Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार !

     नवी देहली - केंद्र सरकारने सरकारी रुग्णालये, पेट्रोलपंप, रेल्वे, विमानतळ, दूधकेंद्र, औषधांची दुकाने यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवली आहे. आता येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. टोलनाक्यावरील वसुलीसंदर्भातील पुढील निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात येणार आहे.
     निवृत्तीवेतनधारकांना वार्षिक हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
     लवकरच एटीएम्मधून ५०० आणि २ सहस्र रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
नोटा बँकांपर्यंत पोचवण्यासाठी वायूदलाचे साहाय्य !
      केंद्र सरकारकडून नवीन नोटा बँकांपर्यंत पोचवण्यासाठी भारतीय वायूदलाचे साहाय्य घेण्यात येत आहे. सध्या नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई चालू करण्यात आली आहे. येथे ५०० रुपयांच्या नोटेसोबतच १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई चालू आहे. आठवडाभरात नोटांचा पुरवठा वाढवण्याची सरकारची योजना आहे. या नोटा तितक्याच वेगाने बँका आणि एटीएम् केंद्रांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता असल्याने रिझर्व्ह बँकेला वायूदलाकडून साहाय्य करण्यात येत आहे. वायूदलाचे ग्लोबमास्टर विमान आणि हेलिकॉप्टर्स नोटांच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत देशभरातील बँकामधील चलनाचा तुटवडा संपुष्टात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
१८ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी !
     राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफीची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. ही मुदत १४ नोव्हेंबरला संपुष्टात येणार होती. आता वाहनांना १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विनाटोल प्रवास करता येणार आहे.
बँकांबाहेरील रांगांवर आक्रमणाची शक्यता
     नोटा रहित केल्यानंतर अधिकोषांतून पैशांचा व्यवहार करण्यासाठी देशभरात मोठ्या रांगा लागल्या आहेत. या परिस्थितीचा लाभ उठवून जिहादी आतंकवादी या गर्दीवर आक्रमण करण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नोटा रहित करण्याच्या निर्णयाचा परिणाम झालेल्या काही समाजकंटकांकडूनही शांतता भंग करण्यासाठी आक्रमण करण्याची शक्यता आहे. या माहितीनंतर केंद्र सरकारने दक्षतेची चेतावणी दिली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn