Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली केरळ मधील कु. निकिता गांधी (वय १६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. निकिता गांधी एक दैवी बालक आहे !
कु. निकिता गांधी
१. वय ९ मास
१ अ. मंदिरात लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाकडे आजीला घेऊन जाण्यास खुणावणे : ‘कु. निकिता ९ मासांची असतांना तिची आजी श्रीमती सुचेता गांधी यांच्यासह एका मंदिरात गेली होती. त्या वेळी निकिताला बोलता येत नव्हते. त्या वेळी मंदिरात सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावले होते. त्या ग्रंथ प्रदर्शनाला आजीला घेऊन जाण्यासाठी ती खुणावू लागली. तिथे गेल्यावर साधक भेटले आणि त्यांनी सत्संगात येण्यास सांगितले. या प्रसंगानंतर तिची आजी सनातनच्या सत्संगाला येऊ लागली. आजीसमवेत निकिताही सत्संगाला आणि आश्रमात येऊ लागली. 
२. वय ७ वर्षे 
२ अ. दूरदर्शनवर दाखवण्यात येणार्‍या विज्ञापनात प्रमुख भूमिकेसाठी (‘मॉडेलिंग’साठी) निवडल्याचे कोणालाही न सांगणे : निकिता दिसायला सुंदर असल्यामुळे दूरदर्शनवर दाखवण्यात येणार्‍या विज्ञापनांमध्ये (‘अ‍ॅडव्हरटाईज’मध्ये) तिला प्रमुख भूमिकेसाठी (‘मॉडेलिंग’साठी) निवडले होते. तिने ही गोष्ट स्वतःहून कुणाला सांगितली नाही. कु. निकिताचे हावभाव अथवा बोलणे या कशातून कधी अहं जाणवायचा नाही.
३. वय ११ ते १६ वर्षे 
३ अ. शाळेतील कार्यक्रमात एकाग्र चित्ताने भजने म्हणणे : एकदा मंदिराच्या उत्सवाच्या वेळी निकिताच्या शाळेतील मुलांचा भजनाचा कार्यक्रम होता. त्यात २० मुलांनी सहभाग घेतला होता. त्या मुलांपैकी केवळ निकिताच एकाग्रतेने भजन म्हणत होती. ते पाहून ‘ती वेगळीच आहे’, असे वाटले. इतर मुलांचे ‘आपल्याकडे कोण पहात आहे ? आपले पालक आहेत का ?’, याकडे लक्ष होते. 
३ आ. घरात येणार्‍या प्रत्येकाशी आदराने बोलणे : निकिता घरातील एकुलती एक मुलगी आहे. ती घरातील मोठ्यांचाच नाही, तर घरात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाशी आदराने वागते. लहान मुलांना ती प्रेमाने सांभाळते.
३ इ. सात्त्विक उत्पादनाचा कक्ष पूर्ण दायित्व घेऊन सांभाळणे : निकिता वर्षातून एकदा हिंदूसंघटन मेळावा किंवा गुरुपौर्णिमा यांच्या वेळी आवर्जून सेवा करते आणि सनातन निर्मित सात्त्विक उत्पादनांचा कक्ष पूर्ण दायित्व घेऊन सांभाळते.
- केरळ येथील साधक (२६.४.२०१६) 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn