Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सौंदत्ती (जिल्हा बेळगाव) यात्रेसाठी २४ घंटे पाणी पुरवावे; वाहनांची अडवणूक करू नये ! - श्री रेणुकाभक्तांचे बेळगाव जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

         कोल्हापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री रेणुकादेवीचे भक्त येत्या १० ते २३ डिसेंबर या दिवशी कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने भूमीअभावी कुंड येथे पाण्याची व्यवस्था करावी. भक्तांसाठी पिण्याचे पाणी पुरवावे. तसेच कोल्हापूरहून येणार्‍या वाहनांची अडवणूक करू नये आदी मागण्या श्री रेणुकाभक्त संघटनांनी बेळगाव येथील जिल्हाधिकारी एन्. जयराम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         कोल्हापूर येथील श्री रेणुकाभक्त सहस्रोंच्या संख्येने डिसेंबर मासात यात्रेसाठी सौंदत्ती येथे येतात. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती डोंगरावर भाविकांची चांगली व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे यंदाही सुविधा द्या. यल्लम्मा डोंगरावर जुन्या पथकर नाक्याजवळ वाहनांची अडवणूक केली जाते; मात्र सर्व भाविकांना एकाच ठिकाणी रहाण्याची व्यवस्था करावी. तसेच कायमस्वरूपी भूमी द्यावी, अशी मागणी भक्तांनी या वेळी केली आहे. या वेळी जिल्हाधिकारी एन्.जयराम यांनी कोल्हापूरच्या भक्तांना अडचण येणार नाही. सर्व सुविधा देण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.
डोंगरावरील भूमी भक्तांसाठी द्यावी !
         कोल्हापूर जिल्ह्यातील श्री रेणुकाभक्त डोंगरावर प्रतीवर्षी उतरतात. त्या ठिकाणी लमाणी समाजाने छत उभारले आहे. या रहाण्यासाठी ते पैशाची मागणी करत आहेत. या भूमीवर कित्येक वर्षांपासून येथील भक्त उतरत आहेत. मात्र अलीकडे लमाणी समाजाचा भक्तांना त्रास होतो. ही भूमी भक्तांसाठी द्यावी, अशी मागणी श्री. अच्युत साळुंखे यांनी केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn