Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

२० वर्षांचा मुसलमान मुलगा आणि १९ वर्षांची हिंदु मुलगी यांना लिव्ह इन रिलेशनमध्ये रहाण्यास गुजरात उच्च न्यायालयाची अनुमती !

अशा अनुमतीमुळे आता प्रत्येक जण 
विवाहाचे वय पूर्ण होण्यापूर्वीच लिव्ह इन 
रिलेशनशीपमध्ये रहाण्याचा प्रयत्न करतील !
        कर्णावती - गुजरात उच्च न्यायालयाने २० वर्षांचा मुसलमान तरुण आणि १९ वर्षांची हिंदु तरुणी यांना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहाण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाने त्या मुलाला तो २१ वर्षांचा झाल्यावर तिच्याशी विवाह करील, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यास सांगितल्यानंतर हा निर्णय दिला आहे. 
१. शाळेत असतांना या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि त्यांनी धर्म न पालटताच विवाह करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र वय पूर्ण नसल्याने त्यांनी जुलै महिन्यात मैत्री करारासाठी अर्ज केला. गुजरातमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशीपला औपचारिक रूप देण्यासाठी हा करार केला जातो. 
२. जुलैमध्ये हा अर्ज करून ते एकत्र रहात होते. सप्टेंबर महिन्यात मुलीच्या आई-वडिलांनी तिला त्यांच्याबरोबर नेले. यानंतर मुलाने उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका (एखाद्याला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्याकरता केलेली याचिका) दाखल केली. तिला तिच्या पालकांनी तिच्या इच्छेविरुद्ध स्थानबद्ध केले आहे, असे सांगत तिला मुक्त करण्याची मागणी या याचिकेत त्याने केली. 
३. यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयात सादर केले. तिथे तिने त्या दोघांना विवाह करायचा आहे. प्रियकर २१ वर्षांचा झाल्यावर आम्ही विवाह करणार आहोत, असे सांगितले. तिने आई-वडिलांसमवेत राहायचे नाही, असेही सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn