Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कर चुकवणार्‍या आणि काळा पैसा असणार्‍या लोकांविरुद्ध ३० डिसेंबरनंतर कठोर पावले उचलली जातील ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

      बेळगाव, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - भ्रष्टाचार ही देशातील मोठी समस्या आहे. कर चुकवणार्‍या आणि काळा पैसा असणार्‍या लोकांविरुद्ध ३० डिसेंबरनंतर कठोर पावले उचलली जातील, अशी चेतावणी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिली. १३ नोव्हेंबर या दिवशी येथील ‘कर्नाटक लिंगायत एज्युकेशन केएल्ई सोसायटी’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले की, 
१. ८ नोव्हेंबरला रात्री गरीब शांतपणे झोपला होता, तर श्रीमंत झोपेच्या गोळ्या घेण्यासाठी बाजारात गेला; मात्र तेथे देणारे कोणी नव्हते.
२. मी आधीच सांगितले होते की, या कामासाठी ५० दिवस हवे आहेत. लोकांना विश्‍वासात घेऊन काम केले. 
३. २०२० मध्ये टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये ‘लिंगायत एज्युकेशन सोसायटी’ने सुवर्णपदक मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो. जगातील सर्वोत्तम १०० विद्यापिठांमध्ये भारतातील एकदेखील विद्यापीठ नाही, ही चिंताजनक गोष्ट आहे. येणार्‍या काळात या समस्येचे निराकरण करू. 
४. काँग्रेसने चार आणे बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही प्रश्‍न विचारले का ? मग ते आमच्या या निर्णयावर टीका का करत आहेत ? काँग्रेसचे धाडस केवळ चार आणे बंद करण्याइतकेच आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn