Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘सनातन संस्था धार्मिक तेढ निर्माण करते, संस्थेच्या सदस्यांचा हत्यांमध्ये सहभाग, विशेष न्यायालयाद्वारे संशयितांचा तपास करावा !’

खोटारडेपणावर आधारित मडगाव येथील अभिव्यक्ती 
दक्षिणायन परिषदेत सनातन संस्थेच्या विरोधातील ठराव अग्रक्रमांकावर !
      सर्वाधिक अल्पसंख्यांक असलेल्या गोव्यात, तसेच भारतात कुठेही सनातनमुळे धार्मिक तेढ निर्माण झाल्याचे एकही उदाहरण नाही, तसेच सनातनच्या एकाही साधकाचा कुठल्याही हत्येत सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नाही. असे असतांना असा ठराव करणार्‍यांनी त्यांची वैचारिक दिवाळखोरीच घोषित केली आहे. यांना विचारवंत तरी कसे म्हणणार ?
      मडगाव, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - मडगाव येथे झालेल्या अभिव्यक्ती दक्षिणायन परिषदेत २० नोव्हेंबर या दिवशी शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या ठरावात सनातन संस्थेच्या विरोधातील ठराव अग्रक्रमांकावर होता. या ठरावात म्हटले आहे की, गोव्यात मुख्य कार्यालय असलेली सनातन संस्था धार्मिक तेढ निर्माण करते आणि संस्थेच्या सदस्यांचा डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कुलबर्गी यांच्या हत्यांमध्ये सहभाग आहे. या तिन्ही हत्यांमधील दोषींना त्वरित अटक करावी आणि जलद न्याय मिळण्यासाठी त्यांचे विशेष न्यायालयाद्वारे अन्वेषण करण्यात यावे. परिषदेच्या समारोप सत्रात प्रभाकर तिंबले यांनी हे ठराव वाचून दाखवले. 
     परिषदेत घेण्यात आलेले अन्य काही देशविरोधी आणि बेगडी पुरोगामित्व सिद्ध करणारे ठराव पुढीलप्रमाणे आहेत. 
१. कला, संस्कृती, साहित्य, चित्रपट आणि प्रसारमाध्यमे यांचे स्वातंत्र्य कायद्याच्या आधारे दाबले जाऊ नये. हल्लीच शासनाने ‘एन्डीटीव्ही’ विरोधात केलेली कारवाई, अभिनेता निवडीला अनुसरून चित्रपट निर्मात्याला धमकी देणे हे लोकशाहीविरोधी आहे. (‘एन्डीटीव्ही’चे प्रसारण हे राष्ट्रविरोधी होते. दक्षिणायन परिषदेत राष्ट्रद्रोही सहभागी आहेत का ? - संपादक) आणि यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जात आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, असे विचारवंतांना वाटत नाही का ? संवेदनशील प्रकरणांत अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्याच्या नादात देशहिताशी तडजोड केली जाऊ शकत नाही, हे न समजणारे म्हणे विचारवंत ! - संपादक) 
२. गोव्यातील धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. (गोव्यातील धार्मिक सलोखा परराज्यातील अंधश्रद्धा निर्मूलनवाले, पुरोगामी, तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि धर्मांध यांच्यामुळेच बिघडत आहे. दक्षिणायन परिषदेतील वक्त्यांची हिंदुत्वाच्या विरोधातील भडकावू भाषणे पाहिल्यास ती अभिव्यक्तीच्या नावाखाली गोव्यातील जनतेला भडकवून घालणारा एक कार्यक्रम होता, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे गोमंतकियांनी अशा कार्यक्रमांना थारा न देणेच श्रेयस्कर ! - संपादक) 
३. काश्मीरचा प्रश्‍न हा पूर्णपणे पाकिस्तानमुळे निर्माण झालेला आहे असे मानल्यास त्यावर तोडगा निघू शकणार नाही, तर हा प्रश्‍न सोडवण्यासाठी काश्मिरी जनतेशी सुसंवाद साधावा. (काश्मिरी जनतेला भारतात रहायचे आहे; पण पाकपुरस्कृत आतंकवादी दक्षिणायन परिषदेत सहभागी झालेल्या काही देशद्रोह्यांसारख्या तेथील फुटीरतावाद्यांना पैशांचे आमिष दाखवून भडकवतात आणि काश्मीर अस्थिर करतात. त्यामुळे पाक आणि त्याने पुरस्कृत केलेले आतंकवादी यांचा बीमोड करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. - संपादक) 
४. मुसलमान महिलांना अनुसरून कोणताही व्यक्तीगत स्तरावर कायदा करतांना संविधानाला प्राधान्य दिले पाहिजे. (या ठरावावरून पुरोगाम्यांचे बेगडी पुरोगामित्व उघड झाले आहे. हीच गोष्ट हिंदु महिलांच्या संदर्भात असती, तर पुरो(अधो)गाम्यांनी असा ठराव संमत केला असता का ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn