Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्यसभेचे कामकाज सलग दुसर्‍या दिवशीही स्थगित !

      गदारोळामुळे वाया गेलेला जनतेचा पैसा काँग्रेसच्या खासदारांकडून वसूल करा ! संसदेतील प्रत्येक मिनिटाचा आर्थिक व्यय २९ सहस्र रुपये आहे. काँग्रेसचे खासदार सभागृहात जनतेच्या प्रश्‍नांसाठी नव्हे, तर स्वत:च्या नेत्यांसाठी गदारोळ करतात, हे लक्षात घ्या ! अशांना जनतेच्या समस्या सोडवण्यात किती रस आहे, हे यातून स्पष्ट होते. 
नॅशनल हेराल्ड प्रकरण
     नवी देहली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या खासदारांनी ८ डिसेंबरला गदारोळ करून संसदेचे कामकाज रोखून धरले होते. त्यानंतर ९ डिसेंबर या दिवशीही काँग्रेसींनी घोषणा देत गदारोळ केल्याने राज्यसभेचे कामकाज सलग दुसर्‍या दिवशी स्थगित करावे लागले. याच सूत्रावरून लोकसभेचेही कामकाज दुपारी ४ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. 

सिद्धीविनायक मंदिर न्यास सुवर्ण मुद्रीकरण योजनेत ४० किलो सोने गुंतवणार !

  • भक्तांनी मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा उपयोग हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा आणि त्यावर भक्तांचा अधिकार हवा !
  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
       मुंबई - देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुवर्ण मुद्रीकरण योजना आणली होती. जनतेकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या योजनते ४० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय सर्व सदस्यांच्या सहमतीने घेतला आहे, असे न्यासाने सांगितले आहे. (सरकारीकरण झालेल्या मंदिराच्या न्यासातील सदस्य हे शासनानेच नेमलेले असतात. अशांना भाविकांच्या भावाचे मोल ते काय असणार ? म्हणूनच देवळांच्या सरकारीकरणाला कडाडून विरोध व्हायला हवा ! - संपादक)
       यातून न्यासाला २ ते २.५ टक्के या दराने वर्षाकाठी ६९ लाख रुपये व्याज मिळणार आहे. (सामान्य लोकांना सोनेतारण कर्जावर भरमसाट दराने व्याज भरावे लागते; मात्र भाविकांच्या सोन्याला अत्यल्प व्याजदर लावणे, हे कुठल्या अर्थशास्त्रात बसते ? - संपादक) 

विधानसभा आणि विधानपरिषद यांचे कामकाज पुन्हा स्थगित !

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे प्रकरण 
     नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - वांझोट्या चर्चेत अर्थ नसल्याने शेतकर्‍यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी घेऊन विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरत पुन्हा कामकाज बंद पाडले. युती शासनाने विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांवर चर्चेची सिद्धता दर्शवली; मात्र सध्या चर्चेपेक्षा शेतकर्‍यांना वाचवणे महत्त्वाचे आहे. त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली.
१. कामकाजापूर्वी विरोधकांनी सभागृहाबाहेर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून घोषणाबाजी केली. सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी प्रथम १० मिनिटे, नंतर ३० मिनिटे आणि त्यानंतर १५ मिनिटे कामकाज स्थगित केले.

हिंदुद्रोही सपा शासनाच्या विरोधात हिंदूंकडून वृंदावन येथे कडकडीत बंद !

विंध्यवासिनी आणि बांकेबिहारी ही मंदिरे लाटण्याचा घाट घालणार्‍या 
उत्तरप्रदेश शासनाच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी आवळली वज्रमूठ !
वृंदावन येथे शासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी
स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली शहरातील बाजारपेठ

मराठवाड्यात ११ महिन्यांत १ सहस्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
    संभाजीनगर - दुष्काळ, नापिकी आणि कर्ज या संकटांत अडकलेल्या १ सहस्र २४ शेतकर्‍यांनी १ जानेवारी ते ५ डिसेंबर २०१५ या कालावधीत आत्महत्या केली असल्याची नोंद शासनाकडे झाली आहे. दुष्काळ, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुला-मुलींच्या लग्नाची चिंता, कर्जफेड ही त्यामागील कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१. नोव्हेंबरमध्ये आत्महत्येचा आकडा ९८४ एवढा होता, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 

इंदूर येथे १० सहस्र धर्मांधांकडून दंगल

श्रद्धेला हानी पोहोचवल्याचे कळताच सहस्रोंच्या संख्येने धर्मांध संघटित 
होऊन कायदा हातात घेतात, हे लक्षात घ्या !
दगडफेक, वाहनचालकांना मारहाण
हिंदु महासभेचे नेते श्री. कमलेश तिवारी यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण
     इंदूर (मध्यप्रदेश) - लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे हिंदु महासभेचे नेते श्री. कमलेश तिवारी यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या विरोधात ८ डिसेंबर या दिवशी इंदूर आणि उज्जैन येथे धर्मांधांकडून विरोध प्रदर्शित करण्यात आला. इंदूर येथील ग्वालटोली ईदगाह येथे १० सहस्रांहून अधिक धर्मांधांनी एकत्र येऊन दंगल माजवली. येथील शोरूम, दुकाने, पेट्रोल पंप यांच्यावर दगडफेक केली, चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या, तसेच वाहनचालकांनाही मारहाण केली. परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे पोलीस दलाला घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. या वेळी दंगलखोरांनी मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या खाजगी मालमत्तेची हानी केली. त्यानंतर आलेल्या पोलीस दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पाकिस्तानने चांगले आतंंकवादी अथवा वाईट आतंंकवादी असा भेदभाव करू नये ! - अमेरिका

       नवी देहली - पाकिस्तानने भारतात आतंकवादी कारवाया करणारे लष्कर-ए-तोयबा सारखे चांगले आतंकवादी अथवा पाकिस्तानला त्रास देणारे पाकिस्तान तालिबान हे वाईट आतंकवादी आहेत, असा भेदभाव करू नये. सर्व आतंकवादी वाईटच असतात, तसेच जोपर्यंत पाकिस्तानात रहाणार्‍या २६/११च्या मुंबई आक्रमणात सहभागी असणार्‍यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत या आक्रमणातील बळींना न्याय मिळणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र उपसचिव अँथोनी ब्लिंन्केन यांनी केले आहे. ते भारताच्या २ दिवसीय दौर्‍यावर आले असतांना पत्रकारांशी बोलत होते. ब्लिंन्केन पुढे म्हणाले, पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी मान्य केल्याप्रमाणे पाकिस्तानने आतंकवाद्यांमध्ये भेदभाव करू नये. २६/११च्या मुंबई आक्रमणात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिक ठर झाले होते. त्यामुळे ही घटना या दोन्ही देशांना जवळ आणत आहे. भारत-अमेरिका आण्विक करारावर बोलतांना ब्लिंन्केन यांनी सांगितले की, येत्या ६ मासांत या दृष्टीने बरीच प्रगती होईल. आय.एस्.आय.एस्.च्या धोक्याविषयी बोलतांना ब्लिंन्केन यांनी सांगितले की, या आतंकवादी संघटनेचा दक्षिण आशियात विस्तार होऊ नये, यासाठी अमेरिका सतर्क आहे. सध्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये आय.एस्.आय.एस्. काही प्रमाणात अस्तित्वात असल्याचे पुरावे समोर येत आहेत; मात्र त्याविषयी सर्वांनीच सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.दोषी स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांचे निलंबन करणार ! - गृहराज्यमंत्री

खामगाव (जिल्हा बुलढाणा) 
येथील श्री गणेशमूर्तीच्या विटंबनेचे प्रकरण !
     नागपूर - बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील श्री गणेशमूर्तीच्या विटंबनेच्या प्रकरणी दोषी स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील विधान परिषदेत सांगितले. आमदार पांडुरंग फुंडकर यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्‍नास उत्तर देतांना डॉ. पाटील म्हणाले, खामगाव नगरपरिषदेच्या वतीने श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून कुंभ सिद्ध करून विसर्जन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या वेळी मूर्ती नगरपरिषदेच्या प्रस्तावित डंपिंग ग्राउंडवर टाकल्याच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी लेखी तक्रार केली. त्यावरून पोलिसांकडून नगरपरिषद अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी बुलढाणा येथील जिल्हाधिकार्‍यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

हिंदुद्रोहाच्या विरोधात न्यायालयीन 
लढा देणार्‍या पुण्यातील धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
     मुंबई - आगामी बाजीराव मस्तानी या हिंदुद्रोही चित्रपटाच्या विरोधात पुण्यातील सामाजिक संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, यात बाजीराव पेशवे, काशीबाई आणि मस्तानी यांचे बनावट व्यक्तिमत्त्व दाखवले आहे. पिंगा आणि मल्हारी ही गाणी वगळली पाहिजेत. आम्हाला चित्रपट दाखवूनच तो प्रदर्शित करावा ! सदर याचिका पुणे न्यायालयाने फेटाळली होती; त्यामुळे आता याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

कोलकाता शहरात आय.एस्.आय.ची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज !

भारताची ढिसाळ अंतर्गत सुरक्षा यंत्रणा !
     कोलकाता - येथे आय.एस्.आय.च्या हेरांची पाळेमुळे खोलवर रूजली असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. नुकत्याच उघड झालेल्या हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीनंतर आय.एस.आय.च्या काही हेरांना अटक करण्यात आली आहे. तथापि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पकडलेल्या हेरांची संख्या ही प्रत्यक्ष वावरत असलेल्या हेरांच्या तुलनेत हिमनगाचे एक टोक असावे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावरून कोलकाता शहराला आय.एस्.आय.च्या हेरांचा विळखा असल्याचे स्पष्ट होते.

मुसलमानांनी अयोध्या, काशी आणि मथुरा यांवरील दावा सोडून द्यावा !

मुसलमान नागरिक अयोध्येचा दावा सोडतील, या भ्रमात न रहाता शासनाने 
हिंदूंनी दिलेल्या बहुमताचा लाभ घेत हिंदूंच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात !
भाजपचे नेते विनय कटियार यांचे मुसलमानांना आवाहन
     फरुखाबाद - अयोध्या ही प्रभु रामचंद्रांची जन्मभूमी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुसलमानांनी अयोध्येवरील, तसेच काशी आणि मथुरा यांवरील त्यांचा दावा सोडून द्यावा, असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी केले. (इतक्या सहजपणे हा प्रश्‍न सुटला असता, तर २३ वर्षे का वाट पहावी लागली ? - संपादक)

मुसलमानाने पुरातून वाचवले; म्हणून हिंदु दांपत्याने त्यांच्या मुलीचे नाव ठेवले युनिस !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा परिणाम !
     चेन्नई - अतीवृष्टीमुळे आलेल्या विनाशकारी पुरातून एका युनिस नावाच्या मुसलमान युवकाने वाचवल्यामुळे येथील एका हिंदु दांपत्याने त्यांच्या मुलीचे नाव युनिस ठेवल्याची घटना समोर आली आहे. उरापक्कम् येथे वास्तव्यास असणारे चित्रा आणि मोहन यांना दक्षिण भागात आलेल्या भयंकर पुरामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. एके दिवशी गळ्याच्या वरपर्यंत पोहोचलेल्या पाण्यात चित्रा ही गर्भवती महिला अडकली असता तिला युनिस नावाच्या एम्.बी.ए. पदवीप्राप्त मुसलमान युवकाने वाचवून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला मुलगी झाल्यावर या नवजात मुलीचे नाव युनिस ठेवून चित्रा आणि मोहन यांनी त्याला धन्यवाद दिले. या मुलीच्या शिक्षणाचा व्यय करणार असल्याचे युनिसने म्हटले आहे. (एखाद्या मुसलमान महिलेला हिंदूने वाचवले असते, तर त्यांनी त्यांच्या मुलीचे हिंदु नाव कधी ठेवले असते का ? - संपादक)

मथुरा येथे अज्ञातांकडून एका साधूची हत्या

समाजवादी पक्षाच्या राज्यात साधू-संत असुरक्षित ! असहिष्णुतेविषयी संपूर्ण देशात डांगोरा 
पिटणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि प्रसारमाध्यमे आता कुठे आहेत ? 
     मथुरा - येथील एका आश्रमातील साधूची अज्ञात लोकांनी दगड आणि विटांनी अमानुष मारहाण करून हत्या केल्याची नुकतीच घटना घडली. पोेलिसांनुसार ७ डिसेंबर या दिवशी येथील गोवर्धन भागातील किराड आश्रमात काही अज्ञान लोकांनी घुसून साधू परमेंदर दास यांना दगड-विटांनी अमानुष मारहाण केली. यात दास यांचा मृत्यू झाला. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. (एका धर्मांधाची हत्या झाली, तर संपूर्ण देश असुरक्षित होतो आणि हिंदूची हत्या झाली, तर त्याचा साधा निषेधही व्यक्त होत नाही ! - संपादक)कॅनडाकडून भारताला २५० टन युरेनियम प्राप्त

     नवी देहली - भारत आणि कॅनडा यांच्यात २ वर्षांपूर्वी झालेल्या युरेनियम पुरवठा करारानुसार कॅनडाने भारताला पहिल्या टप्प्यात २५० टन युरेनियम पाठवले आहे. समुद्रमार्गे आलेले हे युरेनियम भारतात पोहचले असल्याची माहिती राजधानीतील एका वरिष्ठ शासकीय अधिकार्‍याने दिली. सप्टेंबर २०१३ मध्ये भारत आणि कॅनडा यांच्यात अणूसहकार्य करार झाला होता. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये कॅमिको यांनी भारताशी युरेनियम पुरवठा करार केला होता. कॅनडा शासनाने दिलेल्या माहितीनुसार कॅनडा भारताच्या अणूऊर्जा विभागाला ७१ कोटी ५८ लक्ष रुपये किमतीचा सुमारे २ सहस्र ७३० टन समृद्ध युरेनियमचा पुरवठा करणार आहे.भारतातील सेवाभावी संस्थांना ५ सहस्र २४६ कोटींचा विदेशी निधी प्राप्त

या सेवाभावी संस्था देशात कोणते समाजकार्य करतात, याचीही माहिती शासनाने जनतेला द्यावी !
     नवी देहली - वर्ष २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतातील सेवाभावी संस्थांना ५ सहस्र २४६ कोटी रुपयांचा विदेशी निधी प्राप्त झाल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत दिली. सेवाभावी संस्थांनी त्यांचे अहवाल सादर करण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर असल्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये हाच निधी १३ सहस्र ५३ कोटी, तर ख्रिस्ताब्द २०१२-१३ मध्ये ११ सहस्र ५२७ कोटी एवढा असल्याचीही रिजिजू यांनी सांगितले.

काळा पैसा बाहेर जाणार्‍या देशांच्या सूचीत भारत जगात चौथा

     वॉशिंग्टन - अवैध मार्गाने काळा पैसा बाहेर जाणार्‍या देशांच्या क्रमवारीत जगामध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे. वर्ष २००४ ते २०१३ या काळात भारतातून प्रतिवर्षी तब्बल ५१ अब्ज डॉलर्स एवढी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आली, अशी माहिती अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी (जीएफ्आय) या थिंक टँकच्या एका अहवालातून समोर आली आहे.

हिंदुद्रोही बाजीराव मस्तानीच्या प्रदर्शनावर बंदी घाला !- भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  • बाजीराव मस्तानी या हिंदुद्रोही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारे आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन !
  • इतिहासाचा अभ्यास न करता चित्रपट बनवल्याचा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा आरोप
      नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटावर बंदी घालण्याच्या संदर्भात यापूर्वी स्वतः श्रीमंत पेशवे यांचे वंशज आणि मस्तानी यांचे वंशज यांनी त्यांची भूमिका मांडणारे पत्र दिले आहे. विविध इतिहासप्रेमी संघटना आणि व्यक्ती यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बाजीराव मस्तानी या हिंदुद्रोही चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चित्रपटातील आक्षेपार्ह गाणी आणि वाक्ये वगळण्याची मागणी केली आहे.
प्रा. सौ. कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे की... 

धर्म परिवर्तनशील असला, तरी त्याच्या नियमांचे पालन करायलाच हवे ! - सौ. नंदिनी सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

साम वाहिनीवर आयोजित चर्चासत्र सनातनी पंकजा मुंडेंचं डोकं ठिकाणावर कोण आणणार ? 
चर्चासत्रात बोलताना
सौ. नंदिनी सुर्वे
      मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु धर्माने कधीही स्त्रीला न्यून लेखले नाही. प्रत्येक धर्मकृतीत स्त्रीचा विचारच केलेला आहे. त्यामुळे धर्मात सांगितल्यानुसार जे नियम पाळावे लागतात, त्यांचे पालन व्हायलाच हवे. धर्म हा जरी परिवर्तनशील असला, तरीही त्याचे नियम तेच रहातील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी केले. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी शनिशिंगणापूर येथे एका महिलेने चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतल्याच्या प्रकरणात तेथे महिलांना जाण्यास बंदी आहे, तर यात महिलांचा अपमान कुठे होतो, असे विधान केले होते. त्या अनुषंगाने साम वाहिनीने सनातनी पंकजा मुंडेंचं डोकं ठिकाणावर कोण आणणार ? या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम, पुणे जिल्हा अंनिसच्या कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. विद्या चव्हाण आणि भाजपचे श्री. शिरीष बोराळकर सहभागी झाले होते. संजय आवटे यांनी सूत्रसंचालन केले. 

वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभा !

श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी महाअधिवेशनात साधू-संतांचे आश्‍वासक प्रोत्साहन 
उपस्थित मान्यवर 
     महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष भगवान महाराज कोकरे, ह.भ.प. कानीफनाथ महाराज टाक, पालम; ह.भ.प. स्वामी दयानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, परभणी येथील ह.भ.प. रामगीरी महाराज मिरखेळकर, ह.भ.प. नारायण शिंदे, ह.भ.प. सोपानकाका बोबडे (माडेगावकर), ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज अहिर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संंपर्कप्रमुख ह.भ.प. संतसेवक श्री. जालिंदर नामदेव काळोखे पाटील, श्रीक्षेत्र पैठण येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. मोहन महाराज पवार
     श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे), ९ डिसेंबर (वार्ता.) - सीतामातेचे अपहरण झाल्याने रावणाचा नाश झाला, त्याचप्रमाणे सनातनवर बंदी घालण्याचे षड्यंत्र आखले; म्हणून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला. सनातनला सत्त्वपरीक्षा द्यावी लागेल. वारकरी संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठीशी आहे. सनातनच्या साधकांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी वारकरी संप्रदाय पुरोगाम्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी घनगर्जित चेतावणी वारकर्‍यांनी सनातनवर विनाकारण आगपाखड करणार्‍या पुरोगाम्यांना दिली. पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून सनातन संस्थेसारख्या संघटनांवर बंदी घालण्यात येऊ नये, असा ठराव या वेळी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल। च्या गजरात एकमुुखाने संमत करण्यात आला. 

बांगलादेशींना शोधण्यासाठी विशेष मोहीम चालू रणजित पाटील

हिवाळी अधिवेशन
     नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) भिवंडी शहर परिसरात २० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तसेच शहरात बांगलादेशींसाठी विशेष शोधमोहीम चालू करण्यात आली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री श्री. रणजित पाटील यांनी दिली. भाजपचे श्री. अतुल भातखळकर यांनी या संदर्भात प्रश्‍न विचारला होता. तेव्हा १५ आणि १६ ऑक्टोबर या दिवशी अनुक्रमे ३ आणि १७ बेकायदा वास्तव्य करणार्‍यांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस्) अटक केली. काळाचौकी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली.

संगमनेरमध्ये (जिल्हा नगर) अवैधरित्या ८०० किलो गोमांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांना अटक

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करण्याची अपेक्षा ! 
     संगमनेर, ९ डिसेंबर - संगमनेर पोलिसांच्या पथकाने ७ डिसेंबर या दिवशी सायंकाळी शहरातील जुने कोल्हेवाडी रस्त्यावरील एका पशुवधगृहावर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी ८०० किलो गोमांस आणि ते अवैधरित्या घेऊन जाणारा एक मालवाहू टेम्पो असे मिळून ३ लक्ष ८० सहस्र रुपयांचा ऐवज शासनाधीन केला आहे. या प्रकरणी राज महंमद सय्यद आणि मुनीर कुरेशी यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. संगमनेर येथे आतापर्यंत ५ वेळा पोलिसांनी कारवाई करून अनेक गोवंशांना मुक्त केले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गोमांस शासनाधीन करून नष्ट केले आहे.

सनातन संस्थेच्या विरोधात दोन्ही काँग्रेससह १३ आमदारांचा प्रश्‍न !

  • कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
  • हिवाळी अधिवेशन २०१५
     नागपूर, ९ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याने या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. हे खरे आहे का ? त्याविषयी शासनाने कोणती कार्यवाही केली ? किंवा त्यास विलंब होत असेल, तर त्याची कारणे काय ? अशी विचारणा दोन्ही काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या ११ आमदारांनी लेखी ९ डिसेंबरच्या प्रश्‍नोत्तरांच्या सत्रासाठी लेखी प्रश्‍न देऊन केली होती. त्याला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सदर हत्यांच्या प्रकरणी सखोल चौकशी चालू आहे, असे जुजबी उत्तर दिले आहे.

सोलापुरात गोवंशाची क्रूरतेने वाहतूक, दोन गुन्हे प्रविष्ट

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची 
परिणामकारक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता !
      सोलापूर, ९ डिसेंबर - वाहनातून गोवंशाचे पाय आणि तोंड बांधून क्रूरपणे वाहतूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ आणि सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. पोलीस शिपाई शंकर भिसे यांच्या तक्रारीवरून दत्ता रामचंद्र शेलार आणि बोलेरो क्र. एम्एच् १३ बीएल् ८३१७ चा चालक यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. दत्ता शेलार हे ३ जर्सी गायी बोलेरोमधून सुरक्षेची उपाययोजना न करता पशुवधगृहाकडे घेऊन जात असतांना भिसे यांना ६ डिसेंबरच्या मध्यरात्री कारंबा नाक्याजवळ आढळली. 

चिदम्बरम्ना उपरती !

     तिकडे देहलीत सोनिया काँग्रेसचे निष्ठावंत नेते पी. चिदम्बरम् यांनी सांगितले की, सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर राजीव गांधी शासनाने घातलेली बंदी चूक होती. २७ वर्षांनंतर ही उपरती झाली आहे; कारण आता ती होऊन पुष्कळ हानी होणार नाही, याची निश्‍चिती असेल, म्हणूनच चिदम्बरम् बोलले. बंदी घातली, तेव्हा चिदम्बरम् राजीव गांधी शासनात गृह राज्यमंत्री होते; पण ही कृती असहिष्णू ठरत नाही. तस्लिमा नसरीन मुसलमान उग्रवाद्यांच्या भीतीने वणवण फिरत आहे. अज्ञातवासात जीवन जगत आहे. ती असहिष्णुता ठरत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या काँग्रेसच्या राजवटीत होते, तेव्हा विचारस्वातंत्र्यावर घाला पडत नाही. देहलीत शिखांचा नरसंहार होतो, तेव्हा कुणाला भारत सोडून जावेसे वाटत नाही.

सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्या नाकर्तेपणाचे फलित !

      स्वातंत्र्य सुराज्यात परिवर्तित होण्याऐवजी पुन्हा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पारतंत्र्याकडे वाटचाल करू लागले आहे. या चंगळवादाने तरुणपिढी नीतीभ्रष्ट, विवेकभ्रष्ट आणि संस्कारभ्रष्ट होत आहे. हा या देशाला निर्माण झालेला प्रचंड धोका आहे त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. 
कर्नाटक राज्यातील भ्रष्ट अधिकारी !
     कर्नाटक राज्यात वर्ष १९९४ पासून आजतागायत लोकायुक्त पोलिसांनी १०३ अधिकार्‍यांच्या घरावर धाडी घातल्या. त्या अधिकार्‍यांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींची शासनाने चौकशी केली आणि त्यानुसार आतापर्यंत १० अधिकार्‍यांचे अहवाल सिद्ध केले असून तीन अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. १३ अधिकार्‍यांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. २३ अधिकार्‍यांची चौकशी चालू आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यानी सर्व आरोपींची नावे, पद आणि त्यांनी मिळवलेली भ्रष्टाचारी मालमत्ता यांचा तपशील विधानभवनात मांडला.

या अवैध बांधकामांना उत्तरदायी कोण ?

     पुणे येथील लोहगाव विमानतळाच्या संरक्षणाच्या दृष्टीने बाह्य सीमारेषेच्या पुढे १०० मीटर, तर तेथे असलेल्या शस्त्रागारापासून ९०० मीटर अंतरापर्यंतची सर्व अवैध बांधकामे पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तत्पूर्वी हवाईदल आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संयुक्तपणे या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार हवाईदल विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात ७५५ अवैध बांधकामे असल्याचे आढळून आले आहे. यांमध्ये विमानतळाच्या सीमारेषेनंतरच्या १०० मीटर परिसरात २०३ बांधकामे, तर शस्त्रागाराच्या बाह्य सीमारेषेपासून ९०० मीटर परिसरात ५५२ बांधकामे झाली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील ६ मासांत ही अवैध बांधकामे पाडावी लागणार आहेत.

साधकांना सूचना

    पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.१२.२०१५) दुपारी ३.२५ वाजता
समाप्ती - कार्तिक अमावास्या (११.१२.२०१५) दुपारी ३.५९ वाजता
उद्या अमावास्या आहे.

धर्मनिरपेक्षतेचा कैवार घेणार्‍यांकडून असहिष्णुतेच्या सूत्राचा केवळ राजकीय हत्यार म्हणून वापर !

      संसदेत असहिष्णुता या देशभर (विनाकारण) गाजणार्‍या विषयावर वादळी चर्चा झाली. ज्या प्रकारे ही चर्चा होत होती आणि दोन्ही बाजूंकडून वाद-प्रतिवाद होत होते, ते ऐकल्यावर हे सूत्रच किती पोकळ होते, याची निश्‍चिती पटते. गेल्या दीड वर्षात, अर्थात भाजपाप्रणीत रालोआचे नरेंद्र मोदी शासन निवडून आल्यानंतर देशात असहिष्णुता प्रचंड प्रमाणात वाढीस लागली असून अल्पसंख्याकांचे जिणे असह्य झाले आहे, असा कांगावा करत पुरस्कार वापसी, शासनावर टीका इत्यादींची झोड उठवण्यात काही जण आघाडीवर आहेत. यात चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कलाकारही सहभागी आहेत. ही जी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे, ती केवळ सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठीच आहे का ?, असा संशय निर्माण होत आहे.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

हिंदूंची राष्ट्रभक्ती आणि धर्मांधाचा राष्ट्रद्रोह !

      ८ डिसेंबर २०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये फरीद खान नावाच्या भारतीय सैनिकाला आय.एस्.आय.साठी हेरगिरी करतांना पकडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यातून धर्मांधाची राष्ट्रद्रोही वृत्ती लक्षात आली. याउलट हिंदूंच्या राष्ट्रभक्तीचे उदाहरण अभ्यासता येईल. चीनच्या सीमेवर नाथुला येथे बाबा हरभजन नावाच्या एका सैनिकाची समाधी आहे.

इस्लामिक स्टेटची धोक्याची घंटा !

       इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने इराक आणि सिरिया या देशानंतर फ्रान्स, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश या देशांत आतंकवादी कारवायांना अशुभारंभ केला आहे. भारतावरही आक्रमण करणार असल्याचे सांगत इस्लामिक स्टेटने प्रथमच एक जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कट्टर हिंदु राष्ट्रवादी नेता असून इस्लामविरोधी आहेत, असा दावा इस्लामिक स्टेटने प्रसिद्ध केलेल्या फयुचर इस्लामिक स्टेट बॅटल्स या पुस्तकात केला आहे. अशी विधाने करून भारतातील मुसलमानांच्या हिताचा विचार करत असल्याचे दर्शवून त्यांची सहानुभूती मिळवणे आणि त्यांना भारतात खलिफा राजवट स्थापन करण्याकरता इस्लामिक स्टेटच्या जाळ्यात ओढणे, हे यामागील षड्यंत्र आहे. 

चाकण (जिल्हा पुणे) बाजारातून ११ गायी आणि बैल यांची कसायापासून सुटका

गोवंशहत्या बंदी कायदा होऊनही 
गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येणे, हे चिंताजनक !
     पुणे, ९ डिसेंबर - चाकण येथील बैल बाजारातून एक कसायी एकूण ११ गायी आणि बैल चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतांनाच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंशियांना वाचवले. (गोवंशियांना वाचवणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक)
१. बजरंग दलाचे कार्यकर्ते गणेश हुलावळे आणि गणेश रौंधल हे चाकण बैल बाजारात गेले होते. त्या वेळी एक कसायी गायी आणि बैल यांना चोरून नेतांना आढळला. 

फलक प्रसिद्धीकरता

गदारोळामुळे वाया गेलेला जनतेचा 
पैसा उत्तरदायी खासदारांकडून वसूल करा !
      नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या खासदारांनी गदारोळ करून ८ डिसेंबर या दिवशी संसदेचे कामकाज बंद पाडले. त्यानंतर ९ डिसेंबरलाही काँग्रेसींच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

.....याचा अर्थ तृणमूलचे ख्रिस्ती प्रवक्ते भारतविरोधी कृत्य करायला, हिंदु धर्म नष्ट करायला पोपने सांगितले, तर तसेही करतील !

      १६ मे २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार होता. त्या पार्श्‍वभूमीवर टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने चर्चासत्र आयोजित केले होते. त्या वेळी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ता तथा खासदार डेरेक ओब्रायन चर्चासत्रात बोलतांना म्हणाले, १६ मे या दिवशी निवडणुकीचे निकाल काहीही लागू देत, मी प्रथम ख्रिस्ती राहीन आणि नंतरच भारतीय असेन.

हिंदु राष्ट्र स्थापणार !

येतील कितीही वादळे, नाही झुकणार आम्ही ।
असो कितीही पुरोगामी बांडगुळे ॥ 
या भूवर, याच जन्मात हिंदु राष्ट्र स्थापणार आम्ही । 
आहेत आमचे आदर्श छत्रपती शिवराय ॥ 
छातीवर संकटे आली, तरी नाही तुटणार आम्ही ।
कृष्णकृपे या जन्मी या भूवर, हिंदु राष्ट्र स्थापणार आम्ही ॥ 
- श्री. अभिजित देशमुख, हिंदु जनजागृती समिती हिंदू तेजा जाग रे !

Jago !
      National Herald mamleme Congress ke sansadone bawal machakar 2 din sansadka kamkaj rokha.
kya yaha janatadroha nahi ?
जागो !
     नॅशनल हेराल्ड मामलेे में काँग्रेस के सांसदोने बवाल मचाकर २ दिन संसदका कामकाज रोखा.
क्या यह जनताद्रोह नही ?

नाटे (ता. राजापूर) येथील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी (वय ९३ वर्षे) संतपदी विराजमान !

भगवान श्रीकृष्णाने दिले रत्नागिरी 
जिल्ह्याला द्वितीय, तर सनातनला ५५ वे संतरत्न !
     रत्नागिरी, ९ डिसेंबर (वार्ता.) - राजापूर तालुक्यातील श्रीमती सुशीला विष्णु शहाणेआजी संतपदी आरुढ झाल्याची आनंदवार्ता ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी दिली. श्रीमती शहाणेआजी यांच्या निवासस्थानी एका छोट्याश्या कार्यक्रमात श्रीमती शहाणेआजी सनातनच्या ५५ व्या संत झाल्याचे घोषित करण्यात आले. येथील पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांनी पू. शहाणेआजींचा शाल, श्रीफळ आणि श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान केला. या वेळी पू. शहाणेआजींचे सुपुत्र श्री. मिलिंद शहाणे, श्री. रविकांत शहाणे, स्नुषा सौ. कविता रविकांत शहाणे, सौ. अन्नपूर्णा विलास शहाणे आणि गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे आजींचे नातू वेदमूर्ती केतन शहाणे आदी उपस्थित होते. 

पोलिसांच्या अन्वेषण यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावल्यास पुढील दक्षता घ्या !

हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सनातन 
संस्थेच्या साधकांसाठी मार्गदर्शक सूचना !
      केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ज्या पद्धतीने दैनिक सनातन प्रभातच्या निष्पाप वितरक साधकांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, याची माहिती देणारी पत्रकार परिषद अलीकडेच सनातन संस्था आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांनी संयुक्तपणे घेतली. काही सनातनद्वेष्ट्या व्यक्ती आणि संघटना पोलिसांच्या अन्वेषण यंत्रणांना जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले साधक दोषीच आहेत, असे गृहीत धरून किंवा काही माहिती साधक मुद्दाम लपवत आहेत, अशा अपसमजातून त्यांना वेडेवाकडे प्रश्‍न विचारण्यात येत आहेत. प्रश्‍नांचा रोख न समजल्यामुळे किंवा पोलिसी चौकशांचा अनुभव नसल्यामुळे साधकांकडून अनाहुतपणे दिली जाणारी उत्तरे कित्येकदा अपसमज निर्माण करणारी ठरतात. त्यामुळे एकाच साधकाला वारंवार चौकशीला बोलावणे किंवा त्याच्याशी संपर्क झालेल्या अन्य निष्पाप परिचितांंना, आप्तांना आणि साधकांना सत्य-असत्य पडताळण्यासाठी अकारण चौकशीला बोलावणे, असे प्रकार घडत आहेत. अनेकांना याचा त्रासही होतो आणि साधनेसाठी द्यावयाचा मौल्यवान वेळही वाया जातोे. साधकांचा नाहक वेळ जाऊ नये आणि पोलिसांनाही अचूक माहिती विनाविलंब मिळावी, यादृष्टीने खालील काही मार्गदर्शक सूत्रे हिंदु विधिज्ञ परिषदेने साधकांसाठी दिली आहेत.
१. सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. समाजामध्ये साधनेचा प्रसार करून आध्यात्मिक प्रगतीसाठी साधकांंना साहाय्य करणे, हा संस्थेचा मूळ हेतू आहे. संस्थेची उद्दिष्टे कोणताही आर्थिक लाभ मिळावा, अशी नाहीत. सर्वसामान्य साधकाला संस्थेच्या कायदेशीर गोष्टी अथवा आर्थिक व्यवहार यांची काही माहिती नसते. बहुतेक साधक सेवाभावाने येतात आणि स्वत:ला मिळालेली सेवा पूर्ण करतात. याव्यतिरिक्त अन्य गोष्टींशी त्यांना काही देणे-घेणे नसते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. 

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, साधकांच्या कुटुंबियांना दिलेले त्रास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले 

बालसाधकाची प्रेमाने काळजी घेणारा चि. वल्लभ राकेश पाध्ये (वय ५ वर्षे) !

चि. वल्लभ पाध्ये
       एकदा चि. कृष्णा दोडमणी पुष्कळ रुग्णाईत होता. चि. वल्लभने त्याच्या बाबांना (श्री. राकेश पाध्ये यांना) कृष्णाला मांडीवर घेऊन बसण्यास सांगितले. तो स्वतः त्याच्यासाठी पाणी घेऊन आला. तो कृष्णाला म्हणाला, तुला ताप आला आहे का ? हे पाणी पी.
      हे श्रीकृष्णा, चि. वल्लभचा हा गुण माझ्यातही येऊ दे, अशी तुझ्या चरणी आर्ततेने प्रार्थना करते. अशा गुणी बालसाधकांच्या समवेत रहाण्याची संधी मला दिलीस, त्याविषयी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.
- तुझ्या कोमल चरणांजवळ येण्यासाठी आणि तुझ्या मधुर अनुसंधानात सतत रहाण्याची इच्छा असणारी, श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०१५)

भृगु महर्षींच्या संहितावाचनाने रामनाथी आश्रमाच्या अवतीभवती पडलेल्या पावसाची साधकाला आलेली अनुभूती

श्री. सुरजित माथूर
१. रामनाथीच्या अवतीभवती अवेळी पाऊस पडलेला पाहून अकस्मात् भावजागृती होणे : ३.११.२०१५ या दिवशी सायंकाळी मी सेवेसाठी मडगाव येथे गेलो होतो. परतीच्या प्रवासात मडगाव ते बोरी गाव या मार्गात पाऊस पडलेला नव्हता; पण मी थोडे पुढे म्हणजे रामनाथीच्या जवळ आल्यावर पाऊस पडल्याने मार्ग (रस्ता) ओेला झालेला दिसला. त्या भागात आल्यावर मला नेहमीपेक्षा शांत वाटत होते. माझ्या प्रार्थनाही पुष्कळ भावपूर्ण होत होत्या. आश्रमात आल्यावर मला कळलेे की, सनातनच्या रामनाथी आश्रमात ३.११.२०१५ या दिवशी सायंकाळी पंडित लालदेव शास्त्री यांनी भृगु संहितेचे वाचन केले.

तीनही युगांचा साक्षीदार असलेल्या सूर्याच्या रूपात प्रतिदिन श्रीकृष्णाचे दर्शन होण्याचे भाग्य लाभणे

कु. सोनम फणसेकर
          १५.२.२०१५ या दिवशी मी सूर्याला नमस्कार करण्यासाठी बाहेर आले. त्या वेळी सूर्याकडे बघून मला पुष्कळ आनंद होऊ लागला. माझी आतून भावजागृती होत होती. सूर्य माझ्या अगदी जवळचा आहे, असे वाटून त्याच्याविषयी मला प्रेम वाटू लागले. मला हृदयात वेगळ्याच संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर सूर्यदेवाकडे धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारावी, असे वाटले. मला असे का वाटत आहे ? असा प्रश्‍न पडला. मी सूर्यदेवाला सांगितले, हे सूर्यनारायणा, तू त्रेतायुग, द्वापरयुग आणि या कलियुगाचा एकमेव साक्षीदार आहेस. तू रामायण आणि महाभारत पाहिलेस. त्यातील प्रत्येक घटनेचा कलियुगातील तू एकमेव साक्षीदार आहेस. श्रीविष्णूच्या प्रत्येक अवताराचे तुला दर्शन घडले आहे. भगवंताचे साक्षात् दर्शन घडलेल्या तुला पहातांना मला अतिशय आनंद होत आहे. भगवंताने गीतेत ग्रहांमध्ये मी सूर्य आहे, असे सांगितले आहे. तुझ्या रूपाने भगवान श्रीकृष्णाचे आम्हाला प्रतिदिन दर्शन होते. आम्ही तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत. आमचा तुला नमस्कार असो. - कु. सोनम फणसेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०१५)

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

महादेव साधूच्या वेशात श्रीकृष्णाच्या बालरूपाचे दर्शन घेतांना.
(४.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

विरोधी भक्तीने सनातनच्या प्रसाराला हातभार लावणारे अंनिसचे शाम मानव !

१. शाम मानव यांच्यामुळे सनातनला विरोधी भक्तीची ओळख होणे
श्री. ज्ञानेश्‍वर गावडे
       अंनिसचे शाम मानव यांच्यामुळे ईश्‍वरनिष्ठ सनातनला भगवंताच्या भक्तीच्या एका नव्या प्रकाराची ओळख झाली. ती म्हणजे विरोधी भक्ती ! या भक्तीचे स्वरूप म्हणजे चांगले कार्य करणार्‍या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागणे, तिला त्रास देणे आणि त्याचा लाभ त्रास होत असलेल्या व्यक्तीलाच होणे ! अशा प्रकारची भक्ती आमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या साधकांनी कधी ऐकलीही नव्हती. 

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
जन्मानंतर आणि मृत्यूच्या 
आधीची काही वर्षे यांतील साम्य आणि भेद
      सूर्योदय आणि सूर्यास्त यांवेळी सूर्य सारखाच दिसतो. त्याचप्रमाणे जन्मानंतरची आणि मृत्यूच्या आधीची काही वर्षे मानव दुसर्‍यांवर अवलंबून रहाणारा होतो. यांत फरक हा की जन्माच्या वेळी बाळाची आई बाळाचे सर्व आनंदाने करते; पण मानव वृद्ध झाला की, त्याचे सर्व करायला त्याची मुलेही तयार नसतात. विदेशात तर बहुतेक ठिकाणी वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. भारतातही आता त्याचा आरंभ झाला आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बुद्धीवाद संपल्यावर ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

काँग्रेसी चमचेगिरी !

संपादकीय 
     गेल्या २ दिवसांपासून देशाच्या संसदेत नॅशनल हेराल्ड प्रकरण गाजत आहेे. या प्रकरणी मोदी शासन सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभा अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. 
    नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र नेहरूंनी ते ८ सप्टेंबर १९३८ या दिवशी लखनौ येथून चालू केले. अर्थात्च या वृत्तपत्राचे पहिले संपादक नेहरूच होते. देशाचे पंतप्रधान होईपर्यंत ते नॅशनल हेराल्ड बोर्डाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्याच्या कालाखंडात या वृत्तपत्राने म्हणे महत्त्वाची भूमिका बजावली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn