Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनच्या साधकांविरुद्ध खोटे पुरावे उभे करण्याचा सीबीआयचा प्रयत्न निषेधार्ह ! - सनातन संस्था

पत्रकार परिषदेला उपस्थित (डावीकडून) वैद्य उदय धुरी, अधिवक्ता नवीन चोमल,
श्री. अभय वर्तक, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
  • सनातनला अडकवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या सीबीआयच्या नायर या वादग्रस्त अधिकार्‍याच्या उच्चस्तरीय पोलीस चौकशीची मागणी !
  • डॉ. दाभोलकर प्रकरणातील अन्य महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष !
  • पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांना सेवामुक्त करा !
  • सी.बी.आय.कडून भ्रमणध्वनी क्रमांकाच्या रोमिंगवर आधारित होणारा तपास एकांगी आणि खोट्या सिद्धांतावर आधारित !
मुंबई - डॉ. दाभोलकर खून प्रकरणात सनातनच्या काही निष्पाप साधकांना खोट्या आरोपाखाली गोवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केंद्रीय अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर करत आहेत. त्यांचा बुरखा आम्ही फाडत आहोत. हा कट आधीच उधळला जावा, यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहोत. श्री. हेमंत शिंदे, नीलेश शिंदे, नीरज येनगूल, महेंद्र सहस्रबुद्धे, यशवंत सहस्रबुद्धे, गजानन केसकर, कृष्णा कुंभार या सनातनच्या साधकांना यात विनाकारण अडकवले जात आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. मालेगाव २००६ आणि २००८ बाँबस्फोट प्रकरणांत झाले, तसे या प्रकरणात निरपराध्यांना अडकवून स्वत: सहीसलामत सुटून जाणे, हे भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांना शक्य होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर यांच्या वर्तनाविषयी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत त्यांना निलंबित करावे, तसेच त्यांचे भूतकाळातील वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असल्याने ते पडताळून त्यांना सेवामुक्त करावे आणि कारागृहात पाठवावे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. या पत्रकार परिषदेस हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ते श्री. संजीव पुनाळेकर आणि अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, उच्च न्यायालयाचे अधिवक्ते श्री. नवीन चोमल आणि हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नायर यांची श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक !
      १३ नोव्हेंबर या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा जबाब घेण्यासाठी त्यांना सी.बी.आय.च्या कार्यालयात बोलावून अतिरिक्त पोलीस अधीक्षक नायर त्यांच्याशी अत्यंत अपमानास्पद वागले. ६ तास त्यांनी वर्तक यांना बसवून ठेवले. त्यानंतर अभय वर्तक यांना सिगारेट ओढता का ? नाही ? मग निदान दारू तरी रोजच पित असाल ?, यांसारखे अपमानास्पद प्रश्‍नही विचारले. श्री. वर्तक यांना एखाद्या गुन्हेगारासारखी अथवा आतंकवाद्यासारखी वागणूक देऊन त्यांची बॅग नायर यांनी स्वत: तपासली. सनातन संस्थेविषयी ते तुच्छतेने बोलले.
    वरील सूत्र सांगून श्री. वर्तक म्हणाले, यावरून अशी खात्री पटते की, ते पूर्वग्रहाच्या आहारी गेले असून सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवत आहेत. आतापर्यंत आमच्या शेकडो साधकांनी तपासाच्या अंतर्गत पोलिसांना सहकार्य केले करूनही सनातनच्या साधकांना केवळ अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाकडून भ्रमणध्वनी क्रमांकाच्या रोमिंगवर 
आधारित होणारा तपास एकांगी आणि खोट्या सिद्धांतावर आधारित !
   गुन्हे अन्वेषण विभाग संपूर्ण तपास भमणध्वनी क्रमांकाच्या रोमिंगवर आधारित करत आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की -
१. निरज येनगूल, कृष्णा कुुंभार आणि नीलेश शिंदे यांचे भ्रमणध्वनी क्रमांक डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या दिवशी त्याच परिसरात सकाळी रोम झाले होते.
२. श्री. गजानन केसकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक रात्री डॉ. दाभोलकर उतरले, त्या बसस्थानकावर रोम झाला होता.
३. हेमंत शिंदे डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या ठिकाणाहून जवळच असलेल्या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी रहायला आले होते. या सर्वच व्यक्तींचे भ्रमणध्वनी क्रमांक एकमेकांच्या संपर्कात होते.
४. हे क्रमांक सामायिक ठिकाणी एकत्र आल्यामुळे त्यांच्या बैठका होत असणार. अशी बैठक या सर्वांची खुनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळीही झाली होती. हे सर्वजण सनातनचे साधक आहेत.
५. मिरज दंगलीत खोटे आरोप ठेवण्यात आलेले आणि नंतर निर्दोष मुक्त झालेले महेंद्र सहस्रबुद्धे हेदेेखील यांच्या संपर्कात होते आणि वडिलांचा भ्रमणध्वनी वापरत होते.

धर्मनिरपेक्ष या शब्दाचा वापर बंद करा ! - केंद्रीय गृहमंत्री

संविधानात योग्य तो पालट भाजप शासनाने क़रावा, ही जनतेची अपेक्षा !
नवी देहली - सेक्युलर आणि समाजवाद हे शब्द जेव्हा भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली, तेव्हा त्यातील प्रस्तावनेत नव्हते. ते मागाहून राज्यघटनेत घालण्यात आले. सेक्युलर या शब्दाचा खरा अर्थ धर्मनिरपेक्ष असा नसून पंथनिरपेक्ष असा आहे. त्यामुळे यापुढे धर्मनिरपेक्ष शब्दाचा वापर बंद व्हायला हवा, असे परखड मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत मांडले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष आणि संविधान दिन यांचे औचित्य साधून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यघटनेवर विशेष चर्चा घेण्यात आली. त्या वेळी सिंह यांनी राज्यघटनेचे महत्त्व विषद केले.
     सिंह पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा आंबेडकर यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यामुळेच घटना लिहितांना त्यांनी प्रत्येक शब्द अत्यंत अभ्यासपूर्णरित्या वापरला होता. भारत हा मुळातच धर्मनिरपेक्ष देश आहे, याची डॉ. आंबेडकर यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांना सेक्युलर हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेत घालण्याची आवश्यकता जाणवली नाही; मात्र नंतर हे शब्द जाणीवपूर्वक घातले गेले. त्याच्याही पुढे जाऊन सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष आहे, असा आभास निर्माण केला गेला आणि त्याचा राजकारणासाठी दुरुपयोग करण्यात आला.
राजनाथ सिंह यांचा अमीर खान यांना अप्रत्यक्ष टोला
उपेक्षा होऊनही डॉ. आंबेडकर यांनी कधीही देश सोडण्याची भाषा केली नाही !
     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनाही त्या वेळी अनेकदा उपेक्षा, तिरस्कार आणि अपमान सहन करावा लागला होता. तरीही त्यांनी कधीही देश सोडण्याची भाषा केली नव्हती, असे विधान करत सिंह यांनी नाव न घेता अमीर खान यांना टोला लगावला.

रशिया आणि तुर्की देशांतील वाद चिघळला; तुर्कीने व्यक्त केली तिसर्‍या महायुद्धाची भीती

     मॉस्को (रशिया) / अंकारा (तुर्की) - तुर्कीने रशियाच्या पाडलेल्या लढाऊ विमानातील २ वैमानिकांनी पॅरेशूटच्या माध्यमातून विमानातून उडी मारल्याने ते सुरक्षित असल्याचे बोलले जात होते; पण त्यातील एका वैमानिकाला सिरियाच्या बंडखोरांनी ठार केल्याचे वृत्त आल्याने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेत वाचलेले वैमानिक कॅप्टन कोंस्टेनटिन मुराख्तिन यांनी तुर्कीच्या या कृत्याचा बदला घेणार असल्याचे आणि त्यासाठी सिरियातच थांबण्याचे विधान केल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होऊ शकतो, अशी भीती तुर्कीने व्यक्त केली आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर समाजकंटकांकडून मद्य आणि सोडावॉटरच्या बाटल्यांद्वारे आक्रमण

आश्रमावर फेकण्यात आलेल्या बाटल्यांच्या काचांचे तुकडे
रामनाथी (गोवा), २६ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील सनातनच्या आश्रमाच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरील आगाशीत (गच्चीत) समाजकंटकांनी २५.११.२०१५ च्या रात्री १२ वाजता काचेच्या बाटल्या फेकून आक्रमण केले. यामुळे आश्रमातील गच्चीत काचांचा खच पडला. सुदैवाने कोणी साधक आगाशीत नसल्यामुळे कोणाला हानी झाली नाही. आश्रमातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये ३ समाजकंटक रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी बाटल्या फेकत असल्याचे चित्रीकरण दिसले आहे. यासंदर्भात फोंडा पोलीस ठाण्यात लगेचच तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला; मात्र अद्याप या समाजकंटकांना पकडण्यात आलेले नाही.
    किंगफिशर असे लेबल असलेल्या २ बाटल्या, एक सोडावॉटरची बाटली, तसेच अन्य एक बाटली अशा एकूण ४ बाटल्या आश्रमावर फेकून मारण्यात आला. या बाटल्यांच्या काचा अनेक ठिकाणी पसरल्या. काही तळमजल्यावरही पडल्या. आश्रमाच्या नजीक असलेल्या किरण हॉलकडे जाणार्‍या रस्त्यावरून समाजकंटकांनी या बाटल्या फेकल्या. बाटल्या फुटल्याचा आवाज आल्यावर बाजूच्या खोलीतील साधक गच्चीत आले, तेव्हा सर्वत्र काचा पसरल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्वरित आश्रमाचे व्यवस्थापक वीरेंद्र मराठे यांना याविषयी कळवले. त्यानंतर फोंडा पोलिसांना १०० क्रमांकावर संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आश्रमात येऊन झालेला प्रकार पाहिला असून बाटल्यांच्या काचा ते घेऊन गेले आहेत.
यापूर्वीही सनातनच्या आश्रमावर पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या, 
तसेच काचेच्या बाटल्या आणि दगड फेकून मारल्याच्या घटना
     यापूर्वीही सनातनच्या आश्रमावर काचेच्या बाटल्या, दगड फेकून मारल्याच्या, तसेच आश्रमावर आणि आश्रमाच्या वाहनांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या वेळी काही साधकांना गंभीर इजाही झालेली आहे. या संदर्भात पोलिसांत वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत; मात्र अद्याप या प्रकरणी कोणावरही कारवाई झालेली नसल्याने समाजकंटक मुक्तपणे अजूनही अशा प्रकारचे कृत्य करत आहेत.

आतंकवाद्यांना कोणतीही दयामाया दाखवता येणार नाही ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - आतंकवादी आक्रमणांमुळे जगात काय होत आहे, हे सर्व जण पहातच आहेत. त्यामुळे आतंकवादी कुठल्याही देशाचा असला, तरी त्याला कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवता येणार नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस्. ठाकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या खंडपिठाने फ्रान्सची महिला आतंकवादी मेरी इम्यानुअल हीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

इंग्लंडमधील पाचपैकी एका मुसलमानाचा जिहादी आतंकवाद्यांना पाठिंबा

द सन या वृत्तपत्राने उघड केले धोकादायक वास्तव
      इंग्लंड - इंग्लंडमधील ५ पैकी १ मुसलमानाचा (१९ टक्के) इंग्लंडमधून सिरियात आय.एस्.आय.एस्.च्या जिहादी सैन्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिहादी मुसलमान युवकांना पाठिंबा आहे, असे धोकादायक वास्तव द सन या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसवर झालेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर इंग्लंडमधील मुसलमान आणि मुसलमानेतर यांच्या जनमताचा कानोसा घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृत्तामुळे इंग्लंडमध्ये खळबळ माजली आहे. काहींनी या वृत्ताला विरोधही केला आहे.

एप्रिल २०१६ पासून बिहारमध्ये दारूबंदी !

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा स्तुत्य निर्णय !  
  • अन्य राज्यांनीही बिहारचा आदर्श घ्यावा !
पाटलीपुत्र (पाटणा), २६ नोव्हेंबर - बिहारमध्ये १ एप्रिल २०१६ पासून दारूबंदी करण्यात येणार, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे. दारूबंदी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. दारूचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो, गुन्हेगारीही वाढते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यशासनाला ४ सहस्र कोटीं रुपयांचा आर्थिक फटका बसणार असला, तरी त्यासाठी अन्य योजना आखल्या जातील.

स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी बुरखा घालण्यावर बंदीचा कायदा !

कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना साडे सहा लक्ष रुपयांचा दंड
      टिचीनो, स्वित्झर्लंड - स्वित्झर्लंडमध्ये महिलांच्या बुरख्यांवर बंदी घालण्याचा कायदा करण्यात आला आहे. त्यांच्या संसदेने २३ नोव्हेंबरला या कायद्याला संमती दिली असून या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना साडे सहा लक्ष रुपयांचा दंड ठोठवण्यात येईल, असेही सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी त्याचबरोबर गाडीमध्येही महिलांनी बुरखा घालणे, हा गुन्हा ठरेल. पर्यटकांसाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. आतंकवादी आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर हा कायदा करण्यात आला. यापूर्वीही या कायद्याचा वर्ष २०१३ मध्ये विचार करण्यात आला होता. त्या वेळी केवळ दोन तृतीयांश नागरिकांनी त्याला समर्थन दिले होते.

ट्युनिशियात राष्ट्रीय आणीबाणी घोषित !

     ट्युनिश (ट्युनिशिया) - नुकतेच आतंकवादी आक्रमण झालेल्या ट्युनिशियामध्ये १ मासासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. राजधानीचे शहर ट्युनिश येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतंकवाद्यांनी २४ नोव्हेंबरला रात्री ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष बेजी केड इसेब्सी यांच्या सुरक्षारक्षकांच्या बसवर बॉम्बने आक्रमण केले होते. त्यात १२ जण ठार झाले होते. या पार्श्‍वभूमीवर ही आणीबाणी घोषित करण्यात आली. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेले नाही.

मदरशात उस्ताद करतात मुलांचा लैंगिक छळ

  • मुसलमान महिला पत्रकाराचा मदरशातील असहिष्णुतेविषयी गौप्यस्फोट !
  • गौप्यस्फोटप्रकरणी पत्रकाराला येत आहेत धमक्या !
     कोझिकोड (केरळ) - लहानपणी आपण जात असलेल्या मदरशातील उस्ताद (मदरशाचा प्रमुख) हा तेथे येणार्‍या लहान मुलांचा लैंगिक छळ करायचा, असा गौप्यस्फोट केरळमधील महिला पत्रकार व्ही.पी. राजिना यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर केला. हा गौप्यस्फोट केल्यानंतर राजिना यांना फेसबूकवरूनच धमक्या यायला लागल्या आहेत. राजिना या केरळमधील स्थानिक वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी त्यांचे मदरशातील लहानपणीचे काही अनुभव त्यांच्या फेसबूक खात्यावर प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी म्हटले, मदरशातील उस्ताद तेथे येणार्‍या लहान मुलांच्या गुप्तांगाना स्पर्श करायचा आणि कुणी काही विचारलेच, तर त्यांना अश्‍लील उत्तरे द्यायचा. इयत्ता चौथीत शिकणार्‍या मुलींच्या शरिराशीही उस्ताद अश्‍लील चाळे करायचा. या छळाला कंटाळून अनेक मुलामुलींनी मदरसा सोडला होता.

धुबरी (आसाम) येथे गोपाष्टमीनिमित्त कार्यक्रम !

आसाम येथे गोपाष्टमीनिमित्त काढण्यात आलेल्या फेरीत सहभागी झालेले धर्माभिमानी
      धुबरी (आसाम) - येथे गोपाष्टमीनिमित्त बजर काली मंदिराच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धर्माभिमान्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन एक भव्य फेरी काढली. सहस्रो धर्माभिमान्यांचा प्रतिसाद असलेल्या या कार्यक्रमाला भारत सेवाश्रम संघ आसामचे पूज्य स्वामी मृण्मयानंदजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात आसाममध्ये एका धर्मसभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बेंगळुरूमधील विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित उत्तरामुळे राहुल गांधी पडले तोंडघशी !

राहुल गांधी आणि काँग्रेस यांना बेंगळुरूच्या विद्यार्थ्यांकडून सणसणीत चपराक ! भाजपला कमी 
लेखल्याने जनतेत काँग्रेसप्रती आपुलकी वाढेल असे वाटणे, हा काँग्रेसच्या उपाध्यक्षांचा भ्रम आहे !
भाजपवर टीका करण्याचा डाव अंगलट !
     बेंगळुरू, २६ नोव्हेंबर - येथील एका कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष सगळ्या स्तरांवर देशात अपयशी ठरल्याचा आरोप केला. हा आरोप करतांना स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया या पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या मोहिमांही पूर्णपणे अयशस्वी होत असल्याची टीका त्यांनी केली. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या दोन्ही मोहिमा यशस्वी होत आहेत का ?, असा प्रश्‍न विचारला. त्यावर बहुतांश विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले, असे सांगितले. गांधी यांनी विद्यार्थांवर अविश्‍वास दाखवत ३ वेळा तोच प्रश्‍न पुन्हा विचारला आणि माझ्या मते नाही, असेही सांगितले. त्या वेळी पुन्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात हो, हो असा आरडाओरडा केला. राहुल गांधींना हे अपेक्षित नसल्याने ते पुरते गोंधळले आणि त्यांची स्थिती अवघड झाली.

देशात पूर्वीपासूनच असहिष्णुता : देश कधीच सहिष्णू नव्हता ! - हिंदुद्रोही साहित्यिक राजन खान

राजन खान यांच्या विधानावर तथाकथित पुरोगामी, कलाकार, साहित्यिक आणि 
काँग्रेसवाले आपली भूमिका मांडण्याची सहिष्णुता दाखवणार का ?
       पुणे, २६ नोव्हेंबर - या देशाला पूर्वीपासूनच असहिष्णुतेची परंपरा आहे. हा देश कधीच सहिष्णु नव्हता. असे जर आहे, तर गेल्या ६० वर्षांत काँग्रेस, समाजवादी आणि डावे यांनी त्यासाठी काय केले, हा खरा प्रश्‍न आहे. भाजप सत्तेत आला; म्हणून देशातले वातावरण बिघडलेले नाही, असे मत साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांचे शासन केंद्रात सत्तेत आल्यापासून देशात असहिष्णुता वाढल्याच्या आरोपावरून पुरस्कार वापसी केलेले साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी पुणे येथून दक्षिणायन् मोहीम चालू केली आहे. या मोहिमेच्या प्रारंभी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खान बोलत होते. हा कार्यक्रम येथील एस्.एम्. जोशी सभागृहात पार पडला. या वेळी अनिल जोशी, प्रज्ञा पवार, संभाजी भगत, गणेश विसपुते आणि अन्य साहित्यिक उपस्थित होते. 

मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव !

येत्या रविवारपासून वाचा !
    सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.
     मडगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती त्यांनी सांगितल्या होत्या. रविवार, २९ नोव्हेंबर २०१५ पासून दैनिक सनातन प्रभात मध्ये त्याची लेखमाला प्रकाशित करणार आहोत. त्या माहितीचे पुस्तकही लवकरच प्रकाशित करणार आहोत.

महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी नाहीच !

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्यशासनाची पुनर्विचार याचिका 
     नवी देहली - महाराष्ट्र शासनाने डान्सबारवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती. त्यावर राज्यशासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवर बंदी घालण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. त्याचसमवेत बारच्या परवान्यासाठी आलेले सर्व अर्ज २ आठवड्यांच्या आत निकाली काढा, असा आदेशही न्यायालयाने दिला. परवान्यांसाठीचे अर्ज निकालात काढण्यापूर्वी परवाना समितीला नियम बनवण्याचे निर्देश दिले. डान्सबारवरील बंदी उठवतांनाच न्यायालयाने नृत्यांवर बंधने घातली आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, बारमध्ये चालणार्‍या नृत्यात अश्‍लीलता, बीभत्सपणा असता कामा नये. 

प्रशासनाने मंदिरांना हात लावल्यास शिवसेना जनआंदोलन उभे करणार ! - आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

मंदिरांच्या संरक्षणार्थ महानगरपालिकेवर मोर्चा काढणारे 
शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि सर्व शिवसैनिक यांचे अभिनंदन ! 
  • नोटिसा पाठवल्याच्या निषेधार्थ आणि मंदिरांच्या संरक्षणार्थ शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा 
  • महापालिकेसमोर 'घंटानाद आंदोलन' आणि गणपतीची आरती 

महापालिकेसमोर 'घंटानाद आंदोलन' करतांना
आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांसह शिवसैनिक
     कोल्हापूर, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याविषयी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून कारवाई करण्याचे निर्देश लागू केले आहेत. वास्तविक वारंवार अशा पद्धतीने दिल्या जाणार्‍या निर्देशांमुळे समाजातील शांतता आणि सलोखा भंग होण्याची शक्यता आहे. मंदिरांविषयी प्रशासनाची ही गळचेपी सहन केली जाणार नाही. प्रशासनाने मंदिरांना हात लावल्यास शिवसेना स्वस्थ बसणार नाही. प्रशासनाने हिंदूंच्या भावनांना धक्का पोहोचवणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा मंदिरांच्या संरक्षणासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करेल, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी आज महापालिकेचे आयुक्त शिवशंकर यांना दिली.

समितीवर वारकरी संप्रदायातील व्यक्तीची निवड करावी ! - ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर

हिंदूंनो, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमध्ये अधिकाधिक 
भक्त आणि वारकरी यांचा समावेश व्हावा, यासाठी वैध मार्गाने आवाज उठवा ! 
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती निवड प्रकरण 
     सोलापूर, २६ नोव्हेंबर - पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने बरखास्त केली होती. नवीन समिती स्थापन होईपर्यंत प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केलेली आहे. येत्या काही दिवसांत मंदिर समितीची निवड करण्यात येणार आहे. या समितीवर वारकरी संप्रदायातील व्यक्ती नसल्याने वारकरी संप्रदायातून असंतोष व्यक्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वारकरी-फडकरी दिंडी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांनी वारकरी संप्रदायातील व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी केली आहे. तसेच समितीवर वारकरी संप्रदायातील व्यक्तीच्या निवडीची मागणी मान्य न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी चेतावणी त्यांनी शासनाला दिली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांविषयी संसदेतील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार ! - हेमंत गोडसे, खासदार

(डावीकडून) सौ. रिटा पाटील, सौ. मंजुषा जोशी,
श्री. शशिधर जोशी, श्री. हेमंत गोडसे आणि सौ. सुचिता पाटील
     नाशिक - राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सर्व प्रश्‍न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार, असे आश्‍वासन येथील शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. कार्यकर्त्यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समनवयक श्री. शशिधर जोशी, सनातन संस्थेच्या सौ. मंजुषा जोशी, सौ. सुचिता पाटील उपस्थित होत्या. संसदेच्या येत्या अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांविषयीची बाजू मांडण्याची विनंती करत काही गंभीर प्रश्‍नही कार्यकर्त्यांनी श्री. गोडसे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये पाकिस्तानी गायक अदनान सामी याचे नागरिकत्व, अभिनेत्री सनी लिओन हिच्या अश्‍लील संकेतस्थळामुळे समाजावर होणारा परिणाम, अंनिसला विदेशातून मिळणारे आर्थिक साहाय्य यांची चौकशी, तसेच एन्.सी.ई.आर्.टी. अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहास यांना दिलेले स्थान यांसारख्या प्रश्‍नांचा समावेश होता. 

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सनातन संस्थेच्या प्रकाशित ग्रंथांचे २१ संच सार्वजनिक वाचनालयांना भेट !

सार्वजनिक वाचनालयांना भेट दिलेले ग्रंथ दाखवतांना खासदार
श्री. हेमंत गोडसे (वर्तुळात) आणि समवेत साधक, तसेच अन्य मान्यवर
     नाशिक - येथील शिवसेना खासदार श्री. हेमंत गोडसे यांनी त्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धार्मिक आचार, सण-उत्सव, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, समाजसाहाय्य, मुलांसाठी सुसंस्कार आदी विविध विषयांवरील प्रकाशित ग्रंथांचे २१ संच सार्वजनिक वाचनालयांना उपलब्ध करून दिले. या संदर्भात श्री. हेमंत गोडसे म्हणाले, "सनातन संस्था राष्ट्र आणि धर्म यांचा प्रचार चांगल्या प्रकारे करते. सर्व जगात आपली संस्कृती आणि धर्म यांचा प्रसार झाला पाहिजे. या ग्रंथांमुळे समाज आणि युवा पिढी यांचे प्रबोधन होईल. यापुढे सनातनच्या समाजोपयोगी उपक्रमांना साहाय्य करणार." या प्रसंगी भाजप नगरसेवक श्री. दिनकर पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी, नाशिक तालुका वाचनालयाचे श्री. दत्ता पगार, सनातन संस्थेच्या सौ. मंजुषा जोशी, सौ. सुचेता पाटील उपस्थित होते. 

मुंबईच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रमुखपद रिक्त

असे सुरक्षा बल मुंबईची सुरक्षा काय करणार ? 
     मुंबई - मुंबईवरील २६/११च्या आतंकवादी आक्रमणानंतर शहराच्या अंतर्गत सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र सुरक्षा बला'चे प्रमुखपद रिक्त आहे. स्थापनेपासूनच्या पाच वर्षांत पाच जणांना दलाच्या प्रमुखपदी बसवण्यात आले होते. सध्या या दलाच्या जवानांची संख्या आता २५००हून अधिक आहे. या दलातील सैनिकांना असलेले अधिकार आणि शस्त्रास्त्रे यांची वानवा आहे. दलाचे नेतृत्व करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कार्यकारी संचालक पद गेल्या ३ मासांपासूनही रिक्त आहे.

नवचैतन्य बहुउद्देशिय सेवा संस्थेच्या वतीने कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली !

     मिरज, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - मिरज येथील श्रीकांत चौक येथे नवचैतन्य बहुउद्देशिय सेवा संस्थेच्या वतीने कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन चौगुले, मिरज शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, भाजपचे सर्वश्री मकरंद देशपांडे, पांडुरंग कोरे, अभिजित हारगे, गजेंद्र कुल्लोळी, आेंकार शुक्ल, जयगोंड कोरे, संदीप कबाडे, राजाभाऊ देसाई, तसेच अन्य उपस्थित होते.

संभाजीनगरमध्ये चायनीज मांजा वापरण्यावर पोलिसांकडून बंदीचे आदेश

     चायनीज मांजावर भारतभर बंदी असतांना तो अवैधरित्या आयात 
आणि विक्री करणारे व्यापारी यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! 
     संभाजीनगर, २६ नोव्हेंबर - गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवण्यासाठी चायनीज नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हा मांजा धारदार असून पतंग उडवतांना त्यामुळे हाताला जखम होणे, पतंग उडवतांना तुटल्यावर रस्त्यावरील पादचारी अथवा वाहनचालक हे अडकून ते जखमी होण्याची शक्यता असते. चायनीज नायलॉन मांजा हा सहजासहजी हाताने तुटत नाही. त्या मांजाचा पक्षांना स्पर्श झाल्यास त्यांनाही दुखापत होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संभाजीनगर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेषाधिकाराद्वारे चायनीज नॉयलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर २१ जानेवारी २०१६ पर्यंत बंदी घातली आहे. (चायनीज मांजावर भारतभर बंदी असतांना तो अवैधरित्या आयात आणि विक्री करणारे व्यापारी यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

याचिकाकर्त्यांना मत मांडण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून आदेश

येळ्ळूर येथील जनतेला पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची तड लागणार ! 
     बेळगाव, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - येळ्ळूर येथील जनतेला अमानुषपणे मारहाण करणार्‍या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री. विनोद तावडे आणि येळ्ळूर येथील ५३ जणांच्या वतीने याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याविषयी कर्नाटक शासनाने आपली बाजू मांडल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याचिकाकर्त्यांना आपले मत मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सीमावासियांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाची तड निश्‍चित लागणार, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. 

अमीर खान यांचा एकही चित्रपट सांगली जिल्ह्यात प्रदर्शित होऊ देणार नाही ! - हणमंतराव पवार, श्री शिवप्रतिष्ठान

असे धर्मप्रेमी हिंदू सर्वत्र हवेत ! 
     
शिवतीर्थासमोर अमीर खान यांचा पुतळा
जाळतांना श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते
सांगली,
२६ नोव्हेंबर (वार्ता.) - चित्रपट अभिनेता अमीर खान यांच्या माध्यमातून पाकिस्तानातील अफझलखानच बोलत आहे. २५ हून अधिक वर्षे भारतात राहून आणि येथेच कोट्यवधी रुपये कमावून भारताच्या विरोधात बोलणार्‍या अमीर खान यांना या देशातून हाकलून दिले पाहिजे. यापुढील काळात अमीर खान यांचा एकही चित्रपट सांगली जिल्ह्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, तसेच देशप्रेमी नागरिकांनीही अमीर यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन आम्ही करत आहे, असे मत श्री शिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. हणमंतराव पवार यांनी व्यक्त केले. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवतीर्थासमोर अमीर खान यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. (अमीर खान यांचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय घेणार्‍या श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. हणमंतराव पवार यांचे अभिनंदन ! - संपादक) 

जिल्हा परिषद आरोग्यसेवक भरतीची प्रश्‍नपत्रिका फुटली !

     सांगली, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक (महिला) या पदाच्या भरतीसाठीची प्रश्‍नपत्रिका फुटली आहे. ग.रा. पुरोहित कन्या शाळेतील केंद्रावर शाहीन अजमुद्दीन जमादार या परीक्षार्थिकडे शंभर प्रश्‍नांच्या उत्तरांचे पर्याय कुर्ता आणि पायजमा यांवर लिहिल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी शाहीन हिच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. शाहीन ही जिल्हा परिषदेच्या शेटफळे आरोग्य उपकेंद्राकडे कंत्राटी आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहे. पायजमा पालटण्यासाठी साहाय्य केल्याच्या प्रकरणी संशयित म्हणून उमराणी यांनाही चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. उमराणी या शेटफळे आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका या पदावर कायमस्वरूपी पदावर आहेत. (अल्पसंख्यांक म्हणून अन्याय होत आहे म्हणून ओरड करणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य, असे नेहमीच का होते ? - संपादक)

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्वदेशी जागरण विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 
 स्वदेशी जागरण विशेषांक 
 प्रसिद्धी दिनांक : २९ नोव्हेंबर 
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
२८ नोव्हेंबरच्या दुपारी ३ पर्यंत 'ईआरपी' प्रणालीत भरावी !

मुसलमानांचा तरी मुसलमानांवर विश्‍वास आहे का ?

श्री. भाऊ तोरसेकर
       एक मुसलमान डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनाची अपेक्षा करत असेल, तर त्याला कांगावा म्हणावे काय ? त्याला कांगावा संबोधणे क्रूर नाही का ? आस्था, आपुलकी वा प्रेमाची भाषा आम्हाला समजत नाही का ? अशी शंका आधीचा लेख वाचून अनेकांच्या मनात नक्की अलेली असणार; पण त्या व्यक्तीने जो फलक झळकवला आहे, तो वाचून त्यातला अर्थबोध कितीजण घेतात ? मी मुसलमान आहे आणि माझा तुमच्यावर विश्‍वास आहे. तुमचा माझ्यावर विश्‍वास आहे का ? असेल तर मला आलिंगन द्या ! हे वाचणे ठीक आहे; पण त्यातला अर्थ असा की, मुसलमानांवरचा इतरांचा विश्‍वास उडाला असला, तरी मुसलमान मात्र बिगरमुसलमानांवर विश्‍वास ठेवून आहेत, यात कितपत तथ्य आहे ? आज जगात किती ठिकाणी आपल्याला मुसलमानांविषयी अविश्‍वास दिसून येतो ? तेही बाजूला ठेवा. मुसलमानांनी अन्य कुणावर विश्‍वास ठेवण्यापेक्षा त्यांनी मुसलमानांवर तरी विश्‍वास ठेवला पाहिजे ना ? आय.एस्.आय.एस्. वा सुन्नी मुसलमान अन्य पंथीय मुसलमानांशी तरी विश्‍वासाने वागतात का ? जगातली आजची समस्या मुसलमान आणि बिगरमुसलमान अशी नसून, त्यांच्या कडव्या धर्मश्रद्धांनी उभी केलेली समस्या आहे.

(म्हणे) मराठी माध्यमांच्या शाळा संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र !

काँग्रेसच्या कार्यकाळात मराठीसाठी काहीही न 
करणार्‍या माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे फुकाचे बोल !
बदलापूर, २६ नोव्हेंबर - मी शिक्षणमंत्री असतांना शिक्षणात विद्यार्थी आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेतले; परंतु आताचे भाजप शासन शिक्षणात प्रतिदिन नवनवीन निर्णय पारित करून ग्रामीण आदिवासी आणि डोंगरी भागातील मराठी माध्यमांच्या शाळा संपवण्याचे कार्य करत आहे, असा आरोप माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या बदलापूर येथे झालेल्या ५५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. (राज्यात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे शासन होते. या शासनानेच पहिलीपासून इंग्रजी, नवीन मराठी शाळांना मान्यता न देणे यांसह अनेक अयोग्य निर्णय घेतल्याने मराठी शाळांची आज दुरवस्था झाली आहे ! त्यामुळे डॉ. कदम यांनी भाजप शासनावर टीका करण्याअगोदर त्यांच्या शासनाने मराठीची किती हानी केली ते पहावे ! - संपादक)
      डॉ. कदम पुढे म्हणाले, शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध केला जात नाही, त्यामुळे मेक इन इंडिया होणार नाही. शिक्षणाच्या अधिकारांसाठी शिक्षकांनी आता मैदानात उतरले पाहिजे. (मुख्याध्यापकांचाही राजकारणासाठी वापर करून घेणारे काँग्रेसचे लोकप्रतिनिधी ! - संपादक) शासनाने नवीन सादर होणार्‍या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निर्मितीत मुख्याध्यापक संघटनेस समाविष्ट करून न घेतल्यास या धोरणाच्या विरोधात बहिष्कार टाकण्याची चेतावणी मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव विजयकुमार गायकवाड यांनी दिला.

अमीर खान यांनी केलेले विधान हे त्यांच्या पत्नीचे नसून त्यांचेच आहे ! - नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

साम वाहिनीवरील चर्चासत्र 
चर्चासत्रात बोलतांना श्री. नरेंद्र सुर्वे 
     मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) - अमीर खान यांना देशातून जायचे असेल, तर त्यांनी खुशाल निघून जावे. या देशाने एक अमीर खान निर्माण केला; परंतु हाच देश असे अनेक अमीर निर्माण करू शकतो. अमीर खान यांनी व्यासपिठाचा चुकीचा वापर केला आहे. त्यांनी पत्नीच्या नावावर केलेले विधान हे तिचे नसून अमिर खान यांचे म्हणणे आहे, असे आम्ही मानतो. त्यांनी असे का केले ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काही सामाजिक संस्थांना निधी पुरवण्याचे बंद केले. त्यामुळे कदाचित् असे विधान केले असेल. अमीर खान यांचा दंगल हा आगामी चित्रपट येत आहे. कदाचित् त्याच्या प्रसिद्धीसाठीही अशा प्रकारे ते बोलले असावेत, हे नाकारता येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी आज कुठल्याही थराला जाऊ शकते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी साम या वाहिनीवरील चर्चासत्रात केले. या वाहिनीवरील आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात खोट कशात ? देशात ? अमीर खानमध्ये कि सत्ताधार्‍यांमध्ये ? या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अमीर यांचे हे विधान बालीश नाही. जेव्हा संगीतकार ए.आर्. रेहमान यांना विरोध झाला, तेव्हा अमीर यांना ती असहिष्णुता का वाटली नाही ?, असा प्रश्‍नही श्री. सुर्वे उपस्थित केला.

सोलापूर येथे वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात हाणामारी

कायदा हातात घेणारे नागरिक आणि वर्दीचे भान नसलेले पोलीस !
सोलापूर - येथे २४ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यावर त्या रस्त्याने जाणार्‍या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांनी अडवले. वाहतूक पोलीस आणि दुचाकीस्वार यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. जवळपास १ घंटा ही हाणामारी होटगी रस्त्यावर चालू होती. दोघांचीही भाषा अत्यंत हीन पातळीची होती. या घटनेविषयी पोलिसांनी वाहतूक पोलीस सोमनाथ थिटे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट न करता केवळ दुचाकीस्वारावरच केला. (नागरिकांनी पोलिसांवरच हात उचलणे आणि पोलिसांनी नागरिकांसमवेत हाणामारी करणे, हे अयोग्य आहे. तसेच दोघांची चूक असतांना केवळ नागरिकावर गुन्हा नोंद करणे, हे कोणत्या कायद्यात बसते ? - संपादक)
स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)चे प्रसारकार्य

     काल आपण स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.) प्रसारकार्यातील संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा पाहिला. आज आपण संकेतस्थळावरील माहिती वाचून वाचकांनी दिलेले अभिप्राय पहाणार आहोत.

तंबाखू उत्पादनावर शासन बंदी आणेल का ?

      महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी आणली आहे. या बंदीनंतर जरी गुटखा खाणार्‍यांचे प्रमाण अल्पांशी न्यून जरी झाले का, हा प्रश्‍नच आहे, तरी त्याऐवजी काही जणांनी रेडीमिक्स सुपारीयुक्त गुटखा खाण्याचा पर्याय निवडला आहे. राज्यातील कित्येक लोकांनी कोणत्या पान टपरीमध्ये गुटखा मिळतो, याची दुकाने शोधली आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्सन विद्यापीठ यांनी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने देहली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, मध्यप्रदेश, आसाम आणि बिहार या राज्यांचे सर्वेक्षण केले. या सर्व राज्यांत गुटखा विक्रीला बंदी आहे. या सर्वेक्षणात १ सहस्र गुटखा खाणार्‍या लोकांना आणि ४०० हून अधिक दुकानांना विविध प्रश्‍न विचारण्यात आले. त्यामध्ये वरील गोष्ट उघड झाली. त्यातील ३५ प्रतिशत लोकांनी गुटखा विक्री होत असून तो मिळत असल्याचे सांगितले.

राजकारण्यांच्या नेहमीच्या सारवासारवीचे एक उदाहरण !

    हिंदुस्थान हा केवळ हिंदूंसाठीच आहे, असे प्रतिपादन आसामचे राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात केले. आचार्य यांच्या विधानावर काहींनी टीका केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, बांगलादेशमध्ये छळ होणारा कुठलाही हिंदु भारतात येऊन राहू शकतो. केवळ हिंदूच नव्हे, तर कुठल्याही धर्माची व्यक्ती येऊन राहू शकते. हिंदुस्थान हा केवळ हिंदूंसाठीच आहे, असे माझे म्हणणे नव्हते.

प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग देणारी काँग्रेस !

    विठ्ठलदासवाडा, मोरजी, गोवा येथील वयोवृद्ध मुंडकार सत्यवती तारी यांना ख्रिस्ती भाटकार नॉर्बट फर्नांडिस यांनी घराबाहेर काढून तिच्या घरात प्रवेश केला होता. घरातील सर्व सामान, देवतांची छायाचित्रे आणि तुळशी वृंदावन मोडून धार्मिक कलह निर्माण केला. धार्मिक कलहाचा स्फोट होण्यापूर्वीच संशयित भाटकारावर कारवाई करा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, अशी चेतावणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष बाबी गावकर यांनी दिली आहे.

१९७१ च्या भारत-पाक युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाल्याचा अलीकडच्या काळातील इतिहासही ज्ञात नसलेला एक क्रिकेटपटू !

     बांगलादेशमध्ये आपण १९९८ साली खेळत होतो. बांगलादेशचे ८० टक्के प्रेक्षक पाकिस्तानला पाठिंबा देत होते. (बांगलादेशी नागरिकांचा पाकधार्जिणा भारतद्वेष ! - संकलक) तीन-चार भारतीय क्रिकेटपटूंबरोबर गप्पा मारत असतांना मी चिडून म्हटले, या बांगलादेशला स्वातंत्र्य आपण मिळवून दिले, त्यांच्यासाठी आपल्या जवानांनी रक्त सांडले आणि ही मंडळी पाकिस्तानला पाठिंबा देतात ? त्या क्रिकेटपटूंनी आ वासला. एक पश्‍चिम विभागाचा क्रिकेटपटू मला म्हणाला, क्या बात करते हो. कब हुआ. आता आ वासायची पाळी माझी होती. तरीही मी शांतपणे म्हटले, १९७१ साली. तो खेळाडू म्हणाला, योग्य आहे. त्या वेळी तू २०-२१ वर्षांचा असणार. त्यामुळे तुला ठाऊक आहे. मी वैतागून म्हटले, यात मी कधी जन्माला आलो, हा प्रश्‍न नाही. १९४२ साली मी जगात नव्हतो; पण चले जावच्या चळवळीविषयी सांगू शकतो. त्यासाठी वाचावे लागते. इतिहासाची आवड लागते. त्या क्रिकेटपटूवर माझ्या बोलण्याचा काडीइतकाही परिणाम झाला नाही. ऑफस्टंप बाहेरच्या चेंडूकडे दुर्लक्ष करावे, तसे त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 
- श्री. द्वारकानाथ संझगिरी (संदर्भ : दै. लोकसत्ता, २२ जानेवारी २००६. आम्हा काय त्याचे ? हा लेख)

उघड धमकी देणार्‍यांवर सरकार कारवाई करणार का ?

     सनातनच्या विविध ठिकाणच्या केंद्रांवर शासनाने छापे मारावेत. जर सध्याच्या शासनाने हे केले नाही, तर आम्ही त्यांना हे करण्यास भाग पाडणार आहोत. आमचा हा संघर्ष आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि जनतेतून उठाव करण्याचा आहे. विद्रोह करण्याचे आम्ही ठरवलेले आहे, असे वक्तव्य कॉ. गोविंद पानसरे यांची सून स्मिता पानसरे यांनी येथे केले.

ज्या शासनाला देशाच्या राजधानीत सुव्यवस्था राखता येत नाही, ते देशात काय राखणार ?

      नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे कि गुन्हेगारांची बजबजपुरी आहे ?, असा प्रश्‍न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. वानगीदाखल एका संपादकांनी सांगितलेले दोन प्रसंग
१. मी पत्रकार म्हणून वर्षभर देहलीत (दिल्लीत) काम करत होतो, तेव्हा एका रिक्शातून जातांना तो रिक्शावाला सिग्नल तोडून निघाला. त्या वेळी मी त्याला विचारलेे. तेव्हा तो निरक्षर; पण अनुभवी रिक्शावाला म्हणाला, साहब, यहाँ (संसदमे) सिर्फ कानून बनते है, यहा कानून नही चलते, कानून बाकी देशमें चलते है ! 
२. देहली येथे एका बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील गुन्हेगारांना फाशी द्या, या मागणीसाठी देहलीतील तरुण निदर्शकांनी ५ - ६ दिवस तीव्र आंदोलन केले. या तरुण निदर्शकांवर ऐन थंडीत थंड पाण्याचा फवारा मारण्याचे, लाठीमार करण्याचे आणि अश्रूधूर सोडण्याचे प्रकार पोलिसांनी केले अन् या कृतींचेे शासनाने निर्लज्जपणे समर्थन केले. 
संपादकीय, मासिक एकता, (जानेवारी २०१३)
      प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे. (दैनिक सनातन प्रभात (१७.७.२०१०))

वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेल्या भाच्याला दृष्ट लागू नये; म्हणून त्याची मानस दृष्ट काढणारी प्रेमळ मावशी !

     सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक झाल्यावर विविध वृत्तवाहिन्या चर्चासत्रांना येण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रणे द्यायच्या. त्यांपैकी काही वाहिन्यांवर सनातनचा प्रवक्ता म्हणून जाण्याची मला संधी मिळाली. रोहा, जि. रायगड येथे रहात असलेली माझी मावशी सौ. प्रतिभा मनोहर गोखले (वय ८० वर्षे) तिच्या कुटुंबियांसह ही चर्चासत्रे दूरचित्रवाणीवरून नियमितपणे पहात असे. त्या वेळी तिचा भाव जागृत होत असे. त्या कालावधीत मला वाईट शक्तींचा त्रास होऊ नये किंवा कोणाची दृष्ट लागू नये; म्हणून प्रतिदिन मावशी माझी मानस दृष्ट काढत असे. मध्यंतरी एक दिवस मला तिची अकस्मात् आठवण आली आणि मी तिला भ्रमणभाष केला. तेव्हा तिने हे सर्व मला सांगितले. ते ऐकल्यावर माझ्या डोळ्यांत अश्रू आले आणि माझा भाव जागृत झाला. - श्री. अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.११.२०१५)

फलक प्रसिद्धीकरता

सनातनच्या साधकांना नाहक त्रास देणार्‍या 
सीबीआयच्या अधिकार्‍यांची चौकशी होणार का ?
    डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सनातनच्या काही निष्पाप साधकांना खोट्या आरोपाखाली गोवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केंद्रीय अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार नायर करत आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत सनातन संस्थेने केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jhuthe arop lagakar Dr. dabholkar hatya mamleme Sanatanke sadhakonko fasaneka prayas CBI kar rahi hai ! - Sanatan Sanstha
Kya CBIke adhikariyonki janch hogi ?
जागो ! : झूठे आरोप लगाकर डॉ. दाभोलकर हत्या मामले में सनातन के साधकोंको फसाने का प्रयास सीबीआय कर रही है ! - सनातन संस्था
क्या सीबीआय के अधिकारीयों की जांच होगी ?

वेदमंत्र वा स्तोत्र यांचे पुनःपुन्हा पठण किंवा पौरोहित्य करतांना प्रत्येक टप्प्याला येणार्‍या अडचणी, तसेच त्यातून ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय साध्य होण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि त्या वेळी येणार्‍या अनुभूती

श्री. गिरिधर भार्गव वझे
     इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी अनुष्ठाने करतांना, तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी धार्मिक उत्सवांच्या काळात श्री गणपति अथर्वशीर्ष, रुद्र, देवीकवच इत्यादींचे किंवा देवतांसंबंधी मंत्रांचे सर्वत्र पठण केले जाते. एकच स्तोत्र वा मंत्र पुनःपुन्हा म्हणतांना त्याचे जास्त गतीने, अयोग्य वा अस्पष्ट उच्चारांत किंवा उरकल्याप्रमाणे पठण केले, तर त्या पठणाचा संबंधितांना अपेक्षित प्रमाणात लाभ होत नाही.

देवीप्रती आणि संतांप्रती अपार भाव असणार्‍या शिवपूर, वाराणसी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती राधा केशरी !

 
श्रीमती राधा केशरी
    शिवपूर, वाराणसी येथील श्रीमती राधा केशरी यांची 
त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. अनेक अंगभूत गुणांमुळे कठीण 
परिस्थितीतही शांत आणि स्थिर असणे
     आई अत्यंत सरळ स्वभावाची आहे. तिच्यातील नम्रता, प्रेमभाव, इतरांचा विचार करणे, दृढता, तळमळ, तसेच स्वीकारण्याची वृत्ती या गुणांमुळे प्रत्येक कठीण परिस्थितीतही ती शांत आणि स्थिर असते.

देवाचा संसार करण्याचे भाग्य मजला मिळाले !

    
कु. स्वाती गायकवाड
सनातन संस्थेचा प्रत्येक साधक गुरुमाऊलीने वाट दाखवलेल्या राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी होण्यास सिद्ध झालेला आहे. कलियुगात मायेला न भुलता गुरुचरणांच्या ओढीने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात खारूताई एवढा तरी आपला सहभाग असावा, या भावाने साधक तळमळीने कार्य करतात. तरुण साधक-साधिकांना गुरुसेवेत अधिक आनंद मिळतो; पण काही साधकांच्या घरच्यांना आपल्या मुलांनी घर-संसार संभाळून साधना करावी, असे वाटून ते त्यांच्या पूर्णवेळ साधना करण्याच्या निश्‍चयाला विरोध करतात. त्या जिवाला साधनेतून मिळणारा आनंद ते समजून घेऊ शकत नाहीत. त्यांना कसे उत्तर द्यावे ?, असा विचार मनात आल्यावर देवाने पुढील ओळी सुचवल्या.
     महाराष्ट्रात जात (म्हणजे मराठा) वाद एवढा वाढला आहे की, महाराष्ट्रास दुसरे काही शुभ सुचूच शकत नाही. सारे संपादक समाजवादी. सारे टी.व्ही. अँकर्स हटकून डावे (म्हणजे विकले गेलेले.) - दादूमिया (धर्मभास्कर, जून २०१५)
     जरब बसविणे चांगल्या राज्यकर्त्यासाठी महत्त्वाचे असते. आपल्या लोकशाहीत जरब डेफिसिट आहे. श्रीमंतांना आणि सुप्रसिद्ध लोकांना आपल्या देशात सजा म्हणून होत नाही. - निनाद बेडेकर (धर्मभास्कर, जून २०१५)

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोकसुरे

यशोदामाता आणि लडीवाळ कृष्ण : हे चित्र काढतांना मी वात्सल्यभावात होते. या चित्रात कृष्णाचा लडीवाळपणा दिसत आहे. (८.११.२०१३, सकाळी ११ ते ३ आणि सायं. ६ ते ८)

सहनशील, कठीण प्रसंगामध्ये धैर्याने वागणार्‍या आणि अन्यायाची चीड असणार्‍या नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या सौ. धनलक्ष्मी क्षत्रिय (वय ६० वर्षे) !

सौ. धनलक्ष्मी क्षत्रिय
१. सर्वांप्रती प्रेम आणि समभाव असणे
     माझ्या चुलत बहिणीची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. तेव्हा त्यांच्या घरातील सर्वजण रुग्णालयात थांबणार असल्याने तिच्या लहान बाळाला सांभाळायला कोणी नव्हते. तेव्हा माझ्या काकूंनी आईला बाळाला सांभाळण्याविषयी विचारले. तेव्हा आईला शारीरिक दुखणे असूनही ती लगेचच तयार झाली. पुतणीला स्वतःच्या मुलीप्रमाणे आणि बाळाला स्वतःच्या नातीप्रमाणे सांभाळले आणि त्यांचे सर्व मनापासून केले. त्यामुळे नातेवाईकांनाही आईचा आधार वाटला.

महर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे संकटनिवारणासाठी सांगलीची प्रमुख स्थानदेवता असणार्‍या श्‍वेत गणपतीला वस्त्राचे दान देणे आणि वस्त्र नेसवण्यासाठी अनेक यजमानांची नावे आधीच ठरलेली असतांनाही लगेच आलेल्या दिवाळीच्या दिवशी पुजार्‍यांनी श्री गजाननाला वस्त्र नेसवणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. पानसरे प्रकरणात अटक झालेले साधक हे सांगलीचे
 असल्याने महर्षींनी सांगलीची प्रमुख स्थानदेवता असणार्‍या
 श्री गणपतीला वस्त्राचे दान करण्यास सांगणे
     पानसरे प्रकरणात सनातनच्या साधकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड हे सांगली येथे रहाणारे आहेत. या संदर्भात बोलतांना महर्षींनी नाडीपट्टीवाचनात सांगितले की, सांगलीची प्रमुख स्थानदेवता असणार्‍या श्‍वेत गणपतीला संकटनिवारणासाठी अभिषेक आणि वस्त्राचे दान करावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
    स्वतःच्या पोलीस खात्यातील भ्रष्टाचार्‍यांना न ओळखणारे आणि त्यांना न पकडणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना काय ओळखणार आणि पकडणार ? 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

गंगेला प्रदूषित करण्याला तिच्यात विष ओतणारे जनताद्रोही उद्योगालयेच (कारखानेच) उत्तरदायी !

      उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये गंगातीराजवळ १५०० कारखाने आहेत. त्यांपैकी बाटा हे जोडे बनवणारे आस्थापन ! हिंदुस्थान फर्टिलायझर कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल, हिंदुस्थान लिव्हर, शॉ वॉलेस, स्फोटके आणि रसायने निर्माण करणारे मोठे कारखाने अन् असंख्य लहान कारखाने गंगेत सतत विष टाकत असतात. या गंगेत कारखान्यांची मळी किती प्रचंड प्रमाणात पडते !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी  (संदर्भ : मासिक घनगर्जित, एप्रिल २०१२)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील ?, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तर मानसिक शांतीचा लाभ होईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

...सायबर युद्धासाठी भारत सिद्ध आहे का ?

आगामी काळात सायबर युद्धाचा धोका आहे. आतंकवाद्यांकडून माहिती बंदीचे म्हणजे माहितीचा पुरवठा खंडित करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. विविध विनाशक यंत्रणांच्या साहाय्याने एखाद्या वेळी लष्कराची सगळी माहितीच रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. माहिती विकृतीकरण हा पुढचा धोका आहे. आय.एस्.आय.एस्.सारख्या संघटना माहितीजालाचा वापर करून लोकांचे मतपरिवर्तन करत आहेत. यांसाठी लष्कराचे डिजिटलायझेशन झाले पाहिजे, असे मत देशाचे संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले आहे. देशाचे संरक्षणमंत्रीच या संदर्भात चिंता व्यक्त करत असल्याने अर्थातच प्रकरणाचे गांभीर्य पुष्कळ आहे. आय.एस्.आय.एस्.साठी भारत देशातून जाणार्‍या अधिकतम तरुणांनी इंटरनेटच्या (मायाजाला)च्या माध्यमातूनच संपर्क साधल्याचे पुढे आले आहे. सध्या मायाजालाचे मायाजाळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे की, यांना रोखायचे कसे हा खरोखच महत्त्वपूर्ण प्रश्‍न आहे. आतंकवाद्यांमध्येही उच्चशिक्षित, तसेच संगणक अभियंत्यांचा समावेश आहे.

व्यक्तीस्वातंत्र्याची ऐशी की तैशी...

संपादकीय
     वाराणसी येथील काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात प्रवेश करण्याअगोदर विदेशी महिलांना साडी नेसणे बंधकारक केले आहे, तर थिरुअनंतपुरुम् येथे मंदिरात महिलेने प्रवेश करण्यापूर्वी तिची मासिक पाळी चालू आहे कि नाही, हे यंत्राने तपासल्यावरच तिला प्रवेश करण्याची अनुमती मिळेल, असे दोन निर्णय दोन्ही मंदिरांच्या व्यवस्थापनाने घेतले आहेत. दुसरीकडे कथित महिला संघटना आणि पुरोगामी याला विरोध करत आहेत. सध्या भारतात व्यक्तीस्वातंत्र्यांचा अतिरेक होत असून आम्ही हवे तसे वागणार, हवे ते खाणार-पिणार, हवे तिथे जाणार, अशा प्रकारचा उन्मत्त वर्ग सिद्ध होत असून त्याला तथाकथित विज्ञानवादी आणि पुढारलेले साहाय्य करत आहेत. जी मंडळी आज हिंदूंच्या मंदिरात महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येते; म्हणून गळा काढत आहेत, तीच मंडळी मुसलमान धर्मांत महिलांना मशिदीत जाण्यास अनुमती नसणे, महिलांची बुरखा सक्ती या गोष्टींविषयी मात्र मूग गिळून गप्प बसतात. याचप्रकारे या विषयावर चर्चासत्रे घेणारे दूरचित्रवाहिनीवाले कधीही मुसलमान महिलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविषयी चर्चासत्रे घेत नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn