Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पी. चिदंबरम् यांनीच लपवले होते इशरत जहाँचे लष्कर-ए-तोयबाशी असलेले संबंध !

माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांचा आणखी एक गौप्यस्फोट
हिंदूंना भगवे आतंकवादी ठरवून जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या
देशद्रोही काँग्रेसवर बंदी घाला आणि त्यांच्या नेत्यांना कारागृहात डांबा !
    नवी देहली - आतंकवादी इशरत जहाँ चकमक प्रकरणी दोन दिवसांपूर्वी गौप्यस्फोट करणारे माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी आणखी एक दावा केला आहे. इशरत ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याची माहिती लपवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनातील गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केंद्रशासनाच्या प्रतिज्ञापत्रात पालट केले होते, असा गौप्यस्फोट पिल्लाई यांनी केला आहे. चिदंबरम् यांनी या विषयावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पिल्लाई यांनी याआधीही इशरतप्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे म्हटले होते.
१. पिल्लाई एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरत आणि तिचे साथीदार लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे नमूद होते; परंतु त्यात पालट झाल्यानंतरच या प्रकरणाची धारिका (फाइल) माझ्याकडे आली.
२. याआधी पिल्लाई यांनी म्हटले होते की, इशरत लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याचे उघड व्हावे, असे काही जणांना वाटत नव्हते.
३. इशरत आणि तिच्या साथीदारांविषयीची माहिती मिळवून तिला शोधून काढणे, हे गुप्तचर यंत्रणेचे मोठे यश होते.

राममंदिर उभारण्याच्या प्रकरणाची सुनावणी प्रतिदिन होण्यासाठी प्रयत्न करणार ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी यांना हे का करावे लागत आहे ? हिंदूंचे आशास्थान
असलेले केंद्रातील शासन स्वतःहून प्रयत्न का करत नाही ?
    कानपूर - सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या प्रकरणी मला पक्षकार करून चांगले केले. आता मी २९ फेब्रुवारीला एक याचिका दाखल करून या प्रकरणावर प्रतिदिन सुनावणी करण्याची मागणी करणार आहे, ज्यामुळे एका मासातच या प्रकरणावर निकाल मिळेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे एका परिषदेत सांगितले.
डॉ. स्वामी यांनी मांडलेली सूत्रे
१. नेहरू-गांधी परिवारातील कुणीही महाविद्यालयीन शिक्षणात उत्तीर्ण झालेले नाही. नेहरूंपेक्षा बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते. त्यामुळे त्यांना पंडित म्हटले गेले पाहिजे.

पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकमध्ये तिघांना अटक

    लाहोर - पठाणकोट येथील वायूदलाच्या केंद्रावर झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी पाकमध्ये ३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ६ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. (पाकने आतापर्यंत २६/११ प्रकरणी कुणावर तरी कारवाई केली आहे का ? पाक आम्ही काही तरी करत आहोत, हे दाखवून जगाच्या डोळ्यांत धूळफेक आणि भारताच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न कायमच करत आला आहे. अशा धूर्त पाकशी मैत्री नव्हे, तर त्याला धडा शिकवावा ! - संपादक) त्यांना लाहोरपासून ७० कि.मी. अंतरावरील गुजरांवाला येथे अटक करण्यात आली.

(म्हणे) अल्पसंख्यांकांच्या विरोधात धार्मिक हिंसा करणार्‍यांवर कारवाई करा !

जगाचा कैवार घेतल्याच्या तोर्‍यात असलेल्या
अमेरिकेच्या ३४ खासदारांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
  • काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या वेळी अमेरिकेचे हे खासदार झोपले होते का ?
  • पाक आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्यांना दिसत नाहीत का ?
  • भारताच्या अंतर्गत प्रकरणात ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःच्या देशातील अश्‍वेत नागरिकांच्या विरोधात होणारी हिंसा रोखण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न करावेत !
  • जगभरातील मुसलमानांपेक्षा भारतातील मुसलमान अधिक सुखी, असे जिहादी आतंकवाद्याने म्हटल्याचे यांना माहिती नाही का ?
    वॉशिंग्टन - अमेरिकेतील ३४ वरिष्ठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतातील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हिंसेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यात त्यांनी या अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या रक्षणार्थ आणि त्यांना न्याय देण्यासाठी पावले उचलण्याविषयी म्हटले आहे. या पत्रात विशेषतः मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख यांच्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र टॉम लंटोस मानवाधिकार आयोगाने प्रसिद्धीसाठी प्रकाशित केले आहे.
१. यात पुढे म्हटले आहे की, संघासारख्या संघटनांच्या कारवायांना नियंत्रित करावे. 

१२५ कोटी जनता उद्या माझी परीक्षा घेणार !

पंतप्रधान मोदी यांची अर्थसंकल्पाविषयी मन की बात !
     नवी देहली - तुमच्या परीक्षा जवळ येत आहेत; पण उद्या माझी परीक्षा आहे. २९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होणार असून १२५ कोटी देशवासी माझी परीक्षा घेणार आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारीला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसह शालांत परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी किक्रेट खेळाडू सचिन तेंडुलकर आणि बुद्धीबळपटू विश्‍वनाथ आनंद सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांचा संदेशही ऐकवला.

इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे सांगवी (जिल्हा पुणे) येथील व्याख्यान रहित !

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
हिंदुत्ववाद्यांच्या कृतीशील संघटनास यश !
    पिंपरी, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील सांगवी भागात आयोजित करण्यात आलेले इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्पर आणि संघटित कृतीमुळे रहित करण्यात आले.
    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिवजयंती प्रबोधन व्याख्यानाच्या अंतर्गत सांगवी येथे २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वाजता कोकाटे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्रीमंत कोकाटे यांचा पूर्वेतिहास पहाता ते नेहमीच इतिहासाचा विपर्यास करून ब्राह्मण समाजावर गरळओक करतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मुसलमानप्रेमी होते, अशी प्रतिमा रंगवतात. (इतिहासाची मोडतोड करून विकृत इतिहास समाजापर्यंत पोहोचवणारे कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करणे, हे महानगरपालिकेतील संबंधित अधिकार्‍यांचे अज्ञान म्हणायचे कि इतिहासद्रोहाला असणारा राजाश्रय ? - संपादक)

आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या ऑनलाईन हस्ताक्षर चळवळीस अभूतपूर्व प्रतिसाद !

भारत शासनाने आरक्षणपद्धतच बंद करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
  • जातीनिहाय आरक्षणाच्या विरोधात जनरेटा !
  • २ लाख ४० सहस्रांहून अधिक देशाभिमानी नागरिकांनी केली स्वाक्षरी !
     नवी देहली - आरक्षणाने देश विभाजित होत आहे. सर्व एकाच देवाची लेकरे असूनही त्यांच्यात भेदभाव केला जात आहे. सर्व एकाच देशाचे नागरिक आहेत आणि या देशाची संस्कृती प्राचीन आहे. सक्षम तरुणांना आरक्षणाच्या धोरणांमुळे आयुष्यातील संधींना मुकावे लागत आहे. शासनाच्या जातीनिहाय आरक्षणाच्या धोरणाविरुद्ध लढा देण्यासाठी ऑनलाईन चळवळचेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर आरंभण्यात आली आहे. 
१. यासंदर्भात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातीनिहाय आरक्षण समाप्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
२. #YouthUprisingAgainstReservation या ट्विटर हॅशटॅगचा वापर करून अधिकाधिक तरुणांनी आरक्षणाच्या धोरणात पालट करण्यासाठी शासनास उद्युक्त करावे, असे आवाहनही या याचिकेद्वारे करण्यात आले आहे.

पीडीपी-भाजप शासन बनल्यास सहा महिन्यांत कोसळेल ! - माजी रॉ प्रमुख ए. एस्. दुलत

फुटीरतावाद्यांच्या वाढत्या कारवायांना चाप बसवण्यासाठी पीडीपीचे समूळ 
उच्चाटन करून राष्ट्रप्रेमी राज्यकर्त्यांचे शासन स्थापन करणे आवश्यक !
     जम्मू - जम्मू-काश्मीरमधील राजकीय स्थिती चांगली नाही. राज्यात शासन स्थापन करण्याविषयी पीडीपी आणि भाजप यांच्यामध्ये असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून केला जात नाही. त्यामुळे पीडीपी-भाजप युती शासन सत्तेवर आले, तरी ते सहा महिन्यांत कोसळेल, असे रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख ए.एस्. दुलत यांनी म्हटले आहे. काश्मीर आणि जम्मू यांच्यातील दरी वाढलेली असून दोन्ही प्रदेश विरुद्ध दिशेने वाटचाल करत आहेत. श्रीनगर, जम्मू आणि देहली यांच्यातील दरी कशी मिटवली जाणार, असा प्रश्‍न दुलत यांनी केला आहे.
      श्रीनगरमध्ये जेएन्यूचे आभार मानणारे फलक लावण्यात येत आहेत, तर जम्मूमध्ये भाजपचे आभार मानले जात आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ वाढणार असल्याचे चित्र दृष्टीस पडते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक निर्णयासाठी केंद्रशासनाला उत्तरदायी ठरवले जाणार आहे, असे दुलत यांनी म्हटले आहे.

हिंदुत्ववाद्यांना प्रतिगामी ठरवून त्यांना पारितोषिके न देण्याचे कारस्थान ! - डॉ. शेषराव मोरे

हिंदूंनो, विद्यापिठांचा हिंदुद्वेष जाणा !
    नाशिक - विद्यापीठ आणि माध्यमे यात प्रामुख्याने डाव्या विचारांची मंडळी मोक्याच्या जागेवर (प्रमुख पदावर) आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातच नव्हे, तर सर्वच विद्यापिठांत सर्व अधिकाराच्या जागा डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी बळकावल्या असून हिंदूंच्या न्यायाची भाषा करणार्‍यांना कोणताही अभ्यास न करता सरसकट प्रतिगामी ठरवून त्यांना सुविधा आणि पारितोषिके न देण्याचे कारस्थान विद्यापिठांच्या स्थापनेपासून शिजले आहे. सावरकर, हिंदूसंघटन करणारे यांना हीन लेखले जाते. प्रतिगामी अशी शिवी दिली जाते. त्यांना पीएच्.डी., प्राध्यापकी नाकारली जाते, त्यामुळे लोक नाईलाजाने आपण पुरोगामी आहोत, असे दाखवतात, असे प्रतिपादन चौथ्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी केले. नाशिक येथे शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

जेएन्यू प्रकरणी राहुल गांधी, केजरीवाल, येच्युरी, त्यागी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल !

भाजप शासनाने देशद्रोह्यांना कठोर शिक्षा करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
    भाग्यनगर - जेएन्यूच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, खासदार डी. राजा आणि जनता दल (सं)चे नेते के.सी. त्यागी यांच्यावर कलम १२१(ए) आणि १५६(३) नुसार साइबराबाद येथील सरूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशद्रोही घोषणा देणार्‍यांपैकी कन्हैया कुमार यांच्या अटकेचा विरोध करण्यासाठी या परिसरात घेण्यात आलेल्या सभेत हे नेते सहभागी झाल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पम्पोर येथील आतंकवादी आक्रमण : एक सुनियोजित कट

महत्त्वाच्या इमारतींवर वारंवार होणारी आक्रमणे हे भारताविरोधातील युद्धच आहे, हे शासनाला 
समजत नाही का ? आक्रमण झाल्यावर उत्तर देण्यापेक्षा आक्रमण होऊ नये, यासाठी 
प्रयत्न का करत नाहीत ?
     श्रीनगर - काश्मीरच्या पम्पोर शहरातील ईडीआय इमारतीतील आतंकवादी आक्रमण हा एक सुनियोजित कट होता. तीन दिवस चाललेल्या गोळीबाराचे चित्रीकरण केलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नियंत्रण खोली आतंकवाद्यांनी उद्ध्वस्त करून टाकली होती. या इमारतीची संपूर्ण माहिती आतंकवाद्यांना होती. त्यामुळेच त्यांना कॅमेर्‍यांची नियंत्रण खोली नष्ट करणे शक्य झाले, हे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आतंकवाद्यांना कुठलाच पुरावा मागे ठेवायचा नव्हता. इमारतीचे उद्वाहन (लिफ्ट) ही आतंकवाद्यांनी उडवून लावले होते. सुरक्षादलाला इमारतीमध्ये प्रवेश करता येऊ नये, यासाठी सर्व वाटा बंद करून टाकल्या होत्या. सुरक्षादलाच्या सैनिकांना या आवाराची माहिती करून घेण्यास काही घंटे लागले; मात्र १५ एकरमध्ये पसरलेल्या या आवाराची संपूर्ण माहिती आतंकवाद्यांना होती, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
     तीन दिवस चाललेल्या या चकमकीत तीनही आतंकवादी ठार झाले, तसेच सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले. त्यामध्ये सैन्यदलाच्या दोन कॅप्टनचा समावेश होता.

इंडोनेशिया शासन देहविक्रय केंद्रे बंद करणार !

जे इंडोनेशियासारख्या लहान देशाला जमते, ते भारताला का जमत नाही ?
     जकार्ता - इंडोनेशिया शासनाने वर्ष २०१९ पर्यंत देशातील सर्व देहविक्रय केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय आकडेवारीनुसार तेथे अशा प्रकारची १६८ केंद्रे आहेत. शासनाकडून यापैकी ६८ केंद्रे बंद करण्यात आली असून बाकी केंद्रे येत्या ३ वर्षांत बंद करण्यात येणार आहेत. या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी इंडोनेशिया शासनाने विविध योजना राबवण्याचे ठरवले आहे. युनिसेफच्या अहवालानुसार इंडोनेशियात देहविक्रय व्यवसायात असलेल्या महिलांतील ३० टक्के मुली अल्पवयीन आहेत. या ठिकाणी सिंगापूरहून येणार्‍या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. (इंडोनेशियात भारताप्रमाणे तथाकथित स्त्रीमुक्तीवादी संघटना नाहीत, ते बरेच झाले ! अन्यथा त्यांनी महिलांवर अन्याय होतो, असे म्हणून तेथील शासनावर दबाव आणला असता ! - संपादक)

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंच्या संघटनशक्तीचा आविष्कार !

व्यासपिठावर डावीकडून सनातन संस्थेच्या सौ. नयना
भगत, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट या संकेतस्थळाचे संपादक
श्री. पारस राजपूत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके

शासनाने देशप्रेमाची कृती करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करा ! - भाऊ तोरसेकर

श्रीशिवप्रतिष्ठानची इतिहास अभ्यास परिषद 
धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना भारताचार्य सु.ग. शेवडेगुरुजी
    सांगली, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - श्री. नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदुत्वावर आक्रमण केले जात होते. आता ते सत्तेत आल्यावर थेट राष्ट्रवादावरच आक्रमण करून तो दुर्बळ करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. भारतविरोधी घोषणा देणारे अयोग्य कृती करत आहेत, असे न्यायालय, पोलीस, शासन सांगत नाहीत. कोणतेही शासन त्यांची धोरणे पालटत नाहीत. त्यांनी देशप्रेमाविषयी कृती करायला हवी, अशी धोरणे बनवण्यास भाग पाडणारी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे, हेच आजच्या तरुणांचे खरे कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी केले. ते श्रीशिवप्रतिष्ठानच्या इतिहास अभ्यास परिषदेत हिंदुत्व आणि आजची स्थिती या विषयावर बोलत होते.

(म्हणे) भाजप फक्त राष्ट्रभक्त आणि बाकीचे राष्ट्रद्रोही असे भासवले जात आहे !

गुन्हेगारांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार !
    मुंबई - भाजप फक्त राष्ट्रभक्त आणि बाकीचे राष्ट्रद्रोही, असे भासवले जात आहे. त्यामुळे संघर्षासाठी सिद्ध रहा. जेएन्यू प्रकरण एक राष्ट्रीय षड्यंत्र आहे. मोदी शासनामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून काही करायचे म्हटल्यास लगेच देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो. त्यामुळे आता आपल्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनीही सावध व्हावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. (काँग्रेस शासनाच्या राजवटीत धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी कथित आरोपांवरून हिंदुत्ववाद्यांना नाहक कारागृहात डांबण्यात आले. या हिंदुद्वेषाविषयी शरद पवार यांना काय म्हणायचे आहे ? - संपादक) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.

महिला कैद्यांकडून मंदिरातील प्रसाद बनवून घेण्याचा निर्णय अतिशय अयोग्य !

     पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरासाठी लागणारे प्रसादाचे लाडू कारागृहातील महिला कैद्यांकडून बनवून घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय अयोग्य आहे. खरे तर मंदिरातील प्रसाद बनवणे, हे व्यावसायिक कंत्राट नसावे. प्रसाद बनवणारा सेवाभावी असावा. कारागृहातील कैदी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असतात. त्यामुळे तेथील वातावरणही चांगले नसते. तेथे नकारात्मक शक्ती असते.
     अनेक देवस्थानात नामस्मरण करत प्रसाद बनवला जातो. त्यामुळे त्याच्या ग्रहणाने ईश्‍वरी चैतन्य मिळते. नामस्मरणाने प्रसादात सात्त्विक भाव उतरतात. अशा ठिकाणी भाविकांची श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो. त्याला कुठल्याही परिस्थितीत तडा जायला नको, हे महत्त्वाचे आहे.
     महिला कैद्यांना रोजगाराचे पुष्कळ मार्ग आहेत. त्यांचा वापर करावा. प्रसादाचे लाडू बनवून त्यांना रोजगार मिळेल, असे नाही. पुरुष कैद्यांनाही प्रसाद बनवण्यास देऊ नये.
     अशा प्रकारे निर्णय घेऊन लाखो भक्तांच्या असंतोषाला कारणीभूत होऊ नये आणि नवा वादही उपस्थित करू नये !
- श्री. दिलीप मुरलीधर देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव.

प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून लोकेश मिश्रा या विद्यार्थ्याची आत्महत्या

रोहित वेमुला प्रकरणी आकाशपाताळ एक करणारे राज्यकर्ते आता कुठे गेले ?
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून लोकेश मिश्रा (वय २० वर्षे) या विद्यार्थ्याने २५ फेब्रुवारी या दिवशी रहात्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला. 
१. मूळचा आझमगढ येथील एका शेतकरी कुटुंबातील असलेला लोकेश बी.एन्. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात (कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये) शिकत होता.
२. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठीत (सुसाइड नोटमध्ये) विभागप्रमुख दीपक असरानी यांनी मला परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी २० सहस्र रुपये मागितल्यामुळे आणि मला परीक्षेला बसू न दिल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. 
३. या प्रकरणी प्रा. असरानी यांनी अटक करण्यात आल्याचे समजते.
४. लोकेशच्या आत्महत्येच्या विरोधात विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत महाविद्यालयाच्या परिसरात दगडफेक केली, तसेच या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची मागणी केली.
५. राज्यशासनाकडून लोकेशच्या कुटुंबियांना १० लाख, तर महाविद्यालय प्रशासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले आहे.
६. या प्रकरणाचा अन्वेषण करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाने समिती नेमली आहे.

सांगवी (जिल्हा पुणे) येथे भांडणे सोडवण्यास गेलेल्या २ पोलीस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

याचा अर्थ समाजामध्ये पोलिसांविषयी वाटणारा धाक संपला कि काय ? पोलिसांना होणार्‍या मारहाणीविषयी तथाकथित पुरोगामी आणि मानव आयोगवाले आता काहीच का बोलत नाहीत ?
     पिंपरी (पुणे), २८ फेब्रुवारी - जागेवरून झालेली भावाभावांतील भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या २ पोलीस कर्मचार्‍यांनाच दमदाटी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. त्या २ पोलीस कर्मचार्‍यांची नावे सहदेव ढाकणे आणि कल्याण भोसले अशी आहेत. ही घटना २३ फेब्रुवारी या दिवशी सांगवी येथील कुंभारवाडा येथे घडली. या प्रकरणी बाळासाहेब धोंडिबा काची, गणेश बाळासाहेब काची आणि महादेव धोडिंबा काची या तिघांना अटक करण्यात आली आहे. उपरोक्त तिघे आणि सरिता बाळासाहेब काची यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

हिंदु जनजागृती समितीचा तोल गेला आहे का ? या प्रश्‍नावर मी मराठी वृत्तवाहिनीचे चर्चासत्र

चर्चासत्रातून आपला हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याचा काँग्रेस आणि 
भूमाता ब्रिगेड यांचा अश्‍लाघ्य प्रयत्न !
श्री. अरविंद पानसरे
     मुंबई - कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीचा प्रसाद येथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून बनवून घेण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीने विरोध केला आहे. या निमित्ताने २४ फेब्रुवारी या दिवशी मी मराठी या वृत्तवाहिनीने हिंदु जनजागृती समितीचा तोल गेला आहे का ? या विषयावरच चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्रात भाजपचे प्रवक्ता श्री. योगेश वर्मा, काँग्रेसचे प्रवक्ता हरीश रोग्ये, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे सहभागी झाले होते. मी मराठी वाहिनीचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

बजरंग दलाच्या वतीने राहुल गांधी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

प्रतिकात्मक अंत्ययात्रेत सहभागी कार्यकर्ते
     राजगुरुनगर (जिल्हा पुणे), २८ फेब्रुवारी (वार्ता.) - जवाहरलाल नेहरु विद्यापिठात आतंकवादी अफजलच्या समर्थनार्थ आणि भारतमातेच्या विरोधात घोषणा देणार्‍या देशद्रोही विद्यार्थ्यांचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी समर्थन केले होते. याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतीने २६ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा राजगुरु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. राहुल गांधी यांची प्रतिकात्मक तिरडी बांधून त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

अमरावती येथे हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्र धर्माभिमान्यांची उपस्थिती

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव,
पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित देशमुख
  

(म्हणे) गोव्यातील मंत्र्यांची मागणी हा मूर्खपणा !

पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी माफी मागण्याचे प्रकरण
पोर्तुगालच्या पार्टीदो सोशलिस्टा ऑफ पोर्तुगालचे सदस्य एडगर वालीस यांचे उद्दाम वक्तव्य
      येथील हिंदूंचा अनन्वित छळ करून मोठ्या प्रमाणावर घडवलेली धर्मांतरे, मंदिरांचे केलेले भंजन आणि धर्मच्छल करूनही त्याविषयी माफी मागायला सांगितल्यावर येथील मंत्र्यांनाच मूर्ख म्हणणार्‍या पोर्तुगिजांची मग्रुरी अजूनही गेलेली नाही, हेच यातून स्पष्ट होते. त्यांना समजेल, अशा भाषेतच समजवायला हवे !
       पणजी, २८ फेब्रुवारी - ब्रिटिशांनी भारतियांना कुत्र्याप्रमाणे वागवले; परंतु त्यांनी यासाठी माफी मागावी, असा विचारसुद्धा कोणी केलेला नाही. पोर्तुगिजांनी त्यांच्या राजवटीत गोव्यात केलेल्या अत्याचारांसाठी गोव्याशी निगडित असलेले पोर्तुगालचे पंतप्रधान आन्तानियो कोस्ता यांनी गोमंतकियांची माफी मागावी, अशी मागणी एका मंत्र्याने केल्याचे ऐकले आणि त्याचे मला आश्‍चर्य वाटले.

सिंधुदुर्गातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या यात्रेत ख्रिस्त्यांचा धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न

हिंदूंच्या यात्रेत येऊन स्वतःच्या पंथाचे गोडवे गाण्याचे ख्रिस्त्यांचे धाडस कसे होते ?
हिंदूंनो, लाखो ख्रिस्त्यांमध्ये जाऊन कोणी हिंदु धर्माचा प्रसार करू शकतात का ?
देवस्थान समितीने नोंद घेतल्यावर हिंदु धर्मद्रोही प्रकार बंद
     मालवण - दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी-मसुरे येथील श्री देवी भराडीमातेच्या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहिले होते. असे असले, तरी यात्रेच्या २५ फेब्रुवारी या पहिल्या दिवशी यात्रेसाठी उसळलेल्या गर्दीचा अपलाभ उठवत काही ख्रिस्त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रसार करणारी पत्रके वाटली. हा प्रकार समजताच काही धर्माभिमानी हिंदू आणि देवस्थान समितीचे कार्यकर्ते यांनी ही पत्रके कह्यात घेतली, तसेच देवस्थान समितीने ध्वनीवर्धक यंत्रणेवरून धर्मद्रोही ख्रिस्ती प्रसारकांना अशा प्रकारे धर्मद्रोह न करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर हा प्रयत्न थांबवण्यात आल्याचे लक्षात आले. (अशा धर्मप्रसारकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास पुन्हा असे करण्याचे धाडस ते करणार नाहीत ! - संपादक)

१२ वीच्या परीक्षेमध्ये नक्कल (कॉपी) करण्याची राज्यात ११८ प्रकरणे, शिक्षकांकडून दुर्लक्ष

    मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचे (कु)फलित ! नक्कल करणार्‍यांच्या वृत्तीत उद्याच्या भ्रष्टाचारी कृतींची बीजे रोवली आहेत. त्यामुळे उद्याचे भविष्य सुधारण्यासाठी नक्कल करण्यासारखे प्रकार होऊच नयेत किंवा ती करावीशी वाटू नये, यासाठी मुलांना धर्माचरणाचे धडे देणे, हाच यावर एकमात्र उपाय ! 
    पुणे, २८ फेब्रुवारी - राज्यात सध्या १२ वीची परीक्षा चालू आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी चिटणीसाची कार्यपद्धती, भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचे पेपर होते. सदर तिन्ही विषयांच्या प्रश्‍नपत्रिका सोडवतांना राज्यात नक्कल करण्याची ११८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. अनेक केंद्रांवर ही नक्कल प्रकरणे होत असतांनाही त्या वेळी उपस्थित असलेल्या शिक्षकांनी दुर्लक्ष केले असल्याचे पडताळणी करण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले. (नक्कल करणारे विद्यार्थी आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून साहाय्य करणारे शिक्षक अशा दोहोंना शिक्षण विभागाने कडक शासन करणे आवश्यक आहे, तरच अशा अपप्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. - संपादक)

सांगली जिल्ह्यात चारा टंचाई नाही ! - जिल्हाधिकारी

     सांगली, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - ज्यांच्याकडे प्रत्यक्षात गुरे नाहीत, अशा चारा छावणी मालकांनीच चारा छावणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. जिल्हा परिषद अध्यक्षांनीही छावणीचा अर्ज केला होता. त्यांना मी चार्‍याची मागणी असलेल्या दहा शेतकर्‍यांची नावे मागितली आहेत. त्यामुळे चारा छावण्यांची मोघम मागणी करणारी सर्व आवेदने नाकारण्यात आली आहेत. सद्यस्थितीत प्रत्यक्षात चारा छावणीसाठी एकाही शेतकर्‍याची मागणी नाही आणि जिल्ह्यात चारा टंचाई नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
    ते पुढे म्हणाले, म्हैशाळ योजनेचे पाणी शेवटपर्यंत पोहोचल्यास चारा आणि पाणी यांचा प्रश्‍न गंभीर होणार नाही. शेवटच्या कालावधीत पाणी पुरवणार्‍या टँकर्सची संख्या १३० पर्यंत जाऊ शकते.

जागृती मंचाच्या वतीने जेएनयु प्रकरणाच्या निषेधार्थ वाशी येथे निदर्शने

      नवी मुंबई - जागृती मंचाच्या वतीने जेएनयु प्रकरणाच्या निषेधार्थ वाशी रेल्वेस्थानकाच्या समोर २३ फेब्रुवारीला निदर्शने करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जेएनयूमध्ये तेथील विद्यार्थ्यांनी दिलेल्या राष्ट्र्रविरोधी घोषणांचा या वेळी निषेध करण्यात आला. तसेच या वेळी राष्ट्रद्रोही प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे अशा देशद्रोह्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून त्याचे निवेदन देशाच्या राष्ट्र्रपतींना पाठवण्यात आले. 
     या वेळी सर्वश्री वसंत सणस, सुरेशसिंह राणा, प्रभाकर राय, सतिश निकम, आकाश कोटेचा, विनोद उपाध्याय, राहुल देढिया, प्रमोद जोशी, सरस्वती पांडे, ब्रिगेडीयर धर्मप्रकाश यांच्यासह हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरीही उपस्थित होते.

हिंदूंनो, एकदातरी जागे व्हा ! - आचार्य आर्य जितेंद्र महाराज

व्यासपिठावर स्थानापन्न झालेले
आचार्य आर्य जितेंद्र महाराज
     कामोठे (पनवेल) - हिंदूंना सहिष्णुतेची शिकवण दिली गेली. आपल्या हिंदु माता- भगिनींवर बलात्कार होऊ देत, त्यांच्या हत्या होऊ देत; मात्र आपण शांत रहायचे म्हणजे सहिष्णूता. जेएन्यूमध्ये दुर्गा मातेला सेक्स वर्कर म्हटले गेले; पण तेरा सहस्र दुर्गा मंदिरातील एकही पुजारी किंवा एकही दुर्गा उपासक विरोध करण्यासाठी पुढे आला नाही, हे दुर्दैव आहे, असे उद्गार आचार्य आर्य जितेंद्र महाराज यांनी केले. आंतरराष्ट्रीय गौ रक्षा मंच आणि हिंदु राष्ट्र सेना यांनी आध्यात्मिक शांती, तसेच राष्ट्रविरोधी शक्ती यांविरुद्ध लढण्यासाठी शक्ती आराधना व्हावी आणि युवकांमध्ये धार्मिकता वाढावी या उद्देशाने संगीतमय श्री हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी उपस्थितांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी जाणीव करून दिली.

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पंढरपूर येथे आज वाहन फेरी !

भित्तीपत्रक लावतांना कार्यकर्ते
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २८ फेब्रुवारी (वार्ता.) - येेथे २ मार्चला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त २९ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता टिळक स्मारक येथून वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन चौक, भादुले चौक, नाथ चौक, तांबडा मारुति, महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, काळा मारूती, चौफाळा या मार्गे शिवाजी चौक येथे वाहन फेरीची सांगता कोपरा सभेने होईल.
धर्मजागृतीच्या सभेच्या प्रसाराला लाभणारा प्रतिसाद
१. घरोघरी जाऊन लोकांना धर्मसभेची माहिती देणे आणि तरुण मंडळांमधील कार्यकर्ते, महाविद्यालये, शाळा येथील युवक, मंदिरे, बचतगट, भजनी मंडळे, वसतीगृहे, अभ्यासिका, दुकाने, आस्थापन येथील सहस्रो धर्माभिमान्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला गेला.

(म्हणे) जेएन्यूतील विद्यार्थी चळवळीचे दमन पाहून पोर्तुगिजांची आठवण !

देशद्रोह्यांना पाठिंबा देणारे देशद्रोहीच असतात, हे मतांसाठी लाचार 
झालेल्या काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवावे !
गोव्यातील काँग्रेस नेते एदुआर्द फालेरो यांची मुक्ताफळे
     पणजी, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यू) विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप होणे आणि विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला अटक होणे, या घटनांची तुलना १९५०-१९६०च्या दशकात पोर्तुगालमध्ये सालाझाराविरोधात झालेल्या विद्यार्थी चळवळीशी केली आहे. जेएन्यूतील विद्यार्थी चळवळीचे दमन पाहून पोर्तुगालच्या सालाझारविरोधी विद्यार्थी चळवळीची आठवण आली, असे मत एदुआर्द फालेरो यांनी व्यक्त केले आहे. याविषयीचे वृत्त नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकात २५ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाले आहे. (जेएन्यूमध्ये चालणार्‍या देशविरोधी कृत्यांचा देशभरातून निषेध होत आहे. असे असतांना त्या देशद्रोह्यांवरील कारवाईसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे फालेरो यांच्या देशप्रेमाविषयीही शंका उपस्थित होते ! - संपादक)

गोव्यातील शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी कांतारा स्पर्धा

     पणजी - शासकीय योजनांविषयी माहिती जनतेला कळावी, यासाठी माहिती आणि प्रसिद्धी खाते शासकीय योजना या विषयावर कांतारा (ख्रिस्त्यांमध्ये प्रचलित असलेल्या गाण्याचा प्रकार) स्पर्धा आयोजित करणार आहे. ८ मार्च २०१६ या दिवशी या स्पर्धेचे आयोजन इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात करण्यात आले आहे. (ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी न सोडणार्‍या गोवा शासनाने हिंदूंकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा ! - संपादक)

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या गाडीवर दगड, अंडी आणि टॉमेटो फेकले !

गांधीवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची सहिष्णुता ! विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याऐवजी 
आक्रमण करणारे काँग्रेसी देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत का ?
     कानपूर - येथील नवाबगंजच्या व्हीएस्एस्डी महाविद्यालयात जागतिक आतंकवादाच्या विषयावर आयोजित एका परिषदेत उपस्थित होण्यासाठी येथे पोहोचलेले भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या गाडीवर काँग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी दगड, अंडी आणि टॉमेटो फेकून आक्रमण केले, तसेच त्यांना काळे झेंडेही दाखवले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्के मारून तेथून हाकलले. या वेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. येथे वाहतूक कोंडी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना आक्रमण करण्याची संधी मिळाली. भाजपचे शहराध्यक्ष सुरेंद्र मैथानी यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. ते म्हणाले की, अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता असल्याचे पोलिसांना आधीच कळवण्यात आले होते; तरीही त्यांनी सतर्कता बाळगली नाही. (अशा पोलिसांना कर्तव्यचुतीसाठी निलंबित करा ! - संपादक) त्यामुळे येथे जाणीवपूर्वक वाहतूक कोंडी करण्यात आली. काँग्रेस प्रवक्ता अतहर नईम यांनी हे आक्रमण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावला.

सातारा येथे ७०० भाविकांनी घेतला सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचा लाभ

ग्रंथप्रदर्शन पहातांना जिज्ञासू
     सातारा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील संगम माहुली येथे १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत श्री कृष्णामाई-वेण्णामाई उत्सव पार पडला. यानिमित्त सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. 
    या प्रदर्शनाचा लाभ संगम माहुली आणि पंचक्रोशीतील ७०० भाविकांनी घेतला. संगम माहुली ग्रामपंचायतीने सनातन संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करून विशेष सहकार्यही केले.

पुण्यातील आयटी पार्कमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार

महिलांसाठी असुरक्षित बनत चाललेले पुणे !
    पुणे, २८ फेब्रुवारी - येथील हनुमान टेकडीवर विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतांना आता येथील आयटी पार्कमधील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी कार्यालयातील सहकारी मित्रांसह एका मेजवानीसाठी गेली होती. त्या वेळी मद्यप्राशन केलेल्या तिच्या सहकार्‍यांनी तिला बळजोरीने एका निवासी संकुलामध्ये नेले. तेथे त्या मित्रांनी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना धानोरी परिसरात २७ फेब्रुवारी या दिवशी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ तरुणांना कह्यात घेतले आहे. त्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत.

बीड येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक आक्रमण

असुरक्षित पोलीस ! या घटनेवरून पोलिसांचा धाक संपला आहे, असे वाटल्यास आश्‍चर्य काय ?
    बीड, २८ फेब्रुवारी - दोन गटांतील भांडण सोडवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी कैलास ठोंबरे यांच्यावर त्या गटातील लोकांनी प्राणघातक आक्रमण केले. कैलास ठोंबरे हे २७ फेब्रुवारी या दिवशी रात्री कामावरून घरी जात होते. त्या वेळी ते नगर रस्त्यावर दोन गटांमध्ये चालू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेले. तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये बीअरची बाटली फोडली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. पुढच्या उपचारांसाठी त्यांना जालन्यातील एका रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मारहाण करणार्‍यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नगरसेवक शेख मुस्तफा आणि अन्य ४ हून अधिक जण सहभागी होते. (गुंडांचा भरणा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ! - संपादक) ही सर्व घटना क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये मुद्रित झाली आहे. त्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हिंदु जनजागृती समितीने दिला हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीला उजाळा


हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी माहिती जाणून घेतांना जिज्ञासू
   नंदुरबार - भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर क्रांतिकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या ८५ व्या बलीदानदिनी हिंदु जनजागृती समितीने येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या महान कार्याच्या स्मृतीला उजाळा दिला.

महंत सुनीलगिरीजी महाराज संत गौरव पुरस्कारासाठी श्री. मिलिंद चवंडके यांची निवड !

  नगर, २८ फेब्रुवारी - पवनपुत्र मारुती देवस्थान सेवा आश्रम यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय महंत सुनीलगिरीजी महाराज संत गौरव पुरस्कारासाठी संत कार्यासाठी झोकून देणारे आणि दैनिक नगर टाइम्स या वृत्तपत्राचे मुख्य वार्ताहर श्री. मिलिंद चवंडके यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा आश्रमाचे प्रमुख महंत ह.भ.प. बजरंग महाराज यांनी केली. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मनोजकुमार आगे, उपाध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, कार्याध्यक्ष बबनराव लबडे आणि अन्य सदस्यांनी ह.भ.प. बजरंग महाराज यांच्या उपस्थितीत ही निवड केली. पुरस्कार घोषित झाल्याचे पत्रही श्री. चवंडके यांना देण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे पैसे घेऊन शिक्षक पसार

असे शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेला कलंक आहेत ! त्यांना तात्काळ निलंबित 
करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !
     पुणे, २८ फेब्रुवारी - पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील १० वीचे ७० आणि १२ वीचे ६५ विद्यार्थी अशा एकूण १३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क भरण्यात आले नाहीत. हा प्रकार १२ वी परीक्षेच्या आदल्या दिवशी उघडकीस आला. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून संबंधित शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी दंडासहित ११ लक्ष रुपये विलंब शुल्क भरले. हा सर्व अपप्रकार महानगरपालिका सर्वसाधारण सभेत उघडकीस आला. (पालिकेच्या सभेत हा विषय आला नसता, तर एवढी मोठी गोष्ट मंडळाच्या सदस्यांनी लपवलीच असती. यावरूनच शिक्षण मंडळाचा एकूणच अपकारभार दिसून येतो. शिक्षण मंडळाचा कारभार सुधारण्यासाठी पालिका आयुक्त काय उपाययोजना करणार आहेत ? - संपादक)

भारतीय सीमेत चीनच्या पाणबुडीची घुसखोरी !

सगळीकडून घुसखोरी होऊनही निष्क्रीय रहाणारा जगातील एकमेव देश भारत ! 
       नवी देहली - काही दिवसांपूर्वी भारतीय रडारवर अंदमान-निकोबार बेटाजवळील भारतीय समुद्र सीमेत चीनची पाडबुडी दिसल्यानंतर या घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांना शंका आहे की, या पाणबुडीच्या व्यतिरिक्त अन्य काही पाणबुड्याही या समुद्रात लपलेल्या असण्याची शक्यता आहे.

संत चरित्र अभ्यासून त्याप्रमाणे आचरण करा ! - प्रणव गोखले

     पुणे, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - संतांची चरित्रे केवळ वाचन करण्यासाठी नाहीत. संतांनी प्रत्येक गोष्ट कोणत्या उद्देशाने केली, याचा विचार करून आपण त्याप्रमाणे आचरण करायला हवे, असे मार्गदर्शन संत साहित्याचे अभ्यासक श्री. प्रणव गोखले यांनी केले. ग्रंथ पारायण दिंडीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने येथील उद्यान प्रसाद कार्यालयात २४ फेब्रुवारी या दिवशी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनप्रवास आध्यात्मिक दृष्टीकोनातून उलगडून दाखवला.

फलक प्रसिद्धीकरता

निरपराध साध्वी प्रज्ञा सिंह यांना आतंकवादी ठरवणार्‍या काँग्रेसचा देशद्रोह !
    इशरतजहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादी असल्याची माहिती लपवण्यासाठी तत्कालीन काँग्रेसी गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी केंद्रशासनाचे प्रतिज्ञापत्र पालटले होते, असा दावा माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Ishratjahan LeT ki atanki hone ki jankari tatkaleen Grihmantri Chidambaram ne chipayi - Tatkaleen Grihsachiv GK Pillai Kya yah deshdroh nahi ?
जागो ! : 
इशरतजहां लष्कर-ए-तोयबा की आतंकी होने की जानकारी तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम् ने छिपाई ! - तत्कालीन गृहसचिव जी.के. पिल्लाई क्या यह देशद्रोह नहीं ?

माधव गाडगीळ मित्रमंडळाच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव !

    मिरज, २८ फेब्रुवारी (वार्ता.) - श्री. माधव गाडगीळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने येथील काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने गेली १४ वर्षे कीर्तन महोत्सव घेण्यात येत आहे. यंदा ४ ते ७ मार्च या कालावधीत सकाळी ९ ते ११ शिवलीलामृत पारायण, तर ५ ते ७ मार्च या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता ह.भ.प. (सौ.) मंजुश्री बाभे (मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. या कालावधीत विनामूल्य बोन डेन्सिटी शिबीर, हिमोग्लोबीन तपासणी, तर ७ मार्च या दिवशी सकाळी १० वाजता विनामूल्य नेत्र तपासणी आणि सायंकाळी ६ वाजता संधीवात, सांधेरोपण, हाडांचे आजार याविषयी डॉ. हर्षल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल.

शिवछत्रपतींचे गुण अंगीकारून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर

नारायणचिंचोली, ता. पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २८ फेब्रुवारी (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ दिवस पराक्रम केला आहे. त्यामुळे केवळ १९ फेब्रुवारी नव्हे, तर प्रतिदिनच शिवप्रतापाचे स्मरण करून शिवछत्रपतींचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर होणार्‍या आघातांविरोधात लढण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आणि राजे ग्रुप नारायणचिंचोली यांनी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला १०० धर्माभिमानी उपस्थित होते.

जाट आंदोलकांकडून १० महिलांवर सामूहिक बलात्कार

  • हरियाणा उच्च न्यायालयाने राज्यशासनाला फटकारले 
  • बलात्काराची घटना अफवा असल्याचे पोलीस महासंचालकांचे स्पष्टीकरण
     चंदीगढ - जाट समाजाला सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाट आंदोलकांनी १० महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंदोलनाच्या वेळी महिलांवर सामूहिक बलात्कार केला जात असेल, तर ही घटना सर्वांसाठी लज्जास्पद आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकार लगावली आहे. या घटनेचा तपास करून उत्तर सादर करावे, असा आदेश न्यायालयाने हरियाणा राज्यशासनाला दिला आहे.

पाकला एफ्-१६ युद्धविमाने विकण्यास अमेरिकेचे सिनेटर रँड पॉल यांचा विरोध !

पाक सैन्य तालिबान आतंकवाद्यांना साहाय्य करते ! 
      वॉशिंग्टन - अमेरिकी शासनाने पाकला एफ्-१६ युद्धविमान विकण्याचा निर्णय घेतला आहे. यावर रँड पॉल या रिपब्लिकन खासदाराने सिनेटमध्ये संयुक्त ठराव सादर केला. त्यामध्ये पाकिस्तान विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही. त्यामुळे ही विमाने विकण्यावर बंदी घालायला हवी, असे म्हटले आहे. रँड पॉल काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्र्रपती पदाच्या निवडणूक शर्यतीत उतरले होते. हाऊस प्रतिनिधींच्या परराष्ट्र संबंधविषयक समितीने ओबामा शासनाच्या विमान विकण्याच्या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. समितीने ही विक्री थांबवण्याची मागणी केली. या समितीला पॉल यांचे समर्थन मिळाले आहे.

लाच मागितल्याप्रकरणी पुण्यातील एका पोलीस अधिकार्‍याला अटक

असे पोलीस हे पोलीस प्रशासनाला कलंक आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करून 
त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! 
     पुणे, २८ फेब्रुवारी - गुन्हा प्रविष्ट न करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी एक साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय रामराव पवार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी लाच घेतल्याची ही या ८ दिवसांतील चौथी कारवाई आहे. (अशा पोलिसांना पोलीस प्रशासन शोधून त्यांच्यावर कारवाई करून पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ करेल का ? - संपादक)
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट न करण्यासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार पवार यांना २५ फेब्रुवारी या दिवशी तक्रारदाराकडून लाच स्वीकारतांना अटक केली.

कॉ. पानसरेंचा स्मृतीदिन आणि कॉ. येचुरींची कांगावखोरी !

श्री. भाऊ तोरसेकर
१. वर्ष १९७५ मधील आणीबाणीचे कॉ. पानसरे आणि 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वागत केले होते !
     उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी उक्ती मराठीत प्रसिद्ध आहे; पण कोल्हापूरमध्ये येऊन अज्ञानाचे प्रदर्शन मांडणारे मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांना दुर्दैवाने मराठी भाषा अवगत नाही; पण समोर बसलेल्या श्रोत्यांना ती म्हण नक्कीच ठाऊक असेल. येचुरी यांच्या प्रबोधनपर भाषणाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही मराठी उमजत असावी, अशी अपेक्षा आहे; पण इतिहासाचे संदर्भ ठाऊक नसतील, तर काय करणार ? कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त योजलेल्या समारंभात कॉम्रेड येचुरी आपले पांडित्य सांगायला आलेले होते, तर निदान पानसरे यांना ते ओळखत असावेत, असे गृहीत धरावे लागते. पानसरे यांचा पक्ष कोणता आणि त्याचा इतिहास काय आहे, त्याचेही भान येचुरींना असावे, ही अपेक्षा गैरलागू म्हणता येईल काय ? कारण तसे असते, तर या महाशयांनी कोल्हापुरात येऊन पानसरे यांचा इतका अपमान केला नसता. पानसरेंच्या राजकीय वारशाची विटंबना नक्कीच केली नसती.

न्यायालय हेच जनतेचे आशास्थान !

    जात ही भारतात आज एक मोठी समस्या बनलेली आहे. जातीमुळे समाजात तेढ निर्माण करण्याच्या आणि त्यातून समाजहानी करण्याच्या घटना आपल्या देशात अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा भारतीय समाजात विद्वेषाची भावना निर्माण केली, तसेच असंघटित समाजाला आणि देशाला इंग्रजांनी फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करून फोडले. त्याचा परिणाम स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकानंतरही भारत भोगतो आहे. बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहा वर्षांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला; परंतु पुढे सर्वच राजकीय पक्षांनी जातीच्या आरक्षणाचे राजकारण करून निवडणुकीत हत्यार म्हणून त्याचा वापर चालू केला. आज हे हत्यार इतके तीक्ष्ण झाले आहे की, त्याचे घाव जाट, पटेल, मराठा, धनगर आदी जातींच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनातून भारतभूमीला सहन करावे लागत आहेत. या आंदोलनात रेल्वेगाड्या पेटवणे, दुकानांची लूट आणि जाळपोळ, वाहतूक रोखणे, बलात्कार करणे यांसारख्या हिंस्र आणि समाजद्रोही कृत्य करून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न चालू आहे.

संंतांच्या जीवनातील घटनांचे दाखले कुठेही जोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

कु. प्राजक्ता धोतमल
     नुकतेच महाराष्ट्रात भूमाता ब्रिगेडच्या महिलांचे समानतेचे नाटक पार पडले. या नाटकाचा प्रयोग पुरता फसला, हे निराळे. या घटनेविषयी वृत्तवाहिन्यांवरून जी चर्चासत्रे झाली, त्यातील एका चर्चासत्रातील धर्मद्रोही वक्तव्यांचे खंडण करणे अपरिहार्य आहे; कारण त्यामुळे समाजात योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो. 
१. सामाजिक व्यासपिठावर वावरतांना अभ्यासपूर्ण आणि त्रयस्थपणे 
सूत्रे मांडणे आवश्यक असते, याचेही भान नसलेले सूत्रसंचालक !
    जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर शनिशिंगणापूर येथे प्रजासत्ताक पोचले आहे का ?, अशा आशयाचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी सांगितले, महिलांनी चौथर्‍यावर चढून शनिदेवाचे दर्शन घ्यावे कि न घ्यावे, हा संपूर्णपणे धर्माशी संबंधित प्रश्‍न असल्याने हा निर्णय शंकराचार्यांना विचारून घ्यायला हवा. यावर सूत्रसंचालक प्रसन्न जोशी म्हणाले, म्हणजे संत ज्ञानेश्‍वरांना शुद्धीपत्र न देण्याचा निर्णय घेणार्‍या तत्कालीन कर्मठ धर्माचार्यांप्रमाणे तुम्ही करणार का ? या प्रश्‍नावरून प्रसन्न जोशी यांचा अभ्यास किती एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे, हे लक्षात येते. सामाजिक व्यासपिठावर वावरतांना आपण अभ्यासपूर्ण आणि त्रयस्थपणे सूत्रे मांडायला हवीत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

उज्जैन कुंभमेळ्यासाठी टंकलेखन आणि एक्सेल संबंधित संगणकीय सेवा करू शकणार्‍या साधकांची तातडीने आवश्यकता !

     उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वातील पूर्वसिद्धतेच्या सेवांना आरंभ झाला आहे. मराठी आणि हिंदी भाषांत टंकलेखन, एक्सेल किंवा तत्सम संगणकीय सेवा करण्यासाठी ३१.५.२०१६ या दिवसापर्यंत साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी साधक लगेचच येऊ शकत असल्यास सेवा उपलब्ध आहे. ज्या साधकांकडे या सेवा करण्याचे कौशल्य आहे, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून गूगल स्प्रेडशीटमध्ये नावनोंदणी करावी आणि श्री. निषाद देशमुख यांना ९४०४९५६१९४ किंवा ९८२६७४२८३९ या क्रमांकावर कळवावे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पाश्‍चात्त्यांनी अलीकडे लावलेल्या शोधांचे वर्णन श्रीमद्भगवद्गीतेत असणे

    पाश्‍चात्त्य सभ्यतेने लावलेल्या बहुतेक शोधांचे गूढ वर्णन आम्हाला भगवद्गीतेत आढळून येते. ही गोष्ट फारच आश्‍चर्यजनक आहे. भगवद्गीता हा भारताचा महान ग्रंथ आहे. 
- जुलिअस ओपेन्हेमार, अणु बॉम्बचे जनक (१९०४-१९६७), जगातील एक महान भौतिक शास्त्रज्ञ (संदर्भ :विवेक विचार, एप्रिल २०१५)
     भारतीय शिक्षणाची दुःस्थिती : सहस्रो वर्षांपर्यंत ज्ञानाचे केंद्र असूनही शाळांच्या पुस्तकांत भारतीय ज्ञानाचा काहीच उल्लेख नाही. (संदर्भ : विवेक विचार, एप्रिल २०१५)

ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी न सोडणारे गोव्यातील शासन !

     शासकीय योजनांविषयीची माहिती जनतेला कळावी, यासाठी गोवा शासनाचे   माहिती आणि प्रसिद्धी खाते शासकीय योजना या विषयावर कांतारा (ख्रिस्त्यांमध्ये प्रचलित असलेल्या गाण्याचा प्रकार) स्पर्धा आयोजित करणार आहे.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पावसाळ्यात सकाळी उन्हाचे उपाय (उन्हात बसून नामजप) करणे शक्य नसतांना त्याच वेळेत ॐ सूर्याय नमः । हा मंत्रजप केल्याने तेवढाच लाभ होऊन काळे आवरण दूर होऊन उत्साह वाटणे

    मला रात्री विलंबाने झोप लागत असे. त्यामुळे माझ्यावर काळे आवरण येऊन मी सकाळी विलंबाने उठत असे. मला डोके जड होणे, काही न सुचणे आणि अंग दुखणे, असे त्रास होत होते. गेल्या वर्षी एका संतांनी मला सकाळी १५ ते ३० मिनिटे उन्हाचे उपाय (उन्हात बसून नामजप) करायला सांगितले होते, ते मला आठवले. त्या वेळी मी उन्हाचेे उपाय केल्याने सकाळी लवकर उठू लागले होते.
     या वर्षी मला पुन्हा तसेच त्रास होऊ लागले होते. पावसाळा असल्याने सकाळी ऊन नव्हते आणि सूर्यदर्शनही होत नव्हते; म्हणून मी उन्हाचे उपाय करू शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा मला सकाळी उठतांना होणार्‍या त्रासात वाढ झाली होती. मी श्रीकृष्णाला विचारले, सूर्य दिसत नाही, तर उन्हाचे उपाय कसे करू ? तेव्हा ॐ सूर्याय नमः । हा नामजप करावा, असा मनात विचार आला. त्या विषयी पू. पात्रीकरकाकांना विचारल्यावर त्यांनी सकाळी उठल्यावर किंवा जाग आल्यावर १५ मिनिटे येता-जाता, दैनंदिन कृती करतांना ॐ सूर्याय नम: । हा जप करता येईल, असे सांगितले.

ईश्‍वराकडून मिळत असलेल्या ज्ञानाची गती अधिक असल्याने ते मानवाला लगेच ग्रहण करता न येणे

 श्री. राम होनप
    ईश्‍वराकडून मिळत असलेल्या ज्ञानाची गती अधिक असते. त्यामुळे ईश्‍वर ज्या क्षणी ज्ञान देतो, त्याच वेळी मानवी मर्यादेमुळे ते त्याला लगेच ग्रहण करता येत नाही. ज्याप्रमाणे धबधब्यातून गतीने पडणारे पाणी आपल्याला लगेच घेता येत नाही, ते खाली पडेपर्यंत आपल्याला थांबावे लागते, त्याप्रमाणे ईश्‍वरी ज्ञान मिळाल्यानंतर त्याचे आकलन होईपर्यंत काही क्षण थांबावे लागते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०१६)

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या ॐकार जपाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
    २७.१.२०१६ या दिवशी मी एन्डीटीव्ही या दूरचित्रवाहिनीवर शनिशिंगणापूर देवस्थानातील महिलांच्या प्रवेशावरून उठलेल्या वादंगावर असलेल्या चर्चेसाठी गेलो होतो. चर्चा प्रारंभ व्हायची होती. मी तेथील कक्षात बसलो होतो. काही मिनिटांनी मला स्वतःत पुढील पालट जाणवू लागले.
१. श्‍वास अत्यंत नियंत्रितपणे चालू झाला आणि केवळ ॐकाराकडे लक्ष केंद्रित होऊ लागले.
२. प्रत्येक श्‍वासासमवेत प्रचंड ऊर्जा आत येत आहे, असे जाणवू लागले आणि मी मोठा मोठा होत आहे, असे वाटू लागले.
३. स्वतःच्या ठिकाणी ॐकाराच्या अस्तित्वाची आणि त्यामुळे येणार्‍या आनंदाची जाणीव होणे : त्या दूरचित्रवाहिनीचा चित्रीकरण कक्ष, ती १० माळ्यांची इमारत, हे सर्व व्यापून मी मोठा होत जात आहे, माझ्या अस्तित्वाला खरेतर कसलीच मर्यादा नाही, मी हे सर्व भरून उरलो आहे, असे विचार मनात येत होते; परंतु त्यामध्ये हा मी, म्हणजे वीरेंद्र इचलकरंजीकर नव्हतो, तर ती त्या ॐकाराच्या अस्तित्वाची आणि त्यामुळे येणार्‍या आनंदाची जाणीव होती. हे सर्व आपोआपच झाले. - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आश्रम हीच गुरुमाऊली, असा भाव असलेल्या आणि घरी राहून साधना करणार्‍या कु. सुषमा पेडणेकर !

१. घरी राहूनही साधनेत प्रगती करू शकत असतांनाही
आश्रमाची ओढ का वाटते ? याचे साधिकेने केलेले चिंतन
    मला कधी कधी प्रश्‍न पडतो, काही साधक घरी राहून साधना करतात आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठतात; पण मला मात्र आश्रमातच राहून सेवा कराविशी वाटते; पण माझ्या संदर्भात तसे का होत नाही ? मला आश्रमात जायची ओढ का लागली आहे ? यासंदर्भात पुढील सूत्रे सुचली.

कु. सुषमा पेडणेकर यांचा ६० टक्के आध्यात्मिक स्तर होण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया, त्यात होत गेलेले पालट आणि त्यांना स्वत:च्या प्रगतीविषयी मिळालेली पूर्वसूचना !

१. साधिकेने प्रत्येक गुरुपौर्णिमेला ६० टक्के आध्यात्मिक स्तर
गाठण्यासाठी प्रयत्न करणे आणि तसे न होऊनही पुन्हा प्रयत्नरत रहाणे
    सर्व साधक गुरुपौर्णिमेला ६० टक्के आध्यात्मिक स्तर होण्यासाठी सतत प्रयत्न करतात. गुरुपौर्णिमेला काही साधकांचा ६० टक्के आध्यात्मिक स्तर घोषितही होतो. मीही त्या दृष्टीने देवाला सांगून प्रयत्न करायचे. तेव्हा देव मला म्हणायचा, या वेळी तुझा स्तर घोषित करीन; पण तसे व्हायचे नाही. नंतर मी पुन्हा प्रयत्न करायचे. देवाला विचारल्यावर देव पुढच्या गुरुपौर्णिमेला ६० टक्के होशील, असे म्हणायचा. असे पुन:पुन्हा घडत होते. त्या वेळी मी आणखी प्रयत्न करणे, देवाला अपेक्षित आहे, असा विचार करायचे.

पातळीविषयीच्या विचारात न अडकता साधना करणार्‍या कु. सुषमा पेडणेकर !

कु. सुषमा पेडणेकर
     साधनेच्या प्रयत्नांविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. सुषमा पेडणेकर म्हणाल्या, मी घरी असतांना फलकावर स्वतःच्या चुकांचा कागद लावतांना मी रामनाथी आश्रमातील फलकावरच चुका लिहीत आहे, असा भाव असतो. पूर्वी प्रत्येक गुरुपौर्णिमेला मला वाटत असे, यावर्षी माझी ६० टक्के पातळी घोषित होईल. त्या त्या वेळी मला श्रीकृष्ण सांगत असे, नंतर ! त्यामुळे मी ६० टक्के पातळी देवाला करायची, तेव्हा तो करील, असा विचार करून मी तो विचार मनातून काढून टाकला. नंतर आज कार्यक्रमापूर्वी श्रीकृष्णाने मला सांगितले, आज एक सत्संग घेऊन पू. बिंदाताई तुझी ६१ टक्के पातळी झाल्याचे घोषित करतील. सुषमाताई बोलतांना त्यांच्यातील भावामुळे उपस्थितांच्या डोळ्यांतही भावाश्रू जमा झाले. अशा प्रकारे सर्वच साधकांना आज भावसत्संगाचा अवर्णनीय आनंद अनुभवता आला. 

प्रतिकूल परिस्थितीतही सतत भावावस्थेत राहून कु. सुषमा पेडणेकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

कु. सुषमा पेडणेकर यांचा सत्कार करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ
    रामनाथी - घरातील प्रतिकूल परिस्थितीतही भावावस्थेत राहून श्रीकृष्णाप्रती सातत्याने अनुसंधान ठेवणारी आणि सनातनच्या रामनाथी आश्रमाप्रमाणेच घरच आश्रम आहे, असा भाव ठेवून प्रत्येक कृती करणारी अस्नोडा, गोवा येथील कु. सुषमा पेडणेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली ! कु. सुषमा यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे हे गुपित सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ग्रंथ विभागातील साधकांसाठी घेतलेल्या भावसत्संगाच्या वेळी उघड केले. या वेळी उपस्थित असणार्‍या साधकांची भावजागृती झाली.

महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना अचानक ईरोड या स्थानी जाऊन महर्षींच्या मूर्तीसमोर बसून नाडीवाचन करण्यास सांगणे, त्याप्रमाणे ते लगेचच विमानाने ईरोडला जाण्यासाठी निघणे आणि त्यानंतर गोव्याहून मुंबई मिरर या दैनिकात प.पू. डॉक्टरांच्या विरोधात खोटे लिखाण छापून आल्याची वार्ता कळणे अन् त्याविषयी महर्षींनी आम्हाला दिलेली अभूतपूर्व अनुभूती

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. मुंबई मिरर् या दैनिकात प.पू. डॉक्टरांवर गंभीर आरोप
करणारे लिखाण छापून येणे आणि ही वार्ता कळल्यामुळे पू. डॉ. ॐ उलगनाथन्
यांना महर्षींनी तातडीने ईरोड येथे का बोलावले, याचा उलगडा होणे
    २४.२.२०१६ या दिवशी दुपारी अचानक चेन्नई येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना महर्षींनी आदेश दिला की, तुला लगेचच ईरोडला निघायचे आहे आणि तेथे जाऊन महर्षींच्या मूर्तीसमोर बसून नाडीवाचन करायचे आहे. (ईरोड येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचे मूळ घर आहे. तेथे असलेल्या देवघरात वसिष्ठ आणि विश्‍वामित्र यांच्या मूर्ती आहेत. याच घरात पूर्वापार सहा पिढ्या नाडीवाचन झाल्याने येथे महर्षींची स्पंदने सर्वाधिक आहेत; म्हणून या ठिकाणी जाण्यास पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना जाण्यास सांगितले, असे वाटले. - (पू.) सौ. गाडगीळ) महर्षींच्या आदेशानुसार पू. डॉ. ॐ उलगनाथन् लगेचच विमानाने ईरोडला जाण्यासाठी निघाले. ते निघाल्यानंतर अगदी १५ मिनिटांतच गोव्याहून श्री. चेतन राजहंस यांचा भ्रमणभाष आला की, मुंबई मिरर् या दैनिकातून पत्रकार अलका धूपकर आणि श्री. धर्मेंद्र तिवारी यांनी सीबीआयच्या अहवालाचा संदर्भ देत प.पू. डॉक्टरांवर अत्यंत गंभीर आरोप करत खोटे लिखाण केले आहे. यात त्यांनी आता तीन हत्या झाल्या असून चौथी हत्या नाकारता येत नाही, असे प.पू. डॉक्टरांनी म्हटले असल्याचे धादांत खोटे वृत्त छापले आहे. हे लिखाण उद्या सर्व वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होईल. आताच दैनिक कार्यालयात सर्व पत्रकारांचे या लिखाणाविषयी दूरध्वनी येत आहेत. हा निरोप महर्षींना द्या आणि काय उपाय करायचे ?, असे विचारा. हे ऐकून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना तातडीने महर्षींनी का बोलावून घेतले, ते लक्षात आले.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार


परात्पर गुरु डॉ. आठवले
    सनातन संस्थेला हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याविषयी असलेल्या खात्रीचे कारण म्हणजे ईश्‍वराचा आशीर्वाद !
सनातन संस्थेला हिंदूंचा पाठिंबा फारच अल्प आहे, असे बहुतेकांना वाटते; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, सनातनला ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. त्यामुळे सनातनचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पूर्ण होणारच आहे. कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ७ अक्षौहिणी सैन्य असलेल्या पांडवांनी पराभव केला, तो ईश्‍वराच्या, म्हणजेच श्रीकृष्णाच्याआशीर्वादामुळे ! मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ मोगल पातशाह्यांचा पराभव केला, तोही त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या आशीर्वादामुळे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

खरा शिष्य 
सनातनचे श्रद्धास्थानसंत भक्तराज
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच शिष्यत्वाच्याही 
अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा एकांत 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

निधीअभावी रेल्वेचा प्रवास धिम्या गतीने !

     रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी वर्ष २०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. प्रवाशांना सुविधा देण्याजोग्या काही गोष्टींचा त्यात समावेश आहे. तसेच मतदारांना खुश ठेवण्यासाठी तिकीट दरात वाढ न करण्याची टांगती तलवार होतीच. त्यामुळेच तुटीचा अर्थसंकल्प असूनही कोणतेही मोठे धोके न पत्करता अर्थसंकल्प मांडण्याचे कौशल्य प्रभु यांनी पणाला लावले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे आता चकचकीत होतीलही; मात्र खरे आवाहन आहे, ते ७वा वेतन आयोग, प्रवासी आणि माल वाहतुकीत होत असलेली घट, जागतिक मंदीमुळे पायाभूत सुविधांवर होत असलेला परिणाम यांतून सुवर्णमध्य काढत रेल्वेस सर्वांगीणदृष्ट्या बळकट करण्याचे. ७ व्या वेतन आयोगाची टांगती तलवार जशी रेल्वे अर्थसंकल्पावर दिसली, तशीच ती सर्वसामान्य अर्थसंकल्पावरही दिसेल यात दुमत नाही.

श्रीनगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर जेएन्यूतील देशद्रोह्यांच्या समर्थनार्थ हिंसक आंदोलन !

ढोंगी आणि निधर्मी प्रसारमाध्यमे यावर चर्चासत्र घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्रत्येक शुक्रवारी एकाच मशिदीत नमाजपठण केल्यानंतर देशद्रोह्यांकडून आंदोलन केले जाते, हे रोखण्यासाठी केंद्रशासन या मशिदीला टाळे का ठोकत नाही ?
श्रीनगर - येथील नौहट्टा भागातील जामिया मशिदीमध्ये शुक्रवारच्या दुपारच्या नमाजानंतर नेहमीप्रमाणे देशद्रोह्यांनी हिंसक आंदोलन केले. (काश्मीरमध्ये बहुसंख्य मुसलमान असल्यामुळे तेथे निर्माण झालेल्या स्थितीवर ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी उत्तर दिले पाहिजे ! - संपादक) या वेळी त्यांनी जेएन्यूतील देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. या वेळी पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. (गेले अनेक महिने अशा प्रकारे शुक्रवारच्या नमाजानंतर पाकचे झेंडे फडकवले जात असतांना त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश राष्ट्रप्रेमी केंद्रशासन का देत नाही ? - संपादक) देशद्रोही आणि पोलीस यांच्यात या वेळी चकमक उडाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ६ हून अधिक देशद्रोह्यांना अटक केली. आंदोलनाच्या वेळी देशविरोधी घोषणा देण्यासह पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रा. एस्.ए.आर्. गिलानी आणि कन्हैया कुमार यांच्या सुटकेची मागणी केली.

१५५ वर्षे जुन्या भारतीय दंड संहितेची समीक्षा करणे आवश्यक ! - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत दंड संहितेत पालट करण्यासाठी प्रयत्न न करणारी आतापर्यंतची शासने ब्रिटीश शासनाप्रमाणेच राज्य चालवत होती आणि आहेत, हेच लक्षात येते !
कोची (केरळ) - गेल्या १५५ वर्षांत भारतीय दंड संहितेत अनेक पालट झाले आहेत. पूर्वी गुन्ह्यांच्या सूचीत पुष्कळ अल्प गुन्ह्यांची नावे होती आणि त्यावर शिक्षा होती. आताही यात अनेक गुन्हे असे आहेत की, ज्यांना ब्रिटीश शासनाने स्वत:साठी आवश्यक ठरवले होते. आता असे नवीन गुन्हे आहेत त्यांची योग्य व्याख्या करून त्यांना संहितेत समाविष्ट केले पाहिजे. २१ व्या शतकानुसार या संहितेची समीक्षा झाली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले. भारतीय दंड संहितेला १५५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने वर्षभर देशात कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते.

आग्रा येथे विहिंप नेत्याच्या हत्येप्रकरणी शाहरुख, इम्तियाज, आबिद आणि राजा यांना अटक !

धर्मांध लोक हिंदूंना आणि त्यांच्या नेत्यांना वेचून वेचून ठार करतात; मात्र दादरी प्रकरणी ऊर बडवणारे नेते यावर मौन बाळगतात !
आग्रा - २५ फेब्रुवारीला येथील मंटोलामध्ये विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष असणारे ५२ वर्षीय अरुण कुमार महोर यांची धर्मांधांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. महोर हे दलित होते. (या हत्येनंतर राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी यांच्यापैकी एकाही राजकीय नेत्याने दुःख व्यक्त केले नाही कि त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली नाही. कारण मरणारे महोर दलित असले, तरी हिंदुत्ववादी होते. यावरून या नेत्यांचे ढोंगी दलितप्रेम आणि हिंदुद्वेष परत उघड होतो ! - संपादक) या हत्येनंतर येथे हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी राजा, शाहरुख, इम्तियाज आणि आबिद यांना अटक केली असून दिलशान फरार आहे. महोर त्यांच्या मीरा हुसैनी चौकात असणार्‍या फर्निचरच्या दुकानात जात असतांना या धर्मांधांनी त्यांच्यावर शिवीगाळ करत गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महोर यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि जिल्हाधिकारी पंकज कुमार यांनी ५ लाख रुपये दिले आहेत.

अफझलच्या फाशीला 'न्यायालयीन हत्या' संबोधणे मर्यादेचे उल्लंघन ! - माजी न्यायमूर्ती पी.व्ही. रेड्डी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला थेट आव्हान देणार्‍या देशद्रोह्यांवर काही कारवाई होणार आहे का ?
नवी देहली - आतंकवादी महंमद अफझलच्या फाशीला न्यायालयीन हत्या असे संबोधणे हे मर्यादेचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. पी.व्ही. रेड्डी यांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात गरळओक करणार्‍या देशद्रोही विद्यार्थ्यांना फटकारले. माजी न्या. रेड्डी आणि न्या. पी.पी. नावलेकर यांच्या खंडपिठाने वर्ष २००५ मध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत महंमद अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. या आक्रमणातील दुसरा आरोपी शौकत हुसेन याला फाशीऐवजी १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती, तर अन्य दोन संशयित एस्.ए.आर्. गिलानी आणि अफसान यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. जेएन्यूत देशद्रोही विद्यार्थ्यांनी अफझलच्या फाशीला 'न्यायालयीन हत्या' असे संबोधले होते. त्यावर न्या. रेड्डी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, "न्यायालयाचा निकाल स्वत:च सर्व काही सांगतो. "

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट : एक ठार

वीरभूम (बंगाल) - बंगालमधील वीरभूम जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला सकाळी झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात एक जण ठार, तर दोन जण घायाळ झाले आहेत. घायाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरभूम जिल्ह्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात गावठी बॉम्ब सिद्ध करण्यात येत होते. त्या ठिकाणी हा स्फोट झाला. (तृणमूल काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आहेत, कि आतंकवादी ? अशी शंका यावी, अशा पद्धतीने त्यांचे नेते देशद्रोही कृत्यांत सापडत आहेत ! अशा पक्षावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी कुणी केल्यास त्यात नवल काय ? - संपादक) या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

(डावीकडून) श्री. अनुप सरदेसाई यांना सनातन प्रभात
नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे
श्री. महावीर श्रीश्रीमाळ
     रामनाथी (गोवा) - हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्याचा परिचय करून दिला. या वेळी श्री. सरदेसाई म्हणाले, सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.
श्री. अनुप सरदेसाई यांचा परिचय 
    गोवा येथील श्री. अनुप सरदेसाई हे सरदेसाई ग्रूपचे प्रमुख आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांनी अभियंता म्हणून सेवा बजावली आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी या लेखनास आरंभ केला. गेली ५ वर्षे देशातील धार्मिकदृष्ट्या राजकीय समस्यांचा त्यांनी प्रदीर्घ अभ्यास केला आहे. त्यांनी नथुराम गोडसे-स्टोरी ऑफ अ‍ॅन असॅसिन (नथुराम गोडसे-वधाची कथा) आणि महात्माज ब्लंडर्स-व्हाय डिड गोडसे किल गांधी ? (महात्म्याची घोडचूक - गोडसे यांनी गांधींना का मारले ?) ही पुस्तके लिहून पं. नथुराम गोडसे यांची सकारात्मक बाजू जगासमोर आणली आहे.

(म्हणे) 'जन गण मन'ऐवजी 'वन्दे मातरम्'ला राष्ट्र्रगीताचा दर्जा देण्याचा प्रयत्न होत आहे ! - जेएन्यूच्या माजी प्राध्यापिका तनिका सरकार

ज्यांच्या देशप्रेमावरच शंका आहे, त्यांनी 'वन्दे मातरम्'वर आक्षेप घेणे, यात आश्‍चर्य ते काय !
नवी देहली - 'जन गण मन'च्या ऐवजी 'वन्दे मातरम्'ला राष्ट्र्रगीताचा दर्जा देण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना सातत्याने करत आहेत. त्या दिशेने प्रयत्नही चालू आहेत. त्यामुळे भविष्यात 'जन गण मन' हे राष्ट्रगीत राहीलच याची खात्री नाही, असे मत इतिहासकार आणि जेएन्यूच्या माजी प्राध्यापिका तनिका सरकार यांनी व्यक्त केले. ('जन गण मन'ला राष्ट्रगीत ठरवण्याऐवजी 'वन्दे मातरम्'ला राष्ट्रगीत बनवावे, अशी देशातील बहुसंख्य देशप्रेमींची मागणी होती; मात्र हिंदुद्वेषी नेहरूंनी ती जाणीवपूर्वक डावलून जन गण मनला राष्ट्रगीत घोषित केले. जर यात राष्ट्र्रप्रेमी पालट करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याच चुकीचे काय ?- संपादक) जेएन्यूमध्ये 'राष्ट्रवाद' या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात जेएन्यूच्या इतिहास विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सरकार यांनी गांधींचा देश या विषयावर त्यांचे विचार मांडले. देशद्रोही घोषणेचा आरोप असणारे उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य हे या विभागाशी संबंधित होते. (धर्मशिक्षण आणि राष्ट्रभक्ती यांचे शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी राष्ट्र आणि धर्म प्रेमी होतो; मात्र या उलट शिक्षण मिळाले, तर तोच विद्यार्थी धर्म आणि राष्ट्र द्रोही होतो, हे उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या उदाहरणावरून लक्षात येते ! - संपादक)

आक्षेपार्ह मजकूर असल्याचे कारण पुढे करून हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधनपर फलक हटवले !

     गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने फर्मागुडी, गोवा येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात येणार्‍या शिवभक्तांचे प्रबोधन करणारी माहिती असावी, याअनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने कार्यक्रमस्थळी शिवरायांचा प्रताप आणि शिवरायांची शोभायात्रा यासंबंधी दोन फ्लेक्स फलक आयोजकांची अनुमती घेऊन लावले होते. या फलकावर पुढील माहिती हिंदी भाषेत लिहिली होती. 
भारतात आता छत्रपतींचा सत्य इतिहास सांगणेही कठीण !
हिंदूंनो, हा इतिहास खोटा आणि चुकीचा आहे का ?
फलक क्र. १ 
छ. शिवाजी महाराजांचा आठवा प्रताप ! 
    हिंदु राज्य स्थापनेच्या हेतूने ५ मुसलमान राज्यांशी लढून आतंकवाद मिटवला. आतंकवाद आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.

श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना मिळणार पद्मभूषण पुरस्कार !

केंद्रशासनाने डॉ. प्रसाद यांचा सन्मान करून बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, अशी 
हिंदूंची अपेक्षा आहे ! अशा लेखकांचा सन्मान नव्हे, तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 
त्यांना कारावास व्हायला हवा !
     या वर्षी देण्यात येणार्‍या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील लेखक डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना पद्मभूषण या देशातील तिसर्‍या सर्वाधिक प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१. डॉ. प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी द्रौपदी, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अश्‍लाघ्य विडंबन करणारे द्रौपदी नावाचे तेलुगु पुस्तक लिहिले होते. 

शिवाजीनगर बसस्थानकावर मराठी दिन साजरा

पुणे - यंदाच्या वर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजीनगर येथील एस्.टी. स्थानक येथे पुस्तक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रसंगी कुसुमाग्रज यांच्या एका मराठी काव्य फलकाचे अनावरण करण्यात आले.

संकेश्‍वर येथे हिंदु मुलीला पळवून नेणार्‍या धर्मांधाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिले पोलिसांच्या कह्यात

लव्ह जिहादच्या तावडीतून हिंदु मुलीची सुटका
करणार्‍या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
    संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव), २७ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील गावात इयत्ता ८ वीत शिकणार्‍या हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धर्मांध अझरुद्दीन नूर रपूगार (वय २२ वर्षे) याला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी कार्यकर्त्यांनी त्याला पुष्कळ चोपही दिला. मुलीला तिच्या वडिलांकडे सोपवले. हा धर्मांध १ मासापासून मुलीच्या मागे असल्याचे वडिलांनी श्रीराम सेनेला कळवले होेते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पाळत ठेवून त्याला पकडले. मुलीच्या सुटकेसाठी वडिलांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. (हिंदूंनो, केवळ आभार मानू नका, तर आपल्या मुलींना धर्मशिक्षण देऊन लव्ह जिहादपासून वाचवा ! - संपादक)

स्थायी समितीचे २७१ ठराव अवैध ! - वि.द. वर्बे

सांगली, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - गेल्या चार वर्षांत स्थायी समिती सभांमध्ये २७१ अवैध ठराव करण्यात आले आहेत. कागदपत्रे मागितल्यावर एका प्रतिसाठी ५० रुपये याप्रमाणे ७० सहस्र रुपयांची मागणी केली. महापालिकेतील गैरकारभार दडपण्यासाठी हे चालू असून याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहे, अशी माहिती नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह श्री. वि.द. बर्वे यांनी दिली. (सांगली महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा नमुना ! - संपादक)

पंढरपुरात २ मार्चला हिंदु धर्मजागृती सभा !

वाहन फेरीच्या पूर्वसिद्धतेसाठी आयोजित दुसर्‍या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा सक्रीय सहभाग !
बैठकीला उपस्थित धर्माभिमानी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २७ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ मार्च २०१६ या दिवशी टिळक स्मारक मैदान, वीर सावरकर पथ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मसभेच्या पूर्वसिद्धतेसाठी आणि वाहन फेरीसाठी आयोजित दुसर्‍या आढावा बैठकीत धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सक्रीय सहभाग घेतला, तसेच वैयक्तिक स्तरावर संपर्क करून धर्मसभा आणि वाहन फेरी यांची उपस्थिती वाढवण्याचा निर्धार केला आहे.

राजकीय हस्तक्षेप न करता पोलिसांना संपूर्ण अधिकार द्या ! - विक्रम गोखले

     पुणे, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - पोलीस दलातील कर्तृत्ववान अधिकारी चांगले कार्य करत असतांना दुर्दैवाने त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप केला जातो. तो थांबवून पोलिसांना संपूर्ण अधिकार द्या. त्यांच्या सर्व आवश्यकता पूर्ण करा. सीमेवर लढणारे सैनिक आणि अंतर्गत शत्रूंशी लढणारे पोलीस यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, असे सांगत ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विक्रम गोखले यांनी भाजप शासनाने पोलिसांसाठी चांगले कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुक्तछंद या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. देशात असहिष्णूतेच्या नावाने बोंबाबोंब केली जाते. आपल्या देशात पाकिस्तानसारखी परिस्थिती नाही, ही सहिष्णुता नाही का, असा प्रश्‍नही श्री. गोखले यांनी या वेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून पाणीटंचाईची तक्रार करणार्‍या महिलेच्या घरावर दगडफेक

गुंड प्रवृत्तीचे लोक असणारा पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?
    भिवंडी - पाणीटंचाईची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरेसवकाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास बाळू पाटील यांच्यासह १३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    भिवंडी शहरातील भंडारी कम्पाऊंड परिसरात राहणार्‍या वैशाली झा पाणीटंचाईच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी नगरसेवक विकास पाटील यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्या वेळी विकास पाटील यांनी अपशब्द वापरून वैशाली झा यांना परतावून लावले. तसेच विकास पाटील यांनी गुंडांना पाठवून घरावर दगडफेक केली, असा आरोप वैशाली झा यांनी केला आहे.

जेएन्यूतील आतंकवाद्यांच्या वावराविषयीची माहिती प्राध्यापकांनी पत्र लिहून कळवली होती !

    मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) जर्मन विभागातील साहाय्यक प्राध्यापक चक्रवर्ती यांनी ७ फेब्रुवारी १९९६ या दिवशी रजिस्ट्रारला पत्र लिहून विद्यापिठातील देशविघातक शक्तींची चेतावणी दिली होती, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणाची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रा. चक्रवर्ती यांनी पत्राद्वारे केली होती. २१ डिसेंबर १९९५ या दिवशी कुलगुरूंच्या उपस्थितीत अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत चक्रवर्ती यांनी विद्यापिठातील आतंकवाद्यांचा वावर रोखा हे सूत्र उपस्थित केले होते. या संदर्भात कुलगुरूंनी लेखी मागितल्यावर त्यांनी हे पत्र पाठवले.

न्यायालयात अद्यापही इंग्रजी भाषेतून निकाल !

    पुणे, २७ फेब्रुवारी - सर्वसामान्य पक्षकारांना आपल्या खटल्याचा निकाल अधिक चांगल्या रितीने समजावा, यासाठी उच्च न्यायालयाने त्यांचे निकाल मराठीत द्यावेत, असे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. असे असूनही प्रत्यक्षात बहुतांश न्यायाधीश अद्यापही इंग्रजी भाषेतच निकाल देतात, असे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मराठी भाषेतील निकालासाठी अद्यापही प्रतिक्षेत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नजरकैदेत ठेवण्याविषयीची कारणे उघड करा !

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ठराव
     नाशिक - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्याची कारणे सर्वांसाठी उघड करावीत, असा ठराव येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात करण्यात आला. संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्र मंडळ, ठाणेस्थित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, भगूर नगरपालिका आणि मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पणदिनाचे औचित्य साधून त्यांच्या मूळ गावी भगूर येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या विविध क्रांतिकारकांच्या वारसांच्या हस्ते करण्यात आले.
   सावरकर यांना भारतरत्नने सन्मानित करावे, सावरकरांचे विचार आणि कविता या प्राथमिक, माध्यमिक अन् महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये मांडावेत, असे काही ठराव या वेळी संमत करण्यात आले.

जुन्नर येथे मुक्तादेवी मंदिरातील दानपेटीची चोरी

हिंदूंनो, आपल्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
     जुन्नर - येथील मुक्तादेवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. मंदिरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी हे कृत्य केले असल्याची चर्चा होत आहे.

न समजलेले सावरकर या विषयावर आज कोल्हापूर येथे व्याख्यान

    कोल्हापूर, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील
स्वा. सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाच्या वतीने २८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात श्री. विक्रम एडके यांचे न समजलेले सावरकर या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गोवा अबकारी विभागाकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचे विदेशी सिगारेट कह्यात

कोट्यवधी रुपयांच्या उत्पादनांची तस्करी होत असतांना प्रशासन काय करत आहे ? 
     वास्को - गोवा अबकारी विभागाने मुरगाव बंदरावर एका कंटेनरमध्ये असलेले अडीच कोटी रुपयांचे डनहील कंपनीचे विदेशी सिगारेट कह्यात घेतले. दुबई येथून एका विदेशी बोटीने हा कंटेनर गोव्यात आणण्यात आला होता. या घटनेच्या तपासाची सूत्रे अबकारी खात्याने खात्याअंतर्गत एका विशेष विभागाकडे सुपुर्द केली आहेत. या कंटेनरच्या मालकी हक्काचा दावा कोणीही केलेला नाही, अशी समजते.

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     भुसावळ - इसिसच्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा आणि अमरनाथ यात्रेच्या अल्प करण्यात आलेल्या कालावधीला विरोध करा, या मागण्यांसाठी येथे २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या प्रसंगी ४० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी भुसावळ येथील अधिवक्ता मनीष तिवारी, सर्वश्री हिरामण वाघ, शशी सुरवाडकर, उमेश जोशी, यशवंत पाटील आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.

लिंब-गोवे (जिल्हा सातारा) येथील युवकांचा हिंदु ऐक्याचा निर्धार

धर्मासाठी कृतीशील होणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्मजागृतीचे कार्य करणार !
    सातारा, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु धर्मावर होणार्‍या दैनंदिन आघातांची माहिती मिळाली. येत्या काळात टिकण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली. समितीचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून दिशादर्शक आहे. यापुढे समितीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हिंदु धर्मजागृतीचे कार्य करणार आहोत, असा निर्धार लिंब-गोवे येथील युवकांनी एका बैठकीत प्रभु श्रीरामचंद्रांच्या साक्षीने केला.

इपीएफ्च्या निवडणुकीत नवी मुंबई येथील सनातनच्या साधिका सौ. प्रविणा पाटील देशातील पहिल्या महिला म्हणून विजयी

     नवी मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वाशी येथील उपविभागीय कार्यालयाच्या कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकाधिकार पॅनल विजयी झाले आहे. यात नेरूळ येथील सनातनच्या साधिका सौ. प्रविणा पाटील यांनी सुयश मिळवले आहे. सचिवपदासाठी सौ. प्रविणा पाटील यांनी दुसर्‍यांदा निवडणूक लढवली असून सलग दुसर्‍या वेळी निवडून येणार्‍या त्या महाराष्ट्रासह देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वर्ष २०१६-१७ साठी झालेल्या निवडणुकीत अशोक कुमार सिंह उपाध्यक्ष, सौ. प्रविणा पाटील सचिव, मोहन भोईर सहसचिव, तसेच एच्.एन्. सिंह कोषाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn