Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई विमानतळावर २ कोटी रुपयांचे सोने अन् ७.५० लाखांची रक्कम शासनाधीन !

सोनेतस्करीची घटना म्हणजे सुरक्षायंत्रणेचे अपयशच ! 
     मुंबई - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या २ कोटी किमतीचे सोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ नोव्हेंबरला रात्री पोलिसांनी शासनाधीन केले. या प्रकरणी रायपूर येथील नवरत्न गोलेचा या प्रवाशाला अटक केली असून त्याच्याकडून सोन्यासह ७.५० लाख रुपयांची रक्कमही मिळाली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून आरोपीला ९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

१. रायपूरहून मुंबईकडे येणार्‍या विमानातून प्रवास करत असलेल्या एका प्रवासाकडे सोने असल्याची माहिती विमानतळ कस्टम्स्चेे हवाई गुप्तवार्ता पथकाचे प्रमुख उपायुक्त प्रज्ञाशील जुमले यांच्या पथकाला माहिती मिळाली. त्यांनी पाळत ठेवून मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या साहित्याची झडती घेतल्यावर त्यांना बॅगेत हे सोने आढळले. 
२. सोन्याची नाणी, बिस्किटे, तुकडे अन् दागिने यांच्या रूपात हे सोने होते. या सोन्यावर परदेशी बनावटीची खूण आढळली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn