Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘आयबीएन्’ समूहाने काढून टाकले, त्या वेळी कोणत्याही पत्रकाराने आम्हाला पाठिंबा दिला नाही’ !

सनातनद्वेष्टे पत्रकार निखिल वागळे आणि पत्रकार सागरिका घोष यांचे नक्राश्रू !
      मडगाव, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - अंबानी समूहाने ‘आयबीएन्’ समूहाची मालकी घेतल्यानंतर आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला; मात्र त्या वेळी कोणत्याही पत्रकाराने आम्हाला पाठिंबा दर्शवला नाही. पत्रकारांना आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असे नक्राश्रू सनातनद्वेष्टे पत्रकार निखिल वागळे आणि ‘आयबीएन्’मध्ये पूर्वी उच्च पदावर असलेल्या पत्रकार सागरिका घोष यांनी ढाळले. (स्वतःवर अन्याय झाल्यावर वागळे यांच्यासारख्या पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते. यांना पाहिजे ते करू देणे ही यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ! सनातनचे अभय वर्तक यांना चर्चेला बोलावून त्यांना बोलायला न देता नंतर जाण्यास सांगितले, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले होते ? - संपादक) मडगाव येथे अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेच्या अखेरच्या दिवशी ‘प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. आज पत्रकारिता भाजप आणि प्रसारमाध्यमांचे मालक यांची बटीक झाली आहे. एक केंद्रीयमंत्री प्रसारमाध्यमांच्या मालकांना वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्रे यांचा भाजपला पाठिंबा देणाराच संपादक असावा, असे निर्देष करू लागले आहेत, असा आरोप या दोघांनी या वेळी केला. या चर्चासत्राचे अध्यक्षपद दैनिक ‘लोकमत’चे गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी भूषवले.
      निखिल वागळे म्हणाले, ‘‘आम्ही नेहमी स्वयंप्रेरित पत्रकारिता करतो. पत्रकारिता नेहमी तटस्थ असावी, असे सांगितले जाते. पत्रकारिता ही तटस्थ नव्हे, तर परिस्थितीजन्य असली पाहिजे. (पत्रकारिता स्वयंप्रेरित किंवा तटस्थ नव्हे, तर राष्ट्रहितैषी आणि समाजहितैषी असावी. पत्रकारिता कशी असावी, हेच स्पष्ट नसल्याने अनेक वर्षे पत्रकारिता करूनही या विषयावर अशी चर्चासत्रे आयोजित करावी लागतात. - संपादक) पूर्वी आम्ही २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा या काँग्रेस कारकीर्दीत झालेल्या घोटाळ्यांच्या विरोधात लिहित होतो आणि त्या वेळी काँग्रेसचा आम्हाला विरोध होत असे; (आयबीएन्-लोकमत वाहिनीमध्ये राहून दर्डा समूहाचा सहभागाचा आरोप असलेल्या कोळसा घोटाळ्यावर लिहिणे शक्य तरी आहे का ? वागळे यांच्या या वक्तव्यावर कसा विश्‍वास ठेवायचा ? - संपादक) मात्र आता मोदी शासन आमची नांगीच ठेचायचा प्रयत्न करते. आज मोदी शासनाच्या विरोधात लिहिण्यास पत्रकार घाबरतात. पत्रकारांना असे केल्यास कैदेत जावे लागेल किंवा मरणाची भीती वाटते. (मोदी शासनावर असे गंभीर आरोप करणार्‍या वागळे यांच्याकडे या संदर्भात एकतरी पुरावा आहे का ? - संपादक) 
     पत्रकार सागरिका घोष म्हणाल्या की, ‘भाजपविरोधात आज काहीही लिखाण केल्यास जनता ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून आम्हाला वाईट बोलतात, तर काही वेळा ‘प्रेस्टीट्यूट’ असे संबोधतात. तसेच न्यायालयीन दावाही लावला जातो. ‘एन्डीटीव्ही’वर घातलेली बंदी हे यासंबंधीचे बोलके उदाहरण आहे. पूर्वी पत्रकार केवळ पत्रकारितेचेच काम करत होते, तर आता पत्रकार विज्ञापनेही आणण्याचे काम करतात आणि यामुळे पत्रकारांना तटस्थपणे लिहिता येत नाही.
दैनिक ‘लोकमत’चे संपादक राजू नायक यांचे नक्राश्रू !
(म्हणे) ‘पत्रकारितेचा आवाज दाबण्यासाठी माझ्याविरोधात सनातनने ५ दावे दाखल केले !’
      पत्रकाराचा आवाज दाबण्यासाठी न्यायालयीन खटलेही दाखल केले जातात. माझ्याविरोधात सनातनने निरनिराळे ५ न्यायालयीन दावे दाखल केले आहेत. (आधी खोटी वृत्ते द्यायची आणि नंतर वैध मार्गाने न्यायालयीन दावे दाखल केल्यावर त्या विरोधातही ओरड करायची अन् असे करूनही संविधानाचे आपणच रक्षक असल्याप्रमाणे टेंभा मिरवायलाही मोकळे, या वृत्तीचे नायक ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn