Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पळालेला खलिस्तानी आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू याला देहलीत अटक !

     नवी देहली - पंजाबच्या पतियाळ येथील नाभा कारागृहावर १० खलिस्तानी आतंकवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन आक्रमण करून कारागृहातून पळवून नेलेला खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आतंकवादी हरमिंदरसिंह मिंटू याला देहलीमध्ये अटक करण्यात आली आहे. कैद्यांना पळून जाण्यास साहाय्य करणार्‍यांपैकी परमिंदरसिंह याला पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून अटक केली. परमिंदरच्या चौकशीअंती पोलिसांनी हरमिंदरसिंह मिंटू याला अटक केली. परमिंदरकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली. हरमिंदरबरोबर पळालेल्या गुरप्रीत सिंह, विक्की डोंगरा, नितिन देओल, विक्रमजीत सिंह आणि विक्की या ५ कैद्यांचा अद्याप शोध चालू आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn