Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमेरिकेत हिजाब घातलेल्या महिलेला आतंकवादी संबोधले !

     जगभरात मुसलमान पोशाख घातलेल्या व्यक्तींना आतंकवादी संबोधले गेल्याच्या घटना पुन: पुन्हा घडतांना दिसून येतात. याला उत्तरदायी कोण आहे ? त्यांनी जिहादी आतंकवादाला पाठीशी न घालता आतंकवादाचा कठोरपणे विरोध करणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल !
     लॉस एन्जलिस - अमेरिकेत एका दुकानात एका महिलेला हिजाब (कापडाने डोळे सोडून तोंडवळा झाकणे) घातलेले पाहून अन्य एका ग्राहकाने तिला आतंकवादी संबोधले आणि देशाबाहेर जाण्यास सांगितले. केआरक्यूई वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मेक्सिकोमधील अल्बुकर्कच्या स्मिथ्स दुकानात घडली. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यावर हिजाब परिधान करणार्‍या महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले जाते.
     बर्नी लोपेज नावाच्या ग्राहकाने सांगितले, मी सोडा खरेदी करण्यासाठी खालच्या माळ्यावर गेलो असतांना अचानक मी एका महिलेला हिजाब घातलेल्या महिलेवर ओरडतांना बघितले. ती म्हणाली, आमच्या देशातून चालती हो, तू येथील नाही, तू आतंकवादी आहेस. लोपेजने सांगितले की, त्यावेळी सर्व लोक स्तब्ध झाले आणि हिजाब घातलेल्या महिलेच्या बचावासाठी धावले. स्मिथ्सच्या कर्मचार्‍यांनी त्या महिलेचे संरक्षण केले आणि तिला तिच्या कारपर्यंत सोडले. अमेरिकी दूरचित्रवाहिनीने स्मिथ्सच्या व्यवस्थापकाशी या घटनेविषयी विचारल्यावर त्यांनी याला पुष्टी दिली.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn