Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


अखंड हिंदु राष्ट्र स्थापण्याचा उद्घोष करा ! - आमदार टी. राजासिंह, तेलंगण


जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन 
हिंदु धर्म आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी उद्युक्त !

डावीकडून पू. (कु.) स्वाती खाडये, पू. नंदकुमार जाधव, श्री. टी. राजासिंह आणि श्री. सुनील घनवट
    जळगाव - सध्या भारतातून प्रतिदिन आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी जाणार्‍या युवकांना पोलीस पकडत आहेत. हे युवक कोणत्या धर्माचे आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

जळगाव सभेतील वक्त्यांनी चेतवले हिंदूंमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांचे स्फुल्लिंग !

सनातनवर बंदीची मागणी करून हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करणार्‍या
 पुरोगाम्यांच्या भूमिकेच्या विरोधात आवाज उठवा ! - पू. नंदकुमार जाधव
    
पू. नंदकुमार जाधव
पुरोगाम्यांचा आतंकतवाद आणि हिंदुत्वनिष्ठांची मुस्कटदाबी या विषयावर बोलतांना पू. नंदकुमार जाधवकाका म्हणाले, सारे विश्‍व इसिसचा आतंकतवाद अनुभवत आहे आणि भारतदेश पुरोगाम्यांचा आतंकवाद अनुभवत आहे. कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे हे वैचारिक आतंकवादीच होते.
गोमांस खाणे, आय.एस.आय.एसचे झेंडे फडकवणे, लव्ह जिहाद यांवर काही न बोलता शांत रहाणारी खानावळकंपनी दादरी प्रकरणात धर्मप्रेमी दिसते. पुरोगाम्यांची ही सारी दबाव आणणारी भूमिका संशयास्पद असून सनातनबंदीची मागणी करणे चुकीचे आहे. खुनी, बलात्कारी यांसारख्या गुन्हेगारांचा भरणा असलेल्या राजकीय पक्षांनी सनातन बंदीची मागणी करणे चूक आहे. हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करणे याचाच हा भाग असून याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि व्यापक स्वरूपात प्रतिकार केला पाहिजे. सनातनमध्ये संमोहनाद्वारे चुकीची कृत्ये करून घेतली जातात, असे धादांत खोटे शाम मानव हे केवळ प्रसिद्धीसाठी बोलत आहेत. यांच्याविरुद्ध ड्रग्ज् अ‍ॅण्ड रेमिडीज अ‍ॅक्टखाली तक्रार नोंदवली आहे. शाम मानव यांचा हा आरोप चुकीचा आहे. पानसरे यांच्या हत्येसंबंधी अटकेत असलेला समीर गायकवाडही निर्दोष सुटेल. सनातनवर बंदी आणण्याची भाषा करणारे शिखांची हत्या केल्याच्या सूत्रावरून काँग्रेसवर बंदी का आणली नाही, हे सांगतील का ?, असा प्रश्‍न पू. जाधवकाकांनी या वेळी उपस्थित केला.

फेसबूकवरून सभेचा प्रसार !

     जळगाव एच्जेएस् या नावाने हिंदु जनजागृती समितीचे फेसबूक पेज आहे. यावरून समितीच्या उपक्रमाचा प्रसार केला जातो. यंदा प्रथमच सभेतील महत्त्वपूर्ण घटनांचे लाईव्ह संदेश या फेसबूकवरून पोस्ट करण्यात येत होते. त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रत्येक पोस्टला काही क्षणातच सहस्रोंच्या संख्येने लाईक मिळत होत्या !

हिंदु धर्मजागृती सभेस धर्माभिमानी हिंदूंचा अमाप उत्साह !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 
पुतळ्याला हार घालतांना भाग्यनगरचे वाघ आमदार टी. राजासिंह ! 
सभेत वक्त्यांनी केलेल्या कृतीशील होण्याच्या आवाहनाला मिळालेला
 हा उदंड प्रतिसाद... ! २ सहस्र कृतीशील होण्यासाठी उत्सुक असलेल्या युवकांनी
सभेनंतर वक्त्यांना प्रश्‍न विचारून वक्त्यांच्या विशेष मार्गदर्शनाचा लाभ घेतला... ! 

मुंबई काँग्रेसच्या काँग्रेस दर्शन मधून सोनिया गांधी आणि नेहरू यांच्यावर प्रहार !

चुकून का होईना, काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या नेत्यांचे खरे स्वरूप उघड केले, हे बरे झाले !
  • सोनिया गांधी यांच्या वडिलांचा फॅसिस्ट शिपाई म्हणून उल्लेख ! 
  • नेहरू यांच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह !
      नवी देहली - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काँग्रेसचे मुखपत्र काँग्रेस दर्शन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे खळबळ निर्माण झाली आहे. १५ डिसेंबरच्या या अंकात केवळ काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरच टीका करण्यात आली नाही, तर पंडित नेहरू यांच्या कार्यशैलीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस दर्शनचे संपादक मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम असून त्यांनी या संदर्भात चूक सुधारण्याची सिद्धता दर्शवली आहे. (चूक सुधारण्याविषयी अशी तत्परता काँग्रेसच्या नेत्यांनी इतर बाबतीत दाखवली आहे का ? काँग्रेसी व्यक्तीनिष्ठा यातून दिसून येते ! - संपादक)

ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हेच कंधमल दंगलीचे मुख्य कारण !

आतातरी ओडिशा शासन ख्रिस्त्यांकडून केले जाणारे धर्मांतर रोखेल का ?
पाणिग्रही आयोगाचा निष्कर्ष
     भुवनेश्‍वर - वर्ष २००७ मध्ये ओडिशाच्या कंधमल जिल्ह्यात झालेल्या धार्मिक दंगलीच्या मागे ख्रिस्त्यांकडून स्थानिक हिंदूंचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे धर्मांतर हेच मुख्य कारण होते, असे कंधमल दंगलीची चौकशी करणार्‍या एक सदस्यीय आयोगाचे प्रमुख ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बसुदेव पाणिग्रही यांनी येथे पत्रकारांना सांगितले. २४ डिसेंबर २००७ या दिवशी काही आक्रमणकर्त्यांनी विहिंपचे नेते स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्यावर आक्रमण केले. हेही दंगल भडकण्याचे एक प्रमुख कारण होते, असे न्यायमूर्ती पाणिग्रही म्हणाले.

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांकडून अखेर बंदी !

  • हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला लक्षणीय यश
डॉ. झाकीर नाईक यांचा कार्यक्रम रहित करण्यास पोलिसांना
 भाग पाडणार्‍या हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
     मंगळुरू - हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ या संघटनेने ३ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथील नेहरू मैदानावर हिंदुद्वेष्ट्या डॉ. नाईक यांचे भाषण आयोजित केले होते.

अखेर समृद्ध जीवनचे पसार झालेले संचालक महेश मोतेवार यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

हिंदु विधीज्ञ परिषदेने केले होते भांडाफोड !
      पुणे - सहस्रो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असणारे समृद्ध जीवनचे संचालक आणि प्रमुख महेश मोतेवार यांना २८ डिसेंबर या दिवशी धाराशीव (उस्मानाबाद) पोलिसांनी दुपारी २ च्या सुमारास कह्यात घेतले. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मोतेवार यांची गय केली जाणार नाही, असे २७ डिसेंबर या दिवशी सांगताच पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून आले. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेने मोतेवार यांच्या विरोधात तक्रार केली होती.

दाऊदची कार जाळणारे हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांना विदेशातून धमकी !

भारतात दाऊद इब्राहिम याच्या विरोधात कृती घडल्यास, जगभरातील दाऊदप्रेमी त्याला विरोध करतात ! अशा दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत शासन काय प्रयत्न करणार ?
     गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याची कार लिलावात खरेदी करून ती सार्वजनिकरित्या जाळून टाकणारे हिंदु महासभेचे नेते स्वामी चक्रपाणी यांना दूरध्वनीद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. २ वेगवेगळ्या क्रमांकांवरून ही धमकी देण्यात आली असून त्यांपैकी एक क्रमांक संयुक्त अरब अमिरातीचा, तर दुसरा मलेशियाचा आहे. कार जाळून तू डॉनचा अवमान केला आहेस. त्यामुळे तुझे दिवस संपणार आहेत, अशी धमकी दिल्याचे स्वामी चक्रपाणी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (या प्रकरणी शासनाने स्वामी चक्रपाणी यांना संरक्षण द्यावेच; परंतु कायमची उपाययोजना म्हणून दाऊदलाच भारतात आणून त्याला फासावर लटकवावे ! - संपादक)

बजरंग दल आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मेरठ येथे दिलवाले चित्रपटाचा खेळ बंद पाडला !

जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल
      मेरठ (उत्तरप्रदेश) - असहिष्णुतेच्या सूत्रावरून कांगावा करणार्‍या शाहरुख खान यांच्या दिलवाले चित्रपटाचे मवाना चित्रपटगृहातील खेळ येथील देशभक्त युवकांनी बंद पाडला. चित्रपटाचा खेळ चालू असतांना भाजयुमो आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाजवळ आंदोलन केले. त्यानंतर तेथे उपस्थित झालेल्या पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र चित्रपटाचा खेळ बंद करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. चित्रपट संचालक कपिल शर्मा यांनी आंदोलकांच्या ठाम मागणीपुढे झुकते घेत चित्रपटाचे पुढील खेळ रहित करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील कार्यक्रमाला योगऋषी रामदेवबाबा यांना बोलावण्यास धर्मांध विद्यार्थ्यांचा विरोध !

हिंदुद्वेषाचे केंद्र बनत चाललेले देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ! 
अशा विद्यार्थ्यांवर विद्यापीठ व्यवस्थापन काय कारवाई करणार आहे ?
     नवी देहली - येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात २७ से ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २२व्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ वेदांता या कार्यक्रमास योगऋषी रामदेवबाबा यांना बोलावण्यास या विद्यापिठातील धर्मांध विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. विद्यापिठाच्या व्यवस्थापनाने योगऋषी रामदेवबाबा यांना बोलावण्याचा निर्णय घेतला होता. यावर धर्मांध विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाचा हा निर्णय म्हणजे विद्यापिठावर एक प्रकारचे मूक आक्रमण आहे, अशी गरळओक केली. व्यवस्थापनाने त्यांचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अथवा होणार्‍या विरोधाला सामोरे जावे, अशी धमकीवजा शब्दांत चेतवणी दिली आहे. या संमेलनात योगऋषी रामदेवबाबा यांचा कार्यक्रम ३० डिसेंबरला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष शहला रशिद शोरा यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेने शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये प्रश्‍चचिन्ह असणार्‍या अशा तर्‍हेच्या लोकांना बोलावू नये, असे फुत्कार सोडले.

काबूलमध्ये विमानतळाजवळ बॉम्बस्फोट

     काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये करजई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका कारमध्ये बॉम्बचा स्फोट झाला. अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये लढत असलेल्या नाटो सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंधेरी, लालबाग, जुईनगर आणि ठाणे येथे ३१ डिसेंबर प्रबोधन फेर्‍या !

     मुंबई - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने घडणारे अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच भारतीय संस्कृतीचे संवर्धन अन् धर्मपालन करण्यासाठी नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच साजरे करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंधेरी-विलेपार्ले, लालबाग-काळाचौकी, जुईनगर-सानपाडा आणि ठाणे शहर या ठिकाणी काढण्यात आलेल्या प्रबोधन फेर्‍यांच्या माध्यमांतून करण्यात आले. या वेळी अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तुम्ही करत असलेले कार्य आवश्यक आहे, असे अभिप्राय देऊन फेरीत स्वतः सहभागी झाले. 
     ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !, नववर्ष हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्यालाच साजरे करा !, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक धरून, तसेच हस्तपत्रकाचे वितरण करून जनजागृती केली. 

नाशिक येथे ३१ डिसेंबर प्रबोधन फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
    नाशिक, २८ डिसेंबर ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्त होणारे अपप्रकार रोखले जावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे ३१ डिसेंबर प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. २७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ ते सायं. ५.३० या वेळेत झालेल्या या फेरीला २७५ हून अधिक हिंदूंची उपस्थिती होती. फेरीचा प्रारंभ शंखनाद आणि धर्मध्वज पूजनाने भोसला मिलीटरी स्कुल, कॉलेज रोड येथून झाला. धर्मध्वजाचे पूजन नाशिक येथील सनातनचे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांनी केले. फेरीचे रूपांतर शेवटी सभेत झाले. 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पुढील कार्याची दिशा ठरवणारी आढावा बैठक

स्थळ : डॉ. आचार्य सभागृह, नेहरू चौक, जळगाव
दिनांक : २९ डिसेंबर २०१५, सायं. ५ वाजता

फलक प्रसिद्धीकरता

या देशद्रोह्यांना आजन्म कारागृहात पाठवा !
     उत्तरप्रदेश आणि राजस्थान राज्यांच्या आतंकवादविरोधी पथकाने पाकसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली पोखरण येथून गोवर्धन सिंह या तलाठ्याला, तर वायुदलाने जैसलमेर येथून एका संशयिताला अटक केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      Pokharan aur Jaisalmer se hergirike aropme 2 logonko bandi banaya gaya !
kya Aise gaddar es deshme rahane layak hai ?
जागो !
     पोखरण और जैसलमेर से हेरगिरीके आरोप में २ लोगोंको बंदी बनाया गया !
क्या एैसे गद्दार इस देश में रहने लायक है ?

मदर तेरेसा यांचे संतपद - काही कळीचे प्रश्‍न !

     मदर तेरेसा यांचा व्हॅटिकनमधील संतपदाचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. मदर तेरेसा यांनी जे काम उभे केले आणि जे तत्त्वज्ञान मांडले, त्याचा गंभीर आणि सखोल प्रतिवाद करणारे बरेच लेखन झाले आहे. या सार्‍या लेखनातले द मिशनरी पोझिशन : मदर तेरेसा इन थिअरी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस हे ख्रिस्तोफर हीचन्स यांचे पुस्तक सर्वांत महत्त्वाचे आणि मदर तेरेसा यांच्या गरिबांविषयीच्या कळवळ्यालाच आक्षेप घेणारे आहे. त्यांच्यावर सीआयएच्या सोयीचे वर्तन केल्याचा ठपका ठेवणारे आहे. हैतीमधील दैत्य हुकूमशहाकडून देणग्या घेतल्याचा आक्षेप ठेवणारे आहे.

हिंदूंनो, गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा न करता तो ३१ डिसेंबरला साजरा करून महान भारतीय संस्कृतीचे हनन करण्याचे पातक ओढवून घेऊ नका !

     प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी ३१ डिसेंबर उत्साहाने कसा साजरा करता येईल, याचे नियोजन लहान मुले, पालक आणि गल्लीबोळांतील वृद्धांपासून ते अशिक्षितांपर्यंत सर्व जणच करू लागले आहेत. कोणी सुट्या घेऊन, कोणी सायंकाळी आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेत ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या मागे लागलेले दिसू लागले आहे. त्यात शाळा आणि महाविद्यालयेही मागे नाहीत. हे सर्व पाहून मन सुन्न होऊन जाते. वाचकहो, आपणही असेच करत असाल ना ? एक पालक या नात्याने आपल्याशी या निमित्ताने मी हितगुज करू इच्छिते.

गरीब अर्थव्यवस्थेचे श्रीमंत लोकप्रतिनिधी !

     वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये होण्याची शक्यता आहे. दुष्काळात तेरावा महिना बळजबरीने घुसवण्याचा हा घृणास्पद प्रकार म्हणजे जनतेच्या वेदनांवर जाणीवपूर्वक डागण्या देणे होय. जनसेवा (?) या गोंडस नावाआडून वैयक्तिक स्वार्थासाठी किती नीचतम पातळी गाठली जाऊ शकते, याचाच हा परिपाक म्हणावा लागेल. खासदारांच्या वेतनवाढीविषयी असलेला अनुभव हेच सांगतो की, शक्यता वास्तवात उतरण्यास कोणताच विलंब लागत नाही वा त्यात कोणी आडकाठी आणत नाही. राष्ट्राची अर्थव्यवस्था कंगाल झालेली असतांनाही वेतनवाढीचे प्रस्ताव सिद्ध करून ते पुढे रेटले जाणे संतापजनक आहे. प्रतिदिन अर्धीअधिक जनता उपाशी पोटी झोपत असतांना वेतनवाढ नको असे एकही खासदार सांगत नाही म्हणजेच त्यांना वेतनवाढ पाहिजेच हे यावरून सुस्पष्ट होते. मग अर्थमंत्रालयाच्या संमतीच्या प्रतीक्षेचे सोंग तरी कशाला करायला हवे ? अर्थमंत्रालयाला लोकप्रतिनिधींच्या लाभासाठी देशासमोर उभे असलेले कर्जाचे डोंगर अचानक कसे दिसेनासे होतात ? लोकप्रतिनिधींना नेहमीच झुकते माप देणारे अर्थमंत्रालयाचे आर्थिक समीकरण पूर्णपणे चुकीचे असल्याने देशाच्या तिजोरीवर अर्थातच जनतेच्या खिशावर याचा भार पडून आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेचे कंबरडे मोडीत निघण्यास भरच पडणार आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

      रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

भाग्यात असलेले अल्ला देईलच, अशी श्रद्धा ठेवून व्यापार करणारे मुसलमान आणि देवाची आठवणही न काढता ग्राहकालाच देव मानणारे हिंदू !

श्री. नंदू मुळ्ये
१. मुसलमान दुकानदाराने वस्तूचे मूल्य सांगून 
आपले पठण चालू ठेवणे
     मी एका दुकानात चित्र-चौकट (फ्रेम) घेण्यासाठी गेलो होतो. दुकानदार बोहरी मुसलमान होता. तो त्यांचे धार्मिक वाचन करत होता. मी साधारण १० मिनिटे मला हवे असलेले चित्र शोधत होतो, तरीही त्याने माझ्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. केवळ एकदा कटाक्ष टाकला आणि त्याने आपले पठण चालू ठेवले. मी निवडलेल्या चौकटी हातात घेऊन उभा होतो. काही वेळाने त्याने वर बघून दोन शब्दांत त्यांचे मूल्य सांगितले आणि पुन्हा पठण चालू केले.

मराठी भाषेचे महत्त्व न जाणणारे मराठीद्रोही शासन आणि जनता !

गोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी 
राजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर
सनातनची मराठी भाषाविषयक
ग्रंथमालिका
     गोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठी भाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे, यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषा यांचे महत्त्व सनातन गेल्या काही वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातमधून सातत्याने मांडत आहे. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
       वैदिकांची संस्कारप्रक्रिया सुटली; म्हणून चोरपावलाने येणार्‍या इहवादी हिंदुत्वावर समाधान मानावे लागते आणि उजळ माथ्याने गोंधळ घालणार्‍या पाश्‍चात्त्यीकरणाला मूकसंमती द्यावी लागते !- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

मनाने स्वतंत्र असूनही पाश्‍चात्त्यांच्या मानसिक गुलामीने त्रस्त असणे

श्री. प्रशांत जुवेकर
     स्वतःचा विकास झाला का ?, याचे उत्तर केवळ अधिकोषातील रोकड (बँक बॅलन्स) आणि असेट्स पाहून देण्याची सवय आपल्याला पाश्‍चात्त्यांच्या मानसिक गुलामीने लागली आहे. आम्ही मनाने स्वतंत्र आहोत; पण मानसिक गुलामी स्वीकारली आहे, त्याचे काय ? - श्री. प्रशांत जुवेकर (२४.५.२०१२)
     (मडगाव स्फोट प्रकरणात ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकाने कारगृहात असतांना केलेले लिखाण - संकलक)

मिरज आश्रमात सूक्ष्मातून गेल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

१. मिरज आश्रमात सूक्ष्मातून गेल्यावर आश्रमाने आनंदाने स्वागत केल्याचे जाणवणे आणि जिन्याने साधिका पुढच्या प्रगतीसाठी देवद आश्रमात गेल्याबद्दल आनंद व्यक्त करणे : सनातनच्या मिरज आश्रमाची मला फार आठवण आली; म्हणून मी मिरज आश्रमात सूक्ष्मातून गेले. प्राणाहून प्रिय असणारा मिरज आश्रम ! मी आश्रमाला म्हणाले, माझ्या आश्रमा, तू कसा आहेस ? मला तुझी आठवण येते. आश्रमाने आनंदाने माझे स्वागत केले आणि विचारले, तू कशी आहेस ? तुझ्या प्रगतीतच आमचा आनंद आहे. मी जिन्याजवळ गेले आणि त्याच्याशी बोलू लागले. जिना हसत म्हणाला, तू पुढच्या प्रगतीसाठी देवद आश्रमात गेलीस, याचा आम्हाला आनंद झाला.

हॅलोवीन साजरा केल्याने होणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

१. हॅलोवीनच्या दिवशी तू केलेल्या कोणत्याही गोष्टीचा 
आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे कुणीतरी 
सांगितल्यासारखे जाणवणे आणि प्रार्थना अन् नामजप केल्यावर भीती न वाटणे
   हॅलोवीन (३१ ऑक्टोबरच्या दिवशी पाश्‍चात्त्य देशांमध्ये पाताळातील जिवांप्रमाणे (भूत, पिशाच इत्यादींप्रमाणे) स्वतः वेशभूषा करून स्वतःचे घरही भय वाटावे, अशा पद्धतीने सजवतात.) या पाश्‍चात्त्यांच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी घरात मी एकटीच होते. त्या वेळी तुला जे काही करायचे आहे, ते तू कर. त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. ही वेळ आमची आहे, असे कुणीतरी सांगितल्यासारखे मला स्पष्टपणे जाणवले. त्यानंतर दायित्व असणार्‍या साधिकेने मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी अधिकाधिक प्रार्थना आणि नामजप करत होतेे. माझे संरक्षण व्हावे, यासाठी मी २ - ३ घंटे नामजप केला; मात्र त्यानंतर मला त्रासदायक किंवा भीती वाटली नाही.

ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राच्या संदर्भातील अनुभूती !

२९ डिसेबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या 
कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात 
होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
१. ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे सजीव होणे
१ अ. श्रीकृष्ण आणि इतर देवता यांची चित्रे सजीव झाली असून डोळे मिटलेला शिव सोडून इतर देवता साधिकेकडे पहात असल्याचे तिला जाणवणे : आमच्या ध्यानमंदिरातील श्रीकृष्णाच्या प्रतिमेचा मी सूक्ष्मातून प्रयोग केला. प्रतिमेच्या उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे जातांना प्रतिमेतील श्रीकृष्ण माझ्याकडेच पहात असल्याचे, तसेच ती प्रतिमा सजीव झाल्याचे जाणवले. नंतर मी हाच प्रयोग ध्यानमंदिरातील इतर देवतांच्या चित्रांकडे पाहून केला. चित्रातील भगवान शिवाचे डोळे मिटलेले असल्याने त्याव्यतिरिक्त सर्वच देवता माझ्याकडे टक लावून पहात आहेत, असे जाणवले. 
- सौ. भावना शिंदे हर्ली, अमेरिका (३१.८.२०१५)

दत्तमाला मंत्रपठणाच्या वेळी साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्या
(कु.) आरती तिवारी
१. दत्तमाला मंत्राचे पठण करणार्‍या साधकांच्या 
मध्यभागी सनातन संस्था ही अक्षरे सूक्ष्मातून उमटलेली दिसणे
     १९.११.२०१५ या दिवशी ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रपठण चालू होते. त्या वेळी दत्तमाला मंत्रपठण करणार्‍या साधकांच्या मध्यभागी सूक्ष्मातून सनातन संस्था ही अक्षरे उमटलेली दिसली. साधक त्याभोवती चक्राकार बसले होते. प्रत्येक साधकाच्या मनात कृष्ण कृष्ण कृष्ण... असा नामजप चालू होता.
२. मंत्रपठण करणारे सर्व साधक प्रकाशमान 
होऊन त्यांची रचनाचक्रव्यूहाप्रमाणे दिसणे 
आणि साधकांभोवती एक वैशिष्ट्यपूर्ण नक्षी सिद्ध होणे
    प्रत्येक साधक श्रीकृष्णाला आर्ततेने आळवत होता. ते पहातांना माझीही श्रीकृष्णा धाव...रक्षण्या सर्व साधका... अशा शब्दांत प्रार्थना होऊ लागली. काही वेळातच मंत्रपठण करणारे सर्व साधक प्रकाशमान झाले. त्यांची सनातन संस्था या अक्षरांभोवतीची रचना एका चक्रव्यूहाप्रमाणे दिसत होती. चक्रव्यूहातील शेवटच्या भागातील साधकांभोवती बाहेरच्या दिशेने एक वैशिष्ट्यपूर्ण नक्षी सिद्ध झाली.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या दक्षिण अमेरिकेतील साधिका सौ. डायना पेरेस् यांना साधनेमुळे अल्पावधीतच स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती !

     १५.१.२०१५ या दिवशी वर्तमान स्थिती आणि मायेचे जग यांचा आध्यात्मिक स्तरावर आपल्यावर कसा परिणाम होतो ?, यासंदर्भात मी अंतर्मुख होऊन विचार करत होते. त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशन)च्या मार्गदर्शनानुसार साधना ही ईश्‍वरप्राप्तीच्या माध्यमातून आनंद आणि शांती प्राप्त करण्याची अतिशय साहाय्यकारी पद्धत असल्याचे माझ्या लक्षात आले, तसेच ते साध्य करणे तितके सोपे नसले, तरी प्रयत्न आणि ईश्‍वरावरील श्रद्धा यांमुळे या मार्गावर प्रगती करणे शक्य आहे, याची मला जाणीव झाली. साधनेमुळे आतापर्यंत मला झालेले लाभ, स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

भगवंत सतत समवेत असल्याची साधिकेला आलेली अनुभूती

१. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात नामजप करतांना तो श्‍वासोच्छ्वास 
करत असल्याप्रमाणे वाटून छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे आणि काही
क्षणांनंतर श्रीकृष्णाचा तोंडवळा अस्पष्ट होऊन तेथे हनुमानाचा तोंडवळा दिसणे
     ३१.७.२०१४ या दिवशी खोक्यांचे उपाय करण्यासाठी बसले असतांना मी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात नामजप करत होते. श्रीकृष्णाच्या मुखाकडे पहात एकाग्रतेने नामजप करतांना १० मिनिटांनी मला श्रीकृष्णाचे चित्र हलत असल्याचे जाणवले. त्या वेळी श्रीकृष्ण श्‍वासोच्छ्वास करत असल्याप्रमाणे त्याचा संपूर्ण तोंडवळा हलत होता, म्हणचेच छायाचित्रात जिवंतपणा आल्याचे जाणवत होते. यानंतर श्रीकृष्णाचा तोंडवळा पालटला आणि काही क्षणांसाठी तेथे दुसराच एक तोंडवळा मला दिसला. तो तोंडवळा हनुमानाचा असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी श्रीकृष्णाचाही तोंडवळा होता; परंतु तो अस्पष्ट दिसत होता. हनुमानाच्या तोंडवळ्याविषयी मी फारशी परिचित नाही; परंतु तो तोंडवळा हनुमानाचाच असल्याचे मी ओळखू शकत होते. त्यानंतर काही क्षणांसाठी माझ्या डोळ्यांसमोर अजून एक तोंडवळा तरळला. तो कोणाचा आहे ?, हे माझ्या लक्षात आले नाही; परंतु हा निश्‍चितच कोणत्या तरी देवतेचा असावा, असे मला वाटले. या अनुभूतीनंतर मला हलके आणि आनंदी वाटत होते. दुसर्‍या दिवशी काही क्षणांसाठी मला अशाच प्रकारची अनुभूती आली.

पू. भैय्याजी यांच्या उपायांच्या वेळी पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांना आलेल्या अनुभूती

१. उपायांच्या वेळी पू. भैय्याजी यांच्या वरच्या बाजूला 
निळसर वातावरण पसरून तेथे देवीच्या रुपाचा काही भाग दिसणे
     १४.१.२०१५ या दिवशी वायूत्त्वाचे उपाय आरंभ करण्यापूर्वी पू. भैय्याजी म्हणाले, आजपर्यंत ज्या दैवी शक्तीचा उपयोग उपायांसाठी केलेला नाही, त्या दैवी शक्तीला मी आज आवाहन करणार आहे. त्यानंतर डोळे बंद करून उपायांना बसल्यानंतर मला पू. भैय्याजी यांच्या वरच्या बाजूला निळसर वातावरण पसरलेले असून तेथे देवीच्या स्थूल रुपाचा काही भाग दिसला.
२. ही तुझी शक्ती आहे का ?, असे 
श्रीकृष्णाला विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर !
     ही कोणत्या देवाची शक्ती आहे ? असा विचार करत असतांनाच मला पिवळ्या फुलांचा हार आणि काही दागिने दिसले. तेव्हा श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून माझे पुढीलप्रमाणे बोलणे झाले.

सकाळपासून जाणवणारा त्रास कार्यशाळेच्या प्रारंभी केलेल्या प्रार्थनेनंतर नाहीसा झाल्याने कार्यशाळेत किती प्रमाणात चैतन्य असते, ते लक्षात येणे

कु. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की
    १०.८.२०१५ या दिवशी सकाळपासूनच माझ्या मनात विचारांचे काहूर माजल्याने मन अस्वस्थ होते. त्यामुळे अल्पाहाराची सेवा करतांना नामजप करणेही मला कठीण झाले होते. सकाळचा अल्पाहार करण्यापूर्वीच माझे पोट आणि डोके दुखत होते. त्यामुळे मी प्रयत्नपूर्वक प्रार्थना करून श्री गणपतीचा नामजप करू लागले. मी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असतांना काही प्रमाणात मला बरे वाटायचे; परंतु इतर काही कृती करतांना लगेचच मला त्रास जाणवायचा. काही वेळाने कार्यशाळेच्या सत्राला आरंभ झाला. प्रारंभी श्‍वेताताईंनी (सौ. श्‍वेता क्लार्क यांनी) प्रार्थना केली. ती संपताक्षणी माझा त्रास नाहीसा झाला. यावरून कार्यशाळेच्या सत्रात किती प्रमाणात चैतन्य असते, हे माझ्या लक्षात आले. - कु. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की, ऑस्ट्रिया (१०.८.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वेळ न मिळणे
     जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्‍या हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था !
२. कुठे जनतेला विविध प्रलोभने दाखवून स्वार्थी बनवणारे व नंतर काही न देणारे राजकीय पक्ष, तर कुठे राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणार्‍या अन् ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

न्यूनगंड बाळगू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

रशिया पुन्हा मैत्रीस पात्र होईल ?

संपादकीय
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला अचानक भेट दिल्यामुळे त्यांचा रशिया दौरा काहीसा झाकोळला गेला. या दौर्‍यात उद्योग, संरक्षण, व्यापारी आदी अनेक महत्त्वपूर्ण करार झाले. त्यामुळे फलनिष्पत्तीदायक असा हा दौरा होता. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर १७ महिन्यांनंतर रशियाच्या दौर्‍यावर गेले. त्या आधी वेगवेगळ्या व्यासपिठावर त्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी भेट झाली होती. असे असले, तरीही कधीकाळी भारताचा जीवलग मित्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या रशियाच्या दौर्‍यावर जायला मोदी यांनी थोडा विलंब केला. त्याला कारणेही तशीच आहेत. प्रथम म्हणजे रशियाची चीन आणि पाक यांच्याशी वाढत असलेली जवळीक. दुसरी बाब म्हणजे मैत्रीच्या नावावर रशियाने लढाऊ विमाने आणि नौका विकतांना भारताची केलेली लुबाडणूक. तरीही रशियाचा दौरा करून, त्याच्याशी वेगवेगळे करार करून मोदी यांनी जुन्या मैत्रीला उजाळा दिला, हे एका अर्थी बरेच झाले. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सध्याचे चित्र पहाता सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, हा चांगल्या परराष्ट्रनीतीचा भाग आहे. असे असले, तरी रशियाकडून खूप काही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn