Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भगवंताने एका साधिकेला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगितलेली सूत्रे अन् तिला त्यासंबंधी आलेल्या अनुभूती

सौ. अंजली कणगलेकर
   साधारण दीड-दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) सारणी लिखाण करतांना प्रक्रिया हा शब्द २-३ वेळा आला. तेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू, त्यांच्यामुळे निर्माण होणारे प्रसंग, त्यांमुळे होणारी साधनेची हानी आणि मनावर येणारा ताण यांची जाणीव झाली. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या साधकांकडूनही मी पुष्कळदा ताण आला, हे शब्द ऐकल्याचे आठवले. त्या वेळी या प्रक्रियेसंबंधी मनात आलेले प्रश्‍न, त्यांची भगवंताने दिलेली उत्तरे आणि त्यासंबंधी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. भगवंताने प्रक्रियेचा अर्थ सांगितल्यावर स्वतःवरील काळ्या
शक्तीचे आवरण दूर होऊन पुष्कळ हलकेपणा आणि आनंद जाणवणे
प्रश्‍न : प्रक्रिया म्हणजे काय ?
उत्तर : प्रक्रिया म्हणजे स्वतःतील भगवंताला प्रकट करण्याची क्रिया.
अनुभूती : भगवंताने हे उत्तर देताक्षणी मला स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर झाल्याचे जाणवले आणि पुष्कळ हलकेपणा आणि आनंदही जाणवला.
२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन तसेच स्वतःतील भगवंताला
प्रकट करण्याची क्रिया यांचा उच्चार करतांना अनुक्रमे
त्रासदायक आणि आनंदाची स्पंदने जाणवणे
   त्या वेळी लगेच माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन तसेच स्वतःतील भगवंताला प्रकट करण्याची क्रिया असे आलटून-पालटून म्हटले गेले. तेव्हा स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन असे म्हणतांना मला पुष्कळ जडपणा, नकारात्मकता अन् स्वतःवर काळ्या शक्तीचे आवरण येत असल्याचे जाणवले. तसेच स्वतःतील भगवंताला प्रकट करण्याची क्रिया असे म्हणतांना मला हलकेपणा, प्रकाशमान आणि आनंदाची स्पंदने जाणवली.
प्रश्‍न : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन तसेच स्वतःतील भगवंताला प्रकट करण्याची क्रिया या दोन्हींमध्ये कृती तीच करायची असूनही त्यांतील स्पंदनांमध्ये भेद का जाणवतो ?
उत्तर : कृती तीच करायची असली, तरी पहिल्या शब्दांमध्ये नकारात्मक शब्दांत सकारात्मक सूत्र आहे आणि दुसर्‍या शब्दांमध्ये सकारात्मक शब्दांत सकारात्मक सूत्र आहे.
३. भगवंताने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ही स्वतःला
निर्मळ बनवण्याचा अन् सतत अंतर्मुख राहून गोविंदाच्या
अनुसंधानात रहाता येण्यासाठी करायचा प्रयत्न आहे, असे सांगणे
    भगवंताने वरील उत्तराचे विवेचन करतांना सांगितले, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्हणजे २ - ४ दिवसांची किंवा मासांची क्रिया नाही. ही तर आपण शेवटच्या श्‍वासापर्यंत राबवायची क्रिया आहे, म्हणजेच हा स्वतःला निर्मळ बनवण्याचा आणि सतत अंतर्मुख राहून गोविंदाच्या अनुसंधानात रहाता येण्यासाठी करायचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण जेवढे सकारात्मक राहू, तेवढे उत्साहाने आणि आनंदाने ही क्रिया होणार आहे अन् आपल्याला तणावरहित जीवन जगणे शक्य होणार आहे.
४. भगवंताने प्रक्रियेविषयी ज्ञान दिल्यापासून स्वतःच्या
आनंदात आणि भावावस्थेत वाढ झाल्याचे लक्षात येणे
    हे सर्व क्षणार्धात् झाले; मात्र या जाणिवेने मला पुष्कळ शांत आणि हलके वाटले. माझ्या आनंदात वाढ झाली आणि प्रयत्नांची गुणात्मकता वाढली. त्यामुळे शरणागत आणि कृतज्ञता भावात रहाण्याच्या अवधीतही वाढ झाली.
५. कृतज्ञता
    हे गोविंदा, तूच प्रश्‍न निर्माण केलेस, उत्तरेही तूच दिलीस आणि या जिवाच्या प्रयत्नांना दिशा देऊन ते करवूनही तूच घेत आहेस. सगळा काही तूच तू आहेस. या तूमध्ये या जीवातील उरला-सुरला मी विरून जावा आणि तूच तू रहावास, हीच प्रार्थना !
- श्रीचरणी समर्पित,
सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn