Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट !

लोकहो, देशद्रोह्यांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करा !
  • दोन ठार
  • कार्यकर्ता फरार
     मालडा (बंगाल) - तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याने हन्ना शेख (वय ३० वर्षे) आणि फैजुल शेख (वय ३२ वर्षे) ठार झाले. या घटनेत नवीउल शेख (वय ४२ वर्षे) आणि नसीरूल इस्लाम (वय ४० वर्षे) हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घायाळांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही बर्धमान येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात बॉम्ब बनवण्याचे काम चालू असतांना त्याचा स्फोट होऊन काही जण ठार झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते

धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता ! - शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती

     नागपूर - शांतीसाठी धर्माची आवश्यकता असून धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कांचीकामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले. श्री शिवशक्तीपीठ सेवा समितीच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विश्‍व स्वधर्म संमेलनात ते बोलत होते. शंकराचार्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संमेलनाचे उद्घाटन केले आणि त्याद्वारेच उपस्थितांना संबोधित केले.

(म्हणे) आय.एस्.आय.एस्.चा भारतीय मुसलमानांवर प्रभाव पडणार नाही !

आय.एस्.आय.एस्.चे आतंकवादी देशात प्रतिदिन कुठे ना कुठे सापडत असतांना गृहमंत्री कशाच्या आधारे 
हे वक्तव्य करत आहेत ? गृहमंत्री मनाच्या विरुद्ध जाऊन तर प्रतिक्रिया देत नाहीत ना ?
भारतियांना अचंबित करणारे केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान
     लखनौ - भारतीय मुसलमान वेगळे आहेत. भारतीय संस्कृतीच वेगळी आहे. येथील मुसलमान युवक माथेफिरू बनण्यास जात असेल, तर त्याचे नातेवाईक त्याला रोखतात. भारतात आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव कधीच निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मौलाना आझाद विद्यापिठाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केले.

दक्षिण भारतातील युवकांवर आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव वाढत आहे ! - शरद कुमार, प्रमुख, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

आतंकवादासारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सूत्राविषयी दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या विधानात 
कमालीची तफावत कशी काय ? गंभीर सूत्रांविषयी उच्चपदस्थ नेते आणि अधिकारी 
यांच्यात एकवाक्यता नसलेला जगातील एकमेव देश भारत !
     लखनौ - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेला भारतात पाळेमुळे रुजवता आलेली नसली, तरी आय.एस्.आय.एस्.पासून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. युवकांना आय.एस्.आय.एस्.च्या प्रभावापासून दूर ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. विशेष करून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आय.एस्.आय.एस्.चा प्रभाव आहे. या राज्यांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्.आय.ए.) महासंचालक शरद कुमार यांनी येथील एका कार्यक्रमात केले.

कर्नाटक शासन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारच ! - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! टिपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या, तसेच गोमांस 
खाण्याचे समर्थन करणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून अजून कसली अपेक्षा करणार ?
पुरो(अधो)गाम्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
     बेंगळुरू - कितीही अडचणी आल्या, तरी राज्यातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी कर्नाटक शासन अंधश्रद्धा निमूर्र्लन कायदा करण्याच्या निर्णयावर ठाम आहे, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनात केले. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, लोकांच्या अंधश्रद्धेचा अपलाभ मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. त्यांद्वारेच अंधश्रद्धेचा प्रसार होत आहे. डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर अनेक पुरोगामी मला भेटले.

धर्मांध तरुणाचा हिंदु तरुणीशी बलपूर्वक न्यायालयीन विवाह !

कोणीही उठतो आणि हिंदु तरुणीशी बलपूर्वक विवाह करतो ! उत्तरप्रदेश भारतात आहे कि पाकमध्ये ?
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहाद
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - फैजाबाद जिल्ह्यात इसरार या धर्मांध युवकाने एका हिंदु तरुणीच्या नातेवाइकांना जिवानिशी ठार मारण्याची चेतावणी देऊन तिच्याशी बलपूर्वक न्यायालयीन विवाह (कोर्ट मॅरेज) केला. त्यानंतर इसरार आणि त्याच्या नातेवाइकांनी बलपूर्वक तरुणीच्या घरात घुसून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु हिंदूंमुळे धर्मांधांचा हा डाव फसला. या प्रकरणी पोलिसांनी इसरारसह त्याच्या नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (अनेक वर्षांची लव्ह जिहादची समस्या एकही राजकीय पक्ष सोडवू शकत नसेल, तर हिंदूंनी हिंदु राष्ट्राची मागणी का करू नये ? - संपादक)

नववर्षानिमित्त मद्यपान करणार्‍यांना घरी सुरक्षित पोहोचवा ! - पोलिसांचे मद्यालय चालकांना आदेश

३१ डिसेंबरच्या दिवशी मद्यपानाला विरोध न करता समर्थन करणारे कर्नाटक पोलीस !
काँग्रेसी राजवटीत जनतेला वार्‍यावर सोडण्याचा हा प्रकार नव्हे का ?
      बेंगळुरू (कर्नाटक) - नववर्षानिमित्त अत्याधिक प्रमाणात मद्यपान करणार्‍यांना घरी सुरक्षित पोहोचवण्याचे दायित्व मद्यालय चालकांचे असून त्यांनी अशा तळीरामांना वाहनाची व्यवस्था करून घरी पोहोचवावे, असे तोंडी आदेश कर्नाटक पोलिसांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त एम्.ए. सलीम यांनी वरील आशयाचे आदेश काढले आहेत. नववर्षानिमित्त रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू रहाणार आहेत. मद्यपान करून वाहने चालवतांना तोल जाऊन अनेक अपघात होतात.

वर्ष २०१६ मध्ये पुन्हा एकदा घरवापसी मोहीम राबवणार !

धर्मजागरणचे ब्रज प्रांताचे संयोजक नंदकिशोर यांचा निर्धार
     आग्रा (उत्तरप्रदेश) - वर्ष २०१६ मध्ये पुन्हा एकदा घरवापसी मोहीम राबवणार असल्याची माहिती धर्मजागरण मंचाचे ब्रज प्रांताचे संयोजक श्री. नंदकिशोर यांनी दिली. ज्यांना पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा आहे, अशा लोकांशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केेले. धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचे महान कार्य करणार्‍या स्वामी श्रद्धानंद यांच्या बलीदान दिनानिमित्त राम वाटिका येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी श्रद्धानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे अभियान राबवले जाणार असून त्या संदर्भातील रणनीती निश्‍चित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

नेपाळकडून चिनी नागरिकांना फ्री व्हिसाची सोय

चीनशी जवळीक करून लहानसा नेपाळही भारताला वाकुल्या दाखवतो, हे चिंताजनक !
     काठमांडू - नेपाळ शासनाने चिनी नागरिकांना फ्री व्हिसा देण्याचा निर्णय घेऊन तो तात्काळ लागू करण्याचा आदेश दिला आहे. नेपाळचे विदेशमंत्री कमल थापा हे चीन दौर्‍यावर असतांना ही घोषणा करण्यात आली आहे. 
     नेपाळचे विदेशमंत्री कमल थापा चीनच्या दौर्‍यावर गेले असतांना तातडीने बोलवण्यात आलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी नेपाळ शासनाचे प्रवक्ता शेरधन राई यांनी माहिती दिली. नेपाळबरोबर भारताचे राजनितिक आणि कूटनितीक संबंध बिघडल्यामुळे नेपाळ चीनच्या जवळ जात आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे चीनला नेपाळचा चांगला मित्र मानत आहेत. नेपाळमध्ये गेले ४ महिने चालू असलेल्या मधेशीच्या आंदोलनाला भारताचे अप्रत्यक्ष समर्थन आहे, असा आरोप पंतप्रधान ओली यांनी केला आहे. यामुळे भारत-नेपाळ संबंधात कटुता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नेपाळची चीनशी वाढत जाणारी मैत्री भारताला चिंतेचा विषय बनू शकते.

मधेशींनी नेपाळ शासनाचा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला !

नेपाळ शासन आणि मधेशी नागरिक यांच्यातील वाद चिघळला
सीमेवर पुन्हा नाकाबंदी करणार
     मुजफ्फरपूर - मधेशी नागरिकांनी नेपाळ शासनाच्या घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला. हा प्रस्ताव जगाच्या डोळ्यांत धूळफेक करणारा आहे. त्यामुळेच विराटनगर सीमेवर पूर्ण नाकेबंदी करण्यात येणार आहे, अशी चेतावणी नेपाळच्या सद्भावना पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र महतो यांनी दिली आहे. त्यामुळे नेपाळ शासन आणि मधेशी यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

ख्रिस्ताब्द नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात विविध ठिकाणी निवेदन सादर

राऊरकेला (ओडिशा) येथील अपप्रकारांच्या विरोधात जागरूक 
राहून कृती करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन ! 
     राऊरकेला - ३१ डिसेंबरला नववर्षानिमित्त तीर्थस्थाने, पर्यटनस्थळे, सार्वजनिक स्थळे इत्यादि ठिकाणी होणारे अपप्रकार रोखणे, आवश्यक ती कार्यवाही करणे आणि समाजामध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करणे यांसाठी राऊरकेला येथील अतिरीक्त जिल्हाधिकारी के. सुदर्शन चक्रवर्ती यांना हिंदु जनजागृती समितीकडून एक निवेदन देण्यात आले. या वेळी चक्रवर्ती यांनी कायद्याचे उल्लंंघन होईल, अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन जागरूक राहून कृती करेल, असे आश्‍वासन दिले. या प्रसंगी सर्वश्री क्रियायोग मिशनचे अधिवक्ता विभूति भूषण पलेई, अधिवक्ता करमचंद जेना, भाजपचे राजीव बोस, सनातन संस्थेचे श्रीराम काणे आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रकाश मालोंडकर उपस्थित होते. 
क्षणचित्र : ३१ डिसेंबरच्या गैरप्रकारासंबंधी एक ध्वनीचित्रफीत अतिरीक्त जिल्हाधिकारी चक्रवर्ती यांना दाखवण्यात आली.

३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत बिअरबार चालू ठेवण्याची अनुमती रहित करावी ! - हिंदु जनजागृती समिती

शासनाकडे अशी मागणी का करावी लागते ?
     मुंबई - ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने वाढणारी गुन्हेगारी आणि अपप्रकार पहाता १ जानेवारीला पहाटेपर्यंत बिअरबार (मद्यालये) चालू ठेवण्याची शासनाने दिलेली अनुमती रहित करावी. एकीकडे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शासन नवनवीन प्रयत्न करत असतांना दुसरीकडे केवळ महसूलवाढीसाठी समाजाला अपप्रकार करण्यासाठी उद्युक्त करणे चुकीचे होईल. अशाने राज्याचा सर्वांगीण विकास आणि समाजहित कधी तरी साधले जाईल का ? जोडूनिया धन उत्तम व्यवहारे.... या संत तुकाराम महाराज यांच्या वचनानुसार महसूलवाढीचा निर्णय घेणे आवश्यक आहे.

देशभरातील शवागारांमध्ये ३५ सहस्रांहून अधिक मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून

 एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह अंत्यसंस्काराविना ठेवणार्‍यांवर शासन काय कार्यवाही करणार ?
     मुंबई - देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील शवागारांमध्ये ३५ सहस्रांहून अधिक मृतदेह अंत्यसंस्काराविना पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बेवारस मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याविषयी धोरण बनवण्याचे आदेश केंद्रशासनाला देऊनही केंद्राने त्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीही नोंद न घेणारे शासन सामान्य जनतेला किती जुमानत असेल, हे यातून स्पष्ट होते. - संपादक) 

कडक नियमांमुळे पात्रता परीक्षेच्या (नेट) विद्यार्थ्यांना त्रास

केंद्रीय शिक्षण मंडळाचा अजब कारभार !
     पुणे - प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी पात्रता परीक्षा (नेट) २७ डिसेंबर या दिवशी झाली. कडक नियम आणि केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएस्ई) परीक्षेच्या वेळी दिलेली लेखणी (पेन्स) यांमुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये चर्चेची ठरली. काही केंद्रांवर परीक्षा खोलीत विद्यार्थ्यांनी अंगावर थंडी वाजू नये, म्हणून घातलेली स्वेटर, जर्किन्सही नेण्यासही बंदी केली होती. त्यामुळे ऐन थंडीत सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना वेगळ्याच परीक्षेला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्रात ३ सहस्र कोटी, तर देशात १० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा !

'समृद्ध जीवन'च्या ५८ कार्यालयांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी ! 
महेश मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी 
     पुणे - 'सेबी'ने बंदी करूनही गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारणारे महेश मोतेवार यांच्या 'समृद्ध जीवन फूड्स' या आस्थापनाशी संबंधित विविध आस्थापनांच्या ५८ कार्यालयांवर २९ डिसेंबर या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने धाडी टाकल्या. महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरात या राज्यांत या धाडी टाकून पोलीस अधिकारी विविध कागदपत्रांची छाननी करत आहेत. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, संभाजीनगर येथील कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पोलिसांनी महेश मोतेवार यांना पुण्यात २८ डिसेंबरला अटक केली होती आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. उमरगावमधील न्यायालयाने मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. प्रत्यक्षात पोलिसांनी न्यायालयाकडे तपासकामासाठी सात दिवसांची कोठडी मागितली होती. 'सेबी'चे साहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनावणे यांनी या संदर्भात गेल्या मासात तक्रार दिली होती. महाराष्ट्रात ३ सहस्र कोटी, तर देशात १० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा मोतेवार यांनी केला आहे. 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेचा प्रारंभ

दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करतांना पू. लोला वेझीलीच

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आतंकवाद्यांच्या कुटुंबांना देतात, तसे संरक्षण कधी हिंदूंना देतात का ?

     ओडिशा राज्यातील कटकमध्ये एका मदरशात लहान मुलांना आतंकवादाचे शिक्षण दिल्याप्रकरणी डॉ. अब्दुर रहमान नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. त्यानंतर या आरोपीच्या घराजवळ सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

आता या मुलालाही देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सहस्रो रुपये दिले, तर आश्‍चर्य वाटायला नको !

     १३ डिसेंबर २०१५ या दिवशी बिडकीन (जिल्हा संभाजीनगर) येथील एका १६ वर्षांच्या धर्मांध युवकाने जैन गल्लीत रहाणार्‍या पाच वर्षांच्या हिंदुु बालिकेवर बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर धर्मांधावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची गांधीगिरी !

     पुण्यातील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन धर्मांध युवतीला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने तिच्या जाळ्यात ओढल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर आतंकवादविरोधी पथकाकडून त्या मुलीला आतंकवादी कारवायांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न म्हणून इस्लाम, कुराण म्हणजे काय ? आणि त्यामध्ये देण्यात येणारी शिकवण, यांविषयी तिला समजावून सांगण्यात येत आहे.

आय.एस्.आय.एस्.ची संकेतस्थळे पहाण्यात मुंबई आणि पुणे येथील तरुणांची संख्या अधिक !

     हे युवक कोण आहेत, हे वेगळे सांगायला नको ? अशा युवकांना देशप्रेमी ठरवू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?शासनाने आतातरी या युवकांचे देशद्रोही रूप जाणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आतंकवादाची पाळेमुळे उखडून टाकावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
     नागपूर - मुंबई आणि पुणे येथील तरुण आय.एस्.आय.एस्.च्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक असल्याचे गुगल ट्रेण्ड्सच्या आकडेवारीवरून लक्षात आले आहे. आय.एस्.आय.एस्.ची माहिती घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करणार्‍यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. युवकांना जाळ्यात ओढण्यासाठी आय.एस्.आय.एस्.कडून इंटरनेट आणि सामाजिक संकेतस्थळे यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. गेल्या महिनाभरातील गुगल ट्रेंड्सच्या माहितीनंतर हे धक्कादायक वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.

अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी ! - हिंदुत्ववादी संघटनांची एकमुखी मागणी

सोळशी (जिल्हा सातारा) येथे शनीच्या 
चौथर्‍यावर अधिवक्त्या देशपांडे यांनी प्रवेश केल्याचे प्रकरण 
निवासी उपजिल्हाधिकारी (डावीकडे) श्री. संजीव देशमुख यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सातारा - सोळशी (जिल्हा सातारा) येथे अधिवक्त्या देशपांडे यांनी २३ डिसेंबर रोजी शनीच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. सवंग लोकप्रियतेसाठी अशी स्टंटबाजी करणार्‍यांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून अधिवक्त्या वर्षा देशपांडे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि इतर समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना देण्यात आले. 

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने तणावमुक्तीविषयी प्रबोधन

     वर्धा - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेल्या धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने वर्धा कन्या विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे ? याविषयी प्रबोधन करण्यात आले.

नंदुरबारच्या मतिमंद निवासी विद्यालयात सनातन संस्था ठाणेच्या वतीने अन्नदान

     नंदुरबार - सनातन संस्था ठाणेच्या वतीने १६ डिसेंबर रोजी नंदुरबार शहरातील कोकणी हील परिसरातील महात्मा फुले युवक मंडळ, धुळे संचलित मतिमंद विद्यार्थी निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. २० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणार ! - महसूलमंत्री

     सोलापूर, २९ डिसेंबर - सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करणार असल्याचे आश्‍वासन महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री श्री. विजय देशमुख यांना दिले आहे. पालकमंत्री श्री. देशमुख यांनी २८ डिसेंबर या दिवशी महसूलमंत्री श्री. खडसे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते, तसेच जिल्ह्यातील पीक आणि पाण्याची परिस्थिती सांगितली. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले. आणेवारी अल्प दाखवण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी सूचीतून वगळण्यात आले होते; परंतु पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील स्थिती वेळोवेळी सांगितली होती. त्यानुसार महसूलमंत्र्यांनी तातडीने पावले उचलत स्वत: जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून येत्या दोन दिवसांत सोलापूर जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती आणि आणेवारीची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी यांच्या पेरण्या पूर्णपणे वाया गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने शेतकर्‍यांना शासनाच्या साहाय्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.

ख्रिस्ती नववर्षारंभानिमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात प्रबोधन


हिंदु जनजागृती समितीची ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखा चळवळ
     पुणे - ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणार्‍या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक प्रबोधन अभियान राबवण्यात येत आहे. या चळवळीच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असूनही नागरिकांचाही या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

पिंपरी येथील दत्त मंदिराची समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील युवकांकडून स्वच्छता

     पिंपरी - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील युवकांनी २१ डिसेंबर या दिवशी संत तुकाराम नगर येथील दत्त मंदिराची स्वच्छता केली. जसजसे मंदिर स्वच्छ होते, तसतसे मंदिरातील चैतन्य वाढत असल्याची अनुभूती धर्माभिमान्यांनी घेतली. सर्वश्री प्रतिक जाधव, अश्‍विन डहाके, धनाजी गळवे, प्रशांत बच्चे, संदीप चोपदार यांनी मंदिर स्वच्छतेची सेवा केली. मंदिर स्वच्छतेच्या सेवेमध्ये सर्वांचा सहभाग उत्साहवर्धक होता.

(म्हणे) 'रामायण आणि महाभारत ही मिथके !'

कुठे स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर रस्त्यावर उतरणारे मुसलमान, तर कुठे
 स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर त्याचा साधा निषेधही न करणारे धर्माभिमानशून्य हिंदू ! 
हिंदुद्वेष्टे इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांचे हिरवे फुत्कार 
     मालडा (बंगाल) - रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिले त्यांनी स्वत: इतिहास लिहिल्याचा दावा कधीही केला नाही. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही मिथके आहेत, असे हिरवे फुत्कार इतिहासाचे अभ्यासक (?) इरफान हबीब यांनी येथे सोडले. अशा मिथकांना इतिहास मानणे धोक्याचे असून नेमके हेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे, अशीही गरळओक त्यांनी केली. ७६व्या 'इंडियन हिस्ट्री काँग्रेस'च्या पार्श्‍वभूमीवर 'टाईम्स ऑफ इंडिया'ने हबीब यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. 

मराठवाड्यात वर्षाअखेर १ सहस्र १०९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     
     संभाजीनगर, २९ डिसेंबर - मराठवाड्यात असलेला दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांमुळे शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. मराठवाड्याला सलग ४ थ्या वर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या ३ वर्षांपेक्षा या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्ष २०१५ च्या अखेरपर्यंत मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या १ सहस्र १०९ इतकी झाली आहे. डिसेंबर २०१५ या मासात ५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. मराठवाड्यात गेल्या ४ वर्षांतील शेतकरी आत्महत्यांचा हा आकडा सर्वाधिक आहे.
     आत्महत्या झालेल्या एकूण १ सहस्र १०९ शेतकर्‍यांपैकी ६९८ शेतकर्‍यांना साहाय्यता निधीचे वाटप करण्यात आले.

वाळूचोरांवर मोक्का आणि एम्पीडीए या कायद्यांनुसार गुन्हे प्रविष्ट करण्याचे आदेश

     पुणे - अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन हमीवर (बॉण्ड) न सोडता ते वाहन शासनाधीन (जप्त) करावे. त्याचसमवेत वाळूचोरांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायदा अथवा धोकादायक उपक्रम महाराष्ट्र प्रतिबंधक (एम्पीडीए) कायद्यानुसार गुन्हे प्रविष्ट करावेत, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक २८ डिसेंबर या दिवशी बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये गौण खनिज आणि वाळूचोरी यांचे सूत्र उपस्थित झाले, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी सौरभ राव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

आता तृणमूल काँग्रेसवर बंदी आणण्याची मागणी करणार का ?
     मालडा (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या धर्मांध कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याने हन्ना शेख आणि फैजुल शेख हे दोघे जण ठार झाले, तर अन्य दोघे जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Trinmool congresske dhramandha karyakartake Godowm me bam banate samay huye visphotme 2 dharmandhonki mrutyu ! - es partypar bandi kyu na layi jaye ?
जागो !
     तृणमूल कांग्रेसके धर्मांध कार्यकर्ताके गोडाउन में बम बनाते समय हुए विस्फोट मे २ धर्मांधोंकी मृत्यु !
इस पार्टीपर बंदी क्यू ना लायी जाये ?

मदर तेरेसा यांच्या संतपदाविषयी अंनिसची भूमिका चमत्कारिक ! - हिंदु जनजागृती समिती

अंनिसकडून मदर तेरेसांच्या मानवतावादी 
कार्याला पोचपावती, तर सत्यसाईबाबांच्या मानवतावादी कार्याकडे दुर्लक्ष ! 
     मुंबई - एरव्ही चमत्कारांना कडाडून विरोध करणार्‍या आणि चमत्कार ही बाबच अस्तित्वात नाही, असे मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिसने) मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याविषयी मात्र चमत्कारिक आणि अंधश्रद्धाळू भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. याविषयी त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी सिंहगडावर सायंकाळी ७ नंतर थांबण्यास प्रतिबंध

ज्या गड-किल्ल्यांच्या साहाय्याने छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 
त्याचे पावित्र्य जपण्यासाठी महाराष्ट्रात मोहिमा राबवाव्या लागणे, हे लज्जास्पद ! 
     समस्त हिंदूंचे स्फूर्तीस्थान असलेल्या गडांचे पावित्र्य ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी केल्या जाणार्‍या अपप्रकारांमुळे नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी त्यांच्या भागातील गड-संरक्षण मोहिमेचे नियोजन करणे आवश्यक आहे ! 
     पुणे, २९ डिसेंबर - ३१ डिसेंबरच्या रात्री मौजमजा करण्यासाठी प्रतिवर्षी सिंहगडावर जवळपास १० सहस्र पर्यटक उपस्थित असतात. परिणामी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी वन अधिकार्‍यांना साहाय्य करत स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही महत्त्वाची भूमिका बजावतात. या वेळी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी पर्यटकांना सिंहगडावर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत थांबता येणार आहे. वन विभागाने दिलेल्या वेळेशिवाय इतर वेळी नागरिक गडावर आढळल्यास कारवाई केली जाईल, असे साहाय्यक वनसंरक्षक विजय माने यांनी सांगितले. 

हिंजवडी (पुणे) येथे 'इन्फोसिस' आस्थापनेत काम करणार्‍या महिलेवर बलात्कार

     महिलांसाठी असुरक्षित बनत चाललेले पुणे ! महिलांना स्वरक्षणाचे धडे आणि असे गुन्हे करणार्‍यांना फाशीसारखे कठोर शासन केल्यासच काही प्रमाणात आळा बसेल ! 
'इन्फोसिस'मधील २ कर्मचार्‍यांना अटक 
      पुणे, २९ डिसेंबर - येथील हिंजवडी आयटी पार्कमधील 'इन्फोसिस' या आस्थापनेत काम करणार्‍या एका महिलेवर त्याच आस्थापनातील एका कर्मचार्‍याने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. त्याच आस्थापनातील आणखी एका कर्मचार्‍याने त्या महिलेची छायाचित्रे काढून ती सामाजिक संकेतस्थळावर ठेवण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्या महिलेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुभाष बाग आणि प्रकाश किसन महाडीक या दोघांना अटक केली आहे.

आर्थिक आतंकवाद

१. आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या खळबळ कधीच माजत नाही; कारण मंत्र्यांपासून
आमआदमीपर्यंत कोणाला त्यातले काहीच कळत नसणे
     या निवडणुकीत १ सहस्त्र नोटांत एक नोट बनावट, म्हणजे पाकिस्तानी होती, असे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स (DRI)चे म्हणणे आहे. या हंगामात (सीझनमध्ये) ३ सहस्त्र २०० कोटी रुपयांच्या नोटांच्या दुप्पट आकडा बनावट नोटांचा होता; कारण हा आकडा २०१२-१३ या वर्षाचा होता. एकंदर चलनाच्या ०.०००६७ टक्केच हा आकडा गेल्या वर्षी होता. आपल्या बँका सर्व आकडे उघड करीत नाहीत. कॅनडाच्या चलनात ०.४७ टक्के बनावट नोटा आल्यावर तेथे हल्लकल्लोळ माजला. २० महान (ग्रेट) राष्ट्रांनी मान्य केलेल्या आकड्याच्या तो दहापट होता. आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या खळबळ कधीच माजत नाही; कारण मंत्र्यांपासून आमआदमीपर्यंत कोणाला त्यातले काहीच कळत नाही.

पोलिसांना खरंच प्रतिमा सुधारायची आहे का ?

      संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या परिक्षेत्रातील पोलीस कर्मचार्‍यांना भ्रमणभाषमध्ये चित्रपटातील गाणी, पक्ष्यांचा आवाज किंवा कर्कश आवाज यांचे रिंगटोन ठेवण्यास बंदी केली आहे. त्यांनी पोलिसांना भ्रमणभाषवर सभ्य रिंगटोन ठेवण्याचा आदेश दिला आहे. चित्रपटातील गाणी किंवा कर्कश आवाजाच्या रिंगटोन ठेवल्याने पोलीसदलाची प्रतिमा मलीन होते. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी पोलीसदलाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे, असे सांगत त्या संबंधीचे एक पत्रकच नांगरे-पाटील यांनी काढले आहे. त्यांनी हे पत्रक संभाजीनगर ग्रामीण, बीड, जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली येथील पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

     व्यसन हे मनुष्य जीवनाला लागलेला कलंक आहे. व्यसनामुळे कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची मोठी हानी होते. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे. मनुष्याचे आयुष्यमानही अल्प होत आहे. या व्यसनाधीनतेमुळे होणारे परिणाम आणि जाणवणारी लक्षणे यांविषयीची मासिक वज्रधारीमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत. 
१. व्यसनाचे दुष्परिणाम स्वतःसह कुटुंब आणि समाज यांना भोगावे लागणे
     कोणत्याही व्यसनाचे दुष्पपरिणाम दोन प्रकारचे असतात. 
१. तात्कालिक आणि २. दीर्घकालीन 
     तात्कालिक परिणाम हे व्यसनाच्या प्रारंभापासून दिसून येतात; पण व्यसनी पदार्थ सवयीचा झाल्यानंतर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून येतात. त्यात व्यसनी व्यक्तीचे शरीर, मन, कुटुंब, समाज आणि मुले, हे सारेच भाजून निघतात.

आजच्या शिक्षणपद्धतीत धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणे आवश्यक !

१. निराशाजनक शिक्षण देणारी आजची शिक्षणपद्धत रहित करून स्वावलंबनाने खंबीरपणे
उभे रहाण्याचे धैर्य आजच्या तरुण पिढीत निर्माण होईल, असे शिक्षण देणे आवश्यक असणे 
     आजच्या शिक्षणासंबंधी विचार करतांना स्वामी विवेकानंदांनी काढलेले उद्गार चिंतनीय वाटतात. स्वामीजी म्हणतात, मुलाला शाळेत घातले जाते. त्याला पहिला पाठ दिला जातो, तुझे वडील मूर्ख आहेत. दुसरा पाठ शिकवला जातो, तुझे आजोबा मूर्ख होते. तिसरा पाठ तो शिकतो, पाठ देणारे गुरुजन ढोंगी आहेत आणि चौथा पाठ तो शिकतो, सगळे धर्मग्रंथ म्हणजे केवळ पोकळ बडबड आहे. अशा प्रकारे शिकून तो स्नातक बाहेर पडतो, त्या वेळी तो निराशेचा मूर्तीमंत पुतळा बनलेला असतो. त्यामुळे तो कतृत्वहीन, दिशाहीन आणि संस्कारहीन बनतो. अशा सांप्रताच्या शिक्षणामुळेच आजच्या पिढीत धर्मासंबंधी संपूर्ण अनादर आणि अज्ञान निर्माण झाले आहे. ब्रिटिशांना जाऊन ६० वर्षे होऊन गेली, तरी शिक्षणपद्धतीत पालट झालेला नाही. नैराश्याने भरलेल्या सुशिक्षितांची भर विद्यापिठे कायमच घालत असतात. स्वावलंबनाने खंबीरपणे उभे रहाण्याचे धैर्य आजच्या तरुण पिढीत निर्माण होईल, असे शिक्षण दिले पाहिजे.

नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
१. ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही, त्यावर बोलू नये, 
एवढेही न कळणारे विचारवंत !
     आजकाल कोणीही उठतो आणि मला असे वाटते की, असे म्हणत बिनदिक्कतपणे आपले मत मांडतो. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे हा अधिकार मान्य करायलाच हवा. तथापि ज्या क्षेत्रात आपला अभ्यास नाही आणि जे जाणून घेण्याची बिलकूल इच्छा नाही, अशा गोष्टीत जेव्हा असे बुद्धीवंत (?) आपले तोंड घालतात, तेव्हा आश्‍चर्य वाटते आणि समर्थांची उक्ती अभ्यासे प्रगट व्हावे । नाहीतरी झाकोनी असावे । प्रगट होवोनी
नासावे । बरे नव्हे ॥ हे पटते. तोंडाने आजचा जमाना (काळ) आणि विज्ञान यांचा धोशा लावत जेव्हा अवैज्ञानिक आणि हास्यास्पद मते मांडून युक्तीवाद केला जातो, तेव्हा हसूच येते. त्यातही विषय जर देवा-धर्माशी निगडित असेल, तर त्यात अधिकारवाणीने आपले मत मांडणारे लोक पाहिले की, यांचा नेमका यातील अभ्यास काय आणि किती? हा प्रश्‍न पडतो.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) 

सतत कृष्णाच्या अनुसंधानात राहिले, तर तोच साधकांना पुढचे मार्गदर्शन करणार ! - पू. लोला वेझीलीच

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिरास प्रारंभ
     रामनाथी, २९ डिसेंबर (वार्ता.) - शिकण्याची तळमळ असेल आणि शरणागत भावाने सतत कृष्णाच्या अनुसंधानात राहिले, तर तोच साधकांना पुढचे मार्गदर्शन करणार आहे, असे प्रतिपादन स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) पू. लोला वेझीलीच यांनी केले. एस्.एस्.आर्.एफ्.च्या माध्यमातून साधना करणार्‍या जगभरातील अनेक राष्ट्रांतील साधकांच्या साधनेला गती मिळावी, शिकण्याची तळमळ, तसेच शरणागतीचा भाव वाढावा या हेतूने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित शिबिराला २९ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. शिबिरात उपस्थित असणार्‍या साधकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील उद्गार काढले. त्या म्हणाल्या, आजच्या या शिबिरात सहजता जाणवत आहे. सर्वांच्या चेहर्‍यावर शांत भाव जाणवत आहे. शिबिराच्या आयोजकांमध्येही कुठलीही लगबग दिसून येत नाही. आम्ही साधनेतील वरच्या पायरीवर पोहचलो आहोत. या शिबिरातून आपण अजून पुढे जाणार आहोत.

अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेतील एका जिज्ञासूने कथन केलेली अनुभूती

१. एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार नामजप केल्याने समाधान लाभणे : १४.१.२०१५ या दिवशी माझ्या आईचा मृत्यू झाल्यावर मृत्यूनंतरचे जीवन या विषयाशी संबंधित लेख शोधतांना मला एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ सापडले. या संकेतस्थळावर मला काही उल्लेखनीय लेख दृष्टीस पडले. त्यानंतर मी नोंदणी करून मृत्यूनंतरचे जीवन याविषयी एक प्रश्‍न विचारला. श्री. रेंडी नामक एका इंडोनेशियन साधकाने माझे शंकानिरसन होईपर्यंत माझ्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्याने मला माझ्या पंथानुसार असलेला नामजप आणि दत्ताचा नामजप करण्याचे सुचवले अन् मला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की, त्याप्रमाणे करून मला समाधान मिळाले.
- एक जिज्ञासू, जकार्ता, इंडोनेशिया
    (श्रद्धेने धर्माचरण आणि साधना केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने आलेल्या अनुभूतीसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे त्या सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच त्या येतील, असे नाही. - संपादक)

श्री दत्तमाला मंत्राचे पठण करतांना श्री. अजय जोशी यांना आलेल्या अनुभूती

   
डॉ. अजय जोशी
रामनाथी गोवा येथील आश्रमात श्री दत्तमाला मंत्रपठण चालू करण्यात आले. मंत्र म्हणतांना चैतन्यमय वातावरण निर्माण होते. मंत्र भावपूर्ण म्हटल्यावर चैतन्यात वृद्धी होते आणि गुरु त्यात साहाय्य करतात, असा प्रत्यय आला. श्री दत्तमाला मंत्रपठणात किती चैतन्य आहे, याचे कारण गुरुकृपेनेच समजले. श्री दत्तमालामंत्राची अंगे खालीलप्रमाणे आहेत.
१. श्री दत्तमालामंत्राची अंगे
अ. आरंभी योगतज्ञ दादाजी यांचा सिद्ध मंत्र ॐ आनंदं हिमालयं विष्णुं गरुडध्वजं ॐ.... आहे.
आ. त्यानंतर पहिल्या चरणात हा मंत्र अनुष्टुप छंदात असून सदाशिव ऋषींनी रचला आहे. यातील मुख्य देवता श्रीदत्तात्रेय आहे, असे निरूपण केले आहे.

जिज्ञासा, प्रेमभाव आणि शिकण्याची वृत्ती असणार्‍या बोलिव्हिया येथील सौ. सिल्विया फर्नांडेझ !

सौ. सिल्विया फर्नांडेझ
१. जाणवलेली सूत्रे
१ अ. भाषेची अडचण असूनही साधकांशी जवळीक करणे : सौ. सिल्विया फर्नांडेझ या विदेशी असल्यामुळे त्यांना मराठी किंवा हिंदी बोलता येत नाही, तरीही त्या स्वयंपाकघरात येऊन तिथल्या साधकांशी बोलत असतात आणि बर्‍याच वेळा जेवायलाही विदेशी साधकांव्यतिरिक्त अन्य साधकांसमवेत बसतात. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांच्याशी बोलतांना भाषेची अडचण वाटत नाही. त्यांच्याशी आताच ओळख झाली असली, तरी त्या जवळच्या वाटतात.

एस्.एस्.आर्.एफ्.ने घेतलेल्या कार्यशाळेच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. क्रिस्टन हार्डि
१. ग्रंथ विभागातील श्रीकृष्णाच्या चित्रातून
शक्ती प्रक्षेपित होत असल्याने त्याकडे पाहू न शकणे
      ४.८.२०१५ या दिवशी आम्ही आश्रमदर्शन करतांना ग्रंथ विभागात ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे सूक्ष्मातून पाहिले. त्याच्या डोळ्यांतून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मी त्याच्याकडे पाहू शकले नाही. मला त्रास देणार्‍या शक्तीला नष्ट करण्यासाठी तो सुदर्शनचक्र सोडत आहे, असे मला जाणवले. थोड्या वेळाने आश्रम दाखवणारे श्री. ऑरित्रो यांनी सांगितले, श्रीकृष्णाच्या या चित्रातून काळानुसार आवश्यक असलेली शक्ती प्रक्षेपित होत आहे.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकाला आलेल्या विविध अनुभूती

श्री. मॅथ्यु फोफी
१. प.पू. भक्तराज महाराज यांचे सूक्ष्मरूप छायाचित्रातून
बाहेर येऊन विराट होणे आणि त्यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवणे
     १.१२.२०१३ या दिवशी मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला त्यांचे सूक्ष्म रूप छायाचित्रातून बाहेर येतांना दिसले. त्यानंतर ते रूप मोठे होत जाऊन त्या रूपाने संपूर्ण वातावरण व्यापले. मला प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवू लागले.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या युरोपमधील साधिकेला आलेल्या अनुभूती

१. अनेक वर्षांपासून आध्यात्मिक पातळी
तेवढीच राहिली असल्याचे कळल्यावर मन अस्वस्थ होणे
     माझ्या आध्यात्मिक पातळीविषयी सांगण्यात आले. त्या वेळी माझी आध्यात्मिक पातळी ७ - ८ वर्षांपूर्वीइतकीच असून त्यात काहीच पालट झाला नसल्याचे मला समजले. त्यामुळे माझे मन फारच अस्वस्थ झाले. मला अधिकच वाईट वाटत होते. साधना चालू ठेवण्यात काहीच अर्थ नाही. सामान बांधून आपण माघारी जाऊया, असे अनेक नकारात्मक विचार माझ्या मनात येत होते.
     सत्र संपल्यानंतर छोटी सुटी देण्यात आली होती. मी माझ्या खोलीत आले आणि रडले. मला साधना करायची नाही. आपण घरी परत जाऊया, असा विचार मी करत होतेेे, तर दुसरे मन या विचारांशी संघर्ष करून नामजप करत कार्यशाळेच्या पुढील सत्राला उपस्थित रहाण्याचा आणि आज्ञापालन करण्याचा विचार करत होते.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

गोपींसाठी श्रीकृष्णाचा संदेश घेऊन आलेल्या उद्धवाकडून तो संदेश घेऊन त्याचे तुकडे करून
गोपी त्यात श्रीकृष्णाला पहातांना त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू (१४.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

हृदयी गुरुदेव असल्यास काँग्रेसच्या अग्नीने न जळे साधक !

श्री. प्रशांत जुवेकर
अग्नी जाळी, तरी न जळे प्रल्हाद ।
हृदयी गोविंद म्हणूनिया ॥ १ ॥
अग्नी जाळी, तरी न जळती गोपाल ।
हृदयी देवकी बाळ म्हणूनिया ॥ २ ॥
अग्नी जाळी, तरी न जळती पांडव ।
हृदयी वासुदेव म्हणूनिया ॥ ३ ॥ 

आश्रमातील चैतन्य आणि यंत्राचे मीठ-पाण्याचे (डि-टॉक्सचे) उपाय यांमुळे १५ वर्षांपासून असलेले शारीरिक अपंगत्व उणावणे

२९ डिसेबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत 
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत 
असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
     श्री. नीलेश शिरोडकर यांना वर्ष १९९८ मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यात त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती त्यामुळे यांना नैसर्गिकपणे चालणे अशक्य झाले होते. साधना आणि आध्यात्मिक उपाय यांच्या माध्यमातून त्यांनी शारिरिक अपंगत्वावर कशी मात केली ते येथे पाहूया.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष
अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल.  
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंनिसवाले फक्त महाराष्ट्रातील हिंदूंचाच बुद्धीभेद (ब्रेन वॉशिंग) करतात, तर सनातन संस्था जगभरच्या सर्वच धर्मांच्या लाखो जिज्ञासूंना ग्रंथांद्वारे साधनेत मार्गदर्शन करते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.१२.२०१५)बोधचित्र

आतंकवाद रोखण्यासाठी चीनप्रमाणे कठोर कायद्याची आवश्यकता !

संपादकीय
     चीनमध्ये होत असलेल्या आय्.एस्.आय्.एस्.च्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी, तसेच अन्य आतंकवादी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोपे जावे म्हणून २९ डिसेंबर या दिवशी चीनने आतंकवादविरोधी विशेष कायदा संमत केला आहे. या कायद्यान्वये पोलिसांना विशेषाधिकार देण्यात आले आहेतच, याशिवाय आतंकवादविरोधी कारवाया करण्यासाठी लष्करास अन्य देशात जाऊन कारवाई करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. भारतातही अशा विशेष कायद्याची सध्या नितांत आवश्यकता आहे. प्रारंभी केवळ काश्मीरपुरत्या मर्यादित असणार्‍या आय्.एस्.आय्.एस्.ने संपूर्ण भारतात आता पाय पसरण्यास आरंभ केला आहे. नुकतेच राजस्थान आणि बेंगळुरू येथे पोलिसांच्या नाकावर टिच्चून धर्मांधांनी आय्.एस्.आय्.एस्.चे झेंडे फडकवले आणि पोलीस हतबलतेने पहात राहिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn