Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील पथकरवसुली पूर्ण झाल्याने ती तातडीने कायमची बंद करावी ! - विवेक वेलणकर

३१ ऑक्टोबरलाच अपेक्षित पथकर वसुली पूर्ण ! 
जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन लक्ष घालून पथकरवसुली बंद करेल का ? 
     पुणे, २९ नोव्हेंबर -पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या उभारणीसाठी केलेल्या व्ययापोटी कंत्राटदार आयडियल रोड बिल्डर्स (आयआर्बी) आस्थापनाला वर्ष २०१९ पर्यंत एकूण २ सहस्र ८६९ कोटी रुपये पथकरवसुली करण्याचे अधिकार राज्य शासनाने दिले होते. त्या रकमेची पूर्ण वसुली ३१ ऑक्टोबर या दिवशीच पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्या मार्गावरील पथकर वसुली तातडीने बंद करावी, अशी मागणी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली. 

     वेलणकर पुढे म्हणाले की, उलट 'आयआरबी' आस्थापनाने अनुमती दिलेली रक्कम वसूल होऊनही पथकर वसुली चालू ठेवली आहे. त्यामुळे त्यांना अधिकच्या काही कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ झाला असल्याची माहिती कंत्राटदारानेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ( एम्एस्आरडीसी ) संकेतस्थळावर दिली आहे. (हे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या लक्षात का येत नाही ? याला महामंडळाचा भोंगळ कारभार म्हणायचा कि पाट्याटाकूपणा ? कि यामागे अन्य काही 'अर्थ'कारण आहे ? - संपादक) त्यामुळे सध्या नोटाबंदीमुळे बंद असलेला पथकर हा ३ डिसेंबरनंतर पुन्हा चालू होणार नाही, याची दक्षता शासनाने घ्यावी. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn