Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘गोव्यातील महिलांना समान वागणूक द्या !’ - मुसलमान धर्मगुरूंचा सरकारला अनाहुत सल्ला

सरकारला सल्ला देणार्‍यांनी ते स्वतःच्या धर्मातील 
महिलांना किती समान वागणूक देतात, हे सांगावे !
     बेळगाव - केंद्रात आणि गोव्यात दोन्ही ठिकाणी भाजप सरकार आहे. जर सरकारला मुसलमान महिलांचा एवढाच कळवळा आला असेल, तर त्यांनी आधी गोव्यातील महिलांना समान वागणूक मिळण्याकडे लक्ष द्यावे, असा अनाहूत सल्ला मुसलमान धर्मगुरु हझरत सय्यद फझलुल्ला साबरी चिश्ती यांनी दिला आहे. केंद्र सरकारने शरीयत कायद्याला विरोध करणारे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आणि समान नागरी कायद्यावर जनमत अजमावण्याची मोहीम चालू केली. त्याविरुद्ध जनमत सिद्ध करण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून सय्यद फझलुल्ला हे एका पत्रकार परिषदेस संबोधित करत होते. या वेळी कर्नाटकाचे मुख्य काझी हझरत मौलाना असल मिस्बाही हेही उपस्थित होते.
     गोव्यात एखाद्या विवाहित महिलेला वयाच्या ३० वर्षापर्यंत मुलगा झाला नाही, तर तिच्या पतीला दुसरा विवाह करण्याची अनुमती आहे; मात्र ज्या मुसलमानांची विवाह नोंदणी गोव्यात झाली आहे, अशांना बहुपत्नीत्वास मनाई आहे. हा दुटप्पीपण आहे, असे सय्यद फझलुल्ला म्हणाले. (गोव्यात समान नागरी कायदा आहे. त्यामुळे कोणालाही त्यातून सूट देण्यात आलेली नाही, हे फझलुल्ला यांना माहिती नाही का ? - संपादक)
    केंद्र सरकारने शरीयत कायद्याला विरोध करणारे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यामागे देशात समान नागरी कायदा आणण्याचे षड्यंत्र आहे. समान नागरी कायदा हा घटनेच्या कलम ४४ चा भंग ठरतो. म्हणून सर्व मुसलमान त्याला विरोध करत आहेत. मुसलमान महिलांनाही तलाक मागता यावा, असे प्रावधान शरीया कायद्यात आहे, असे फझलुल्ला म्हणाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn