Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आमची पिढी हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात आणल्याविना स्वस्थ बसणार नाही !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमावासियांना घ्यायला लावली शपथ ! 
     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - आता निर्णायक पद्धतीने पाऊल उचलले पाहिजे. अन्यथा अशा अनेक पिढ्यान्पिढ्या हा लढा चालूच राहील आणि आपण सीमाभागातील कुंदा खात बसू. पुढच्या वेळेस मला आपल्या महाराष्ट्रातील कुंदा खायचा आहे. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यासाठी शिवसेना साहाय्य करेलच. आज शपथ घ्यावी की, आमची पिढी हा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात आणल्याविना स्वस्थ बसणार नाही. हा केवळ सीमावासियांचा लढा नाही, तर माझ्या मातृभाषेचा, माझ्या आईचा लढा आहे. त्या भावनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस तुमच्यामागे उभा आहे आणि पुढे आणखी प्रभावीपणे मागे उभा राहील, असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रुमख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

     मराठी अभ्यास केंद्र, खानापूर (जिल्हा बेळगाव) मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या माध्यमातून सीमाभागासाठी फिरते वाचनालय आणि संगणक कक्षाचे लोकार्पण २८ नोव्हेंबरला शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थित सीमावासियांशी संवाद साधला. या वेळी उद्योगमंत्री सर्वश्री सुभाष देसाई, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे नारायण काकोडकर, मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार आदी उपस्थित होते. 
     महाराष्ट्र-बेळगाव सीमा लढ्यात सक्रीय सहभाग घेऊन आपली हयात त्यात घालवली, तसेच १ नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळणार्‍या कार्यकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांनी खटले प्रविष्ट केले, त्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योगमंत्री सर्वश्री सुभाष देसाई, दीपक पवार नारायण कापोलकर उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn