Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या पू. प्रेमा कुवेलकर यांचा आज वाढदिवस
दैनिक सनातन प्रभातच्या पश्‍चिम महाराष्ट्र आवृत्तीचा आज वर्धापनदिन

कोटी कोटी प्रणाम !

संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीदिन

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! - श्रीक्षेत्र आळंदी येथील महाअधिवेशनात एकमुखी मागणी

 • वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने १२ वे वारकरी महाअधिवेशन !
 • धर्म आणि राष्ट्र हितार्थ श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी आणि हिंदुत्ववादी यांची वज्रमूठ !
अधिवेशनाला उपस्थित जनसमुदाय
      श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे) - नाठाळाचे माथी हाणू काठीचा वारसा सांगणार्‍या वारकर्‍यांनी राष्ट्र आणि धर्म हितार्थ कृतीशील होण्याचा निर्धार ८ डिसेंबर या दिवशी केला ! निमित्त होते संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ७१९ व्या संजीवन सोहळ्याच्या दिवशी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित १२ व्या वारकरी महाअधिवेशनाचे ! या वेळी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली. 

शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ : कामकाज दिवसभरासाठी स्थगित

जनतेच्या करातून आलेले पैसे असे उधळण्याचा सर्व 
पक्षीय लोकप्रतिनिधींना काय अधिकार आहे ? लोकप्रतिनिधींना 
दुष्काळाचा प्रश्‍न सोडवायची इच्छा असती, तर त्यांनी चर्चा होऊ दिली असती !
    नागपूर, ८ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यांना शासनाने तातडीने कर्जमाफी द्यावी, यासाठी आणि प्रथम दुष्काळाच्या प्रश्‍नावर चर्चा घडवून आणण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसह सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषद येथे आज गोंधळ घातला. काँग्रेसच्या आमदारांनी युती शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध असो, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना न्याय द्या, अशा स्वरूपाचे फलक आणि घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. सत्ताधार्‍यांनी या विषयावर चर्चा करण्याची सिद्धता दर्शवली; मात्र याला विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही. वारंवार सांगूनही विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे, तर विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे निंबाळकर यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

संसदेत काँग्रेस खासदारांनी घातलेल्या प्रचंड गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

 • गदारोळ घालून संसदेचा पर्यायाने जनतेचा अमूल्य वेळ आणि पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी जनताद्रोहीच ! अशांकडून हा सर्व व्यय (खर्च) वसूल करा !
 • नॅशनल हेराल्ड प्रकरण
     नवी देहली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी मोदी शासन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभा येथे प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. 

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घाला ! - प्रांत कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी

मिरज येथील प्रांत कार्यालयात निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     मिरज, ८ डिसेंबर (वार्ता.) - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच पिंगा पिंगा या गाण्यातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. वास्तविक पेशव्यांच्या काळात घरंदाज महिलांची परंपरा होती की, स्त्रिया अंगविक्षेप करून नाचत नसत. तत्कालीन राजघराण्यातील स्त्रिया या राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, राणी चेन्नम्मा यांच्या परंपरेतील होत्या. त्यांनी तलवारींनी पराक्रम गाजवून शत्रूला नाचवले आहे. हा प्रकार म्हणजे स्वतःचा गल्ला भरण्यासाठी हिंदूंच्या आदर्श कुटुंबव्यवस्थेला लावलेला धक्का आहे. इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी ८ डिसेंबर या दिवशी मिरज येथील प्रांत कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. 

अमेरिकेत मुसलमानांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घाला !

       केवळ २-३ आतंकवादी आक्रमणांनंतर अमेरिकेत मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी तेथील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार करतात, तर गेली कित्येक वर्षे प्रतिदिन आतंकवादाची झळ सहन करत असलेल्या भारताने काय करायला हवे ? तरीही भारत असहिष्णु, असुरक्षित असल्याच्या वावड्या उठवणारे साहित्यिक, साम्यवादी, पुरो(अधो)गामी यांना आता अमेरिकेविषयी काय म्हणायचे आहे ?
                       अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे डेव्हिड ट्रम्प यांची मागणी
    न्यू जर्सी - पॅरिसमध्ये झालेले आतंकवादी आक्रमण, कॅलिफोर्नियात नुकताच झालेला गोळीबार आणि आय.एस्.आय.एस्.कडून मुसलमान युवकांच्या साहाय्याने अमेरिकेवर आक्रमण करण्याचे होत असलेले प्रयत्न आदी घटनांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत मुसलमानांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी भरलेले डेव्हिड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या मागणीचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटले असून त्यांच्या विरोधकांनी तर त्यांना वेड लागले असल्याची टीकाही केली आहे.

नाटे (ता. राजापूर) येथील श्रीमती सुशिला विष्णु शहाणे (वय ९३ वर्षे) संतपदी विराजमान !

सनातनचे ५५वे संतरत्न 
पू. (श्रीमती) सुशीला विष्णु शहाणेआजी (डावीकडे)
यांचा सन्मान करतांना पू. (श्रीमती) मंगला खेर
याविषयीचे सविस्तर वृत्त उद्या वाचा

बांगलादेशातील हिंदु नेते आलोक सेन यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

बांगलादेशाच्या शासनाकडून तेथील अल्पसंख्य हिंदूंवर अन्याय होत असल्याविषयी 
मोदी शासन बांगलादेशाला खडसवेल, अशी आशा आहे ! 
बांगलादेशचे केंद्रीयमंत्री हाजी मोशर्रफ होसेन यांच्यावर संशय
      ढाका - बांगलादेशातील फरीदपूर येथे बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्‍चन संघटन परिषदेचे सचिव आणि हिंदु नेते श्री. आलोक सेन यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी तीक्ष्ण शस्त्रांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते गंभीर स्वरूपात घायाळ झाले आहेत. २४ नोव्हेंबर या दिवशी ही घटना घडली असून येथील ढाका वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अहवाल दाखल करण्यात आला आहे.

चीनमधील प्रदूषणाने अभूतपूर्व पातळी गाठल्याने बीजिंगमध्ये अतीदक्षतेची चेतावणी

 • प्रदुषणाचा धोका ओळखून भारतीय राज्यकर्त्यांनीही वेळीच पावले उचलावीत !
 • सर्व शाळा केल्या बंद ! 
 • खुल्या जागेतील सर्व बांधकामांवर बंदी ! 
 • चारचाकी वाहनांच्या वापरावर कडक निर्बंध !
      बीजिंग - बीजिंगमध्ये वातावरणातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून आज सकाळी तेथील हवेत मोकळा श्‍वास घेणेही अवघड बनले आहे. शासनाने नागरिकांना अतीदक्षतेची चेतावणी दिली असून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अशी परिस्थिती उद्भवण्याची चीनच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. खुल्या जागेत चालू असलेल्या सर्व बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे.

आतापर्यंत १० लक्ष विस्थापितांनी घेतला जर्मनीत आश्रय

    बर्लिन - इराक आणि सिरिया या देशांतील युद्धजन्य परिस्थितीला कंटाळून आणि आपला जीव वाचवून आलेल्या विस्थापितांची संख्या केवळ जर्मनीतच १० लक्षांवर पोहोचली आहे, असे जर्मनीच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय युरोपातील अनेक देशांत या विस्थापितांनी आश्रय घेतला आहे. पॅरीस आणि अमेरिकेत नुकत्याच घडलेल्या आतंकवादी आक्रमणामुळे या विस्थापितांच्या आडून आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनीही युरोपमध्ये प्रवेश केला असावा, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इराक आणि सिरिया या देशांतील परिस्थिती सामान्य होऊन येथील विस्थापित कधी परत जातील, अशी चिंता युरोपमधील देशांत व्यक्त करण्यात येत आहे.

रशियाचे कृत्य चिथावणीखोर, भविष्यात आम्हीही प्रतिक्रिया देऊ ! - तुर्कस्थान

कुठे तुर्कस्थानच्या दिशेने केवळ क्षेपणास्त्र पकडल्याच्या कारणावरून रशियाला खडे बोल 
सुनावणारे तुर्कस्थानचे बाणेदार राज्यकर्ते, तर कुठे प्रतिदिन सीमेवर गोळीबार करून 
भारतीय सैनिकांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या शत्रूराष्ट्र पाकशी चर्चेची गुर्‍हाळे 
चालू ठेवणारे भारतीय राज्यकर्ते !
रशियाच्या अधिकार्‍याने मिसाईल लाँचर तुर्कस्थानच्या दिशेने पकडल्याचे प्रकरण
      इस्तंबूल (तुर्कस्थान) - तुर्कस्थानच्या दिशेने मिसाईल लाँचर घेऊन उभ्या असलेल्या एका रशियाच्या नौदल अधिकार्‍याचे छायाचित्र समोर आल्याने रशिया आणि तुर्कस्थान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. तुर्कस्थानने यावर तीव्र आक्षेप नोंदवला असून रशियाचे हे कृत्य चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे. रशियाचे एक जहाज तुर्कस्थानच्या सागरी सीमेतून जात असतांना हे छायाचित्र काढण्यात आले होते. एका स्थानिक वृत्तवाहिनीने काढलेल्या या छायाचित्रानुसार एक रशियन नौदल अधिकारी सीजर कुनिकोव्ह या जहाजाच्या पुढील भागात उभा असून त्याने त्याच्या खांद्यावर मिसाईल लाँचर घेतले असल्याचे दिसते. मिसाईल तुर्कस्थानच्या दिशेने पकडले असल्याचे दिसत असल्याने तुर्कस्थानने हा आक्षेप नोंदवला आहे.

पंतप्रधान मोदी अयोध्येत भव्य राममंदिर उभारतील ! - डॉ. प्रवीण तोगाडिया

      भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भव्य राममंदिर उभारतील, असा विश्‍वास विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केला. डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले, अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ मध्ये पाडलेल्या बाबरी मशिदीच्या ठिकाणीच भव्य राममंदिर उभारण्यात येईल. भाजपच्या राष्ट्र्रीय कार्यकारिणीने संमत केलेल्या प्रस्तावानुसार आणि निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनानुसार भव्य राममंदिर उभारून कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न पंतप्रधान मोदी साकार करतील. यासाठी हिंदूंनीही संतांच्या निर्देशांचे पालन करण्याची सिद्धता ठेवावी. सरदार पटेल यांनी ज्याप्रमाणे गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर उभारले, त्याप्रमाणे अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी संसदेत विधेयक संमत करण्यात येईल, असे आश्‍वासन भाजपच्या राष्ट्र्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आल्याचे डॉ. तोगाडिया यांनी सांगितले.

हरियाणात गोभक्तांवरील खटले मागे घेणार ! - मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा

खट्टर यांचे अनुकरण देशातील इतरही राज्यांनी करून गोभक्तांवरील 
खटले रहित करण्यासाठी पावले उचलावी ! 
     पानीपत (हरियाणा) - गायींच्या रक्षणासाठी गोभक्तांनी आंदोलने केली, तसेच जीव धोक्यात घालून त्यांनी तस्करांपासून गायींना वाचवले. त्यामुळे या आंदोलनांच्या वेळी सर्व गोभक्तांवर दाखल करण्यात आलेले खटले रहित करण्यात येतील, तसेच खटल्याच्या सर्व धारिकाही नष्ट करण्यात येतील, अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ६ डिसेंबर या दिवशी येथील आर्य बालभारती शाळेत आयोजित आर्य युवा महासंमेेलनात बोलतांना केली. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. एकट्या पानीपत जिल्ह्यात गोभक्तांच्या विरोधात अनुमाने ४० खटले नोंद आहेत.
    मुख्यमंत्री खट्टर पुढे म्हणाले, हरियाणात गोसंरक्षण आणि गोसंवर्धन कायदा लागू करण्यात आला आहे. भारतीय संस्कृती ही गायींचे रक्षण करणारी आहे. गायींना मान्यता मिळाली पाहिजे. गायींपासून पंचामृत प्राप्त होते.

अ‍ॅसिड आक्रमणातील पीडितांना मोफत उपचारासह हानीभरपाई द्या !

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 
     नवी देहली - अ‍ॅसिड आक्रमणातील पीडितांसाठी यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे हानीभरपाई, पुनर्वसन आणि मोफत उपचारांची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. 
     बिहारमधील परिवर्तन केंद्र या स्वयंसेवी संस्थेने या संदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे खाजगी रुग्णालये अ‍ॅसिड पीडितांचा मोफत उपचार करण्यास नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला, तसेच या संदर्भात न्यायालयाने आदेश द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्या. एम्. वाय. इकबाल आणि न्या. सी. नगप्पन यांच्या खंडपिठाने वरील निर्देश दिले. त्याचबरोबर बिहार शासनाने सदर पीडितेला १० लक्ष रूपये हानीभरपाई देण्यासह तिच्या शस्त्रक्रियेचा खर्चही करावा, असेही आदेश दिले.
    या पूर्वीही न्यायालयाने सर्व खाजगी रुग्णालयांना अ‍ॅसिड आक्रमणातील पीडितांना औषधे आणि महाग शस्त्रक्रियेसह मोफत उपचार करून साहाय्य करण्याचे निर्देश दिले होते, तसेच हा विषय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खाजगी रुग्णालयांसमोर ठेवण्यास सांगितले होते.

(म्हणे) रा.स्व. संघाला आतंकवादी संघटना घोषित करून त्यांच्यावर बंदी घाला !

आझम खान यांचा हिंदुद्वेष ! खान यांनी कधी काश्मीरमध्ये आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवणे, 
पाकच्या समर्थनार्थ घोषणा देणे आदी देशद्रोही कृत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही !
आझम खान यांचे विखारी फुत्कार !
       रामपूर - केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आतंकवादी संघटना घोषित करून त्यांच्यावर बंदी घालावी, असे फुत्कार समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी काढले. खान पुढे म्हणाले, संघ समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे त्यांचे धोरण राबवण्यात व्यग्र आहे. वर्ष १९४८ मध्ये गांधी यांच्या हत्येला जी परिस्थिती कारणीभूत ठरली होती, तशीच परिस्थिती आज देशात निर्माण करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. गांधींच्या हत्येनंतर तत्कालीन नेहरू शासनाने संघावर जशी बंदी घातली होती, तशीच बंदी पुन्हा घालण्यात यावी.

बाबरी पतनदिनी केरळ-कर्नाटक सीमेवर हिंसाचार, २ जण घायाळ

वादग्रस्त जागेवरील मशिदीचा ढाचा पाडल्याचा संताप मनात ठेवून २३ वर्षांनंतरही धर्मांध 
राष्ट्राच्या संपत्तीला हानी पोहोचवतात. याला सहिष्णुता म्हणायचे का ? जिहादी राज्यकर्त्यांनी तसेच स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यशासनांनी हिंदूंची सहस्रो मंदिरे तोडली, तरीही हिंदूंनी असा हिंसक मार्गाचा वापर करून विरोध केल्याचे कधी पाहिले आहे का ? तरीही हिंदू असहिष्णु असल्याचा कांगावा केला जातो.
     कासारगोड (केरळ) - कासारगोड शहरात ६ डिसेंबर या दिवशी बाबरी मशीद पतनदिनी अज्ञात व्यक्तींनी शासकीय आणि खाजगी बसगाड्यांवर दगडफेक केल्याने तणाव पसरला. कासारगोड जिल्हा केरळ-कर्नाटक सीमेवर असून धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजला जातो. 
     ६ डिसेंबर या दिवशी हिंसाचार पसरण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी पूर्वसिद्धता केली होती. तरीही केरळ राज्य परिवहन मंडळ आणि खाजगी मालकीच्या काही बसगाड्या समाजकंटकांच्या तावडीत सापडल्या. त्यांच्यावर ५ आणि ६ डिसेंबरच्या रात्री दगडफेक करण्यात आली. यात २ चालकांना मार लागल्याने ते घायाळ झाले. समाजकंटकांनी बाबरी मशिदीच्या पतनाच्या निषेधार्थ रस्त्यांवर टायर जाळून आणि अडथळे उभे करून काही काळासाठी वाहतूक बंद पाडली. पोलीस या समाजकंटकांच्या मागावर असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सत्यनारायणाची पूजा केल्यावरून ११ भारतियांना कुवैतने हाकलले !

कुवैतमध्ये भारतीय साधी धार्मिक पूजा करू शकत नाहीत आणि भारतात अनेक वर्षांपासून ५ कोटींच्यावर बांगलादेशी घुसखोर सुखनैव रहात असून त्यांविरुद्ध कोणीही काही करत नाही, हे लक्षात घ्या !
    मंगळुरू - फ्रेंड्स ऑफ कन्नूर एक्सपॅट असोसिएशनशी संबधित असलेल्या भारतियांनी कुवैतमध्ये सत्यनारायणाची पूजा केल्यावरून ११ भारतीयांना कुवैतमधून हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे. हे सर्व मंगळुरू येथील रहिवासी आहेत. 
     नवचेतन वेलफेअर असोसिशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्ष २०११ पासून सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात येत आहे. याविषयी पुरुषोत्तम कुक्यन यांनी मंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितले, आम्ही हा कार्यक्रम बंद सभागृहात करत असल्याने कुवैत प्रशासनाची कोणतीही अनुमती घेण्याची आवश्यकता आम्हाला वाटली नाही. या पूजेविषयी तेथील प्रसारमाध्यमांनी आम्ही अनुमती न घेता कार्यक्रम करून मोठ्या आवाजात संगीत वाजवले, असे चुकीचे वृत्त प्रकाशित केले. त्याचबरोबर कुवैतमधील काही लोकांनी या पूजेवर आक्षेप घेतांना ते काळी जादू आणि धार्मिक चर्चा करत असल्याचा आरोप केला. १६ ऑक्टोबर या दिवशी या पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेसह आध्यात्मिक प्रगती साध्य करण्याचे साधकांचे ध्येय पुनरुज्जीवित !

सिंहगडावरील अविस्मरणीय शिबीर 
घोषणा देत गड चढतांना शिबिरार्थी
       पुणे, ८ डिसेंबर (वार्ता.) - येथील किल्ले सिंहगड या ठिकाणी ६ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेले शिबीर सर्व शिबिरार्थींना केवळ आनंदच नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी चैतन्य आणि उत्साह प्रदान करणारे ठरले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख, सनातन संस्थेच्या कु. वैभवी भोवर, श्री. निरंजन दाते यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या गडावर आध्यात्मिक स्तरावर पार पडलेले अनौपाचरिक शिबीर सर्वच कार्यकर्त्यांमध्ये मोकळेपणा, संघटितपणा, नेतृत्वगुण यांचा विकास करण्यासह आध्यात्मिक दृष्टीकोन कृतीत आणण्यासाठीचा जणू प्रायोगिक भागच ठरले. त्यामुळे सहभागी शिबिरार्थींना साधनेसाठी प्रेरणा मिळाली. 

पुणे येथील भामचंद्र डोंगराचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन !

 • हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांवरील आघातांना वैध मार्गाने आणि संघटितपणे वेळीच विरोध न केल्यास संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेला भामचंद्र डोंगर भुईसपाट होईल !
 • तक्रारीनंतरही जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष !
       पुणे - संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भामचंद्र डोंगराचे (जिल्हा पुणे) खाणमाफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन होत आहे. शासनाने हा डोंगर वर्ष २०११ पासून संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. हे उत्खनन थांबवण्यासाठी प्रयत्नरत असलेले ह.भ.प. मधुसूदन पाटील महाराज यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत, तरी त्यास कोणताही प्रतिसाद मिळालेले नाही. (लक्षावधी वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेला भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी राज्यशासनाने त्वरित कृती करावी, ही अपेक्षा ! - संपादक) याउलट ह.भ.प. मधुसूदन पाटील महाराज यांचेच एकदा अपहरण करण्यात आले होते. (एका संतांचे अपहरण केले जाते याचा अर्थ हे कायद्याचे राज्य उरलेले नाही, असे जनतेने समजायचे का ? - संपादक) 

अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६ (मराठी)चे प्रकाशन

अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६ (मराठी)चे प्रकाशन करतांना
वारकरी संप्रदायाचे पितृतुल्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते
      या वेळी धर्मशिक्षण, तसेच अन्य प्रबोधनात्मक लिखाण असणार्‍या अ‍ॅन्ड्रॉईड सनातन पंचांग २०१६ (मराठी)चे प्रकाशन वारकरी संप्रदायाचे पितृतुल्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

मोर्चे आणि आंदोलन यांमुळे नागपुरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

मोर्चे आणि आंदोलन यांची पूर्वकल्पना असतांनाही सामन्यांना 
नाहक त्रास भोगावा लागण्यामागे वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभावच कारणीभूत !
     नागपूर, ८ डिसेंबर ( वार्ता.) - येथील हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस मोर्चे आणि आंदोलन यांनी गाजला. आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. शिक्षकांच्या मागण्या, आरक्षणाचा मोर्चा, रिक्शाचालकांचे आंदोलन असो, अशा शेकडो छोट्या-मोठ्या आंदोलनांनी नागपूर शहर गजबजले होते. सर्वत्र वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. 
     काही रस्त्यांवर १ किलोमीटरपर्यंत वाहने अनेक घंटे अडकून पडली होती. रेल्वे स्थानक, विधानभवन मार्ग यांसारखे अनेक रस्ते आंदोलकांनी व्यापले होते. त्यामुळे सामान्यांना पुष्कळ त्रास झाला.

लोकप्रतिनिधींच्या 'विदर्भ पर्यटना'साठी शासकीय वाहनांच्या खाजगी वापरावर बंदी ! - सामान्य प्रशासनाचा आदेश

इतक्या मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा
 तो पैसा लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विकासकामांसाठी द्यायला हवा ! 
खाजगी वापरासाठी प्रती कि.मी. १२ रुपये शुल्क लागू ! 
     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - लोकप्रतिनिधींच्या विदर्भ पर्यटनाला वेसण घालण्यासाठी आणि शासकीय वाहनांचा खाजगी कामांसाठी वापर करण्यास सामान्य प्रशासन विभागाने बंदी घातली आहे. अधिकार्‍यांनी खाजगी कामांसाठी वाहन वापरायचे असल्यास त्यासाठी अनुमती घेणे बंधनकारक आहे. वाहन वापरल्यास प्रती किमी १२ रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे. निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ वाहन खोळंबले, तर प्रतीघंटा ८ रुपये शुल्क आणि संपूर्ण दिवस वाहन शहराबाहेर असेल, तर इंधनाच्या व्यतिरिक्त ८० रुपये प्रतीदिवस अधिक मोजावे लागणार आहेत. वाहनांच्या इंधनावर प्रतीवर्षी होणार्‍या अवाढव्य खर्च कपातीसाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिवेशनकाळात शासकीय वाहने शहराच्या सीमेबाहेर नेण्यास बंदी करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्तांची अनुमती घ्यावी लागणार आहे. 

बंगाल शासनाचे सीमा भागातील मदरशांवर लक्ष !

आतंकवादाला धर्म नसतो, असे 
म्हणणार्‍या ममता बॅनर्जी शासनाची कृती !
     कोलकाता - बंगालमधील ममता बॅनर्जी शासनाकडून बांगलादेशाला लागून असलेल्या सीमा भागातील मदरशांवर लक्ष ठेवले जात आहे. बांगलादेशमध्ये आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या कारवाया, तसेच सीमेवर दिसणारे त्याचे परिणाम पहाता हे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका प्रशासकीय अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही मदरशांत काही संशयित लोक दिसत असल्याच्या सूचना मिळाल्या आहेत. हे लोक मदरशांत २-३ दिवस थांबल्यानंतर लगेचच गायब होतात. 

भाजप ५, तर शिवसेना ३ जागांवर निवडणूक लढवणार !

     नागपूर, ८ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - २७ डिसेंबर या दिवशी होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने ५ आणि शिवसेनेच्या वतीने ३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांच्या एकत्रित घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. 
     मुंबई शहरात शिवसेना १, भाजप १ याव्यतिरिक्त अकोला आणि नगर येथील दोन्ही जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार आहे. तसेच नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि धुळे या चारही जागांवर भाजपचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे. डिसेंबर २०१६ च्या विधान परिषदेच्या निवडणुकांतही युती म्हणून निवडणुका लढवल्या जातील, असाही निर्णय या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

ठाणे येथे शोधमोहीम घेऊन बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात येणार !

     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - भिवंडी शहर परिसरात अनधिकृतपणे वास्तव करणार्‍या २० बांगलादेशी घुसखोरांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. ही गोष्ट ऑक्टोबर मासात निदर्शनास आली असून त्यांच्याकडे पॅनकार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका आणि पासपोर्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहराद्वारे विशेष शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्‍नोत्तरात दिली. आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी हा प्रश्‍न विचारला होता.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा

     नागपूर - दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी नागपूर विधीमंडळात दोन्ही सभागृहाचे कामकाज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ माजवून बंद पाडले. याच मागणीसाठी काँग्रेसचा राज्यस्तरीय मोर्चा दीक्षाभूमीपासून चालू झाला. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदही घेतली. 

कोल्हापूर येथे ११ मासांत लाच घेणार्‍या ४० जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - १ जानेवारी ते २० नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या ३१ सापळ्यांतील ४० आरोपींच्या विरोधात आतापर्यंत कारवाई केली आहे. त्यामध्ये ३४ लोकसेवक, १ इतर लोकसेवक आणि ५ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. यातील ३३ लोकसेवक आणि इतर १ लोकसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली. कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हा प्रश्‍न विचारला होता. 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वंदनीय उपस्थितीत नारायण बेट येथे १०८ सत्यनारायण महापूजा संपन्न

सत्यनारायण पूजा करतांना उजवीकडून योगतज्ञ दादाजी
आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रमिलाताई वैशंपायन
     केडगाव, ८ डिसेंबर (वार्ता.) - योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या संकल्प पूर्तीसाठी त्यांनी केलेल्या अनेक कार्यवाहीचा एक भाग म्हणून केडगाव (ता. दौंड) येथील क्षेत्र नारायण बेट येथे ६ डिसेंबर २०१५ या दिवशी १०८ सत्यनारायण महापूजा संपन्न झाल्या. या पूजेचा १०८ दांपत्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला योगतज्ञ दादाजी आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रमिलाताई वैशंपायन यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाकरता मुंबई, पुणे, नाशिक, नगर, सांगली, कल्याण या ठिकाणांहून 'ॐ आनंदं हिमालयं' संप्रदायाचे साधक दांपत्य, तसेच सनातन संंस्थेचे साधक दांपत्य उपस्थित होते. श्री दत्त संस्थान नारायण बेट न्यासाचे व्यवस्थापक श्री. छगन चौधरी यांच्या हस्ते योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा सन्मान करण्यात आला. या महापूजेची सांगता योगतज्ञ दादाजींच्या धर्मपत्नी सौ. प्रमिलाताई वैशंपायन यांच्या भावपूर्ण भक्तीगीताने झाली. त्यानंतर सर्व साधक महाप्रसाद घेऊन त्यांच्या घरी परतले. 

संभाजीनगर येथे योगी संत श्री कृष्णाजी महाराज यांच्यावरील सनातन-निर्मित ध्वनीचित्र-चकतीचे अनावरण

योगी संत श्री कृष्णाजी महाराज यांच्यावरील ध्वनीचित्र-चकतीचे
अनावरण करतांना ह.भ.प. श्री रखमाजी महाराज नवले (बसलेले),
(डावीकडून पुढील ओळीत उभे) श्री. प्रभु सुकासे, श्री. बाबा भांड,
 सौ. आशा भांड आणि समवेत सनातनच्या साधिका कु. अनुराधा जाधव
संभाजीनगर - वडजी (ता. पैठण) येथील योगी संत श्री कृष्णाजी महाराजांविषयीच्या सनातन-निर्मित ध्वनीचित्र-चकतीचे अनावरण करण्यात आले. संत एकनाथ वारकरी शिक्षण संस्था पैठणचे अध्यक्ष ह.भ.प. श्री रखमाजी महाराज नवले यांच्या शुभहस्ते अग्नीसमाधी, नववी पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून हे अनावरण करण्यात आले. 
     या प्रसंगी साकेत प्रकाशनचे अध्यक्ष, तसेच योगी संत श्री कृष्णाजी महाराज यांचे काका श्री. बाबा भांड, त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशा भांड, कृष्णाजी महाराज यांचे शिष्य श्री. प्रभु सुकासे, श्री. दत्ताभाऊ गोजर यांच्यासह ६ शिष्यगण, तसेच सनातन संस्थेचे श्री. शरद चावडा उपस्थित होते. हा सोहळा १ ते ८ डिसेंबर या कालावधीत पार पडला.

न्यायालयाकडून उस्मानिया विद्यापिठातील 'बीफ फेस्टीव्हल' आणि 'पोर्क फेस्टीव्ह'लवर बंदी

नाक दाबल्यावर तोंड उघडते, हेच या निर्णयातून सिद्ध होते !
     भाग्यनगर (हैद्राबाद) - येथील उस्मानिया विद्यापिठात आयोजित 'बीफ फेस्टीव्हल'च्या (गोमांस महोत्सव) विरोधात 'पोर्क फेस्टीव्हल' (डुक्करमांस महोत्सव) साजरा करण्याची घोषणा हिंदुत्ववाद्यांनी केली होती. दोन्ही प्रकारचे महोत्सव करण्यास न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. या विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी १० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसानिमित्त दादरीतील कथित हत्येच्या निषेधार्थ फेरीचे आयोजन केले होते; मात्र त्यावरही न्यायालयाने बंदी घातली असून ५० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. 

कोल्हापूर येथील अंबाबाईच्या शालूचा लिलाव बोली न लागल्याने रहित

७ वर्षांच्या इतिहासातील प्रथमच घटना 
 पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर ओढवली नामुष्की 
     कोल्हापूर - येथील महालक्ष्मी मंदिरातील अंबाबाईच्या शालूचा लिलाव बोली न लागल्याने प्रथमच रहित करावा लागला. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. गेल्या ७ वर्षांपासून तिरुपतीहून अंबाबाईसाठी शालू येतो. त्याची बोली करून लिलावही केला जातो. 
     प्रशासनाने यंदा शालूसाठी ५ लाख ४२ सहस्र रुपयांची बोली लावली होती; मात्र ती बोली ३ लाख रुपयांहून पुढे चालू करायला हवी, असे भाविकांचे म्हणणे होते. लिलावासाठी ९ भाविक आले होतेे; मात्र कुणीही बोलीत सहभाग घेतला नाही. ही बोली स्थगित करण्यात आली असून कदाचित पुढच्या मासात पुन्हा लिलावाचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे.

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वांत मोठा धोका !

निवृत्त ब्रिगेडियर 
श्री. हेमंत महाजन
      भारतात घुसखोरी करून येथेच कायमचे स्थायिक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नेमकी संख्या कधीही मोजली गेलेली नाही; परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या ५ - ६ कोटींच्या घरात आहे. बांगलादेशी घुसखोरांची ही भीषण समस्या वेळीच संपुष्टात न आणल्यास त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. कालच्या भागात आपण बांगलादेश सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने घुसखोरी थांबवण्यासाठीचे उपाय यांविषयी माहिती पाहिली. आता त्यातील पुढील भाग पाहूया.
१३. लोकसंख्येवरील मर्यादा
     सीमेनजीक दाट वस्तीचा भाग असल्यास घुसखोरी सोपी होते. सीमावर्ती खेड्यातील लोकसंख्येवर मर्यादा घातली पाहिजे. पुढील काही उपायही करता येतील.

कुख्यात गुंड दाऊदच्या मालमत्ता लिलावात सहभागी होणार्‍या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

       मुंबई - वर्ष १९९२ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबई आणि देशातील मालमत्तेचा लिलाव करण्याचे शासनाने घोषित केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस्. बालाकृष्णन् यांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळवले; मात्र त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकीलने दूरभाष करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. (केवळ मालमत्ता जप्त करण्यापेक्षा दाऊदला पकडण्याची ठोस कृती शासनाने केली, तर सामान्यांना अशा धमक्यांना सामोरे जावे लागणार नाही ! - संपादक)

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

निर्भयाचा बलात्कारी तुमच्या जवळपास आहे का ?

श्री. सुरेश चिपळूणकर
      हे शीर्षक बघून तुम्हाला आश्‍चर्य वाटले असणार, हे मला माहिती आहे. प्रश्‍नच असा आहे आणि तो करणे आवश्यक आहे. कारण डिसेंबर २०१५ नंतर देहली, मुंबई, आजमग-कटिहार पासून भारतातील कोणत्याही शहरात तुमची मुलगी, पत्नी किंवा सून यांच्या आसपास निर्भयाचा बलात्कारी बसलेला असेल, त्यांच्याशी बोलत असेल. तुम्हाला भीती दाखवण्यासाठी मी हे बोलत नाही; परंतु सध्याचे भारतातील कायदे आणि कथित मानवाधिकार यांच्या समाजविरोधी कार्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी बोलत आहे.
१. निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्वांत क्रूर आरोपी महंमद अफरोज !
     १६ डिसेंबर २०१२ या दिवशी देहलीमध्ये निर्भयावर बलात्कार झाला होता. या अतिशय घृणा आणणार्‍या गोष्टीने संपूर्ण भारत देशाला हादरवून सोडले होते.

हिदूंनो, हिदु धर्माचे महत्त्व स्पष्ट करणारी ही पाश्‍चात्त्यांची दुःस्थिती जाणा !

१. इंग्लंडमधील संसदेने मान्य केलेल्या पशूरक्षणाच्या विधेयकाविषयी मानव सर्वश्रेष्ठ 
असल्याने त्याला प्राण्यांच्या हत्येची अनुमती आहे, असे सांगणे
    मानवांच्या पशूंवर केलेल्या अत्याचारांवर बंधन घालण्यासाठी इंग्लंडच्या संसदेत विधेयक आल्यावर खालच्या सदनाने त्याला संमती दिली; पण वरच्या सदनात गेल्यावर त्यांनी ते विधेयक कँटनबरीच्या आर्च बिशपकडे पाठवले. आर्च बिशपने घोषित केले की, मानवाला प्रत्येक जिवाला मारण्याचा किंवा त्याचा कसाही उपयोग करण्याचा पूर्ण अधिकार आहे; म्हणून संसद असे विधेयक पारित करू शकत नाही. बायबल केवळ माणसांच्या संरक्षणाकरता आदेश देते; कारण मानव इतर सर्वांपेक्षा अग्रस्थानावर आहे. तो इतर सर्व वस्तूंचा त्याला हवा तसा उपभोग घेऊ शकतो.

सनातन संस्थेला संपवण्यासाठी पुरोगाम्यांचे चक्रव्यूह !

    सध्या जग आय.एस्.आय.एस्.चा आतंकवाद, तर भारतात हिंदू प्रतिदिन पुरोगाम्यांचा वैचारिक आतंकवाद अनुभवत आहेत. पुरोगाम्यांनी काँग्रेस, साम्यवादी, रिपब्लिकन आदी पक्ष, तसेच ख्रिस्ती आणि मुसलमान संघटना यांच्या साहाय्याने सनातन संस्थेला संपवण्यासाठी चक्रव्यूह रचले आहे.
- पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
आधुनिकांनी हिंदु धर्मावर उडवलेले शिंतोडे पुसताच हिंदु बांधवांना आपली धर्मस्मृती पुन्हा प्राप्त होईल !

      आता हिंदुत्वाऐवजी भारतीयत्व आले. वैदिक वा सनातन हिंदु संस्कृती नव्हे, तर आमचे आधुनिक बांधव भारतीय संस्कृती म्हणू लागले. मोठमोठ्यांना आज हिंदु म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडत आहेत. हे आमचे पराकाष्ठेचे मानसिक अधःपतन आहे. पहाता पहाता हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन, भ्याड होत आहेत आणि किड्या-मुंग्यासारखा जगत आहेत. आमचे आधुनिक बांधव पतित झाले आहेत; परंतु आमची खात्री आहे की, त्यांच्या अंतःकरणात खोल खोल कुठेतरी आजच्या सनातन प्रणालीकरता निश्‍चित अभिमान आहे. हे कुणीही अमान्य करणार नाही. वेळ येताच ते दिसून येईल. हे धर्मघना, या आधुनिकांनी हिंदु धर्मावर उडवलेले शिंतोडे पुसताच आमच्या बांधवांना आपली धर्मस्मृती पुन्हा प्राप्त होईल. आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरातून त्यांना पुन्हा सम्यक जीवनदृष्टी लाभेल. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित (मार्च २०१४))

गेले डोंगर कुणीकडे ?

      गेले डोंगर कुणीकडे ?, असे म्हणण्याची वेळ काही वर्षातच सर्वसामान्य माणसावर येते की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्याचे कारण असे की, विकासाच्या नावाखाली, गौण खनिज उत्खनन करण्यासाठी अवैधपणे डोंगर भुईसपाट करण्याच्या प्रक्रियेने केवळ शहरी भागात नाही, तर ग्रामीण भागातही प्रचंड वेग धारण केला आहे. त्यातच केंद्रशासनाने बांधकामासाठी दगडांची वाढत असलेली मागणी आणि गौण खनिजांचा वाढता उपसा लक्षात घेऊन डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या जमिनींवर दगडांच्या खाणीला अनुमती देण्याचा विचार चालू केला आहे. असे झाले, तर डोंगर पोखरण्याची प्रक्रिया अजून वेग धारण करेल.

समीर गायकवाडला एक न्याय आणि शरद पवार यांना दुसरा न्याय का ?

      समीर गायकवाड याच्या ब्रेन मॅपिंगची मागणी होते; मग तेलगी घोटाळा प्रकरणात नाव असलेले शरद पवार यांची का होत नाही ? समीर गायकवाड यांच्या विरोधात वकीलपत्र घेणारे पुरोगामी अधिवक्ते कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, तुळजापूर येथील भवानीमंदिर या ठिकाणी देवस्थानांकडून भूमीचा मोठा अपव्यवहार होत असतांना कुठे होते ? - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद
साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.१२.२०१५) दुपारी ३.२५ वाजता
समाप्ती - कार्तिक अमावास्या (११.१२.२०१५) दुपारी ३.५९ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

गेल्या ५ वर्षांत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले

      पुणे, ८ डिसेंबर - सध्या महिलांवर होणारे अत्याचार रोखणे आणि त्यांनी सुरक्षेसाठी करायचे उपाय यांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत भारतातील महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१० मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचे प्रमाण ९.६ प्रतिशत, तर हेच प्रमाण वर्ष २०१४ मध्ये ११.४ प्रतिशत एवढे झाले आहे.

अशा प्राचार्यांना कायमचे निलंबित करा !

       पश्‍चिम महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात ८ आणि ९ फेब्रुवारी २०१४ या दिवशी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात प्राचार्यांच्या संमतीने महाविद्यालयातील विद्यार्थी हिंदु देवतांच्या संदर्भातील विडंबनात्मक नृत्य सादर होते; मात्र एका धर्माभिमानी विद्यार्थ्यासह हिंदुत्ववादी आणि पोलीस निरीक्षक यांनी या नृत्यांना तीव्र विरोध दर्शवला. प्रारंभी विडंबनात्मक नृत्य वगळण्यास आडमुठेपणा करणारे प्राचार्य आणि स्नेहसंमेलनाचे संयोजक यांनी हिंदुत्ववाद्यांचा रोष आणि पोलिसांचा दबाव यांमुळे स्नेहसंमेलनातून १५ विडंबनात्मक नृत्ये अन् गाणी वगळली. (१७.२.२०१४)

फलक प्रसिद्धीकरता

अशी असहिष्णुता भारताने कधी 
अल्पसंख्यांकांविषयी दाखवली आहे का ?
       कुवैतमधील फ्रेंड्स ऑफ कन्नूर एक्सपॅट असोसिएशनशी संबधित असलेल्या भारतियांनी सत्यनारायणाची पूजा केल्यावरून ११ भारतियांची त्या देशातून हकालपट्टी करण्यात आली. हे सर्व मंगळुरू येथील रहिवाशी आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

jago !
      Islami rastra Kuvait ne Satyanarayan ki puja karnepar 11 Bhartiyonko Bharat vapas bhej diya !
Asahishnuta par bolnewale aab chup kyo ?
जागो !
     इस्लामी राष्ट्र कुवैतने सत्यनारायण की पूजा करने पर ११ भारतीयोंको भारत वापस भेज दिया !
असहिष्णुता पर बोलनेवाले अब चूप क्यो ?

छत्तीसगड राज्यात क्रांतीकारकांच्या फ्लेक्स फलकांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने केलेले धर्मप्रसाराचे कार्य

१. शाळेत क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन
१ अ. अंजोरा, जि. दुर्ग, छत्तीसगड येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९.९.२०१५ या दिवशी विद्यार्थ्यांसाठी क्रांतीकारकांचे एकदिवसीय फ्लेक्स प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाला शाळा आणि विद्यार्थी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१ अ १. क्षणचित्रे
अ. शाळेत गेल्यावर प्राध्यापिका सौ. कल्याणी शर्मा यांनी प्रदर्शनाच्या सिद्धतेसाठी दोन विद्यार्थ्यांना पाठवले आणि सिद्धता तत्परतेने करवून घेतली.
आ. प्रदर्शन लावल्यानंतर लगेचच त्यांनी एका शिक्षिकेद्वारे संपूर्ण फ्लेक्सचे भ्रमणभाषद्वारे छायाचित्र काढून घेतले.
इ. प्रदर्शन चालू असतांना मध्येच सौ. कल्याणी शर्मा यांनी सांगितले, मी प्रदर्शनाचे छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅपवर जिल्हा शिक्षा अधिकारी आणि ग्रुपमधील शिक्षक अन् शिक्षिका यांना पाठवले आहे.

एका निर्धार सभेत पुरोगामी नेते भारत पाटणकर यांनी केलेल्या असत्य वक्तव्यांचे एका साधिकेने राष्ट्रप्रेमी विचारांद्वारे केलेले खंडण !

कु. नीलिमा कुलकर्णी
     २५.११.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये पृष्ठ १ वर तथाकथित पुरोगामीवाल्यांच्या निर्धार सभेत सनातनविरुद्ध गरळओकीचा फुसका बार ! या मथळ्याखाली एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ते वाचल्यावर पुरोगामी नेते भारत पाटणकर यांचे वक्तव्य आणि त्यासंबंधी मला सुचलेले राष्ट्रप्रेमी विचार पुढे देत आहे.
१. फरारी रुद्र पाटील यांनी पाटणकर यांना 
लग्नासंबंधी विशेष निमंत्रण दिले असेल, तर त्यांनी 
त्याविषयी लगेच शासन आणि पोलीस यांना कळवले का ?
भारत पाटणकर : रुद्र पाटील हा फरारी असूनही त्याने येऊन लग्न केले !
राष्ट्रप्रेमी विचार : रुद्र पाटील यांच्या लग्नाला भारत पाटणकर उपस्थित होते का ? जर हे पाटणकर यांना ठाऊक होते, तर त्यांनी ही गोष्ट शासन आणि पोलीस यांना त्याच वेळी का कळवली नाही, याचे उत्तर पाटणकर यांनी द्यावे. 

साधकांवर जीवापाड प्रेम करणार्‍या भाग्यनगर सेवाकेंद्रातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वात्सल्यमूर्ती श्रीमती पोन्नम्माक्का !

श्रीमती पोन्नम्माक्का
       ११.४.२०१५ ते १७.४.२०१५ या कालावधीत मला भाग्यनगर सेवाकेंद्रात वास्तव्य करण्याची संधी मिळाली. त्या वेळी माझा श्रीमती पोन्नम्माक्का यांच्याशी जवळून परिचय झाला. आक्का भाग्यनगर सेवाकेंद्रात साधकांसाठी भोजन बनवण्याची सेवा करतात. त्यांचा आध्यात्मिक स्तर ६६ टक्के आहे. भोजन बनवण्याच्या सेवेव्यतिरिक्त आक्का सेवाकेंद्रातील आणि बाहेरून आलेल्या साधकांचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी बिंदूदाबनाचे उपाय करतात. सर्वच साधकांना त्यांच्या उपायाने लाभ झाल्याचे ऐकून मी माझ्या गुडघेदुखीवर सलग तीन दिवस त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या उपायांच्या वेळी श्रीमती पोन्नम्माक्का यांच्याविषयी लक्षात आलेली काही सूत्रे पुढे देत आहे. 

बेल्तंगडी, दक्षिण कन्नडा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती इंदिरा राव (वय ६७ वर्षे) !

श्रीमती इंदिरा राव
१. मुलाला सेवेसाठी पूर्णपणे सहकार्य करणे
      श्रीमती इंदिरा राव (वय ६७ वर्षे) या बेल्तंगडी, दक्षिण कन्नडा येथे रहातात. त्या भावपूर्ण नामजप करतात. मागील १४ वर्षांपासून त्यांचा मुलगा सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतो. तो सेवेनिमित्त अनेकदा बाहेर जातो; पण काकूंचे त्याला पूर्ण सहकार्य असते. एवढ्या वर्षांत त्यांनी एकदाही मुलाला बाहेर जाऊन सेवा करण्यास विरोध केला नाही. माझ्या मुलाला सेवेला घेऊन चला, असेच त्या इतर साधकांना सांगतात. त्यांच्या पतीचे ८ मासांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्या घरी एकट्याच रहातात. खरेतर झाडांच्या लागवडीसाठी त्याच्या साहाय्याची आवश्यकता असते; पण त्या म्हणतात, घरचे लागवडीचे काम केले नाहीस, तरी चालेल. मुलाला सेवेला बाहेर जाण्यास सांगून त्या त्याला सेवेसाठी साहाय्य करतात. 

भवभूतीप्रमाणे सनातनचे विरोधकांना सांगणे

ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः ।
उत्पस्यते हि मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥ - भवभूती
अर्थ : या जगात जे कोणी आमची अवहेलना करत असतील, तर त्यांना जे काही समजायचे असेल ते समजू दे. आमची ही धडपड त्यांच्यासाठी नाही. केव्हातरी आणि कुठेतरी आमच्या कष्टांची जाण असलेला मनुष्य निश्‍चितच जन्मेल. ज्याला आमच्या या प्रयत्नांचा पुष्कळ उपयोग होईल; कारण काळ हा अनंत आहे आणि ही पृथ्वीही विशाल आहे.

पोलिसांचे अयोग्य वर्तन आणि समाजाचे उत्तरदायित्व !

       अलीकडे समाजमनात पोलिसांविषयी जनतेचा रक्षक नव्हे, तर भक्षक ही प्रतिमा निर्माण झाली आहे. याचे कारण पोलिसांचे अनुभवास येणारे अयोग्य वर्तन ! पोलिसांच्या सद्यस्थितीवर दृष्टी टाकल्यास जनता, गुन्हेगार, न्यायालय इत्यादींशी निगडित बहुतांश पोलिसांचे वागणे दायित्वशून्य, माणुसकीशून्य आणि संवदेनशून्य असते. भ्रष्टाचारामुळे पोलिसांची प्रतिमा कलंकित झालेली दिसते. आज पोलीस कोठड्या या छळछावण्या झाल्या आहेत. राजकारणी आणि जनता यांच्याशी पोलिसांचे असलेले संघर्षमय संबंध, तसेच गुन्हेगारांशी त्यांचे असलेले साटेलोटे यांमुळे पोलिसांशी समाजाचा सुसंवाद होण्यापेक्षा विसंवादच घडतो. शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये, ही म्हण सांप्रत काळात पोलीस ठाण्यांविषयी सार्थ ठरू लागली आहे. या प्रकरणात पोलिसांचे अयोग्य वैयक्तिक अन् सामाजिक वर्तन आणि अशा पोलिसांना सुधारण्यासाठी समाजाने करावयाचे प्रयत्न यांविषयी सांगितले आहे. 

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, साधकांच्या कुटुंबियांना दिलेले त्रास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले 

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

श्रीकृष्णाभोवती भावविभोर होऊन नाचतांना गोपी.
(२.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)

साधकांना सूचना

प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !
       आपत्कालात सर्व अवयवांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन सकाळी देवीकवच म्हणावे !, असे महान दत्तयोगी प.पू. सदानंदस्वामींनी प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साधकांना सांगणे : पुण्यातील महान संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साडे तीन सहस्र वर्षांपूर्वीचे महायोगी श्री सद्गुरु सदानंदस्वामी बोलतात आणि ते या गुरुवाणीच्या माध्यमातून भक्तांना वेळोवेळी संदेशही देत असतात. हल्लीच त्यांची गुरुवाणी ऐकण्याचे सद्भाग्य आम्हाला प्राप्त झाले. त्यांना साधकांच्या आरोग्याविषयी प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, आता हा पृथ्वीवरील अनाचार वाढतच जाणार आहे. यामध्ये आसुरी शक्तींच्या आक्रमणालाही आपल्याला सामोरे जावे लागेल. आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे. यामुळे देहाभोवती अभेद्य असे शक्तीकवच निर्माण होण्यास साहाय्य होईल.
       मोगल आणि ब्रिटीश यांच्या राजवटीत हिंदु धर्मावर अनेक आक्रमणे झाली, तरी हिंदु धर्म टिकला; मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती संकटात आली आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाङ्गी हिंदूंनी एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता ठरली आहे ! 
 - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        कुठे शत्रूचे संकट आल्यावर आम्ही १०५ (कौरव १०० आणि पांडव ५) म्हणणारा धर्मराज, तर कुठे राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना हिंदूंमध्ये भेद निर्माण करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, अंनिसवाले आणि विद्रोही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

    
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
   दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा एकांत 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

चर्चा नको धडा शिकवा !

संपादकीय 
    शांतता आणि निष्क्रीयता यांतील नेमका भेद आपण ओळखायला शिकले पाहिजे. एखादे राष्ट्र वर्ष १९४७ पासून भारताच्या खोड्या काढत असेल आणि तरीही आपण त्याच्याशी चर्चेचे गुर्‍हाळ चालवण्याच्याच मानसिकतेत असू, तर तो शांततेचा पुरस्कार नसून त्याद्वारे आपली ठळकपणे अधोरेखित होणारी निष्क्रीयता आहे, हे आपण जाणले पाहिजे.
    बँकॉक येथे नुकतीच भारत आणि पाक या दोन्ही राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा झाली. कुणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक केलेली ही चर्चा टीकेची धनी ठरली. यापूर्वी म्हणजे मोदी शासन सत्तेत आल्यानंतर काही मासांतच भारत आणि पाक यांच्यात प्रशासकीय पातळीवरील चर्चेचे देहली येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात नेहमीप्रमाणे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी खोडा घातला. त्यात भर म्हणून पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी या चर्चेपूर्वी फुटीरतावाद्यांना देहलीत चर्चेचे निमंत्रण दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn