Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराची बाजू मांडू नये, यासाठी बांगलादेशच्या मंत्र्यांकडून इस्रायलच्या अधिकार्‍याला लाच देण्याचा प्रयत्न !

     ढाका - स्वित्झर्लंडमधील झुरीच शहरात इस्रायलचे नागरिक मेंदी सफादी हे आंतरराष्ट्रीय व्यवहार पहाणारे आस्थापन चालवतात. बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय पत वाढवावी, यासाठी बांगलादेशच्या मंत्र्यांनी मेंदी सफादी यांची भेट घेतली. सफादी यांनी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार पाहून हे काम स्वीकारण्यास नकार दिला. सफादी यांना लाच देण्याचाही प्रयत्न या मंत्र्यांनी केला; मात्र सफादी त्याला बधले नाहीत. ही माहिती बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘हिंदू स्ट्रगल समिती’चे अध्यक्ष श्री. सहीपण कुमार बसू यांनी दिली.
     बांगलादेशाच्या इमामाने ‘या देशातील हिंदू हे इस्रायलमध्ये असलेल्या मुसलमानांसारखे आहेत’, असे सांगून सफादी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘मी तत्त्वाचा माणूस आहे. माझी विचारसरणी विकाऊ नाही’, असे सांगत सफादी यांनी त्यांनाही नकार दिला. 
    बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत, याचे पुरावे माझ्या जवळ असून ते युरोपियन युनियन आणि राष्ट्रसंघाला दिले, असेही सफादी यांनी सांगितले. या अत्याचारांत बांगलादेशातील वरिष्ठ राजकीय पुढारी आणि अधिकारीही सहभागी होतात, असे सफादी म्हणाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn