Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

माझे माहेर पंढरी, आहे भिमरेच्या तिरी ।
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥

भाग्यनगर येथून इसिसचे ११ संशयित आतंकवादी एन्आयएच्या कह्यात !

 •  स्फोटके, हत्यारे आणि रोख रक्कम जप्त ! 
 •  मंदिर आणि मॉल यांवर आक्रमण करण्याचा रचला होता कट !
 •  इसिसचा भारतात प्रभाव पडणार नाही, असे विधान करणारे केंद्रीय गृहमंत्री आता का बोलत नाहीत ?
 •  भाग्यनगरच्या एका धाडीत इसिसचे ११ आतंकवादी सापडतात, तर देशभर असे किती आतंकवादी पसरलेले असतील ? यावरून सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्‍न निर्माण होतो !
      भाग्यनगर (हैद्राबाद) - आतंकवादी आक्रमणाचा कट रचला जात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) २९ जूनला येथील १० ठिकाणी घातलेल्या छाप्यातून इसिसशी संबंधित असणार्‍या ११ संशयित आतंकवाद्यांना कह्यात घेतले आहे. त्यातील मोहम्मद इलियास यजदी, मोहम्मद इब्राहिम यजदी, हबीब बरकस, मोहम्मद इरफान आणि अब्दुल्ला बिन अहमद अलमुदि उपाख्य फहद या ५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरितांची चौकशी चालू आहे. हे सर्व २० वर्षे वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून स्फोटके, हत्यार, लॅपटॉप, २५ भ्रमणभाष आणि १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती एन्आयएचे वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार यांनी दिली. या आतंकवाद्यांनी मंदिर आणि मॉल यांवर आक्रमण करण्याचा कट रचला होता. या आतंकवाद्यांना सिरियामधून पैसे येत होते, अशी माहिती मिळाली आहे. तेथील प्रमुख आतंकवाद्यांशी ते संपर्कात होते. या प्रमुखाकडूनच भारतात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी स्फोटके आणि पैसे पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु वैद्याचा जिहाद्यांकडून शिरच्छेद !

 •  इस्लाम म्हणजे शांती, असे म्हणणारे आता तोंड उघडतील का ?
 •  भगव्या आतंकवादाचा डांगोरा पिटणारे हिरव्या आतंकवादावर बोलतील का ?
आयुर्वेदिक उपचारपद्धत इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत हत्या !
     ढाका - बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या केली. आयुर्वेदिक उपचारपद्धत इस्लामविरोधी असल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय असून बांगलादेशमधील इबेला ही वृत्तवाहिनी वगळता कुठल्याही प्रसारमाध्यमाने हे वृत्त दिले नाही. (बांगलादेशातील वृत्तवाहिन्यांचा हिंदुद्वेष ! - संपादक)
     सुलाल (कविराज) चौधरी चितगाव येथील चीकाडेर येथील रहिवासी होते. ते २५ जूनच्या रात्री त्यांच्या फातीकचारी आझादी बाजार येथील चिकित्सालयातून रिक्शाने घरी परतत होते. त्यांची रिक्शा एका पुलावरील निर्जन स्थळी आली असता जिहादी आतंकवाद्यांनी ती अडवली आणि चौधरी यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्यारांनी आक्रमण करून त्यांचे शिर धडावेगळे केले. चौधरी यांच्या पत्नी चंपा चौधरी यांनी पतीला घरी परतण्यास विलंब झाला म्हणून भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी रौझान पोलीस ठाण्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांना पतीची हत्या झाल्याचे कळले.
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
जळगावात चहार्डी गावात 
रत्नावती-चंपावती नद्यांच्या पुराने थैमान
        जळगाव - चोपडा तालुक्यातील बहुतांश भागांत २८ जून या दिवशी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. रत्नावती आणि चंपावती या नद्यांना पूर येऊन चहार्डी गावात पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ झाली. गावातील ११ रिक्शा यात वाहून गेल्या. शिवाय अनेकांच्या घरातील कपडे, अन्न-धान्य भिजले. परिणामी, ग्रामस्थांनी पूर्ण रात्र जागून काढली. सकाळपर्यंत गावात एक ते दोन फूट पाणी होते. मुसळधार पावसामुळे काजीपुरा येथील पूल वाहून गेला. परिणामी, चोपडा ते शिरपूर हा मार्ग बंद झाला.

(म्हणे) सनातनच्या पदाधिकार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करा अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ !

हिंदुद्वेषी संभाजी ब्रिगेडची भर पत्रकार परिषदेत धमकी !
     मुंबई - आतंकवादी कारवाया करणार्‍या सनातनच्या सर्व पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करावेत. सनातन संस्थेवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देणार आहोत. कायदेशीर मार्गाने लढा देऊनही कारवाई झाली नाही, तर आम्ही प्रसंगी कायदाही हातात घेऊ, अशी धमकी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता प्रा. डॉ. शिवानंद भानुसे आणि वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. (म्हणजे न्यायालयाने यांच्याच बाजूने निकाल द्यावा आणि न दिल्यास हे कायदा हातात घेणार, हा सरळ सरळ न्याययंत्रणेवर दबाव नाही का ? शासन आणि न्यायालय यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक)      प्रा. भानुसे पुढे म्हणाले, या संदर्भात २ जुलै या दिवशी संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सिंदखेडराजा येथे होणार्‍या बैठकीमध्ये या संदर्भात पुढील धोरण ठरवण्यात येईल. या बैठकीनंतर सनातन संस्थेवर कारवाई व्हावी आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल.

ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात पालख्यांचे पुण्यात आगमन !

        पुणे, २९ जून - ग्यानबा-तुकारामचा जयघोष करत आळंदी येथून प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २९ जून या दिवशी पुण्यनगरीत आगमन झाले. २९ आणि ३० जून या दोन दिवशी पालख्यांचा पुण्यात मुक्काम असून १ जुलैला त्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ होतील. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे, तर भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखीचा मुक्काम असेल.
        निर्मल वारी करण्याच्या राज्यशासनाच्या संकल्पानुसार वारीदरम्यान वारकर्‍यांसाठी फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सेन्सरद्वारे गर्दी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे. मात्र लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रातोरात हालवला जातो, हे दुर्दैवी आहे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

मुर्शिदाबादमध्ये धर्मांधाच्या घरी बॉम्ब बनवतांना स्फोट १ ठार आणि ४ घायाळ

घरोघरी बॉम्ब बनवण्याचे कारखाने निर्माण होऊ देणारे बंगाल सरकार !
      कोलकाता - बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज भागात एक धर्मांध घरी बॉम्ब बनवत असतांना स्फोट झाला. या स्फोटात शेख शौकत या व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४ जण घायाळ झाले. ही घटना २६ जूनच्या रात्री घडली. घायाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. (बंगालमध्ये सतत घडणार्‍या बॉम्बस्फोटाच्या घटना पाहून येथे शासन नावाची व्यवस्था आहे का ?, असा प्रश्‍न पडतो ! - संपादक)

हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी कारागृह अधीक्षकांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस !

कसाबसारख्यांना बिर्याणी खाऊ घालणारे प्रशासन संशयित
 म्हणून अटक केलेल्या हिंदूंना मात्र साधे औषधोपचारही देत नाही, हे लक्षात घ्या !

येरवडा कारागृह प्रशासनाचा हिंदुद्वेष्टा कारभार !
     पुणे - मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी येरवडा कारागृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
१. २७ जून या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी धनंजय देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाला तक्रार करतांना सांगितले की, त्यांचा डावा हात दुखत असल्याने एम्आर्आय ही वैद्यकीय पडताळणी करणे आवश्यक आहे. याविषयी कारागृह प्रशासनाला न्यायालयीन आदेशाद्वारे आणि अन्य प्रकारे वारंवार सांगूनही कारागृहातून केवळ वेदनाशामक गोळ्या दिल्या जात आहेत.
२. या वेळी देसाई यांचे अधिवक्ता मिलिंद पवार यांनी न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले. त्यामध्ये कारागृह प्रशासनाने न्यायालयीन आदेशाचे पालन न करणे, देसाई यांची ससून रुग्णालयात तात्काळ एम्आर्आय वैद्यकीय पडताळणी करणे आणि त्यांना चांगले वैद्यकीय उपचार न देण्याविषयी कारागृह अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवून घेण्यात यावा, अशा मागण्या केल्या. त्यावर न्यायालयाने उपरोक्त नोटीस बजावली.

(म्हणे) सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदी घाला ! - पुरोगामी संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी

     सांगली - डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येस उत्तरदायी धरून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांना आतंकवादी संघटना घोषित करावे आणि त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका आंदोलनाद्वारे केली. यात भारिप बहुजन महासंघ, रिपब्लीक सेना आणि बौद्ध संघर्ष समिती यांचा समावेश होता. (राज्यातील, तसेच केंद्रातील कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने अद्याप सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांना कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवलेले नाही. असे असतांना स्वयंघोषित न्यायप्रणालीप्रमाणे केवळ हिंदुद्वेषातूनच पुरोगामी संघटना बंदीची मागणी करत आहेत ! - संपादक) जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
     डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येमागे एकच मेंदू काम करत असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. (सीबीआयच्या तपासातून असे काही स्पष्ट झालेले नसतांना धादांत खोटा दावा करणे, हा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार ! - संपादक) सनातन आणि समिती यांची वाटचाल धोकादायक आहे. धर्मप्रचाराचा आव आणून अशांतता निर्माण करणे, जातीय दंगली घडवून आणणे, हेच या संघटनांचे काम असल्याने त्यांच्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी. (तोंड आहे म्हणून बोलणारे पुरोगामी ! - संपादक)

७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींना संमती !

 • वेतनवाढीमुळे सुखावलेला कर्मचारीवर्ग देशाच्या विकासाच्या धोरणाला हातभार लावेल, अशीच जनतेची अपेक्षा !
 • २३.६ टक्के वेतनवाढ
        नवी देहली - केंद्रीय मंत्रीमंडळाने ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या कर्मचार्‍यांना २३.६ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. जानेवारी २०१६ पासून ही वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तेव्हापासूनची वाढीव वेतनाची रक्कम कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे. यामुळे केंद्रसरकारवर १ लाख २० सहस्र कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. वेतन आयोगाने १८ ते ३० टक्के वेतनवाढीची शिफारस केली होती.

केरळ राज्यातील तरुणांना अल्-कायदामध्ये प्रवेश देण्याच्या कार्याला वेग !

जिहादी आतंकवादाने पोखरलेले केरळ राज्य !
     सनातन संस्थेसारख्या राष्ट्रप्रेमी संघटनेच्या साधकांची वारंवार चौकशी करून स्वत:चा अमूल्य वेळ दवडणार्‍या विविध अन्वेषण यंत्रणांनी जिहादी आतंकवाद्यांवर लक्ष ठेवले असते, तर त्यांच्या मुसक्या आवळून भारत आतंकवादमुक्त झाला असता !
     मलाप्पुरम (केरळ) - येथील मुसलमान तरुणांना हेरून अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेत प्रवेश देण्याचे कार्य गुप्तपणे करणार्‍या अनेक संघटना केरळ राज्यात कार्यरत आहेत, असे भारतीय गुप्तचर खात्याच्या अहवालात म्हटले आहे. हे वृत्त जनम नावाच्या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. आतापर्यंत २० तरुणांना पुढील धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली जिहादी प्रशिक्षण देण्यासाठी येमेन देशातील दमास येथील मदरशात पाठवण्यात आले आहे. (सुरक्षायंत्रणा याबाबतीत उशिरा सतर्क कशा होतात ? यांचे तळ आधीच उद्ध्वस्त केले असते, तर पुढील धोका टळला नसता का ? - संपादक)

(म्हणे) मोदी शासनाच्या कार्यकाळात मानवाधिकारांची स्थिती वाईट !

वारंवार भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसणारा अमेरिकेचा मानवाधिकार आयोग ! अमेरिकेतील वाढती वर्णद्वेषी आक्रमणे आणि हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे यांविषयी हा आयोग ब्रही काढत नाही, हे लक्षात घ्या !
अमेरिकेच्या मानवाधिकार आयोगाचा कथित निष्कर्ष
      वॉशिग्टन - अमेरिकेच्या मानवाधिकार आयोगानुसार मोदी शासनाच्या २ वर्षांच्या कार्यकाळात भारतात मानवाधिकारांची स्थिती दयनीय असून देशातील धार्मिक स्वातंत्र्य न्यून झाले आहे, असे म्हटले आहे. (मानवाधिकार आयोगाने जगभरातील हिंदूंच्या वाईट स्थितीची दखल किती वेळा घेतली आणि त्यावर काय कृती केली, हेही सांगायला हवे ! - संपादक) मानवाधिकार आयोगाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सातत्याने चर्चा होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.

एम्टीसीआर्मध्ये भारताला सदस्यत्व मिळाल्यावर चीनचा थयथयाट !

      बीजिंग - अणू पुरवठादार गटात भारताला प्रवेश देण्यास विरोध करणार्‍या चीनने भारताला एम्टीसीआर् गटात (मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजीम) सदस्यत्व मिळाल्यावरून टीका केली आहे. चीनच्या सरकारचे दैनिक ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, भारत ढोंगी आहे. भारतियांमध्ये राष्ट्रवादाची कमतरता आहे. ते पाश्‍चात्त्य देशांकडे जाऊन स्वतःची हानी करून घेत आहेत. अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व न मिळाल्यावरून भारतीय प्रसारमाध्यमे आणि राज्यकर्ते चीनला दोष देत आहेत; मात्र ते स्वतःच्या चुकांकडे लक्ष देत नाहीत.
     पुढे म्हटले आहे की, भारत अमेरिकेच्या मागे का धावत आहे, हे समजण्याच्या पलीकडे आहे. संपूर्ण जग म्हणजे अमेरिका नाही. अमेरिका भारताची बाजू घेत आहे म्हणजे संपूर्ण जग भारताच्या बाजूने आहे, असे नाही. प्रत्यक्षात अमेरिकेची भारताच्या बाजूने असलेली भूमिका केवळ आणि केवळ चीनवर अंकुश ठेवण्यासाठीच आहे. भारतियांना राष्ट्रवादाला समजण्याची आणि शिकण्याची आवश्यकता आहे.

कॅथल (हरियाणा) येथे गोरक्षकांकडून १७ गायींची सुटका

केवळ गोहत्याबंदी कायदा करून न थांबता गोतस्करांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
     कॅथल (हरियाणा) - गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी गायींची वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करून १७ गायींची सुटका केली; मात्र गोळीबार करत गोतस्करांनी घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २३ जूनच्या रात्री गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना पंजाबमधून पशू भरलेले वाहन कॅथलकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नाकाबंदी करून या वाहनाचा पाठलाग केला. त्यामुळे गोळीबार करत तस्करांनी वाहन मार्गात सोडून पळ काढला.

मध्यप्रदेश सरकार भोपाळमध्ये प्रतिदिन ५०० जनावरे कापले जाणारे पशूवधगृह बांधणार !

भाजपच्या राज्यांत हिंदूंना हे अपेक्षित नाही !
     भोपाळ - मध्यप्रदेश सरकारकडून येथे पशूवधगृह उभारण्यात येणार आहे. सरकारने एका खाजगी आस्थापनाला यासाठी कंत्राट दिले आहे. येथे प्रतिदिन ५०० जनावरे कापली जाणार आहेत. त्यात गोवधही होणार असल्याचे म्हटले जात आहे. या पशूवधगृहाला भोपाळमधील मांस विक्रेते स्वतःचा व्यवसाय वाचवण्यासाठी विरोध करत आहेत. हाजी रियाझ कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन या पशूवधगृहाला विरोध केला आहे. ते म्हणाले की, भोपाळ शहराची मागणी केवळ ६० जनावरांची असतांना प्रतिदिन ५०० जनावरे येथे कापण्यात येणार आहेत.
     भोपाळचे महापौर आणि भाजपचे नेते आलोक शर्मा म्हणाले की, या पशूवधगृहामुळे शहरातील घाण न्यून होईल. मांस व्यापारी प्रतिदिन जनावरांची हत्या करून घाण करत असतात.

कर्नाटक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मांडणार !

     बेंगळुरू - राज्यातील काँग्रेस सरकार पावसाळी अधिवेशनात ४ जुलैला महाराष्ट्राच्या धर्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मांडणार आहे; परंतु या विधेयकात मडेस्नान (उच्छीष्ट स्नान) सारख्या धार्मिक परंपरांवर बंदी असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला कायदा आहे तसा लागू करण्यात येणार आहे. कायदा तसेच समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी बैठक घेऊन विधेयकाला होकार दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात समाज कल्याण खात्याच्या अधिकार्‍यांकडून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनाही दायित्व देण्यात आले आहे. तक्रार येताच चौकशी करून न्यायालयात खटला दाखल करण्याचे दायित्व पोलिसांचे असणार आहे.

तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूलच्या विमानतळावरील बॉम्बस्फोटात ३६ जण ठार !

        इस्तंबूल - येथील आतातुर्क विमानतळावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या ३ साखळी बॉम्बस्फोटांत ३६ जण ठार, तर १५० जण घायाळ झाले आहेत. भारतीय वेळेनुसार २९ जूनला रात्री साडेतीनच्या सुमारास हे आक्रमण करण्यात आले. इसिसने ते केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ३ आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार करताच त्यांनी स्वत:लाही उडवून दिले. काही महिन्यांपासून कुर्द आणि इसिसच्या आतंकवाद्यांनी तुर्कस्थानला लक्ष्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत.

गोव्यात औषधालयांपेक्षा मद्यालयांची संख्या अधिक ! - फ्रान्सिस डिसोझा, उपमुख्यमंत्री, गोवा.

 • हे सांगण्यापेक्षा ते न्यून करण्यासाठी काय केले, हे सांगणारे राज्यकर्ते हवेत !
 • पबमध्ये जाणार्‍या मुलींना रोखल्यावरून श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्या सारख्या संस्कृतीरक्षकांना गोवा सरकार राज्यात येण्यास प्रतिबंध करते; मात्र मद्यालयात जाणार्‍यांना रोखण्याचे कार्य करत नाही !
      म्हापसा (गोवा) - गोव्यात औषधालयांपेक्षा मद्यालयांची संख्या अधिक आहे आणि यामुळे व्यसने टाळण्यासाठी मनुष्यामध्ये प्रबळ आत्मीक बळ असणे अत्यावश्यक आहे. म्हापसा भागात पहाटे ५.३० पासून मद्यालये उघडी असतात आणि त्या वेळी मद्यप्राशनासाठी लोकांची रीघ लागलेली दिसून येते, अशी विदारक स्थिती गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. (या स्थितीला राज्यकर्तेच उत्तरदायी आहेत ! अशी पोपटपंची करण्यापेक्षा बिहारप्रमाणे राज्यात दारूबंदी का करत नाही ? - संपादक)

अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये चढाओढ

 • अल्पसंख्यांकांना कितीही खूश केले, तरी बहुसंख्य हिंदूंना दुखावून कधी सत्ता मिळेल का ?
 • भाजपच्या नेत्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन, तर देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी डोक्यावर सांजावची टोपी घालून लोकांशी साधला संवाद
       पणजी - राज्यातील अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी भाजप आणि आप यांच्या नेत्यांमध्ये सध्या चढाओढ चालू आहे. भाजपचे नेते तथा गोवा विधानसभेचे उपसभापती विष्णु वाघ यांनी नुकतेच त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले, तर गोवा भेटीवर असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ख्रिस्त्यांचा सांजाव साजरा करतांना घातली जाणारी पानाफुलांनी सजवलेले कोपेल (टोपी) डोक्यात घालून लोकांशी संवाद साधला. गोवा विधानसभा निवडणूक समोर ठेवून अल्पसंख्यांकांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष विविध कुल्प्त्या योजत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

अलिगड येथे महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन !

आर्यसमाज मंदिराचा उपक्रम !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - अलिगड येथील अचलताल येथील आर्यसमाज मंदिरामध्ये आयोजित एका शिबिरामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात लढण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येत आहे. हिंदु मुलींनी लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू नये. त्यांनी भारतीय संस्कृतीनुसार आचरण करायला हवे, असे शिबिराच्या आयोजक दीपिका आर्या यांनी सांगितले. (महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार्‍या आर्यसमाज मंदिराचे अभिनंदन ! अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्वत्रच्या हिंदु संघटनांनी दिले पाहिजे ! - संपादक) आर्यसमाज मंदिर येथे नुकतेच ८ दिवसीय प्रशिक्षण शिबीर चालू झाले होते. शिबिरामध्ये विद्यार्थिनींना बंदूक आणि लाठी, तलवार चालवणे, जुडो-कराटे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह लव्ह जिहादच्या विरोधात मोहीम कशी राबवावी ?, हिंदू मुलींना या धोक्याविषयी कसे सतर्क करावे इत्यादी गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रमांचे नियोजन केले होते.

प्राचीन भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपायला हव्यात ! - प्रा. डॉ. मंजिरी भालेराव

        पुणे, २९ जून (वार्ता.) - प्राचीन भारतीय संस्कृती, तसेच या संस्कृतीचे भौतिक अवशेष झपाट्याने लुप्त होत आहेत. अनेक सुरेख मूर्तींची तस्करी होत आहे, तर काही मंदिरांचे दगड चुरा करण्यासाठी (क्रशिंग) वापरले जात आहेत. त्यामुळे हा ठेवा शक्य तितक्या लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोेचवायला हवा. त्यासाठी प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती यांच्या पाऊलखुणा जपत या अवशेषांचे डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय विद्या आणि पुरातत्वशास्त्र यांच्या अभ्यासिका प्रा. डॉ. मंजिरी भालेराव यांनी केले. प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद व्यासपीठ यांच्या वतीने प्रसादचे माजी प्रकाशक आणि संचालक कै. मनोहर उपाख्य बापूसाहेब जोशी स्मृती गौरव पुरस्कार डॉ. भालेराव यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. २८ जून या दिवशी येथील एस्.एम्. जोशी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी गुजरात येथील प.पू. स्वामी सवितानंद, डेक्कन महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो.बं. देगलूरकर, प्रसादच्या संचालिका उमा बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भालेराव पुढे म्हणाल्या...
१. इतिहास अथवा पुरातत्त्वशास्त्र यांमध्ये शिक्षण घेण्याची समाजाची आज मानसिकता नाही; कारण शालेय पाठ्यपुस्तकांमधून संस्कारक्षम वयात विद्यार्थी पराभवाचा इतिहास शिकत आहेत.

नवनियुक्त पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आशाकुमारीही वादाच्या भोवर्‍यात !

     नवी देहली - १९८४ च्या देहलीतील शीखविरोधी दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपामुळे कमलनाथ यांना पंजाब प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदावरून त्यागपत्र द्यावे लागल्यानंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या आमदार आशा कुमारी यांची या पदावर नियुक्ती केली आहे; मात्र आशाकुमारी यांना वनभूमी हडपल्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. (या पात्रतेमुळेच काँग्रेसने त्यांना हे पद दिले आहे का, अशी शंका जनतेच्या मनात आल्यास नवल ते काय ? - संपादक) आशाकुमारी सध्या जामीनावर मुक्त असून त्यांचा खटला वरच्या न्यायालयात प्रलंबित आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी मात्र आशाकुमारी यांच्या नियुक्तीचे समर्थन केले. (भ्रष्टाचार्‍यांची खाण असणार्‍या काँग्रेसने भ्रष्टाचार्‍यांना विरोध केल्यास एक आश्‍चर्यच ठरेल ! - संपादक) खुनाच्या आरोपात सध्या जामीनावर असलेले अमित शहा, जर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, तर आशाकुमारी प्रभारी का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न सिब्बल यांनी केला आहे.

बांगलादेशात हिंदूंच्या वाढत्या हत्यांमुळे १५० हिंदु कुटुंबियांचे पलायन !

हिंदूंनो, भारतासहित परदेशातील विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंचे रक्षण
करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे अपरिहार्य आहे !
     ढाका - इस्लामी कट्टरतावाद आणि हिंदूंच्या वाढत्या हत्या यांमुळे बांगलादेशात १५० हिंदू कुटुंबांनी पलायन केले आहे. या शरणार्थी हिंदूंनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या वाढत्या हत्यांमागे इसिस असल्याचा संशय व्यक्त केला जात असून बांगलादेशातील सरकार त्या रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. (इसिसमुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचा जीव धोक्यात आला आहे. केंद्रशासन आतातरी त्याचा नि:पात करण्यासाठी पावले उचलणार का ? - संपादक)    

पाकिस्तानात हिंदु असलेल्या पत्रकाराला मुसलमान सहकार्‍यांकडून भेदभावाची वागणूक !

भारतातील ढोंगी पुरोगामी आणि राजदीप सरदेसाई,
बरखा दत्त, निखिल वागळे यांसारखे पत्रकारही यावर तोंड उघडणार नाहीत !
      कराची - हिंदु असल्यामुळे एका पत्रकाराला अन्य मुसलमान सहकार्‍यांसोबत पाणी पिण्यास तसेच भांडी धुण्यास मनाई करण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे. साहिब खान ओद असे या पत्रकाराचे नाव असून पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे.
१. दादू जिल्ह्यात रहाणार्‍या या पत्रकाराची यावर्षी कराची येथे पत्रकार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
२. एके दिवशी ओद यांचा मुलगा राजकुमार त्यांच्या कार्यालयात गेला असता तो हिंदु असल्याचे सहकार्‍यांना समजले. तेव्हापासून ओद यांना वाळीत टाकण्यात आले.

हिंदु जागरण मंचाची उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात चळवळ !

     नवी देहली - हिंदु जागरण मंचाकडून उत्तरप्रदेशात शाळा आणि महाविद्यालये यांचे सत्र चालू होताच जुलै मासामध्ये लव्ह जिहादच्या विरोधात चळवळ राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत हिंदु युवतींना कोणत्याही युवकाशी मैत्री करण्यापूर्वी त्याची खरी ओळख पडताळण्यासाठी त्याचे मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड तपासण्यास सांगण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर दूरध्वनी क्रमांकाच्या सर्व्हिस प्रोव्हाइडर मधून तपासणी करण्याचेही आवाहन करण्यात येणार आहे.

हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराच्या तिसर्‍या दिवशी रगरागिणी शाखेचे कार्य आणि उद्देश यांविषयी माहिती !

     सनातन आश्रम, रामनाथी - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ जूनपासून चालू असलेल्या अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराच्या तिसर्‍या दिवशी हिंदु जनजागृती समिती प्रणित रगरागिणी शाखेचे कार्य आणि उद्देश यांविषयी माहिती देण्यात आली.
धर्मद्रोही महिलांना वैध मार्गाने रोखण्यासाठी रणरागिणी शाखेची 
स्थापना ! - कु. प्रतीक्षा कोरगांवकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा
     धर्मद्रोही महिलांच्या माध्यमातून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांना वैध मार्गाने रोखण्यासाठी रणरागिणी शाखेची स्थापना करण्यात आली आहे. समाजात लव्ह जिहादसारख्या घटनांना बळी पडणार्‍या हिंदु युवतींचे प्रबोधन करणे, अश्‍लीलतेचा प्रसार करणारी संकेतस्थळे, पोस्टर (भित्तीपत्रके), अभिनेत्री यांच्या विरोधात समाजात जागृती निर्माण करणे, तसेच धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून महिलांना धर्माचरणाचे महत्त्व सांगणे यांसारखे कार्य रणरागिणी शाखा करत आहे.
      या वेळी शनिशिंगणापूर, कोल्हापूर, तसेच त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिरांत घुसणार्‍या धर्मद्रोही महिलांच्या विरोधात स्थानिक महिलांनी वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाविषयी आणि धर्मपरंपरांच्या बाजूने निर्माण झालेल्या प्रभावी संघटनाविषयी माहिती देण्यात आली.

श्री एकवीरादेवीच्या कार्ला डोंगरावर दरडी पडण्याचा धोका

     पुणे - श्री एकवीरादेवीच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात दरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. २५ जूनच्या रात्री मंदिरालगतच्या डोंगराचे काही मोठे दगड खाली पडले असून मंदिराच्या पायर्‍या आणि सुरक्षा भिंत यांचा भराव खचला आहे. त्यामुळे पावसाळयात तेथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २१ जून २०१५ च्या रात्री मुसळधार पावसात देवीच्या मंदिराशेजारील ट्रस्टच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगड पडून कार्यालयाची हानी झाली होती; मात्र १ वर्ष पूर्ण होऊनही भारतीय पुरातत्व विभागाने तेथे उपाययोजना केलेली नाही. (भाविकांच्या जिवावर उठलेला भारतीय पुरातत्व विभाग ! या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी आणि तात्काळ उपाययोजना करावी. - संपादक)
    
मंदिराजवळ असलेल्या गुंफा आणि श्री महादेवाच्या पिंडी समोरील सुरक्षा भिंतीचा भराव पूर्णपणे खचला असून दगड डोंगरावरून थेट वाहनतळामधील वाहनांवर पडण्याचा धोका आहे. तसेच जिन्यासमोरील मागील वर्षी पडलेली भिंत अजूनही बांधण्यात आलेली नाही. येथील ऐतिहासिक ठेवा असलेल्या लेण्या पहाण्यासाठी पर्यटकांकडून भारतीय पुरातत्व विभाग ५० रुपये तिकिट घेते; परंतु पर्यटकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. पुरातत्व विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक, भाविक आणि ट्रस्ट यांनी केली आहे.

सोलापूरमध्ये वाहतूक पोलीस फौजदारावर आक्रमण करणार्‍या काँग्रेस नगरसेवकाला अटक

गुन्हेगारी वृत्ती आणि 
गुंडांचा भरणा असलेली काँग्रेस !
       सोलापूर, २९ जून - काँग्रेसचा नगरसेवक नागेश ताकमोगे यांची गाडी अडवल्याच्या रागातून त्यांनी वाहतूक पोलीस फौजदार विश्‍वास भांबड यांच्यावर भरचौकात आक्रमण केले. या वेळी पोलीस आणि ताकमोगे यांच्यात झटापटही झाली. या प्रकरणी फौजदार भांबड यांनी विजापूर नाका पोलीस चौकीत ताकमोगे यांच्या विरुद्ध तक्रार केली असून त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. (या प्रकरणी काँग्रेस पक्ष ताकमोगेंवर कारवाई करणार कि दायित्व झटकणार ? - संपादक)
१. नागेश ताकमोगे यांचे चालक अरुण जगदाळे हे असरा चौकात वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने गाडी चालवत होते. या वेळी त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाने गाडी अडवून गाडी क्रमांकाची पाटी नसल्याने दंड आकारला.
२. त्या चालकाने ही माहिती ताकमोगे यांना कळवताच त्यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांना शिवीगाळ केली. या वेळी शहर वाहतूक शाखेचे फौजदार भांबड हे तेथे आले असता त्यांनी ताकमोगे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या वेळी ताकमोगे त्यांच्या अंगावर धावून गेले. (असे कायदाद्रोही नगरसेवक सोलापूर शहराचा कारभार कसा चालवत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिपायानेच पळवल्या !

शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी 
संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्यच) हवे !
       पुणे, २९ जून - फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र शाखेच्या (बीसीएस्) पडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिपायानेच पळवल्या. यामध्ये त्या शाखेचे शिक्षण घेणार्‍या विदेशी विद्यार्थ्यांसह काही जणांनी शिपायाच्या साहाय्याने उत्तरपत्रिका घरी नेल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून शिपाई शिगवण यांना कह्यात घेतले आहे.
       विदेशी विद्यार्थ्यांनी शिगवण यांना एका उत्तरपत्रिकेमागे ३ सहस्र रुपयांचे आमिष दाखवले होते. त्यांनी त्या उत्तरपत्रिका मध्यवर्ती मूल्यांकन केंद्रातून काढून विदेशी विद्यार्थ्यांना घरी लिहिण्यासाठी दिल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या, ते विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे लागलेल्या निकालात दाखवण्यात आले होते. त्यामुळे हा निकाल वाचून त्या विद्यार्थ्यांनाही धक्का बसला होता आणि त्यांनीही त्याविषयी लेखी तक्रार प्राचार्यांकडे दिली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्या उत्तरपत्रिकांचा शोध घेतला असता उपरोक्त माहिती उघडकीस आली. डेक्कन पोलीस या प्रकरणातील विदेशी विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.

देहलीप्रमाणे गोव्यातील झोपडपट्टया कायदेशीर करू ! - अरविंद केजरीवाल

अवैध झोपडपट्ट्या कायदेशीर करण्यापेक्षा जनतेला वैध घरे
बांधण्यास सक्षम करू, असे एकही राजकीय पक्ष का म्हणत नाही ?

मतांच्या राजकारणासाठी अवैध गोष्टींना प्रोत्साहन देणारे आपवाले !
      पणजी, (गोवा) २९ जून (वार्ता.) - खारीवाडा, वास्को येथील अवैध घरे पाडून शासनाने पारंपरीक मच्छीमारांवर अन्याय केला आहे. लोकांचा निवारा, जेवण, नोकरी आदी गरजा भागवू न शकणार्‍या शासनाला लोकांचा निवारा हिसकावून घेण्याचा अधिकार नाही. गोव्यात आपचे शासन सत्तेवर आल्यास देहलीप्रमाणे गोव्यातील झोपडपट्ट्या कायदेशीर केल्या जातील आणि झोपडपट्टीवासियांना सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे वक्तव्य देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा भेटीवर असतांना केले.

प्रा. वेलिंगकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सदस्यत्व सोडले !

भाषाप्रेमींच्या दबावानंतर प्रा. वेलिंगकर यांचा निर्णय !
      पणजी, २९ जून (वार्ता.) - गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कार्यक्रमासाठी निवडलेल्या समितीत भारतीय भाषा सुरक्षा मंचचे समन्वयक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यासह संघाचे नेते रत्नाकर लेले, राजू सुकेरकर यांचा समावेश करण्यात आला होता; मात्र ख्रिस्त्यांच्या लांगूलचालनासाठी इंग्रजी शाळांचे अनुदान कायम ठेवणार्‍या गोव्यातील भाजप शासनावर चिडलेल्या राज्यातील भाषाप्रेमींनी याला तीव्र विरोध केला. भाषाप्रेमींच्या दबावानंतर प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कार्यक्रम आयोजन समितीच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.

आमदार निवासात बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात १३ वर्षांनंतर माजी पोलीस निरीक्षक दोषमुक्त !

१३ वर्षांनंतर न्याय मिळणे हा अन्यायच होय ! १३ वर्षे निरपराध्याची अपकीर्ती
झाल्याला उत्तरदायी असणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सरकारने सांगायला हवे !
     बेंगळुरू - कर्नाटक राज्यातील राजकारण्यांच्या वाढत्या भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांना धडा शिकवण्यासाठी आमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा आरोप असलेले माजी पोलीस निरीक्षक गिरीश मत्तनवार, गुरन्ना आणि ए.पी. वीरेश यांची न्यायाधीश चन्नकेशवा यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
     वर्ष २००३ मध्ये घडलेल्या या घटनेच्या निकालाला तब्बल १३ वर्षे लागली. १ नोव्हेंबर २००३ या दिवशी कर्नाटक विधानसभेच्या आमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी पोलीस ठाण्यात आला.

गेल्या १० वर्षांत तमिळनाडू राज्यात हिंदूंपेक्षा मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांच्या लोकसंख्येत वाढ !

पुढील काही वर्षांनी भारतात हिंदूंचे अस्तित्व राहील का ?, असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे, त्यामागील हे
कारण लक्षात येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची अर्थात सनातन धर्म राज्याची स्थापना अपरिहार्य आहे !
     चेन्नई - येथील सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज या संघटनेने २०११ मधील जनगणना आकडेवारीचा अभ्यास करून २००१ ते २०११ या दशकात तमिळनाडूत हिंदूंच्या लोकसंख्येच्या तुलनेत मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांच्या लोकसंख्येत अधिक वाढ झाल्याचे नोंदवले आहे.
     वर्ष २००१ मध्ये तमिळनाडूची लोकसंख्या ६ कोटी २४ लक्ष ५ सहस्र ६७९ एवढी होती. वर्ष २०११ मध्ये ती वाढून ७ कोटी २१ लक्ष ४७ सहस्र ३० एवढी झाली. त्यात हिंदूंची लोकसंख्या ५ कोटी ४९ लक्ष ८५ सहस्र ७९ वरून वाढून ६ कोटी ३१ लक्ष ८८ सहस्र १६८ एवढी झाली म्हणजेच ती १४.९२ टक्क्यांनी वाढली.

उंचगाव येथे युवा सेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

    
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलतांना श्री. राजू यादव
      कोल्हापूर - उंचगाव येथे युवा सेनेच्या वतीने शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दहावीच्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवासेना जिल्हाप्रमुख श्री. हर्षेल सुर्वे म्हणाले की, युवा सेनेने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी काही अडचण असेल, तर ती सोडवावी. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना तालुकाप्रमुख श्री. भाऊ चौगुले यांनी केले होते. प्रास्ताविक युवा सेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित युवा सेना उपतालुकाप्रमुख सर्वश्री बंडू घोरपडे, ग्रामंपचायत सदस्य विनय करी आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कचरा उठाव आणि पाणीपुरवठा योग्य पद्धतीने करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चा !

       कोल्हापूर, २९ जून (वार्ता.) - संपूर्ण गांधीनगर येथील कचरा त्वरित काढावा आणि पिण्याचे पाणी सोडण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा ग्रामविकास अधिकार्‍याच्या डोक्यावर रिकामी घागर ठेवून त्यांना कचर्‍याने आंघोळ घालण्यात येईल, अशी चेतावणी करवीर शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायतीला देण्यात आली. २८ जून या दिवशी गांधीनगर येथे करवीर शिवसेनेच्या वतीने रिकामी घागर घेऊन मोर्चा काढण्यात आला. या वेळी शिवसेनेच्या वतीने रिकामी घागर आणि कचरा ग्रामपंचायतीमध्ये आणून आंदोलन करण्यात आले.
       ग्रामविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गांधीनगर ही महाराष्ट्रातील घाऊक बाजारपेठ आहे. तेथील कचरा समस्या गंभीर झाल्याने नागरिकांना रोगराईलाही सामोरे जावे लागत आहे. गटारे नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरूनच वाहते. ग्रामंपचायतीने अंतर्गत सांडपाणी आणि इतर पावसाच्या पाण्यासाठी दोन्ही बाजूंनी गटारे आणि कचरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसेच १०-१५ दिवसांतून सर्व भागात पिण्याचे पाणी सोडण्याचे व्यवस्थित नियोजनही करायला हवे.

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रसरकार बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आतातरी काही करणार का ?
     बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु आयुर्वेदिक वैद्य सुलाल चौधरी यांची २५ जून या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी शिर धडावेगळे करून निर्घृण हत्या केली. आयुर्वेदिक उपचार पद्धत इस्लामविरोधी असल्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

     Jago ! : Bangladesh me Hindu Aurvedik vaidya Sulal Chowdhari ki Jihadi Atankwadiyone hatya ki !
     Kya Hinduonka Vanshsanhar hone tak Bharat Sarkar chup rahegi ?      जागो ! : बांग्लादेश में हिन्दू आयुर्वेदिक वैद्य सुलाल चौधरी की जिहादी आतंकवादियों ने गला काटकर हत्या की।
     क्या हिंदुआेंका वंशसंहार होने तक भारत सरकार चुप रहेगी ?

ऐन आषाढीच्या तोंडावर ५० केरोसीन विक्रेत्यांचे त्यागपत्र !

        पंढरपूर - ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर तहसीलदारांनी मागण्यांच्या संदर्भात चर्चा न करता कारवाई करण्याची चेतावणी दिल्याने शहरातील ५० केरोसीन विक्रेत्यांनी नायब तहसीलदारांना भेटून सामूहिक त्यागपत्र दिले आहे. तोडगा न निघाल्यास वारकर्‍यांना केरोसीनसाठी वणवण फिरावे लागणार आहे.

पाण्याअभावी सांगलीत कृष्णा नदी कोरडी : कुपवाड औद्योगिक वसाहतीस ५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

       सांगली, २९ जून (वार्ता.) - कृष्णा नदीत गेल्या काही दिवसांपासून पाणी नसल्याने ती कोरडी पडली आहे. नदीत शेरीनाल्यासह भुयारी गटारांमधील घाण, तसेच कचरा पडून आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शहरातील अनेक उपनगरांत पाणीपुरवठा बंद असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. नदीतील पाणी खाली गेल्याने कुपवाड आणि मिरज औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारा जॅकवेल उघडा पडला आहे. त्यामुळे गेल्या ५ दिवसांपासून कुपवाड औद्योगिक वसाहतील पाणीपुरठा बंद आहे. यामुळे २५ उद्योग बंद पडल्याने उद्योजक आणि कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. सांगली शहराला पाणीपुरवठा चालू ठेवण्यासाठी सध्या जॅकवेलजवळ तराफा टाकून मोटारीद्वारे पाणी उपसा करण्याचे काम चालू आहे.

कोयना धरणात ७ टक्केच उपयुक्त जलसाठा

       कराड (जिल्हा सातारा) - कोयना पाणलोट क्षेत्रासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी मात्र अल्प पाऊस पडला आहे. पावसाच्या तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ ३५ टक्केच पर्जन्यवृष्टी झाली आहे. कायम भरून वाहणार्‍या कोयना नदीचा प्रवाह खंडित झाला असून, काही ठिकाणी नदीचे पात्र कोरडे आहे. जूनच्या अखेरच्या सप्ताहात कोयना नदीची ही स्थिती प्रथमच दिसून येत असल्याचे जाणकार सांगतात. कोयना धरणात ७ टक्केच उपयुक्त जलसाठा असल्याने धरणातून कोयनानदीतील विसर्ग बंद आहे. १०५.२५ टीएम्सी क्षमतेच्या कोयना धरणात १२.१८ टीएम्सी म्हणजेच ११.५८ टक्के जलसाठा असून, पैकी ६.९३ टीएम्सी म्हणजेच ६.५८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

वैद्यकीय अधिकार्‍याला दीड लाख रुपयांना फसवले !

कुणालाही स्वतःचा पिनक्रमांक देऊ नका, अशी सूचना
अधिकोषांकडून वारंवार केली जाते ! त्याचे सतर्कतेने पालन करणे आवश्यक !
      मालवण (जिल्हा सिंधदुर्ग) - मालवण तालुक्यातील गोळवण प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस्.एस्. यादव यांच्या एटीएम् कार्डचा क्रमांक आणि संकेतांक मिळवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अधिकोश खात्यातील दीड लक्ष रुपये काढल्याचे उघड झाले आहे.
     एका हिंदी भाषिक व्यक्तीने यादव यांना भ्रमणभाषवर संपर्क करून तुमचे एटीएम् कार्ड खराब झाले आहे. ते पालटायचे असून एटीएम् क्रमांक आणि त्याचा संकेतांक द्या, असे सांगितले. त्यांनी संकेतांक दिल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने पैसे काढले गेले. यासंदर्भात यादव यांनी संबंधित अधिकोशाकडे विचारणा केली असता अधिकोशाने याच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मडकई, गोवा येथील श्रीमती आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. उमेश नाईक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज सत्कार सोहळा !

        मडकई, गोवा (वार्ता.) - येथील श्रीमती आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. उमेश नाईक हे ३० जून २०१६ या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्तानेे श्रीमती आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूलच्या वतीने श्री. नाईक यांचा सत्कार सोहळा सायंकाळी ५ वाजता येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर उपस्थित रहाणार आहेत. शाळेची व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वतीने सर्वांना या कार्यक्रमासाठी सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये घाणीचे साम्राज्य

कांगावाखोर तथाकथित पर्यावरणवादी 
आणि जिल्हा प्रशासन आता कुठे आहे ?
         पंढरपूर, २९ जून - चंद्रभागा नदीची सद्यस्थिती अत्यंत विदारक आहे. पाणवनस्पती, शेवाळे, कपड्यांच्या चिंध्या आणि प्लास्टिक पिशव्या यांमुळे नदीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून पाणी प्रदूषित झाले आहे. (जिल्हा प्रशासन नदी स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करणार का ? - संपादक) या दूषित पाण्यामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन आषाढी एकादशी म्हणजेच, १५ जुलैपूर्वी चंद्रभागा नदीची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी वारकरी करत आहेत. (वारकर्‍यांच्या आरोग्याशी खेळणारे जिल्हा प्रशासन ! - संपादक)
चंद्रभागा नदीची विदारक स्थिती
         सद्यस्थितीत पात्रात पाणी न्यून, तर पाणवनस्पती आणि शेवाळेच जास्त आहे. त्यामुळे स्नानासाठी नदीपात्रात जाणे धोकादायक झाले आहे. त्यात भर म्हणून शहराच्या अनेक भागांतून येणारे सांडपाणी हेही चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याचा रंग पालटला असून पाण्यात लाल रंगाचे किडेही झाले आहेत. यामुळे पाण्याला दुर्गंध येत आहे. प्रतिदिन येथे अनेक म्हशी पाण्यात डुंबताना दिसतात. त्यांचे शेण वाळवंट आणि घाट यांवर पसरत असल्याने अस्वच्छता आणि दुर्गंधी यांत भर पडली आहे. (या प्रकरणी राज्य शासनाने जिल्हा प्रशासन आणि संबंधितांवर कठोर करावी. - संपादक) अवैध वाळू उपशामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रात खड्डे वाळू तस्करांनी चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूउपसा केल्यामुळे पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. वारकरी पात्रात स्नानासाठी गेल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज न आल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
नमामि चंद्रभागेचा मुहूर्त कधी ?
         चंद्रभागा नदीच्या सुशोभीकरण आणि स्वच्छता यांसाठी राज्य सरकारने नमामि चंद्रभागा या योजनेची घोषणा केली आहे. त्यासाठी निधीही संमत केला आहे; पण या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला मुहूर्त कधी मिळणार, याविषयी चर्चा चालू आहे.

शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अल्पसंख्याक असा फलक लावणे अनिवार्य

राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि 
महाविद्यालये यांना राज्यशासनाची सक्ती
         मुंबई - राज्यातील अल्पसंख्याक शाळा आणि महाविद्यालये यांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून अल्पसंख्याक असा फलक लावण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे फलक लावण्याच्या सूचना अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ हे फलक लावणे अनिवार्य असणार आहे.
         राज्यातील अनेक शाळा, महाविद्यालये शिक्षणहक्क कायद्यातील नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही सक्ती करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा मे २०१६ मधील आढावा

१. मुंबई जिल्हा
१ अ. हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी या महिला शाखेच्या कार्याचा आढावा
१ अ १. धर्मपरंपरा रक्षण चळवळीचा प्रारंभ :
रणरागिणी शाखेच्या धर्मपरंपरा रक्षण चळवळीस मुंबई येथे प्रारंभ झाला. मुंबईची ग्रामदेवता श्री मुंबादेवीची ओटी भरून देवीचा या चळवळीसाठी आशीर्वाद घेण्यात आला. या वेळी श्रीमती संगीता अमलाडी, सौ. रमा सावंत, सौ. ज्योती परब, सौ. विद्या कामेरकर, सौ. उर्मिला खानविलकर आणि सौ. शर्मिला बांगर या उपस्थित होत्या.
१ अ २. पत्रकार परिषद : धर्मपरंपरा रक्षण चळवळीच्या जागृतीसाठी १२ मे या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी रणरागिणीच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, तसेच अधिवक्त्या (सौ.) गौरी सावंत, रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या सौ. रमा सावंत, सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि रणरागिणी शाखेच्या मुंबई जिल्हा संघटक सौ. मनाली नाईक या उपस्थित होत्या.

आपचे राजकारण हिंदुविरोधी ! - श्री. अनुप कुमार शुक्ल, आपचे कार्यकर्ते, भिवंडी, ठाणे

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनवर चिखलफेक 
करणार्‍या आशिष खेतान यांना आपचे भिवंडी (जिल्हा ठाणे)
 येथील कार्यकर्ते श्री. अनुप कुमार शुक्ल यांचा घरचा अहेर !
       देहलीतील आपचे नेते तथा स्वयंघोषित पत्रकार आशिष खेतान हे दाभोलकर हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ सनातनवर सातत्याने चिखलफेक करत आहेत. सनातनचे हिंदुत्वाचे कार्य चांगल्यापैकी जाणून असलेले आपचे कार्यकर्ते श्री. अनुप कुमार शुक्ल हे खेतान यांच्या या सनातनद्वेेषामुळे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी आशिष खेतान यांना खरमरीत पत्र लिहून त्यांचा हिंदुविरोधी तोंडवळा उघड केला आहे. श्री. शुक्ल यांनी हिंदीतून लिहिलेल्या पत्राचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे.
आशिष खेतान,
       माझे नाव अनुप कुमार शुक्ल आहे. मी आम आदमी पक्षाचा भिवंडी (पूर्व), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील सदस्य आहे तथा भिवंडीचा संयोजक होतो. नुकतेच आपण सनातन संस्थेवर केलेले आरोप कानावर आले. ऐकून दु:ख झाले; कारण आपण सनातन संस्थेवर केलेले आरोप तथ्यहीन आणि मिथ्या आहेत.
पाऊले चालती पंढरीची वाट...भारताच्या पुनरुत्थानातील समस्या आणि त्यांवरील उपाय !

श्री. आनंद जाखोटिया
      सद्यस्थितीत भारतातील बहुसंख्य हिंदूंपैकी बहुतांश जण विविध हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांत विभागले गेले आहेत. या संघटना आणि संप्रदाय आपापल्या परीने काही क्षेत्रांत कार्य करत आहेत; पण भारताच्या किंवा हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी या सर्वांचे संघटन का होत नाही ?, असा प्रश्‍न अनेकदा पडतो. त्या वेळी लक्षात येते की, यांच्यापैकी अनेक जणांचे कार्य मानसिक स्तरावर चालू आहे.
१. मानसिक स्तरावरील 
कार्य करतांना भीती असणे
      विविध हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांना भीती वाटते की, संघटितरित्या कार्य करत असतांना आपला कार्यकर्ता किंवा साधक दुसर्‍यांकडे आकर्षित झाला तर ? त्यामुळे अशा सीमारेषेवरील कार्यकर्त्यांना संघटना पदे देऊन, तर सांप्रदायिक मानसिक शिकवण देऊन स्वतःमध्ये अडकवून ठेवतात.
२. आध्यात्मिक स्तरावरील 
कार्य केल्याने व्यापक दृष्टी निर्माण होणे
      याउलट सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य आध्यात्मिक स्तरावर चालते. यांतील प्रत्येकाचे व्यष्टी ध्येय मोक्षप्राप्ती, तर समष्टी ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे समष्टी ध्येयाला व्यष्टी ध्येयाचा पायाही आहे. या ध्येयापेक्षा आणखी कोणतेच ध्येय उदात्त असू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्ता आणि साधक यांच्यात व्यापक दृष्टी यायला साहाय्य होते. परिणामी हिंदु धर्मासाठी कार्य करणारी कोणत्याही संघटनेतील किंवा संप्रदायातील व्यक्ती त्याला आपली वाटते.

हिंदु जनजागृती समितीने मे २०१६ मध्ये केरळ राज्यात केलेला धर्मप्रसार !

१. १.५.२०१६ या दिवशी एका धर्माभिमान्याने प्रवचन आयोजित केले होते. त्या वेळी धर्माचरणाचे महत्त्व आणि धर्माचरण कृतीत कसे आणू शकतो ? या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना प्रवचन पुष्कळ आवडले. ६० वर्षांच्या एका महिलेने सांगितले, वयाच्या ६० वर्षांत आज प्रथमच मला देवालयातील देवदर्शनाविषयी एवढी माहिती समजली. त्यामुळे तिला आनंद झाला.
२. धर्माचरण या विषयावर 
घेतलेल्या प्रवचनांना उत्तम प्रतिसाद !
अ. ६.५.२०१६ या दिवशी कोट्टयम् जिल्ह्यात धर्माचरण या विषयावर प्रवचन घेण्यात आले. १५० जिज्ञासूंनी त्याचा लाभ घेतला. लोकांना हा विषय आवडला.
आ. कोडुंगल्लूर या ठिकाणी २९.५.२०१६ या दिवशी मुले आणि त्यांच्या माता यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात समितीच्या कार्यकर्त्यांचा एक वर्ग आयोजित केला होता. त्यात धर्माचरणाच्या कृती, उदा. नमस्कार कसा करावा ? कपाळावर कुंकू कसे लावावे ? यांविषयी माहिती देण्यात आली.
- कु. अदिती सुखटणकर आणि कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (४.६.२०१६)
     मोगल आणि ब्रिटीश यांच्या राजवटीत हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे झाली, तरी हिंदु धर्म टिकला; मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती संकटात आली आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता ठरली आहे ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी
 इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

    
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण 
फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू 
झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पाकड्यांचा भारतद्वेष !

     जम्मू-काश्मीरमधील पम्पोर येथे करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या आक्रमणाचा निषेध करणे सोडाच, पण भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पाकिस्तानच्या उच्चायुक्त बासित यांनी केले आहे. या आक्रमणाविषयी प्रतिक्रिया देतांना हा रमझानचा महिना आहे. आता इफ्तार पार्टी चालू आहे. इफ्तारवर बोला आणि पार्टीचा आनंद लुटा असे त्यांनी म्हटले आहे. भारतावरील आतंकवाद्यांचे आक्रमण ही त्यांच्यासाठी आनंद लुटण्याची पद्धत आहे. पाकच्या आसुरांची ही वृत्ती पुन्हा एकदा या निमित्ताने जगासमोर आली आहे.

चराचरातील देवत्व अनुभवायला देणारी आणि चराचरात व्यापून राहिलेली माझी गुरुमाऊली !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ... 
        काही दिवसांपूर्वी रात्री झोपतांना प.पू. डॉक्टरांनी आतापर्यंत स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर माझ्यासाठी काय काय केले ?, ते आठवत होते. तेव्हा माझा कृतज्ञताभाव जागृत झाला आणि खरंच माझी गुरुमाऊली किती श्रेष्ठ आहे !, असे मला वाटत होते. तिचे श्रेष्ठत्व जाणण्याची माझी काहीच पात्रता नाही. मी अज्ञानी आणि असमर्थ असूनही ते माझ्यावर निरंतर निरपेक्ष प्रेमच करतात. माझे अनंत अपराध पोटात घालून ते मला जवळ करतात. त्यांचे माझ्यावर केवढे उपकार आहेत !, असे विचार माझ्या मनात येत होते. मी त्यांच्या सहवासातील क्षणमोती आठवत होते. त्या वेळी पुढील ओळी माझ्या मनःपटलावर उमटू लागल्या.
१. प्रकाशालाही प्रकाश देणारी माझी गुरुमाऊली ! (टीप १)
२. फुलांना जिवंतपणा देणारी आणि माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला तो अनुभवायला देणारी माझी गुरुमाऊली ! (टीप २)

प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असलेली व्यष्टी-समष्टी साधना प्रत्येकाकडून व्हावी, याची तळमळ असलेल्या पू. भाऊ (सदाशिव) परब यांच्या संतसंगात शिकायला मिळालेली सूत्रे !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
         १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

व्यष्टी आणि समष्टी साधनेसंदर्भात काही कृतीच्या स्तरांवरील सूत्रे

        २७ ते ३० जून २०१६ या काळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे अखिल भारतीय साधनावृद्धी शिबीर चालू आहे. या निमित्ताने व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात येणार्‍या अडचणींना सामोरे कसे जावे याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. स्वभावदोष 
निर्मूलन आणि अहं निर्मूलन
        स्वभावदोष आणि अहं असलेले रावणाच्या पार्टीत असतात आणि आपल्याला तर देवाच्या पार्टीत जायचे असते. त्यासाठी पुढील सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी आपल्या रोगाचे निदान सांगितल्यावर आपल्याला भीती वाटत नाही, उलट निदान झाले. आता औषधोपचार करून आपण ठीक होऊ, असे आपल्याला वाटते, तसेच कोणी आपल्याला आपले दोष सांगितले, तर वाटले पाहिजे, दोघांची भीती वाटायला नको; कारण प्रयत्नांनी सर्व दोष आज ना उद्या नाहीसे करता येतात.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत ठेवून ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने करणारे अन् आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेले मडकई, गोवा येथील श्री. उमेश विनायक नाईक !

श्री. उमेश नाईक
       श्री. उमेश विनायक नाईक वर्ष १९९६ ते २०१६ या कालावधीत श्रीमती आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूल, करंजाळ, मडकई, गोवा येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा करत आहेत. ते शाळेतील नोकरी सेवा या भावाने करतात. याआधी वर्ष १९८० ते १९९५ या कालावधीत ते नवकार्य विद्यालय, मडकई येथेेे उत्तम शिक्षक म्हणून गौरवले गेले होते. ३०.६.२०१६ या दिवशी श्री. उमेशसर हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त शाळेत त्यांचा सत्कार होत आहे. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. शिस्तप्रिय
       त्यांची शाळेतील वर्तणूक आदर्श असते. ते स्वतः शाळेचे अनुशासन पाळतात. ते शाळेत नेहमी प्रार्थनेपूर्वी पोचतात आणि शाळेची वेळ संपल्यावरच बाहेर पडतात.
       ते अतिशय नम्र आणि प्रेमळ आहेत.

प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण एकच आहेत, अशी अनुभूती देणारा अन् मनाची नकारात्मक स्थिती नाहीशी करून मन सकारात्मक करणारा रामनाथी आश्रमातील भावसत्संग !

कु. कौमुदी जेवळीकर
       रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेसाठी आणि शिकण्यासाठी आलेले साधक यांचा प्रतिदिन भावसत्संग घेण्यात येतो. यात आरंभी भावजागृतीसाठी प्रयोग घेतला जातो. २८.३.२०१६ या दिवशी रंगपंचमी असल्याने भावसत्संग घेणार्‍या कु. कौमुदी जेवळीकरताई हिने सर्व साधक प.पू. डॉक्टरांना रंग लावण्यासाठी जात आहोत, असा भाव ठेवायला सांगितले. यामध्ये ताई विविध रंगांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगत प.पू. डॉक्टरांना रंग लावण्यास सांगत होती.
१. श्रीगुरूंच्या चरणांना रंग लावून चरणांवर मस्तक ठेवल्यास तोच रंग स्वत:च्या मस्तकीही लागेल, असा विचार येऊन तशी कृती केल्याने आनंद मिळणे : आरंभी मला श्रीगुरूंच्या मुखाला रंग कसा लावायचा ?, असा प्रश्‍न पडला. तेव्हा त्यापेक्षा त्यांच्या चरणांना रंग लावूया. नंतर मी मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवल्यास तोच रंग माझ्या मस्तकीही लागेल, असा माझा विचार झाला आणि त्यानुसार कृती केल्याने मला आनंद मिळाला. (काही वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांच्या चरणांना स्पर्श झाल्याचा एक प्रसंग या वेळी आठवून भावजागृती झाली.)

नामजप आवडीने ऐकणारा आणि देवाप्रती पुष्कळ भाव असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला, पुणे येथील चि. विस्मय विशाल अष्टेकर (वय २ वर्षे) !

कु. विस्मय अष्टेकर
        पुणे येथील कु. विस्मय विशाल अष्टेकर याचा ३०.६.२०१६ (ज्येेष्ठ कृष्ण एकादशी) या दिवशी दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. विस्मय याला सनातन परिवाराकडून 
दुसर्‍या वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणी
१ अ. बाळंतपण नीट व्हावे, यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी गुरूजींकडे गेल्यावर त्यांनी बाळाच्या तोंडवळ्यावर हनुमंताचे तेज असेल, असा आशीर्वाद देणे : गरोदर असतांना एकदा मी आणि माझे यजमान आमच्या गुरुजींकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना आम्ही बाळंतपण नीट व्हावे आणि बाळही व्यवस्थित असावे, असा आशीर्वाद मागितला. त्यावर गुरुजी म्हणाले, सर्व नीट होईल. बाळाच्या तोंडवळ्यावर हनुमंताचे तेज असेल.
१ आ. नामजप करतांना बाळ प्रतिसाद देत असल्याचे जाणवणे : गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी प्रतिदिन पोटावर हात ठेवून मारुतिस्तोत्र आणि श्री दत्तगुरूंचा नामजप करत होते. नामजप म्हणत असतांना बाळाची हालचाल चालू व्हायची. त्या वेळी बाळ नामजपाला प्रतिसादच देत आहे, असे मला जाणवत होते.

गुरुआई, तुम्हीच आम्हा सर्वांना पूर्णत्वाला न्यावे ।

गुरुआई, गुरुआई घेतेस समष्टीत तू मला कवटाळूनी ।
असतील चुका, दोष, अहं साधकांत जरी ।
तरी घेतेस तू ते पोटात घालूनी ॥ १ ॥
गुरुआई, गुरुआई हाक माराविशी वाटते ।
ओल्या पापण्या होऊन ऊर भरून येतो ।
माते, किती करशील तू समष्टीसाठी ।
कृतघ्न झाल्यासारखे वाटते मला ॥ २ ॥
सतत सेवा आमची पूर्ण व्हावी ।
दोष, अहं दूर व्हावा यासाठी ।
लवकरात लवकर श्रीकृष्णाला आम्ही भेटावे ।
म्हणून तुझीच तळमळ अधिक असते ॥ ३ ॥

देवाच्या कृपेने मनाच्या स्थितीत सकारात्मक पालट होऊन स्थिरता वाढल्याची साधकाला आलेली अनुभूती

१. एका संतांविषयी मनात नकारात्मक विचार आल्यावर देवाने सकारात्मक विचार देऊन त्यातून बाहेर काढल्याचे जाणवणे आणि त्यानंतर दिवसभरात एकदाही नकारात्मक विचार मनात न येणे : ५.१०.२०१५ या दिवशी सकाळी अल्पाहार करतांना आणि अल्पाहाराची ताटली धूत असतांना एका संतांविषयी ते संत ऐकूनच घेत नाहीत. केवळ दुसर्‍याचे दोेष सांगतात. इतर साधक सेवा करतात आणि नाव मात्र यांचे होते, असे विचार मनात येत होते. तेव्हा देवाने मनात विचार दिला, त्यांचे कितीही दोेष आणि चुका असतील, तर त्याचे फळ त्यांना मिळणार आहे. त्यामुळे मी माझी स्थिती का बिघडवून घेत आहे ? प.पू. डॉक्टरांनी त्यांच्यामध्ये काहीतरी चांगले आहे; म्हणून त्यांना दायित्व दिले आहे, तर मला त्यांचे दोष न बघता ज्या गुणांमुळे ते दायित्व दिले आहे, ते गुण मला घ्यायचे आहेत. ते संत आहेत, तर माझ्या मनात त्यांच्याविषयी असे अपशब्दाचे विचार येऊ शकत नाही. त्यानंतर मी देवाला सांगितले, देवा, तूच काय ते बघ. हे माझे विचार नाहीत. त्यानंतर माझ्या मनातील त्या संतांविषयीचे नकारात्मक विचार थांबले आणि दिवसभरात एकदासुद्धा तसा नकारात्मक विचार आला नाही.

ज्ञान आणि विषय यांचा परस्परांशी असलेला संबंध !

श्री. राम होनप
      ज्ञानाला प्रकट होण्यासाठी विषय लागतो. विषयामुळे अनेक पैलूंचे ज्ञान होते. ईश्‍वराच्या ज्ञानभांडारातून ज्ञान हवे असल्यास त्यासाठी विशिष्ट विषयाची आवश्यकता असते, उदा. सूर्य हा विषय असल्यास ईश्‍वराकडून सूर्याविषयी माहिती मिळते. या विषयामुळे सूर्याच्या कार्याचे ज्ञान होते. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०१५)

अमृत महोत्सव वर्षारंभदिनाच्या २ दिवस अगोदर रामनाथी आश्रम परिसरात दिव्यात्म्यांचे आगमन झाल्याविषयी आलेली अनुभूती

       महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीद्वारे सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृतमहोत्सव वर्षारंभदिन २९.५.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा झाला. महर्षींनी सांगितल्यानुसार २१ ते २९ मे २०१६ या कालावधीत दिवसभरातील काही वेळ संपूर्ण आश्रमात ध्वनीक्षेपकावर सामवेद गायनाची ध्वनीचकती लावण्यात आली. त्या प्रसंगी महर्षींनी सर्व साधकांना सामवेद गायन ऐकण्यासाठी सूक्ष्मातून आश्रमात येणार्‍या देवता आणि ऋषीमुनी यांचे चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना करा, असेही सांगितले होते. त्यानुसार अमृत महोत्सवाच्या अगोदर ८ दिवसांपासून आश्रम परिसरातील चैतन्य आणि सेवा करण्यासाठी उत्साह वाढल्याचे अनेक साधकांना जाणवले.
       २७.५.२०१६ या दिवशी आश्रमाच्या परिसरातील वातावरणात वरच्या बाजूला मला निळ्या, पिवळ्या, गुलाबी आणि पांढर्‍या रंगाचे अनेक गोळे दिसले. ते पाहिल्यावर माझे मन शांत झाले.
       (महर्षींच्या सांगण्यानुसार सामवेद गायन ऐकण्यासाठी आश्रमात विविध गोळ्यांच्या स्वरूपात दिव्यात्मे आल्याचे वरील अनुभूतीवरून स्पष्ट होते. - संकलक)
- डॉ. (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०१६)

गुरुकृपेने अवघ्या विश्‍वात फडकेल हिंदुत्वाचा भगवा ।

श्री. श्याम सांगुनवेढे
ईश्‍वरचरणी प्रार्थना । कधीही न व्हावा ।
हिंदु धर्माचा र्‍हास । असाच सदैव लाभावा ।
परात्पर गुरूंचा सहवास ॥ १ ॥
परात्पर गुरूंमुळेच वाढली । धर्मकार्याची व्याप्ती ।
सनातनचे होऊनी । पासष्ट साधक संत झाले ॥ २ ॥
साक्षात् ईश्‍वररूपात । लाभले प.पू. आठवले ।
गुरुकृपेने देश-विदेशातील । धर्माभिमानी एकवटले ॥ ३ ॥
कुणीही म्हणेल पाहून । साधकांची भावपूर्ण सेवा ।
गुरुकृपेने अवघ्या विश्‍वात । फडकेल हिंदुत्वाचा भगवा ॥ ४ ॥
आश्रमातील तेजाने मांडले आहेत । मनात आलेले विचार ।
खरंच झोकून देऊन । करीन गुरुकार्याचा प्रसार ॥ ५ ॥
परात्पर गुरूंच्या चरणी अर्पण,
श्री. श्याम रमेश सांगुनवेढे, निंबी (भा), जि. अकोला, महाराष्ट्र. (१४.६.२०१६)

सार्‍या जगाची आई भूवरती अवतरली ।

देवाचिया घरी राहे निरंतरी ।
देव आहे शेजारी ।
तरी तो साधक न ओळखी ॥ १ ॥
देव रहाण्याची व्यवस्था करी ।
खाण्या-पिण्यासहित सर्वकाही ।
देवाला वाटे साधकांची उन्नती व्हावी ॥ २ ॥
देव मागत नाही पैसा-अडका अन् संपत्ती ।
देव सांगतो, अहं सोडी अन् सद्गुण जोडी ।
देव मुक्तीचा मार्ग दाखवी ॥ ३ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व !
मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, तर व्यक्तीचे आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदूंचा उद्रेक कोण शमवणार ?

     हरियाणातील मानेसर येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावले. ही घटना १० जूनची; मात्र त्या संदर्भातील ध्वनीचित्रफितीचे सध्या प्रसारण होत आहे. ही गोष्ट पुढे आल्यावर वृत्तवाहिन्यांनी नेहमीप्रमाणे हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठवण्यास आरंभ केला. वृत्तवाहिन्यांच्या मते यातून म्हणे गोरक्षकांची पाशवी वृत्ती समोर आली. या प्रकरणात सर्व सहानुभूती मिळाली ती गायींना कापून गोमांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना !

विनम्र अभिवादन !

आज राजमाता जिजाऊ भोसले यांची पुण्यतिथी

(म्हणे) सनातन संस्थेने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांना संपवले !

कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने वा न्यायव्यवस्थेने सनातनवर कोणत्याही प्रकारचे आरोप
 केलेले नसतांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धादांत खोटा आरोप
     पिंपरी (जिल्हा पुणे) - बुरसटलेले विचार आणि त्या माध्यमातून कालचक्र उलटवून पूर्वीची चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा आणण्याचे सनातनचे प्रयत्न आहेत. या संस्थेला पुरोगामी विचार नष्ट करता आले नाहीत; म्हणून त्यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांना संपवले. (यावरून चव्हाण हे पुन्हा एकदा अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे काय ? - संपादक)      डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी सनातनचे दोघे जण हाती लागले आहेत. (त्या दोघांना केवळ संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. - संपादक) तरीही या संस्थेवर बंदी घालण्यासाठी वेळकाढूपणा करणार्‍या सरकारला सनातनला काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा आहे का, असे सनातनद्वेषी आणि उपरोधिक प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे २७ जून या दिवशी आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ता रत्नाकर महाजन आदी उपस्थित होते.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन अर्ज एन्आयएच्या विशेष न्यायालयाने फेटाळला

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
     मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयात केलेला जामीन अर्ज २८ जून या दिवशी फेटाळण्यात आला. या निकालामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. वर्ष २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे एन्आयएने पुरवणी आरोपपत्राद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्याआधारे त्या जामिनास पात्र असल्याचा दावा त्यांच्या जामीन अर्जात करण्यात आला होता.
     बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता, ती साध्वींच्या नावे नोंद असली, तरी ती फरारी आरोपी रामचंद्र कालसंग्रा याच्या कह्यात होती. त्यामुळे या प्रकरणाचे खापर साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर फोडले जाऊ शकत नाही, असा दावाही त्यांच्या अर्जात करण्यात आला होता; मात्र निसार अहमद सय्यद बिलाल या व्यावसायिकाने साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या जामिनाला विरोध करणारा अर्ज न्यायालयात केला होता. जमात-ए-उलेमा महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली होती. दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे बाबरी मशीद पाडण्यात आली ! - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

उपराष्ट्रपतींकडून स्वधर्मनिष्ठा शिका !
     नवी देहली - तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे बाबरी मशीद पाडली गेली, असा दावा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. विनय सीतापती यांनी लिहिलेल्या हॉफ लॉयनच्या प्रकाशनाच्या वेळी अन्सारी बोलत होते. अन्सारी पुढे म्हणाले की, जर हा देश राव यांच्या चांगल्या कामांचा लाभ घेत आहे, तर चुकीच्या कामांचे भोगही भोगत आहे. पुस्तकाचे लेखक सीतापती यांच्या म्हणण्यानुसार बाबरी पाडण्यात राव यांचा स्पष्ट हात नव्हता; मात्र त्यांनी ती वाचवण्यासाठी काहीही केले नाही.

अमरनाथ यात्रेवर २१३ जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता !

अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास भारतातून एकालाही हज यात्रेला जाऊ दिले
 जाणार नाही, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती !
     नवी देहली - २ जुलैपासून आरंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे संकट भिरभिरत आहे. काश्मीरमध्ये घुसलेल्या २१३ जिहादी आतंकवाद्यांकडून या यात्रेवर आक्रमण होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. २१३ आतंकवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्या आतंकवाद्यांचा समावेश आहे. सध्या हे आतंकवादी काश्मीर खोर्‍यात लपून बसलेले आहेत. यातील अनेक आतंकवादी पूर्वीपासून, तर काही आतंकवादी आता घुसले आहेत. त्यांचा बीमोड करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि सैनिक यांनी समन्वयाची रणनीती आखली आहे. १८ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या यात्रेच्या सुरक्षेसाठी सैन्याने हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा वापर करण्याचे ठरवले आहे. यात्रेमध्ये असणार्‍या भोजनालयांवरही आक्रमणाची शक्यता आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारच्या आक्रमणाचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

भाजप नेत्याच्या घरातून एके ५६ बंदूक पळवली !

आतंकवादग्रस्त काश्मीर ! अशी स्थिती असेल, तर सामन्य जनतेचे रक्षण कसे होणार ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे भाजपचे नेते गुलाम महंमद चोपन यांच्या घरात ४ संशयित आतंकवाद्यांनी घुसून त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍याकडून एके ५६ बंदूक हिसकावून घेऊन पळ काढल्याची घटना बडगाम जिल्ह्यातील चांदोरा येथे २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर त्या भागात दक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. गावात जाणार्‍या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली असून आतंकवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पाक उच्चायुक्तांना दिलेले इफ्तार पार्टीचे निमंत्रण मुस्लिम राष्ट्रीय मंचने मागे घेतले !

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने २ जुलैला देहलीत इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. यात ११४ देशांच्या राजदूतांना आणि उच्चायुक्तांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचाही समावे होता; मात्र पंपोर येथील आक्रमणानंतर बासीत यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना देण्यात आलेले आमंत्रण मागे घेण्यात आले आहे. बासीत यांना दूरभाष करून पार्टीला येऊ नका, असे सांगण्यात आले आहे. बासीत यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून टीका करण्यात आली होती. तसेच त्यांना निमंत्रण देणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचालाही लक्ष्य करण्यात आले होते. 

आतंकवादी आक्रमणावरून काश्मीर विधानसभेत गदारोळ

विधानसभेत गदारोळ करण्यापेक्षा केंद्रशासनाकडे पाकवर कारवाई करण्याची मागणी का करत नाही ?
     कुपवाडा (काश्मीर) - भारतीय सैनिक हुतात्मा झाल्यावरून काश्मीरच्या विधानसभेत राज्यातील सुरक्षेच्या स्थितीवरून गदारोळ झाला. राज्यशासनाने सध्याच्या सुरक्षेच्या स्थितीविषयी निवेदन द्यावे, अशी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी मागणी केली. २५ जून या दिवशी आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर केलेल्या आक्रमणात ८ पोलीस हुतात्मा झाले होते आणि जवळपास २४ हून अधिक पोलीस घायाळ झाले होते.

भारत हिंदु मुन्नानीचे नेते आर्.डी. प्रभू यांना ठार मारण्याच्या धमकीप्रकरणी शिवसेना तमिळनाडूची समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

हिंदुत्ववादी नेत्यांच्या रक्षणासाठी समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !
     चेन्नई - भारत हिंदु मुन्नानी या संघटनेचे नेते श्री. आर्.डी. प्रभू यांना दूरभाषवरून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी शिवसेना तमिळनाडूने चेन्नई पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. या वेळी त्यांनी श्री. प्रभू यांना मारणार्‍यास २५ लाख रुपये देण्याची उघड घोषणा देणार्‍या ३ जिहाद्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली. श्री. प्रभू यांना २१ जून या दिवशी ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

मंगळुरू (कर्नाटक) येथे गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याविषयी चौकशी

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची नाहक चौकशी करण्यात वेळ वाया घालवणार्‍या पोलिसांनी
 अशी चौकशी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !
     २८.६.२०१६ या दिवशी गुप्तचर विभागाच्या २ अधिकार्‍यांनी मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनच्या सेवाकेंद्रात जाऊन सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याविषयी चौकशी केली.
१. या अधिकार्‍यांनी सेवाकेंद्रातील साधकांना उपरोक्त कार्यकर्त्यांविषयी आमच्याकडे असलेल्या माहितीची केवळ निश्‍चिती करायची आहे, असे सांगितले. त्या पोलीस अधिकार्‍यांकडे या कार्यकर्त्यांचे पत्ते आणि दूरभाष क्रमांक होते.
२. साधकांनी अधिकार्‍यांना तुम्हाला जी काही माहिती हवी आहे, ती संबंधित कार्यकर्त्यांना विचारा, असे सांगितले.
३. यावर पोलीस अधिकार्‍यांनी आम्हाला वेगळी अशी काही माहिती नको आहे, असे सांगितले. यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी तेथील जागेविषयी विचारले असता, साधकांनी माहिती दिली.
४. यानंतर पोलीस अधिकमार्‍यांनी आम्ही आमच्या कार्यालयात जाऊन संबंधित कार्यकर्त्याला दूरभाष करू, असे सांगितले.

गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळते !

जुनागड (गुजरात) कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. गोलकिया यांचा दावा
केंद्रशासन राष्ट्रीय स्तरावर गोहत्या बंदी कायदा करून देशी गोधन वाचवणार आहे का ?
    
जुनागड (गुजरात) - देशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. त्यामुळे गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. (गाय ही गोपालकाचेही पालन करणारी असून देशाच्या समृद्धीची जननी आहे, असे वारंवार सिद्ध झाले असतांनाही आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशात गोहत्या बंदी कायदा न करता कोट्यवधी गायींची हत्या होऊ दिली, हे या देशाचे दुर्दैव आहे ! - संपादक)      डॉ. गोलकिया यांनी त्यांच्या ४ वर्षांच्या संशोधनामध्ये गीर जातीच्या ४०० हून अधिक गायींच्या गोमूत्राची सतत चाचणी केली. यानंतर त्यांनी १ लिटर गोमूत्रामधून ३ मिलीग्रॅम ते १० मिलीग्रॅम पर्यंत सोने काढल्याचा दावा केला आहे.

काश्मीर प्रश्‍नावर पाक मागे हटणार नाही !

पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांचे फुत्कार
काश्मीरच्या संदर्भात पाक जसा कणखर भूमिकेतून विधाने करतो, तसे 
भारतीय शासनकर्त्यांनीही करून आपण पाकहून वरचढ असल्याचे दाखवून दिले पाहिजे !
     इस्लामाबाद - पाकिस्तानला त्यांचे शेजारी राष्ट्र भारताशी मैत्रीचे संबंध हवे आहेत; मात्र पाक काश्मीर धोरणापासून मागे हटणार नाही. जेव्हाही भारताशी चर्चा होईल, तेव्हा काश्मीर प्रश्‍न प्राध्यान्याने असेल, असे पाकचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. (केंद्रात राष्ट्रवादी विचारांचे शासन येऊन २ वर्षे होऊनही पाकच्या विचारसरणीत काहीही फरक पडला नाही. यावरून शासनाची परराष्ट्र नीती फसली, तर नाही ना ? असे जनतेला वाटल्यास नवल नाही ! - संपादक)
     अजीज म्हणाले, भारत काश्मीरच्या संदर्भात पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, जे आम्हाला अमान्य आहे. पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील कोणत्याही तणावाच्या विरोधात आहे. पठाणकोट एअरबसवर जानेवारीमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चा सध्या थांबलेली आहे.

शिबिरार्थींकडून हिंदु धर्मजागृती सभा आणि साधना यांविषयी अनुभवकथन

हिंदु जनजागृती समितीच्या अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचा दुसरा दिवस !
     सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) - हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय साधनावृद्धी शिबिराचा प्रारंभ २७ जूनला येथे झाला. शिबिरात दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ जूनला शिबिरार्थींनी त्यांच्या भागांत धर्मजागृतीच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांविषयीच्या अनुभवांचे कथन केले. यातून प्रत्यक्ष कार्य करतांना येणार्‍या अडचणींवरील उपाययोजना, तसेच साधनेचे महत्त्व यांविषयी शिकायला मिळाल्याचे शिबिरार्थींनी सांगितले.
साधकत्व आणि भाव यांमुळे कर्नाटक राज्याची 
धर्मप्रसाराची फलनिष्पत्ती अधिक ! - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, कर्नाटक राज्यात साधकसंख्या अल्प असूनही साधकत्व आणि भाव यांमुळे कर्नाटक राज्यात धर्मप्रसाराची फलनिष्पत्ती अधिक आहे. येथील साधक फळाची अपेक्षा न ठेवता प्रत्येक सेवा गुरुसेवा आहे, या भावाने सेवा करतात. सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर राहून ईश्‍वराला अपेक्षित अशी सेवा करण्याचा आदर्श या साधकांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

माऊलींचा गजर आणि टाळ-मृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी (जिल्हा पुणे) येथून प्रस्थान

पाऊले चालती पंढरीची वाट !
      आळंदी - माऊली, माऊली, जय जय रामकृष्ण हरि असा जयघोष आणि टाळ-मृदूंगाच्या निनादात संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २८ जून या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे याची देही याची डोळा असा होता. परब्रह्माची भेट घेण्यासाठी निघालेल्या या पालखीमध्ये लक्षावधी संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. 
     २८ जून या दिवशी पहाटे ४ वाजता घंटानाद, पहाटे ४.१५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक करण्यात आला. पहाटे ४.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत भक्तांच्या महापूजा आणि समाधी दर्शन हे एकाच वेळी चालू होते. दुपारी १२.३० वाजता माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला.

राष्ट्रद्रोही सुधींद्र कुलकर्णी यांची पत्रकार परिषद शिवसैनिकांनी उधळली !

भारतात असे कार्यक्रम आयोजित करणे हा पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी 
बळी घेतलेल्या सहस्रो नागरिक आणि सैनिक यांचा घोर अवमान आहे ! 
 • केवळ शिवसैनिकच राष्ट्रप्रेमी आहेत का ?
 • पाक छायाचित्रकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन
 • पाकप्रेमात आकंठ बुडालेल्या सुधींद्र कुलकर्णी यांना पाकमध्ये हाकला !
     मुंबई - मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरमच्या नावाखाली सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानी छायाचित्रकारांना बोलावले आहे. तस्बीर ए मुंबई-तस्बी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी २८ जून या दिवशी दुपारी प्रेस क्लब ऑफ मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सीमेवर रोज सैनिकांचे बळी जात असतांना हे पाकिस्तान प्रेम कशासाठी ?, असा प्रश्‍न करत आणि घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी ही पत्रकार परिषद उधळून लावली. सुधींद्र कुलकर्णी यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ५ शिवसैनिकांना कह्यात घेतले आहे.

आई-वडील अथवा नातेवाईक यांचे संरक्षण करण्यासाठी कुणावर प्रतिआक्रमण केले, तर तो गुन्हा क्षमापात्र ! - सर्वोच्च न्यायालय

      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्र आणि न्या. शिव कीर्ती सिंह यांच्या खंडपिठाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालानुसार स्वत:चे आई-वडील अथवा नातेवाईक यांचे संरक्षण करण्यासाठी कुणावर प्रतिआक्रमण केले, तर तो गुन्हा क्षमापात्र ठरेल. याआधी प्रचलीत कायद्यानुसार हे प्रावधान केवळ स्वत:च्या संरक्षणापुरतेच मर्यादित होते.
     राजस्थानातील दोघांना त्यांच्या शेजार्‍यावर प्राणघातक आक्रमण केल्याच्या आरोपाखाली कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवून २ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठवली होती. ही शिक्षा नंतर राजस्थान उच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने, या दोघांनी शेजार्‍यांवर का आक्रमण केले, त्याची कारणे कनिष्ठ न्यायालयाने विचारात घेतली नव्हती, तसेच या आरोपींनाही अनेक जखमा झाल्या होत्या ही गोष्टही नजरेआड केली, असे म्हटले आहे. या सर्वांचा विचार करून त्यांना निर्दोष मुक्त केले. (कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वरिष्ठ न्यायालय पालटते. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश सक्षम नाहीत म्हणून त्यांना न्यायदानासाठी अपात्र का ठरवत नाहीत ? - संपादक)


गोमांस वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना गोरक्षकांनी शेण खाऊ घातले !

हिंदूंसाठी श्रद्धास्थानी असणार्‍या गोमातांची हत्या करून त्यांच्या मासांची वाहतूक 
करणार्‍यांच्या विरोधात हिंदूंचा हा उद्रेक राज्यकर्ते केव्हा लक्षात घेणार ?
     मानेसर (हरियाणा) - येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्‍या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.
    गोरक्षक दलाचे गुडगाव येथील प्रमुख धमेंद्र यादव यांनी सांगितले की, कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर टेम्पोमधून गोमांस नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी रिझवान आणि मुख्तयार या दोघांना टेम्पोचा ७ किलोमीटर पाठलाग करून बदरपूर सीमेजवळ रोखले. त्यांच्याजवळ ७०० किलो गोमांस सापडले.

पंपोर येथील आक्रमणाचा सूत्रधार हा हाफिज सईदचा जावई !

पाक हाफीज सईदवर कोणतीही कारवाई करत नाही, तेथे त्याच्या जावयावर कारवाई काय करणार ? 
पाकला जशास तसे उत्तर देणारे राज्यकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्म राज्यच हवे !
     श्रीनगर - काश्मीरच्या पंपोरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ८ पोलीस ठार झाले होते. या आक्रमणामागे जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याचा जावई खालिद वलीद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    या आक्रमणाच्या वेळी २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या आतंकवाद्यांना आम्ही ठार मारले, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस आणि सैनिक यांच्यात श्रेय घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. (८ पोलिसांना ठार केल्याच्या दुःख करण्याऐवजी २ आतंकवाद्यांना ठार केल्याचे श्रेय घेण्यासाठी वाद घालणारे सुरक्षा रक्षक देशाचे कसे रक्षण करणार ? - संपादक)

मिरी (बॉर्नियो) येथे उभारण्यात आलेले हिंदु मंदिर १० जुलैला उघडणार !

     मिरी - मलेशियाजवळील बॉर्नियो बेटावरील मिरी येथे उभारण्यात आलेले श्री कामिनी दुर्गा ईश्‍वरी अम्मा अलायम मंदिर १० जुलै या दिवशी हिंदु भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या मंदिरामुळे मिरी हिंदु सोसायटीच्या १ सहस्रपेक्षा अधिक सदस्यांना पूजाविधीसाठी जागा उपलब्ध होणार आहे. मिरीच्या तमन तुंकु येथे उभारलेले श्री कामिनी दुर्गा ईश्‍वरी अम्मा अलायम मंदिर हे येथील पहिलेच हिंदु मंदिर आहे. या मंदिराचे आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, असे मिरी हिंदु सोसायटीचे अध्यक्ष सेलवाराज ग्रप्रगसे यांनी सांगितले.
     मंदिराच्या उभारणीसाठी साहाय्य केलेले राज्यशासन, विविध संघटना आणि अर्पणदाते यांचे श्री. ग्रप्रगसे यांनी आभार मानले आहेत. १० जुलै या दिवशी मंदिराचे विधिवत् उद्घाटन होणार आहे. त्या दिवशी मंदिरात महाकुंभाभिषेक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे मिरी हिंदु सोसायटीच्या अध्यक्षांनी सांगितले.

कार्वे (जिल्हा सातारा) येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागेची अनुमती

हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाचा परिणाम !
     कार्वे - येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.
१. कार्वे, तालुका कराड येथील कार्वे-शेणोली राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे कार्य चालू आहे. कार्वे गावानजीक असलेल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासकीय हद्दीमध्ये आहे.
२. तो पुतळा शासकीय भूमीवरील अतिक्रमण असून रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा निर्माण करत आहे, असे सांगून पाटबंधारे खाते तो मागे हलवण्याच्या विचारात आहे. २८ जून या दिवशी सरकारकडून पुतळा हलवण्यात येणार असल्याची नोटीस ग्रामपंचायतीला देण्यात आली. नोटिसीची एक प्रत कराड ग्रामीण पोलीस ठाण्याला माहितीसाठी देऊन त्यांच्याकडून आवश्यक ते पोलीस संरक्षण मागण्यात आले आहे. (अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असा प्रसंग घडवला असता, तर त्यांना विरोध करण्याचे अथवा ते हटवण्याचे धाडस झाले असते का ? - संपादक)

महाराणा प्रताप बटालियन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने !

निदर्शने करतांना महाराणा प्रताप बटालियनचे
आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
     मुंबई - आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आतंकवादाना बेल आणि हिदूंना जेल अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. कारागृहात असणारे निर्दोष साधू-संत आणि धर्मरक्षक यांची त्वरित सुटका करावी, त्यांच्यावरील खटले रहित करण्याची मागणी केली. हिंदू महासभा, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, हिंदुराष्ट्र सेना, हिंदू राष्ट्र जनजागृती संघटन, हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग होता साधू, संत आणि हिंदुत्ववादी संघटना उपस्थित होत्या. या वेळी बटालियनचे अध्यक्ष श्री. ठाकूर अजयसिंह सेंगर, श्री. एकनाथ मुंबईकर, श्री. निखिल वर्मा यांनी मार्गदर्शन केले.

दादरमध्ये रिपब्लिकन सेनेकडून मोर्च्याच्या वेळी दुकानांवर दगडफेक आणि मोडतोड !

डॉ. आंबेडकर यांचे जुने मुद्रणालय आणि भवन पाडल्याचे प्रकरण
     मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील जुने ऐतिहासिक मुद्रणालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याचा विरोध म्हणून रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या वेळी आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक केली आणि साहित्याची मोडतोड करून दुकाने बंद करण्यास सांगितले. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. या घटनेमुळे या भागात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. 
     आनंदराज आंबेडकर या मोर्च्याचे नेतृत्व करत होते. आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांच्या देखत दुकाने आणि वाहने यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली, तसेच काही दुकानांतील पैसेही चोरण्यात आले. डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स इम्प्रूव्हमेंट या न्यासाकडे या दोन वास्तूंची मालकी होती. २७ जून या दिवशी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता. न्यासाने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे; मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय आणि अन्य नागरिक यांनी विरोध दर्शवला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn