Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिबंध !

हा निर्णय केवळ देहलीपुरता सीमित न ठेवता देशभरातील 
जनतेचीच फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणातून सुटका करणे आवश्यक आहे !
फटाक्यांच्या खरेदी-विक्री संदर्भातील सर्व अनुज्ञप्ती निलंबित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश !
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने देहलीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व फटाके विक्रेत्यांच्या अनुज्ञप्ती पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्या आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे फटाक्यांची खरेदी आणि विक्री यांच्यावर एकप्रकारे प्रतिबंध लावण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही परवान्यांचे नुतनीकरण करण्यात येऊ नये, असा निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे, तसेच न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला या पटाक्यांमधील घटकांच्या दुष्परिणामाचा अभ्यास करून ६ मासांच्या आत अहवाल सादर करण्याचाही निर्देश दिला आहे.
      मुख्य न्या. तीरथसिंह ठाकूर, न्या. ए.के. सिकरी आणि न्या. एस्.के. बोबडे यांच्या तीन सदस्यीय खंडपिठाने ही सुनावणी केली. 
       या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी फटाक्यांच्या वापरावर प्रतिंबध लावण्याची मागणी केली होती. या वेळी त्यांनी या फटाक्यांमुळे देहलीसह राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रातील वायुप्रदूषणाचा स्तर अतिशय भीषण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. फटाके उडवणे धन जाळण्यासारखे असल्याचे सांगून न्यायालयाने म्हटले होते, लोकांनी विचार केला पाहिजे की, जर या फटाक्यांमुळे मनुष्यावर इतका परिणाम होतो, तर अधिक संवेदनशील कान असणार्‍या कुत्र्यांसारख्या प्राण्यांवर याचा किती परिणाम होत असेल. अहवालानुसार देहलीत ३० टक्के मुले दम्यामुळे पीडित आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn