Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्री गणेशयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि गणेशयागाची जाणवलेली वैशिष्ट्ये

कु. तृप्ती गावडे
१. गणेशचतुर्थी नंतर घरून आश्रमात परत येत 
असतांना वाहनचालकाच्या वेगाने गाडी चालवण्यामुळे होणारा 
अपघात टळणे अन् त्यामुळे श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
     १३.९.२०१६ या दिवशी गणेश चतुर्थीनंतर मी घरून रामनाथी आश्रमात परत येत होते. तेव्हा गाडीत बसायला मला पुष्कळ भीती वाटत होती. गाडीत चढल्यावर मला बसायला जागाही नव्हती; म्हणून मी परत खाली उतरले. त्यानंतर मनात विचार आला, गर्दी असली, तरी आपण आताच जाऊया आणि मी पुन्हा तशीच गाडीत बसले. गाडीत बसल्यावर जयघोष आणि श्रीकृष्णाचा श्‍लोक मला प्रयत्नपूर्वक म्हणावा लागत होता. त्यानंतर वाहनचालक गाडी इतक्या वेगाने चालवत होता की, त्याचे त्याला भान नव्हते. त्यामुळे त्याचा प्रवाशांनाही त्रास होत होता. गोव्यात पोचतांना गाडीचा मोठा अपघात होणार होता; परंतु चालकाने जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि माझी देवाला प्रार्थना झाली देवा, यातून तूच आम्हाला वाचवलेस. आश्रमात पोचल्यावर गणेशयाग चालू होता. माझे भीतीचे प्रमाण अल्प झाले होते. त्या वेळी माझ्या मनात या यागामुळेच आमच्यावरचे अपघाताचे संकट टळले, असा विचार आला आणि श्रीगणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
२. १४.९.२०१६ या दिवशी आश्रमात श्रीगणेशयाग चालू होता. 
तो पहाण्याची मला संधी मिळाली. त्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 
अ. यागातील ज्वाळा पहातांना पृथ्वीवरील सर्व काळी शक्ती जळून नष्ट होत आहे, असे मला वाटत होते.
आ. यागाच्या ठिकाणी सर्व देवता उपस्थित आहेत, असे दिसले. 
इ. याग तीन दिवसांचा असला, तरी त्यातील चैतन्य आणि शक्ती पृथ्वीवर अखंड कार्य करणार आहे, असे जाणवले.
ई. हा याग चालू झाल्यापासून वायुदेवतेच्या शक्तीमुळे यागातील धुराने पूर्ण पृथ्वीची शुद्धी होत आहे, असेही जाणवत होते.
उ. आकाश आणि प्रकाश या देवताही यागातील चैतन्य पृथ्वीवर पसरवण्यासाठी साहाय्य करीत आहेत, असे जाणवत होते. 
ऊ. पृथ्वीवर वाढलेल्या रज-तमाचे प्रमाण न्यून करण्यासाठी या यागाच्या माध्यमातून भगवंताने त्याची शक्ती प्रकट केली आहे, असे जाणवले. 
ए. यागातील ज्वाळा बाहेर पडतांना त्या सजीव वाटत होत्या आणि त्यांच्याकडे एकटक पहात रहावे, असे वाटत होते.
ऐ. आमच्या शक्तीचे कार्य कुठून चालू करू, अशी प्रार्थना यागातील ज्वाळा ईश्‍वराला करीत असल्याचे जाणवले. त्यामुळे ज्वाळा ईश्‍वरेच्छेने कार्य करणार आहेत, असे जाणवले. 
३. स्वप्नात श्री गणेशाने त्याच्या हातातील पाश दाखवून तो कार्य करणार असल्याचे सांगणे
     यागाच्या दुसर्‍या रात्री मला एक स्वप्न पडले होते. स्वप्नात श्री गणेशाने मला त्याच्या हातातील पाश दाखवला. तेव्हा त्याने मला सांगितले, या पाशाचे तोंड ज्या दिशेला असेल, त्या दिशेला मी प्रथम कार्य करीन, म्हणजे त्या दिशेची काळी शक्ती नष्ट करीन. नंतर श्री गणेश म्हणाला, देवतांच्या हातातील शस्त्र ज्या दिशेला तोंड करून ठेवलेले असते. त्या दिशेला त्या कार्य करतात. 
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn