Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वप्नात विशालकाय मनुष्यरूपातील १ आणि पक्षीरूपातील ५ - ६ गरुड दिसणे अन् श्रीविष्णु आणि त्याचे वाहन गरुड यांच्या सध्याच्या काळातील कार्याविषयी ज्ञान मिळणे

 
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
३१.१०.२०१६ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. या स्वप्नात एक विशालकाय गरुड मनुष्यरूपात दिसला. हा गरुड मनुष्यरूपात उभा राहून उडायला लागला. (पक्षी आडवे उडतात, हा गरुड उभा उडत होता.) तो वर जायला लागल्यानंतर अवकाशात ५ - ६ पक्षीरूपातील शुभ्र रंगाचे गरुड भ्रमण करतांना दिसले. त्यानंतर स्वप्नातच श्रीहरि विष्णूचे वाहन असलेल्या या गरुडाविषयी भगवंताने पुढील ज्ञान दिले.
   मनुष्य देह हे वाहन, तर त्याचा चालक आत्मा असतो. त्याप्रमाणे माझा देह हा विष्णुअवतार श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले यांचे वाहन, म्हणजे गरुडासम आहे. बाह्यस्वरूप देहावर स्वार होऊन स्वस्वरूप श्रीगुरु (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तेच कर्तेकरविते आहेत. जसे श्रीहरि गरुडावर आरूढ होऊन ब्रह्मांडे भ्रमण करत कार्य करतात, तसे श्रीगुरु माझ्या देहरूपी गरुडावर आरूढ होऊन त्यांचे धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत. त्याचसम सर्वसाधकांचे देह हे गरुडस्वरूप असून श्रीहरि विष्णु म्हणजे साक्षात् परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे त्यांवर स्वार होऊन धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत. ही जाणीव साधकांमध्ये जागृत करून, ही अनुभूती देत या योगे ते सर्व साधकांचा उद्धार करत आहेत.
- (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्र्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn