Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांना ४६० कोटी रुपयांचा तोटा !

नक्षलवाद्यांच्या कारवाया न्यून होणार !
       नवी देहली - केंद्र सरकारने ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम काळा पैसा साठवून ठेवणार्‍यांवर झाला, त्याचबरोबर पाक आणि दाऊद इब्राहिम यांच्यावरही झाला आहे. त्यासमवेत भारतातील नक्षलवाद्यांनाही तो झाला आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांना या निर्णयामुळे ४६० कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यामुळे नक्षलवाद्यांच्या कारावायांमध्ये घट होेण्याची शक्यता आहे.
       गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांना शस्त्र, गोळ्या, स्फोटके आदी साहित्य विकत घेण्यासमवेतच त्यांना देण्यात येणार्‍या पैशांवरही परिणाम झाला आहे.
       यासाठीच नक्षलवाद्यांकडे ही रक्कम होती. आता ती रद्दी झाली आहे. 
       बिहार, झारखंड, छत्तीसगड, बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी राज्यांत नक्षलवादी अधिक सक्रीय आहेत. ते रोकड देऊनच शस्त्रे खरेदी करत होते. यासाठी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात येत होता. हा पैसा ते जंगलात झाडाखाली लपवून ठेवतात आणि वर सांकेतिक भाषेत खूण करतात ती केवळ त्यांच्या कमांडरला आणि पैशाची देवाणघेवाण करणार्‍यालाच लक्षात येते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn