Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अनपेक्षित अडथळे येऊनही श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या कृपेने बेलग्रेड (युरोप) येथील साधकांनी गुरुपौर्णिमेची सेवा पूर्ण करणे

१. अपुर्‍या साधकसंख्येत गुरुपौर्णिमेच्या सेवांचे नियोजन करावे लागणे 
     ‘या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत बेलग्रेड येथील काही साधक झाग्रेब येथे झालेल्या कार्यशाळेसाठी गेले असल्याने ते गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्री (१८.७.२०१६) उशिरा पोचले. काही साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास होत असल्याने ते सेवा करू शकत नव्हते. त्यामुळे अल्प साधकसंख्येत गुरुपौर्णिमेच्या सेवांचे नियोजन करण्यात आले.
२. पाच युवा साधिकांची मासिक पाळी अनपेक्षितपणे 
आल्याने सर्व सेवांचे दायित्व वयस्कर साधकांवर येणे 
     वातावरणातील वाईट शक्तींनी या महोत्सवात अडथळे निर्माण केल्यामुळे आणि त्यातच ५ युवा साधिकांची मासिक पाळी अनपेक्षितपणे काही दिवस अगोदर किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आली. त्यांच्यापैकी ४ जणींना पुष्कळ त्रासही होत होता. त्यामुळे त्या कोणत्याही सात्त्विक वस्तू किंवा अन्नाला स्पर्श करू शकत नसल्याने प्रसाद बनवणे, प्रसाद वाटणे, फुलांची सजावट आणि पूजेची सिद्धता करणे यांसारख्या सेवा त्या करू शकल्या नाहीत. त्यामुळे शेवटच्या क्षणी सेवांचे नियोजन पालटावे लागून सर्व सेवांचे दायित्व (६३ ते ६९ वर्षे या वयोगटातील) ५ वयस्कर साधकांवर आले. त्यामुळे शारीरिक सेवा वाढल्याने वयस्कर साधकांना पुष्कळ त्रास झाला. कार्यक्रमाच्या शेवटी साधिकांचे शरीर, मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण आल्याने २ साधिकांची सेवा करण्यास आवश्यक ती शारीरिक अन् मानसिक स्थिती उरली नाही. गुरुपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर गुरुपूजेचा सराव करतांना अधिक दमल्यामुळे एका साधिकेला ‘चक्कर येऊन पडणार’, असे वाटत होते. 
     हे सर्व त्रास पहाता असे लक्षात आले की, वातावरणातील वाईट शक्तींच्या धूर्त कारस्थानामुळे युवा साधिकांना सेवेपासून दूर ठेवून शेवटच्या क्षणी सर्व सेवा वयस्कर साधकांवर आल्याने ते करण्यात त्यांना अडचणी आल्या. स्वच्छतेच्या सेवेत साहाय्य करण्यास सांगूनही काही युवा साधिका अपुरे आध्यात्मिक उपाय करून उर्वरित वेळ केवळ गप्पा मारत होत्या. अधिक सेवांमुळे वयस्कर साधिकांची धावपळ होत असल्याचे जणू त्यांना भानच राहिले नव्हते. यावरून सूक्ष्मातून साधकांचे विभाजन झाल्याचे जाणवले. केवळ श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या कृपेमुळे गुरुपौर्णिमेच्या सेवा पूर्ण होऊ शकल्या.’
- बेलग्रेड येथील साधक, सर्बिया, युरोप. (२४.७.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn