Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई येथे माय होम इंडियाच्या वतीने यंदाचा ७ वा ओ.एन्.इ. इंडिया पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - माय होम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या ७ वर्षांपासून ओ.एन्.इ. इंडिया पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार उत्तर पूर्व भागातील राष्ट्रीयत्व टिकवण्यासाठी जे लोक प्रामाणिकपणे स्वत:च्या क्षेत्रात कार्यरत असतात, त्यांना देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार आसाम येथील डॉ. बिरुबाला राभा यांना समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आला. २३ नोव्हेंबरला दादर येथील वीर सावरकर स्मारक सभागृहात हा सोहळा साजरा झाला. या वेळी माय होम इंडियाचे संस्थापक श्री. सुनील देवधर हे उपस्थित होते.
      आसाममध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर बहिष्कार घालण्यात येतो. डॉ. राभा यांनी या विरोधात २०११ मध्ये मिशन बिरुबाला ही चळवळ उभारली. विविध क्षेत्रांतील मुलांचे, सामाजिक संस्थांचे साहाय्य घेऊन महिलांवरील हे अत्याचार थांबवण्याचे कार्य त्यांनी अवलंबले आहे.
      या वेळी माय होम इंडियाचे संस्थापक श्री. सुनील देवधर यांना सनातनने प्रकाशित केलेला हिंदु राष्ट्र का हवे? हा इंग्रजी भाषेतील ग्रंथ हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी भेट दिला.
माय होम इंडियाचे राष्ट्रीय कार्य
     १. देशाच्या उत्तर पूर्व भागात जे भारतीय आहेत त्यांच्याकडे देशातील अन्य भागातील लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन निराळा असतो. या लोकांमध्ये तेही भारतीयच असल्याची भावना निर्माण करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
     २. गेल्या ३ वर्षांपासून घर सोडून पळून गेलेल्या, हरवलेल्या किंवा अपहरण करण्यात आलेल्या मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवण्याचे कार्य ही संस्था करते.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn