Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सत्संग, नामजप करतांना आरंभी भावाच्या स्तरावर प्रयोग केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होणे

      सप्टेंबर २०१६ मध्ये देहली आणि वाराणसी सेवाकेंद्र येथे पू. (डॉ.) पिंगळेकाका यांनी आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी आढाव्याच्या आधी आमच्याकडून भावजागृतीचा एक प्रयोग करवून घेतला. धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । आपने हमे जो अपना लिया । आपकी कृपा से जो भिगो दिया, धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । या ओळी प्रत्येक साधकाला मनातल्या मनात दोन वेळा म्हणायला सांगितल्या. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना सामूहिकरित्या या दोन ओळी म्हणायला सांगितल्या आणि दोन्ही वेळेस काय जाणवले, ते सांगायला सांगितले. त्यामुळे आमचा भाव जागृत झाला आणि चांगल्या अनुभूतीही आल्या. त्या दिवशी व्यष्टी साधनेचा आढावाही भावाच्या स्तरावर झाला. असा प्रयोग सलग तीन दिवस आम्ही केला. त्यामुळे साधकांच्या उत्साहात वाढ झाली. साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
      अशा प्रकारे भावाचे अन्य प्रयोग आपण करून त्यात सातत्य ठेवल्यास त्याचा आपल्याला लाभ होईल. असे भावाचे प्रयोग आपण बैठक, सत्संग, नामजप करतांना आरंभी केले, तर आपल्या सर्वांचाही भाव जागृत होईल आणि सेवाही भावपूर्ण होईल. 
१. देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती
अ. मनातल्या मनात भावप्रयोग करतांना सहजपणा नव्हता. माझे ध्यान केवळ भजनावरच होते. सामूहिकरित्या भजन म्हणतांना सहजपणा होता. मन शांत आणि स्थिर होते अन् संघटितपणा वाटत होता. - कु. मनीषा माहूर
आ. मनातल्या मनात भावप्रयोग करतांना शरिराला कंप येत होता आणि आत्मविश्‍वास न्यून वाटत होता. सामूहिकरित्या भावप्रयोग करतांना शब्द अंतर्मनातून येत होते आणि शरणागत भाव वाटत होता. - सौ. केतकी येळेगावकर
इ. मनातल्या मनात भावप्रयोग करतांना स्वतःकडेच लक्ष होते, त्यामध्ये आर्तता नव्हती. सामूहिक भावप्रयोग करतांना सर्वच साधक याचकभावाने प.पू. गुरुदेवांचे दर्शन घेत आहेत आणि सर्वांमध्ये उत्साह आहे, असे वाटत होते. - कु. राशि खत्री 
ई. मनातल्या मनात धन्य धन्य हम हो गये गुरुदेव । हे भावगीत गातांना प.पू. गुरुदेव समोर बसले आहेत. त्यांचे तेथे अस्तित्व आहे, याची जाणीव अधिक होती. सामूहिक भावप्रयोग करतांना अस्तित्वाची जाणीव न्यून होती. या भावगीतामुळे दिवसभरात गुरुदेवांची आठवण अधिक झाली. - श्री. प्रणव मणेरीकर 
उ. मनातल्या मनात भावगीत गातांना पुष्कळ कृतज्ञता वाटली, तर सामूहिक भावगीत गातांना प.पू. गुरुदेव विराट रूपात दिसत होते आणि तेव्हा शरणागत भावाची अनुभूती येत होती. - श्री. निरंजन चोडणकर 
ऊ. मनातल्या मनात भावगीत गातांना मला माझ्या वैयक्तिक जीवनात घडलेले प्रसंग आठवले आणि आज मी त्यांच्याच कृपेने साधनेत आहे, असे वाटले. सामूहिक गीत गातांना हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे आणि त्यामुळे सर्व साधक कृतज्ञता व्यक्त करत आहेत, असे वाटले. - श्री. कार्तिक साळुंके 
ए. मनातल्या मनात भावगीत गातांना बैठकीत प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व आहे आणि वरून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य येत आहे, असे दिसले. सामूहिक भावगीत गातांना प.पू. गुरुदेवांच्या भावसोहळ्याची आठवण झाली आणि सर्व साधक देवतांच्या रूपात पुष्पवृष्टी करत आहेत, असे दिसले. - कु. पूनम चौधरी 
२. वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती
अ. मनातल्या मनात भावगीत गातांना भावजागृती झाली आणि शेवटचा भाग मी पूर्ण म्हणू शकलो नाही. सामूहिकपणे भावगीत गातांना सगळे साधक एकाच गतीने भावऊर्जेसह गुरुदेवांकडे जात आहोत, असे वाटले. - श्री. नीलेश सिंगबाळ 
आ. वैयक्तिक जपाच्या वेळी मी एकटाच प.पू. गुरुदेवांच्या चरणी आहे, असे वाटले. सामूहिक जपाच्या वेळी सर्व साधकांचा एकाच वेळी कृतज्ञता भाव जागृत झाल्याचे वाटत होते आणि चैतन्य ग्रहण होत होते. - श्री. नीलय पाठक
इ. वैयक्तिकपणे भावगीत म्हणतांना शरणागत भाव जागृत होऊन कृतज्ञता वाटत होती. सामूहिकपणे भावगीत म्हणतांना साधकांकडे मोठ्या प्रमाणात शक्ती आणि चैतन्य येत आहे अन् ती त्यांना मिळत आहे, असे वाटले. त्यानंतर मन निर्विचार झाले. - सौ. प्राची जुवेकर 
ई. मनातल्या मनात भावगीत गातांना भावजागृती होत होती, तर सामूहिकरित्या भावगीत म्हणतांना प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवत होते. - सौ. प्राची मसूरकर
उ. मनातल्या मनात भावगीत गातांना भावजागृती झाली आणि गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती, तर सामूहिकरित्या भावगीत म्हणतांना पुष्कळ आनंद जाणवत होता. - कु. जया सिंह 
ऊ. मनातल्या मनात भावगीत गातांना मन अगदी शांत झाले आणि डोक्याच्या डाव्या बाजूला संवेदना जाणवली. सामूहिकरित्या भावगीत म्हणतांना पुष्कळ रडू आले आणि हमसून हमसून रडावे, असे वाटले. - कु. दुर्गा चौबे 
ए. मनातल्या मनात भावगीत गातांना कृतज्ञताभाव वाढला आणि आनंद जाणवत होता. सामूहिकरित्या गीत गातांना मोठ्या प्रमाणात चैतन्य जाणवत होते आणि आनंद जाणवत होता. - श्री. दशरथ मसूरकर 
ऐ. मनातल्या मनात भावगीत गातांना संपूर्ण शरीर रोमांचित झाले, अनाहतचक्र प्रकाशमय झाले आणि शरीर हलके वाटले. मनाला शांत वाटून आनंद जाणवला. सामूहिकरित्या भावगीत गातांना आतून कृतज्ञताभाव जागृत झाला आणि मन भरून आले.
- सौ. भाग्यश्री आणेकर
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn