Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

४ आतंकवादी ठार, तर १ मेजर आणि २ सैनिक हुतात्मा !

  • केवळ भाषणबाजी करण्याने पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट होत नाही, हे प्रतिदिन भारतीय सैनिकांच्या हुतात्मा होण्याच्या घटनेवरून तरी संरक्षणमंत्र्यांच्या लक्षात येणार आहे का ?
  • सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यावरून स्वतःची पाठ थोपटून घेत बसण्यापेक्षा पाककडून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील आक्रमणे ठोस पावले उचलून रोखावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • जम्मू येथील सैन्याच्या छावणीवर आतंकवादी आक्रमण
  • सांबा येथे २ आतंकवादी ठार ! 
        श्रीनगर - जम्मूतील नगरोटा येथे सैन्याच्या छावणीवर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १ मेजर आणि २ सैनिक हुतात्मा झाले, तर काही सैनिक घायाळ झाले आहेत. सैनिकांनी या वेळी ४ आतंकवाद्यांना ठार केले. २९ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे आक्रमण करण्यात आले. आतंकवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर गोळीबार केला. येथे छावणीच्या परिसरात हे आतंकवादी लपून बसले होते. जम्मूपासून २० किलोमीटर अंतरावर नगरोटा भाग आहे. सैन्याच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय येथे आहे. 
हुतात्म्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघे ! 
        हुतात्मा झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर येथील मेजर कुणाल मुन्ना गोसावी (वय २८ वर्ष) आणि नांदेड येथील सैनिक संभाजी यशवंत कदम (वय ३५ वर्षे) यांचा समावेश आहे. 
        संभाजी कदम मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. ३५ वर्षीय संभाजी यशवंत कदम हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी होते. कदम कुटुंबातील ते एकमेव कमवते सदस्य होते. त्यांच्या वीरमरणाचे वृत्त कळवल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. संभाजी कदम यांच्या पश्‍चात पत्नी, ३ वर्षांची मुलगी, आई आणि वडील आहेत. 
        मेजर कुणाल गोसावी ४ वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत.
        आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळ असलेल्या सांबा आणि चमलियाल भागातही आतंकवाद्यांनी आक्रमण केले. सांबा भागात सीमा सुरक्षा दलाच्या गस्तीपथकावर गोळीबार करण्यात आला. यात एक सैनिक घायाळ झाला, तर २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn