Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इसिसचा जिहादी आतंकवादी नील प्रकाशला पश्‍चिम आशियातून अटक

     न्यूयॉर्क - ऑस्ट्रेलियातील इसिसचा जिहादी आतंकवादी नील प्रकाशला पश्‍चिम आशियातील एका देशातून अटक करण्यात आली आहे. काही मासांपूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई आक्रमणात आतंकवादी प्रकाश ठार झाल्याचा दावा केला होता. 
    प्रकाशचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला होता. प्रकाशने वर्ष २०१२मध्ये बौद्ध धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारला होता. वर्ष २०१३ ला इसिसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला अबू खालिद अल् कंबोडीया नावाने ओळखण्यात येत होते. २५ वर्षीय नील प्रकाश ऑस्ट्रेलियाच्या तरुणांना इसिसमध्ये दाखल करण्याचे काम करत होता. वर्ष २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी त्याच्या विरोधात अटक वारंट काढला होता. तो ऑस्ट्रेलियात अनेक आक्रमणांमध्ये सहभागी झाला होता. एका वरिष्ठ अमेरिका अधिकार्‍याच्या नुसार अमेरिकेच्या सैन्याने यावर्षी प्रकाशला लक्ष्य केले होते; परंतु तो या आक्रमणात घायाळ झाला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn