकांवर स्पष्टपणे दिसून येतो. वर्ष १९६५ मध्ये मुंबई येथे जन्मलेले डॉ. झाकीर नाईक स्वत: एमबीबीएस् डॉक्टर असल्याचे सांगतात. प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरामध्ये धार्मिक पुस्तकांचा संदर्भ देत (कथित) वैधता प्रदान करून दिशाभूल करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना इतर धर्मगुरूंपेक्षा वेगळे स्थान आहे.
१. डॉ. झाकीर नाईक हे जगभरातील सुन्नी मुसलमान युवकांसाठी जणू नायकच !
    प्राप्त माहितीनुसार डॉ. झाकीर नाईक वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी वर्ष १९९१ मध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. तेव्हापासून ते जगभर फिरून कुराण आणि इस्लाम यांविषयी भाषणे देत आहेत. सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी मागील २० वर्षांत ३० हून अधिक देशांमध्ये २ सहस्रांहून अधिक सभा घेतल्याचे सांगितले जाते. जगातील सुन्नी मुसलमान युवकांसाठी डॉ. झाकीर नाईक हे जणू नायकच होत. वर्ष २०१२ मध्ये बिहारच्या किशनगंजमध्ये त्यांच्या सभेला लक्षावधी लोक उपस्थित होते.
२. प्रक्षोभक भाषणांमुळे अनेक देशांमध्ये बंदी !
    शरिया कायदा लागू करणे आणि इतर धर्मांची निंदा करणे या त्यांच्या वृत्तीमुळे इतर धर्मांमध्येच नाही, तर त्यांच्याच धर्मातील मंडळींकडूनही त्यांच्यावर टीका केली जाते. अशा वक्तव्यांमुळे त्यांना इंग्लंड आणि कॅनडा यांसारख्या अनेक देशांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
३. डॉ. झाकीर नाईक यांची काही वादग्रस्त वक्तव्ये ! 
१. वर्ष २०१० मध्ये एका सभेत डॉ. झाकीर नाईक यांनी सांगितले होते, मी सार्‍या मुसलमानांना सांगतो की, आम्ही मुसलमानांनी आतंकवादी बनले पाहिजे. दरोडेखोरासाठी पोलीस हा एक आतंकवादीच असतो.
२. जर ओसामा बिन लादेन इस्लामच्या शत्रूंशी लढत आहे, तर मी त्याच्या समवेत आहे !, या वक्तव्याचे स्पष्टीकरण देतांना डॉ. झाकीर नाईक म्हणाले की, अमेरिका जगातील सर्वांत मोठा आतंकवादी आहे आणि ओसामाने त्याच्या विरोधात युद्ध केले; म्हणून मी असे म्हणालो.
३. कुराण मुसलमान पुरुषांना त्यांच्या समवेत महिलांना ठेवण्यास अनुमती देते. इसिसमध्ये सध्या महिलांशी होत असलेल्या व्यवहारावरून आपल्याला याची कल्पना येते.
४. इस्लामच असा धर्म आहे, ज्यामुळे जगात शांती येऊ शकते. जो या इस्लामला सोडेल, त्याला ठार मारले पाहिजे. या वक्तव्यामुळे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर अनेक देशांनी प्रवेशबंदी लादली आहे.
५. इस्लाम हा सर्व धर्मांपेक्षा महान धर्म आहे. इस्लामी देशांमध्ये बिगर-इस्लामी धर्माच्या नागरिकांना त्यांचे धार्मिक स्थळ बनवण्याची अनुमती देता कामा नये.
६. टेनिस खेळतांना सानिया मिर्झा हिने व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत. कोणताही भारतीय नेता स्वत:च्या मुलीला बीच व्हॉलीबॉल (समुद्रकिनारी तोकड्या कपड्यांत खेळण्यात येणारा खेळ) खेळायला पाठवणार नाही.
७. जेथे मुलींचा कौमार्यभंग होऊ शकतो, अशा शाळांमध्ये मुलींना पाठवू नका. अशा शाळांवर बंदी घातली पाहिजे. मुलींना सोन्याचे दागिने घालण्याची अनुमती देऊ नका.
८. महिला स्वातंत्र्याच्या नावावर पश्‍चिमेकडचे देश स्वत:च्या आया-बहिणींना विकत आहेत.
९. मुसलमान जगात पत्नीला मारझोड करणे, हे वाईट नाही.
१०. शारीरिक संबंधांच्या वेळी निरोध वापरणे, हे मानवाची हत्या करण्यासारखे आहे.
११. शरियत कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍यांना दगडाने ठेचून मारणे योग्य आहे.
१२. समलिंगींना ठार मारले पाहिजे, असे कुराण सांगते.
१३. मुसलमानांनी अल्ला व्यतिरिक्त अन्य कोणाचेही साहाय्य घेता कामा नये.
(संदर्भ : लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉम आणि महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम ही संकेतस्थळे)
४. प्रभु श्रीरामचंद्र आणि सीतामाता यांची अपकीर्ती करून 
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन करणारे आधुनिक गझनी डॉ. झाकीर नाईक !
    कट्टर मुसलमान असलेले डॉ. झाकीर नाईक हे हिंदुद्वेष्टेही आहेत. प्रभु श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. या वक्तव्याला आधार देण्यासाठी ते रामायणातील काही श्‍लोकांचा संदर्भ देतात. याविषयी वाराणसी येथील स्वामी अभयानंदतीर्थ यांनी खंडनही केले आहे. हिंदूंच्या देवतांवर होणार्‍या टीकेचे धर्माभिमानी हिंदूंना खंडन करता यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील www.hindujagruti.org/news/9509.html या लिंकवर डॉ. झाकीर नाईक यांनी प्रभु श्रीरामचंद्राविषयी उधळलेली मुक्ताफळे आणि स्वामी अभयानंदतीर्थ यांनी केलेले खंडन यांचे भाषांतर येथे देत आहोत. त्याचा अभ्यास करून धर्माभिमानी हिंदू प्रभु श्रीरामचंद्रांवर टीका करणार्‍यांची तोंडे गप्प करतील, अशी अपेक्षा आहे.
४ अ. रामायणातील श्‍लोकांच्या अर्थाचा अनर्थ करून श्रीरामचंद्रांना मांसाहारी ठरवण्याचा आटापिटा करणारे डॉ. झाकीर नाईक ! : इस्लाम अ‍ॅण्ड कंपॅरिटिव्ह रिलिजन या संस्थेचे डॉ. झाकीर नाईक आणि डॉ. शोएब सय्यद हे राम मांसाहार करायचा असा खोटा प्रचार करत आहेत. अयोध्याकांडाच्या २०, २६ आणि ९४ व्या अध्यायात श्रीराम वनवासात जात असतांना त्यांनी कौसल्यामातेला मी सुग्रास मांसाहार वर्ज्य करीन, असे वचन दिल्याचा उल्लेख आढळतो. श्रीराम मांसाहार वर्ज्य करण्याचे वचन देतात, त्या अर्थी ते पूर्वी मांसाहार करत असत, असा दावा
  डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे. सीतेने रामाला हरिणाची शिकार करण्यास सांगितले, ते हरिणाचे मांस खाण्यासाठीच असा दावाही त्यांनी केला आहे. राम जर मांसाहार करायचे, तर मग हिंदू मांसाहार का करू शकत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.
४ आ. स्वामी अभयानंद तीर्थ यांनी केलेला प्रतिवाद
१. प्रभु श्रीरामचंद्रांनी वनवासात मांसाहार करणार नाही, असे मातेला वचन देण्याचा अर्थ पूर्वी ते मांसाहार करत होते, असा होत नाही ! : वाल्मिकी रामायणामध्ये ५३७ अध्याय आहेत. त्यामध्ये २४ सहस्र श्‍लोक आहेत. यामध्ये केवळ दोन श्‍लोकांमध्ये मांसाहाराचा उल्लेख आहे. रामायणात खालील श्‍लोक आढळतो.

चतुर्दश हि कर्षाणि कत्स्यामि किजने कने ।
मधुमूलफलैर्जीकन् हित्का मुनिकद् आमिषम् ॥ - वाल्मीकिरामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग २०.१७, श्‍लोक २९.१५

अर्थ : प्रभु श्रीरामचंद्र सांगतात, मी वनवासात एखाद्या साधूप्रमाणे जीवन जगेन. मी मांसाहार वर्ज्य करीन आणि फक्त कंदमुळे, फळे आणि मध यांचे सेवन करेन.
त्यांच्या या विधानावरून अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्र मांसाहार करायचे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. या श्‍लोकामध्ये हित्वा आमिषाम् ।, असा शब्द वापरण्यात आला आहे. आमिषाम् म्हणजे मांस आणि हित्व म्हणजे नाही, असा या शब्दांचा अर्थ आहे. वैदिक संस्कृतीमध्ये पुत्र जेव्हा दूरच्या देशात जातो, तेव्हा तो आपल्या आईला मी धर्मानुसार वागेन, मी मांसाहार करणार नाही, दारूला स्पर्श करणार नाही, असे वचन देतो. याचा अर्थ घरी असतांना तो मांसाहार करायचा, दारू प्यायचा, असा होत नाही. रामायणातील कुठल्याच अध्यायामध्ये राम मांसाहार करायचा, असा उल्लेख नाही. ९४ अध्यायातील बहुतांश श्‍लोकांमध्ये प्रभु श्रीरामचंद्रांनी चित्रकूट जंगलातील फळे, झाडे, फुले यांची स्तुती केली आहे. या श्‍लोकांमध्ये कुठेही मांसाहाराचा उल्लेख नाही.
२. मांसाहारासाठी नव्हे, तर खेळण्यासाठी हरिण मिळावे, याकरता सीतामातेने प्रभु श्रीरामचंद्रांना ते पकडण्याची विनंती करणे : अरण्यकांडाच्या ४३ व्या अध्यायामध्ये सीतामातेला सुवर्ण मृग दृष्टीस पडते. ती रामाकडे ते पकडून आणण्याची मागणी करते. त्याविषयी खालील श्‍लोक आहे.

आर्यपुत्राभिरामोऽसौ मृगो हरति मे मनः ।
आनयैनं महाबाहो क्रीडार्थं नो भकिष्यति ॥ - वाल्मीकिरामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ४३/४१, श्‍लोक १०/९
अर्थ : त्या सुंदर हरिणाने माझे मन मोहित केले आहे. ते हरिण खेळण्यासाठी पकडून आणा.

पुढील आठ अध्यायांमध्ये सीतामाता त्या हरिणाविषयी वर्णन करतांना हे हरिण अयोध्येत नेल्यानंतर त्याला पाहून अयोध्यावासियांना आनंद होईल असे सांगतांना आढळते. श्रीराम आणि सीता यांना अन्न म्हणून ते हरिण हवे होते, असा कुठल्याही श्‍लोकामध्ये उल्लेख आढळत नाही.
३. श्रीराम मांसाहारी नव्हते, हे दर्शवणारे आणखी एक उदाहरण
   सुंदरकांडातील ३६ व्या अध्यायामध्ये सीतामाता आणि हनुमान यांचा संवाद आहे. त्या वेळी हनुमान सीतामातेला सांगतात, रावणाचा वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र लंकेत येतील. तुमच्या विरहामुळे प्रभु श्रीराम दुःखी झाले आहेत. असे असतांनाही त्यांनी मद्य अथवा मांसाहार याला स्पर्श केलेला नाही.
डॉ. झाकीर नाईक यांना इतर धर्मियांच्या धर्मग्रंथांवर टीका करणे आवडते. डॉ. झाकीर नाईक यांनी त्यांना मिळालेले अर्धवट ज्ञान त्यांच्यापाशी ठेवावे आणि हिंदु धर्माचा खोटा प्रचार करू नये.
- स्वामी अभयानंदतीर्थ, वाराणसी
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn