Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कानपूर येथील रेल्वे अपघातात १२२ प्रवासी ठार !

अपघातात जागतिक विक्रम करणारी भारतीय रेल्वे !
अशा रेल्वेप्रशासनाकडून बुलेट ट्रेन कशी चालवली जाईल, याची कल्पना येते !
     कानपूर (उत्तरप्रदेश) - १९ नोव्हेंबरच्या रात्री साडेतीनच्या सुमारास उत्तरप्रदेशातील कानपूरजवळील पुखराया येथे पाटणा-इंदूर एक्सप्रेस रेल्वे गाडीचे १४ डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात ११५ प्रवासी ठार, तर १२२ हून अधिक प्रवासी घायाळ झाले आहेत. घायाळांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त गाडी इंदूरहून पाटण्याच्या दिशेने निघाली होती. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही; मात्र रेल्वे रुळ उखडले गेल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी साहाय्यताकार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती विभागाचे पथक साहाय्य करत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना साहाय्यता कार्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. १. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दुर्घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे, तसेच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रभू यांनी ट्विट करून सांगितले आहे.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीचे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. या अपघातात घायाळ झालेल्यांसाठी प्रार्थना करत आहोत असे ट्विट केले आहे.
३. पंतप्रधान साहाय्यता निधी, रेल्वे प्रशासन, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश शासन यांनी आर्थिक साहाय्य करण्याची घोषणा केली आहे.
४. रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना साडेतीन लाख रुपये, गंभीर घायाळांना ५० सहस्र रुपये, तर किरकोळ घायाळांना २५ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत.
५. उत्तरप्रदेश सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये, तर गंभीर घायाळ अन् किरकोळ घायाळ यांना रेल्वे प्रशासनाप्रमाणे साहाय्य देण्यात येणार आहे.
६. मध्यप्रदेश सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तसेच गंभीर घायाळ अन् किरकोळ घायाळ यांना रेल्वे प्रशासनाप्रमाणे साहाय्य देण्यात येणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn