Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकाकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाविषयी खोटे आणि हिंदु जनजागृती समितीची मानहानी करणारे वृत्तांकन !

क्षमा मागून स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !
     पणजी - दैनिक हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्राने १६ नोव्हेंबर या दिवशी पृष्ठ २ वर मडगाव येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाविषयी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात हिंदु जनजागृती समितीविषयी मानहानीकारक मजकूर आहे. या संदर्भात दैनिक हेराल्डने स्पष्टीकरण देऊन हिंदु जनजागृती समितीची क्षमा मागावी, असे पत्र हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी या दैनिकाच्या संपादकांना पाठवले आहे.
     मडगाव येथे १५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदू संघटनांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले होते. गोवा ‘कॅसिनो’मुक्त करावा, पुरो(अधो)गाम्यांच्या मडगाव येथे होणार असलेल्या दक्षिणायन परिषदेवर बंदी घालावी, डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF)’सह ‘पीस स्कूल’च्या सर्व शाखांवर बंदी घालावी, आदी मागण्या या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या होत्या. या आंदोलनासाठी प्रशासनाकडून रितसर अनुमती घेण्यात आलेली असतांना वृत्तात अनुमतीशिवाय आंदोलन केल्याचे म्हटले आहे. या वृत्तात हिंदु जनजागृती समिती ही नोंदणीकृत संघटना नसल्याचे म्हटले आहे. पादचार्‍यांना जाण्यासाठी पुरेशी जागा ठेवून आंदोलन पदपथाच्या एका कोपर्‍यात करण्यात आले होते. असे असतांना हिंदु जनजागृती समितीने आंदोलन करून पदपथ आणि रस्ते अडवले होते, असा खोटा आरोप या वृत्तात करण्यात आला आहे. (वस्तूस्थितीचाही विपर्यास करणारे वृत्त प्रसिद्ध करणे म्हणजे पीतपत्रकारितेचा कहर आहे. अशी वृत्तपत्रे ही पत्रकारितेला लागलेला कलंक आहे. - संपादक) याविषयी आक्षेप घेऊन निषेध करणारे पत्र डॉ. मनोज सोलंकी यांनी हेराल्डच्या संपादकांना पाठवले आहे. डॉ. सोलंकी यांनी या पत्रात म्हटले आहे की,
१. खोटे वृत्त प्रसिद्ध करून समितीची मानहानी करण्यात आली आहे. हिंदु जनजागृती समिती नोंदणीकृत संस्था आहे. दैनिकात हिंदु जागृती समिती असे चुकीचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रसिद्धीपत्रक देऊनही संघटनेचे नाव चुकीचे प्रसिद्ध केल्यावरून या वृत्ताची अविश्‍वासार्हता दिसून येते.
२. वृत्तात धार्मिकतेच्या (कम्युनल) धर्तीवर आंदोलन करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. यावरून समितीच्या वतीने पाठवण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक व्यवस्थित अभ्यासले नसल्याचे दिसून येत आहे.
३. अराष्ट्रीय कृत्य करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन आणि पीस स्कूल यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करणे हे अराष्ट्रीय आहे का ? केंद्रशासनाने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्याची योग्य कारवाई केली आहे.
४. या वृत्तात एकही विषय गोवा राज्याशी संबंधित नव्हता, असे तुम्ही म्हटले आहे. कॅसिनो आमची संस्कृती आणि नैतिकता नष्ट करत आहे. गोव्यात कॅसिनोवर बंदी घालणे हा गोव्याशी निगडित विषय नाही का ? कॅसिनोवर बंदीची मागणी केल्याविषयी वृत्त प्रसिद्ध करणे हे या पत्रकाराचे कर्तव्य नव्हते का ? अर्थात हेराल्डच्या एका कर्मचार्‍यावर कॅसिनोवाल्यांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे दैनिक हेराल्ड कॅसिनोच्या विरोधात वृत्त प्रसिद्ध करील, अशी अपेक्षा नाही.
५. मडगाव येथे होणार असलेल्या दक्षिणायन परिषदेला विरोध हाही आंदोलनाचा विषय होता. हा गोव्याशी निगडित विषय नाही का ?
६. ही कुठल्या प्रकारची पत्रकारिता आहे ? यावरून हेतूपुरस्सर खोटे वृत्त देऊन हिंदु जनजागृती समितीची अपकीर्ती केल्याचे दिसून येते.
याविषयी धर्माभिमानी हिंदू पुढील संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.
हेराल्ड, कांपाल, पणजी, गोवा.
दूरभाष क्र. : ६५१८५००, ६५१८५३०, २२२४२०२
राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा !
      हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn