Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ४३८ पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष पथकाचे (एस्आयटीचे) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात सनातनचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर ४३८ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणी यापूर्वी सनातनचे साधक आणि संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

     कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांना ९० दिवसांत आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट करावे लागते. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटी) डॉ. तावडे यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून २ सप्टेंबर या दिवशी त्यांना कह्यात घेतले होते. या प्रकरणात ३० नोव्हेंबरला ९० दिवसांची मुदत संपणार होती. तत्पूर्वी पोलिसांनी हे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) डॉ. तावडे यांना १० जून या दिवशी अटक केली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn