Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने मारली बाजी !

      कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - नगरपालिका निवडणुकीत येथे मुरगूडसह पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव आणि कुरुंदवाड नगरपालिकेत मतदारांनी सत्तांतर घडवत प्रस्थापितांना घरी बसवले. या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.
  • मुरगूडमध्ये शिवसेनेने प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर घडवत नगरपालिकेची सत्ता आणि नगराध्यक्षपदही जिंकले. मलकापूर आणि पन्हाळा नगरपालिकेत जनसुराज्य पक्षाने सत्तांतर घडवले. या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आणि सत्ताही जनसुराज्य पक्षाने पटकावली.
  • मलकापूरमध्ये भाजप आणि स्वाभिमानीची साथ होती. पन्हाळ्याचे विद्यमान नगराध्यक्ष आसिफ मोकाशी जनसुराज्य पक्षाचे असले, तरी या वेळी ते विरोधात होते. मोकाशी यांनी आमदार सत्यजित पाटील यांच्या साहाय्यावर आघाडी केली; मात्र त्यांचा पराभव झाला. जनसुराज्य पक्षाने एकहाती सत्ता मिळवली.
  • पेठवडगावमध्येही युवक क्रांती आघाडीने (सालपे गट) काँग्रेसप्रणीत यादव आघाडीचा धुव्वा उडवून नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या १३ जागा जिंकून सत्ता मिळवली.
  • जयसिंगपूरमध्ये नगराध्यक्ष ताराराणी-भाजपचा आणि सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची अशी स्थिती झाली. जिल्ह्यातील सर्वांत मोठी नगरपालिका असणार्‍या इचलकरंजी येथे नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. अलका स्वामी निवडून आल्या; मात्र भाजपचे आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांचे वर्चस्व असूनही नगरपालिकेची सत्ता मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn