Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आय.एस्.आय.एस्.विषयी आत्मीयता बाळगणार्या १५० धर्मांधांवर गुप्तचर यंत्रणांची करडी दृष्टी !

अशा देशद्रोह्यांना त्वरित कठोरात कठोर शिक्षा करा !
नवी देहली - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेविषयी आत्मीयता बाळगणार्यो भारतातील १५० धर्मांध युवकांवर गुप्तचर यंत्रणांची करडी दृष्टी आहे. यंत्रणांच्या अहवालानुसार १५० जणांमध्ये आय.एस्.आय.एस्.कडे आकर्षित होणारे, तसेच या संघटनेच्या कारवायांविषयी सहानुभूती वाटणारे यांचा समावेश आहे. या १५० पैकी बहुतांश युवक नियमितपणे 'ऑनलाईन'द्वारे आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आहेत. त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे एका अधिकार्याने सांगितले. आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्यासाठी इराक आणि सिरिया या देशांत आतापर्यंत गेलेल्या भारतियांची संख्या २३ इतकी आहे. त्यांपैकी ६ जण मारले गेले, तर एक जण मुंबईतील त्याच्या घरी परतला आहे. या ६ जणांमध्ये सुल्तान अजमेर शाह आणि साजिद या दोघांसह 'इंडियन मुजाहिदीन' या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तिघांचा समावेश आहे. आय.एस्.आय.एस्.ने ज्या अन्य ३० भारतियांना कट्टरतावादाकडे वळवले आहे, त्यांना मध्य-पूर्वेत जाण्यापासून रोखण्यात आले आहे. आय.एस्.आय.एस्.च्या बाजूने लढणार्यांमध्ये सध्या कल्याण येथील २ युवक, तर तेलंगण आणि कर्नाटक येथून प्रत्येकी १, तसेच ऑस्ट्रेलिया, ओमन अन् सिंगापूर या देशांत रहाणार्या प्रत्येकी एका भारतियाचा समावेश आहे.

माझी मुलेही सैन्यात जातील ! - कर्नल महाडिक यांच्या पत्नीचा निर्धार

सातारा येथे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
अशा वीरपत्नीच राष्ट्राची खरी शक्ती आहेत !
सातारा - कुपवाडा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांशी लढतांना हुतात्मा झालेले कर्नल संतोष महाडिक (वय ३९ वर्षे) यांच्या पार्थिवावर १९ नोव्हेंबरला पोगरवाडी (जिल्हा सातारा) या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी कर्नल महाडिक यांच्या पार्थिवाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्री. पर्रीकर यांनी महाडिक यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी कर्नल महाडिक यांच्या पत्नीने "माझी मुलेही सैन्यातच भरती होतील", असा विश्वास पर्रीकर यांच्याजवळ व्यक्त केला. (देशासाठी लढणार्यौ जवानांचे प्रतिदिन बळी घेणार्या आतंकवाद्यांना आणि त्यांना पोसणार्या पाकला शासनाने कायमचा धडा शिकवणे, हीच हुतात्मा जवानांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल ! - संपादक) कर्नल महाडिक यांना ५ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी आहे. 

तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन कोलकाता उच्च न्यायालयाकडून रहित !

चक्रावणारा न्याय !
शारदा चिटफंड घोटाळा
कोलकाता - बहुचर्चित शारदा चीटफंड घोटाळ्यातील आरोपी तथा तृणमूल काँग्रेसेचे नेते मदन मित्रा यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन कोलकाता उच्च न्यायालयाने रहित केला. मित्रा हे कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री असून त्यांनी १८ नोव्हेंबरला त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले.  मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी त्यांचे त्यागपत्र स्वीकारले आहे. (भ्रष्टाचारात बरबटलेली तृणमूल काँग्रेस !- संपादक)

भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाककडून 'हिजबूल मुजाहिदीन'ला ८ वर्षांत ८० कोटी रुपयांचे साहाय्य !

पाकवर आक्रमण करण्यासाठी भारताला आणखी किती पुराव्यांची आवश्यकता आहे ?
नवी देहली - भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाकने 'हिजबूल मुजाहिदीन' या जिहादी आतंकवादी संघटनेला ८ वर्षांत ८० कोटी रुपयांचे साहाय्य केल्याची माहिती भारतीय अन्वेषण अधिकार्यानी पॅरिसमधील 'फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स'ला (एफ्एटीएफ्ला) दिली आहे. 

आय.एस्.आय.एस्.च्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी केरळ विशेष विभाग स्थापणार !

आतंकवाद्यांच्या संकेतस्थळांवर केवळ लक्ष ठेवणारे नव्हे, तर त्यांचा बीमोड करणारे शासन हवे !
      कोझिकोडे - आय.एस्.आय.एस्. जिहादी विचारसरणीच्या प्रचार प्रसारासाठी सामाजिक संकेतस्थळांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे, हे लक्षात घेऊन केरळ पोलिसांनी या संकेतस्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही संशयित व्यक्तींची संकेतस्थळे विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत. या विशेष विभागाच्या वतीने त्यांची कार्यपद्धत सुनियोजित करण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक टी.पी. सेनकुमार यांनी दिली आहे. (आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना गेली २ वर्षे कार्यरत असून तेव्हापासून ती भारतातील मुसलमान तरुणांचे सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जिहादीकरण करत आहे. त्याची दखल केरळ शासन आता घेत आहे, हे अनाकलनीय आहे. हा प्रकार बैल गेला अन् झोपा केला या म्हणीप्रमाणे आहे. - संपादक) 

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ पोलीस हवालदाराकडून चुकून गोळीबार !

चुका करणारे पोलीस हवालदार देशाच्या अतीमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा यंत्रणेत 
कसे सामील होऊ शकतात ? त्यांची नेमणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !
      नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहलीतील ७ रेसकोर्स रस्त्यावरील निवासस्थानाजवळ १८ नोव्हेंबर या दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास देहली पोलीस दलाच्या एका हवालदाराकडून चुकून गोळीबार झाल्याची घटना घडली. पोलीस उपअधीक्षक जतीन नरवाल यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर वाहनतळाच्या परिसरात या हवालदाराच्या एके-४७ रायफलमधून ३ गोळ्या चुकून उडाल्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून हा काही कट आहे का, या दिशेनेही गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत. संबंधित हवालदाराला निलंबित करण्याच्या हालचाली चालू आहेत.

इंटरनेट जगतातून आय.एस्.आय.एस्.ला उखडून टाकण्यासाठी भारताची रणनीती

नवी देहली - इंटरनेटवरून मोठ्या प्रमाणात प्रसार करून जगातील युवावर्गाला आकृष्ट करण्याचे आय.एस्.आय.एस्.चे मनसुबे उखडून टाकण्यासाठी जगातील अनेक देश सरसावले आहेत. भारताने अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांसह आय.एस्.आय.एस्.ला इंटरनेट जगतातून उखडून टाकण्यासाठी रणनीती आखणे चालू केले आहे. या रणनीतीद्वारे या संघटनेला तिचे इंटरनेट जगतातील जाळे वाढण्यापासून रोखणे आणि या संघटनेकडे इंटरनेटच्या माध्यमातून आकृष्ट होणार्या युवकांची माहिती मिळवण्यात येणार आहे.

न्यायाधिशांच्या नियुक्ती प्रक्रियेचा मसुदा करण्यास केंद्रशासन असमर्थ

नवी देहली - उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांतील न्यायाधिशांची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेचा मसुदा सिद्ध करणे केंद्रशासनासाठी अशक्य आहे, असे केंद्रशासनाच्या वतीने अ‍ॅरटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. 

बांगलादेशातील विरोधी नेत्यांना ठोठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

      ढाका - बांगलादेश स्वातंत्र्यासाठी वर्ष १९७१ मध्ये युद्ध झाले. या युद्धातील युद्धगुन्ह्यांचे आरोप असलेल्या विरोधी पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना ठोठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. बांगलादेशचे सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील ४ सदस्यांच्या खंडपिठाने हा निकाल दिला. 
     आरोपींनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका खंडपिठाने फेटाळून लावली. जमात ए इस्लामीचे महासचिव अली अहसान महंमद मुजाहिद आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे नेते सलाहुद्दीन कादीर चौधरी यांना युद्ध गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मंत्रिमंडळात शिक्षा झालेल्या या दोन्ही नेत्यांचा समावेश होता. झिया यांच्या पक्षाला जमात ए इस्लामीने पाठिंबा दिला होता. 

दाऊदचा मुलगा बेंगळुरूमध्ये रहातो ! - देहलीचे माजी पोलीस आयुक्त नीरजकुमार यांचा गौप्यस्फोट

बॉलीवूडमधील अनेकांचे दाऊदशी संबंध 
९/११च्या आक्रमणासाठी भारतीय आतंकवाद्यांचे अर्थसाहाय्य
     नवी देहली - दाऊदचा मुलगा बेंगळुरूमध्ये रहात असल्याचा गौप्यस्फोट देहलीचे माजी पोलीस आयुक्त नीरजकुमार यांनी त्यांच्या डायल डी या पुस्तकात केला आहे. दाऊदच्या डी आस्थापनाचा कारभार पहाणार्‍या अहमद मनसूर याला देहलीतील जामा मशीद भागातून अटक करण्यात आली होती. त्याने ही माहिती पोलिसांना दिल्याचे नीरजकुमार यांनी यात म्हटले आहे. या पुस्तकातील माहितीनुसार, दाऊद दुबईत राजाप्रमाणे वास्तव्य करत होता. रिअल इस्टेट, आर्थिक व्यवहार, चित्रपट प्रदर्शनाचा दिवस यासंबंधी दाऊदच निर्णय घेत होता. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील अनेकांचे दाऊदशी संबंध होते. (या प्रकरणी गृहविभाग संबंधितांची चौकशी करील का ? - संपादक) दाऊदने एका अभिनेत्रीशी गुपचूप निकाह केला. त्यांना एक मुलगा आहे. तो बेंगळुरूमध्ये रहातो आणि त्याची देखभाल संबंधित अभिनेत्रीची बहीण करत आहे. नीरजकुमार हे सीबीआयचे संयुक्त संचालकही होते. त्यामुळे त्यांच्या या गौप्यस्फोटाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या या पुस्तकात दाऊद इब्राहिम आणि अभिनेता संजय दत्त यांच्याशी संबंधित बरेच खुलासे करण्यात आले आहेत.

नायजेरिया या इंधन निर्यातदार देशामध्येच पेट्रोलची टंचाई !

वाढत्या जागतिक आतंकवादामुळेही अनेक देशांना भविष्यात इंधनाची चणचण भासू शकते, तेव्हा 
भारतियांनी आतापासूनच इंधन साठ्यांचा काटकसरीने वापर करण्याची सवय लावावी !
पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा
     अबूजा (नायजेरिया) - आफ्रिका खंडामधील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश अशी ओळख असलेल्या नायजेरियामध्येच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचा तुटवडा तीव्रतेने जाणवू लागला आहे. नायजेरियामधील प्रमुख शहरांत पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कच्चा तेलाचा आफ्रिकेमधील सर्वांत मोठा निर्यातदार असूनही तेल शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्याची यंत्रणा नसल्याने नायजेरियाला पेट्रोल आयात करावे लागते. या आयातीसाठी शासनाचे अनुदान लागू आहे. या अनुदानाचा निधी न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलची आयात पूर्णपणे थांबली आहे. 

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कमिशन एजंट ! - भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

     कर्णावती (अहमदाबाद) - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे कमिशन एजंट असून त्यांच्याकडे अडीच लाख कोटी रुपयांची गडगंज संपत्ती असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला. येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर हे गंभीर आरोप केले.

उघड्यावर शौच करणारा उमेदवार नसावा !

स्वातंत्र्यानंतरच्या ६८ वर्षांनंतरही असे आवाहन करावे लागणे देशासाठी लज्जास्पद आहे !
शासकीय पदांच्या भरतीसाठी हरियाणा शासनाची नवी अट
     चंदीगड - येथील जिल्हा ग्रामीण विकास संस्था (डीआर्डीए), कुरुक्षेत्र विभागाकडून काही वृत्तपत्रांमध्ये प्रभाग समन्वयक (ब्लॉक को-ओर्डीनेटर) आणि क्लस्टर मोटीवेटर्स या पदांच्या भरतीसाठी विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये हरियाणा शासनाने चाकरी (नोकरी) करू पहाणारा उमेदवार उघड्यावर शौच करणारा नसावा, अशी अट ठेवली आहे. हे विज्ञापन सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

भारतातून चोरीला गेलेली १ सहस्र वर्षांपूर्वीची शिव-पार्वतीची मूर्ती अमेरिकेत सापडली

केंद्रशासनाने देवतांच्या मूर्तींच्या तस्करीची पाळेमुळे खोदून काढून 
ती थांबवण्यासाठी कठोर शिक्षा आणि आवश्यक उपाययोजना करावी, ही अपेक्षा !
  • कुख्यात तस्कर सुभाष कपूर सध्या अमेरिकी पोलीस कोठडीत 
  • ६ प्राचीन मूर्ती अमेरिकी सीमाशुल्क विभागाच्या कह्यात 

       वॉशिंग्टन - कुख्यात तस्कर सुभाष कपूर याने १ सहस्र वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या काही मूर्ती सत्य लपवून 'बॉल स्टेट' विद्यापीठामधील 'ओस्ले' संग्रहालयाला विकल्या आहेत. (कपूर भारतातून देवतांच्या मूर्ती तस्करी करत असतांना तो भारतातील पोलिसांना न मिळणे, हे गृह विभागाचे अपयशच आहे. यावर गृह विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. - संपादक) चोला राजवटीच्या कालखंडातील जवळपास १ सहस्र वर्ष जुनी असलेली शिव-पार्वतीची भारतातून चोरीला गेलेली मूर्ती अमेरिकेत सापडली आहे. कपूर याने ती मूर्ती चोरल्यानंतर अमेरिकेमध्ये तस्करी करून पाठवली होती. या पंचधातूच्या मूर्तीसह एकूण ६ प्राचीन मूर्ती सध्या अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाच्या कह्यात असून सुभाष कपूर सध्या अमेरिकन पोलीसांच्या कोठडीत आहे.

भांडुप येथे धर्मांधाकडून पुजार्याला बांबूने मारहाण

तक्रार प्रविष्ट करणार्या  पुजार्याला पोलिसांकडून अनाहूत सल्ले !
धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणावर शासन वचक बसवणार का ?
भांडुप, १९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील पश्चिरमेकडील श्रीकृष्ण मंदिरातील पुजारी आणि सनातनचे हितचिंतक श्री. विजय ठोंबरे (गुरुजी) यांना धर्मांधाने बांबूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते गेल्या १६ वर्षांपासून मंदिरात पूजा करत आहेत. या प्रकरणी मारहाण करणार्यो धर्मांधावर कारवाई होण्यासाठी पुजार्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. (पोलिसांनी धर्मांधांवर तत्परतेने कठोर कारवाई करावी, ही हिंदूंची अपेक्षा ! - संपादक) 

पुरस्कार वापसी करणार्‍यांना पुस्तक वापसीने प्रत्युत्तर

     भोपाळ (मध्य प्रदेश) - देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचा कांगावा करत पुरस्कार वापसी करणार्‍या साहित्यिकांना आता त्यांचीच पुस्तके परत करून उत्तर देण्याची मोहिम चालू करण्यात आली आहे. ही मोहिम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून केली जात असल्याचे बोलले जात आहे.

भरपावसातही चेन्नईत शिवसैनिकांनी बाळासाहेबांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पाडला !

     चेन्नई - थांबारम, चेन्नई येथे १५ नोव्हेंबर या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसर्‍या पुण्यतिथीचा कार्यक्रम भरपावसात आदरभावाने पार पडला. सध्या चेन्नई येथे पावसाचे थैमान चालू आहे. सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. तरीही शिवसैनिक त्याची तमा न बाळगता या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुसलमानांच्या एका संघटनेने हा कार्यक्रम होऊ नये, तसेच तेथे भगवा फडकवला जाऊ नये, यासाठी भरपूर प्रयत्न केले. पोलिसांनीही पावसामुळे हा कार्यक्रम रहित होईल, अशी अटकळ बांधली होती. तरीही शिवसैनिकांनी भगवा फडकवून आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राला पुष्पहार वाहून त्यांना सार्वजनिक स्थळी आदरांजली वाहिली. या वेळीं शिवसैनिकांनी क्रोमापेठपर्यंत वाहनफेरी काढली. शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. जी. राधाकृष्णन्, सरचिटणीस श्री. एम्. रविचन्द्रन् आणि इतर पदाधिकारी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली.

गुजरातमध्ये भाजपकडून ५०० मुसलमान व्यक्तींना उमेदवारी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
     नवी देहली - भाजपने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तब्बल ५०० मुसलमान उमेदवारांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ष २०१० मध्ये मुसलमान उमेदवारांना दिलेल्या उमेदवारीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यांनी अधिक असल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना वर्ष २०१० मध्ये तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ३०० मुसलमान उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या वेळी करण्यात आलेल्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि भाजपचे २५० मुसलमान उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते.

बेंगळुरू येथे ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत भव्य आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन

१० लाख हिंदू उपस्थित रहाण्याचा अंदाज
हिंदूंच्या मेळाव्यात धर्मावरील संकटे आणि उपाय यांविषयी जनजागृतीच्या 
कार्यक्रमाचाही समावेश असणे, ही काळाची आवश्यकता आहे !
     बेंगळुरू - बेंगळुरू येथे ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत हिंदु अध्यात्मिक आणि सेवा मेळा या संघटनेच्या वतीने ५ दिवसीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात हिंदुत्ववादी स्तंभलेखक श्री. एस्. गुरुमूर्ती आणि हिंदु अध्यात्मिक आणि सेवा मेळा या संघटनेचे अध्यक्ष श्री. विजय संकेश्‍वर यांनी ही माहिती एका पत्रकार परिषदेत दिली. या मेळ्यात कर्नाटक राज्यातील विविध सामाजिक-धार्मिक क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या संस्थांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. या संस्थांना मेळाव्याच्या निमित्त एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यास शहरातील आणि आसपासच्या भागांतून १० लाख हिंदू भेट देतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या मेळाव्यात हिंदूंचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि त्यावर आधारित मूल्ये आणि परंपरागत हिंदु जीवनशैली यांची प्रत्यक्षात कशी सांगड घालावी याचे मार्गदर्शन करण्यात येईल. त्यामुळे सध्याच्या जीवनात भेडसावणार्‍या पर्यावरण, प्रदूषण, मानवी मूल्ये, महिलांचा आदर करणे आणि राष्ट्रप्रेम अशा विविध प्रश्‍नांवर उपाय शोधता येणे शक्य होणार आहे. याशिवाय या मेळ्यात प्राचीन ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक ज्ञान, प्राचीन धर्म ग्रंथ यांवर आधारित धार्मिक जीवनशैली म्हणजेच धर्म याची माहितीही संगण्यात येणार आहे.

बेंगळुरू येथील मंदिरातून पंचधातूची मूर्ती आणि सोनसाखळ्यांची चोरी !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
      बेंगळुरू - येथील गोपाळपुरा, मागदी रस्त्यावर असलेल्या येल्लम्मा मंदिरातून पंचधातूची ३ फूट उंचीची मूर्ती आणि ३ सोनसाखळ्या यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली. मंदिराचे पुजारी मंजुनाथ नेहमीप्रमाणे मंदिरात आल्यावर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. पोलिसांना मंदिराचे मुख्य दार बंद असल्याचे आढळले; मात्र मंदिराच्या छतावर असलेल्या एका फटीतून चोरांनी मंदिरात प्रवेश केला आणि ऐवज लंपास केला. चोरीस गेलेल्या सामानाचे नेमके मूल्य कळू शकले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.

चोपडा येथे धर्मांधांनी हिंदु महिलेची अंत्ययात्रा रोखली !

हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता प्रतिपादणारा प्रसंग !
वाद्य बंद करण्यास दमदाटी 
चोपडा (जिल्हा जळगाव) - येथील धर्मांधांनी वयोवृद्ध हिंदु महिलेची सवाद्य निघालेली अंत्ययात्रा रोखली. 'दुसरी गल्ली से जाओ, यहा से नही जाना', असे दटावून हिंदूंना वाद्य बंद करण्यास भाग पाडले. ७० वर्षीय हिंदु महिलेची अंत्ययात्रा परिसरातील एका अनधिकृत मशिदीजवळून जात असतांना २० ते २५ धर्मांध धावत अंत्ययात्रेजवळ आले. त्यांनी हिंदूंशी हुज्जत घातली. त्यांची दमदाटी थांबत नसल्याने शेवटी हिंदूंनी वाद्य बंद करून अंत्ययात्रा पुढे नेली. या संदर्भात पोलिसांनीही काहीच कारवाई केली नाही. 'अंत्ययात्रा ही दुःखद घटना असून ती रोखली जाऊ नये', असे संतप्त हिंदू या वेळी बोलत होते.

हिंदूंच्या संघटित शक्तीचा अभाव, प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि राजकारण यांमुळे गुंता वाढला !

बेळगाव येथील कथित थडगे हटवण्याचे प्रकरण
      बेळगाव - येथील खंजर गल्लीमधील कथित थडग्यामुळे गेल्या ३ मासांपासून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा खंजर गल्ली, खडक गल्ली, चांदू गल्ली, काकतीवेस परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच या प्रकरणात राजकारण शिरल्यामुळे गुंता वाढला आहे. हा गुंता सोडवण्याऐवजी तो वाढवण्याकडेच अनेकांचा कल दिसून येत आहे. भाजपने काढलेल्या मोर्च्याकडे इतर हिंदुत्ववादी संघटनांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे या प्रकरणात हिंदूंच्या संघटितपणाचा अभाव दिसून येतो.

फ्रान्सवर रासायनिक आणि जैविक आक्रमणाची शक्यता !

पॅरिस - आतंकवाद्यांकडून फ्रान्सवर रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने आक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी दिली. फ्रान्समध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीसंदर्भात देशातील लोकप्रतिनिधींच्या चालू असलेल्या चर्चेत ते बोलत होते. 

आगामी बाजीराव मस्तानी चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण !

प्रसादराव पेशवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
हिंदूंनो, तुमच्या इतिहासपुरुषांचा अवमान करणार्‍या चित्रपटांचा सनदशीर मार्गाने निषेध नोंदवा !
     मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या चित्रपटात पिंगा या गाण्यात बाजीरावांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी या दोघीही एकत्र नृत्य करतांना दाखवल्या असून पेशव्यांच्या इतिहासात असा कुठलाही संदर्भ नाही. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली पेशव्यांच्या इतिहासात फेरफार करण्याचा अधिकार भन्साळींनी कुणी दिला, असा प्रश्‍न प्रसादराव पेशवे यांनी केला आहे.

महिलेवर सामूहिक बलात्कार

स्वैराचार माजल्याने आणि धर्माचरण नसल्याने समाजाचे 
 झालेले अध:पतन रोखण्यासाठी धर्माचरणाशिवाय पर्याय नाही ! 
कणकवलीतील ५ युवकांना अटक 
     कणकवली - आमिष देऊन विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी शहरातील ५ युवकांना पोलिसांनी १७ नोव्हेंबर या दिवशी अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. चार दिवसांत २ वेळा या युवकांनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर महिलेने कणकवली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 

पोर्तुगीजकालीन चारचाकीची लक्षावधी रुपये खर्च करून दुरुस्ती !

जनतेचा पैसा वापरून ही चारचाकी दुरुस्त करून घेणे खरेच आवश्यक आहे का ? 
     पणजी, १९ नोव्हेंबर - गोवा मुक्तीपूर्वी पोर्तुगीज गव्हर्नर मान्युएल आंतोनियो वासालो इ सिल्वा यांनी विकत घेतलेली अमेरिकेतील बनावटीची चारचाकी राज्यपाल सौ. मृदुला सिन्हा यांच्या आदेशावरून आता लक्षावधी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात येत आहे. वर्ष १९६१ मध्ये गोवा मुक्तीनंतर गोवा भेटीवर आलेले तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरलेली ही चारचाकी राज्यपाल भवनमध्ये पडून होती. अमेरिकेतून सुटे भाग मागवून ही चारचाकी दुरुस्त केली जात आहे. 

देशाला हिरव्या संकटापासून वाचवण्यासाठी हिंदूंच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र या ! - शरद पोंक्षे

      पुणे - हिंदुहृदयसम्राट हा शब्द शासकीय नाही आणि तो भारतरत्नसारखा शासनाचा पुरस्कार नाही. सर्वसामान्य लोकांनी असामान्य व्यक्तींना बहाल केलेली ती बिरुदावली आहे. सत्ता कोणाचीही असू द्या, खरे हिंदुहृदयसम्राट दोनच आहेत. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या विचारांमध्ये साम्राज्य उलथवून टाकण्याचे सामर्थ्य होते. आज देशात हिरवे संकट घोंगावत असून भाग्यनगरचे नवनवीन निजाम महाराष्ट्रात येत आहेत.

अंगप्रदर्शन करणार्‍या कपड्यांमुळे महिलांवरील अत्याचार वाढले ! - याचिकाकर्ते

उच्च न्यायालयात याचिका दाखल !
      मुंबई - महिला अंगप्रदर्शन करणारे आणि तंग कपडे घालत असल्यामुळे महिलांवर बलात्कार किंवा अन्य प्रकारचे लैंगिक अत्याचार होतात. त्यामुळे महिलांना अशा प्रकारचे पेहराव करण्यास बंदी करावी. पुरुषांना दोष देण्याऐवजी महिलांवरील अत्याचाराला महिलाच उत्तरदायी आहेत, अशा प्रकारची याचिका श्री. चंद्रकांत पालव या याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. पालव न्यायालयात बोलत असतांना शासकीय अधिवक्त्यांनी पालव यांना जोरदार विरोध केला;

कीर्तन परंपरेला उर्जितावस्था देण्यासाठीचे ह.भ.प. सुहासबुवा वझे यांचे कार्य उल्लेखनीय ! - पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर

मडकई येथे निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन 
     मडकई (गोवा) - मंदिराच्या सौंदर्यीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित करणार्‍या देवस्थान समित्या समाजप्रबोधनाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम असलेली कीर्तनाची परंपरा लोप पावत चालली आहे. कीर्तनाद्वारे समाजप्रबोधनाच्या अशा या महान परंपरेला उर्जितावस्था देण्यासाठी कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे यांनी चालू केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी मडकई येथील श्री नवदुर्गा संस्थानाच्या वतीने आयोजित केलेल्या निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. 

पत्रकारितेतील शुचिता जपा !

मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रीय पत्रकारदिनी पत्रकारांना आवाहन 

पुढील रांगेत डावीकडून सत्कारमूर्ती प्रकाश कामत,
संजीव वेरेकर, संदेश प्रभुदेसाई आणि प्रसन्ना शिरोडकर
     पणजी, १९ नोव्हेंबर - पत्रकारांना नेहमी परखड असावे लागते. सर्व बाजूंनी दबाव येत असतांना पत्रकारांना शुद्ध, ताठर आणि प्रामाणिक भूमिका घेणे कठीण जाते. काही अपवाद वगळता गोव्यातील पत्रकारांनी चांगले कार्य केले आहे. यापुढेही या क्षेत्राची शूचिता जपून ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

सहस्रो नायजेरियन भारतात येऊन रहातात कसे ? प्रवासी म्हणून आले, तर परत जात कसे नाहीत ? त्यांना भारतात जे पोसतात, त्यांना कडक शिक्षा करा !

१. 'गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायात नायजेरियातील नागरिकांच्या टोळीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यंदाच्या पर्यटन हंगामापूर्वीच नायजेरियाच्या या टोळीने उघडपणे अमली पदार्थ विक्रीचा धंदा चालू केला आहे. यामुळे स्थानिक युवा पिढी वाममार्गाला लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमली पदार्थ विक्री करणार्‍या या नायजेरियातील नागरिकांच्या टोळीला त्वरित आवर घालण्याची मागणी हरमल गावचे माजी पंच बाबुश फर्नांडिस यांनी केली आहे. 

सोलापूर येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

गोवंशहत्या बंदी कायद्यानुसार पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई करावी, ही गोप्रेमींची अपेक्षा !
     सोलापूर - येथील विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन चौकात विना परवाना गोवंशियांना नेण्यात येणारा टेम्पो शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. याविषयी पोलीस हवालदार विश्‍वनाथ भिटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धर्मांध अल्लाउद्दीन कुरेशी, गौस बेपारी यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

घोटाळा करणार्‍या लुईस बर्जर आस्थापनाचा राज्य शासनाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रमांशी संबंध

     मुंबई - लुईस बर्जर या आस्थापनाच्या आर्थिक घोटाळ्यांचे प्रकरण गोव्यात उघडकीस आल्यावर त्या आस्थापनाचे लागेबांधे राज्य शासनाच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रमांमध्येही असल्याचे उघडकीस आले आहे. शहर विकास आणि पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवणार्‍या एम्एम्आर्डीए, सिडको आणि मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांना लुईस बर्जर सल्लागार असल्याने हे उपक्रमही चौकशीच्या फेर्‍यांत अडकले आहेत,

नागपूर येथे आधुनिक वैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार !
वरिष्ठ आधुनिक वैद्य शवविच्छेदन अहवालांत पालट करण्यास सांगत असल्याचा आरोप
     नागपूर - शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वरिष्ठ आधुनिक वैद्य चक्क शवविच्छेदन अहवाल (पोस्टमॉर्टेम रिपोर्ट)मध्ये पालट करण्यास सांगतात, अनेक बेकायदेशीर कामे करून घेतात, असा आरोप करत एका आधुनिक वैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मातृभाषेत शासकीय, निमशासकीय संस्था आणि ऐतिहासिक वास्तू यांची नावे असावीत, यासाठी आंदोलन करावे लागले, हे महाराष्ट्रात सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना अतिशय लज्जास्पद !

     'सध्या 'बॉम्बे' असा शब्द वापरल्या जाणार्‍या ठिकाणी 'मुंबई' असेच लावले गेले पाहिजे, यासाठी शिवसेना आंदोलन करणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय संस्था आणि ऐतिहासिक वास्तू यांच्या नावांसमोरील 'बॉम्बे' हे नाव पालटून तिथे मुंबई लिहावे, यासाठी शिवसेनेचे खासदार श्री. अरविंद सावंत प्रयत्न करत आहेत.'

आय.एस्.आय.एस्.च्या क्रूर कारवायांना सामोरे जाण्यासाठी शासनाने काय सिद्धता केली आहे ?

     'आय.एस्.आय.एस्. भारतावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे. ही संघटना कधीही आक्रमण करू शकते. यासंदर्भात इंटेलिजन्स ब्युरोनेही अनेकदा सांगितले आहे.'
- डी. शिवानंदन्, माजी पोलीस आयुक्त, मुंबई

फलक प्रसिद्धीकरता

देशात आय.एस्.आय.एस्.चे जाळे वाढण्यापूर्वीच कठोर उपाययोजना आखणे आवश्यक ! 
     आय.एस्.आय.एस्. या संघटनेविषयी आत्मीयता बाळगणार्‍या भारतातील १५० युवकांवर गुप्तचर यंत्रणांची करडी दृष्टी आहे. या युवकांमध्ये आय.एस्.आय.एस्.कडे आकर्षित होणारे, तसेच या संघटनेच्या कारवायांविषयी सहानुभूती वाटणारे यांचा समावेश आहे.

लोकांना धोकादायक ठरू शकणार्‍या कुत्र्यांना मारण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

प्राणीमित्र संघटनांची याचिका फेटाळली !
रस्त्यावर फिरणार्‍या कुत्र्यांचा उपद्रव प्राणीमित्र संघटनांना कसा दिसत नाही ? 
छोट्याशा गोष्टीसाठी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण वेळ घेतला, म्हणून संबंधितांना
शासन व्हावे, असे कुणाला वाटल्यास नवल काय ?
     नवी देहली - भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक तक्रारी आणि त्याविषयीचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात येत असते. मुंबई आणि केरळ उच्च न्यायालयाने लोकांना धोकादायक ठरू शकणार्‍या कुत्र्यांना मारण्याची अनुमती दिली होती; परंतु प्राणीमित्र संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

मंगळवेढा (सोलापूर) येथे संतसृष्टी निर्माण करण्याची मागणी

     सोलापूर - येथील मंगळवेढा तालुक्यात अद्यापपर्यंत १७ प्रसिद्ध संत होऊन गेले असून ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्यामुळे येथे संतसृष्टी निर्माण करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. विष्णु गवळी यांनी महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या आणि अन्य मागण्यांविषयी श्री. खडसे यांनी सोलापूरच्या जिल्ह्याधिकार्‍यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले

डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिवाळीनिमित्त देण्यात येणारे सानुग्रह अनुदान नाकारले !

     पुणे, १९ नोव्हेंबर - पिंपरीचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून मिळणारे ९० सहस्र रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) विनम्रपणे नाकारले आहे. डॉ. परदेशी यांना पालिका प्रशासनाने याविषयीचा धनादेश पाठवला होता. त्यांनी तो विनम्रपणे परत पाठवला. (किती अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेचे संकेतांक पाळून असा निर्णय घेतात ? - संपादक) 

सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने ध्यानयोग शिबिराचे आयोजन


शिबिरात सहभागी महिला 
     नंदुरबार - येथील लालबाग कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिरात सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने १८ नोव्हेंबर या दिवशी महिलांसाठी एकदिवसीय ध्यानयोग शिबीर घेण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून योगशिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. नरेंद्र पाटील यांनी या वेळी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी योगसाधनेचे महत्त्व, सहजावस्था, शरीरध्यान, श्‍वसनध्यान, प्रमुख ८४ आसने, शरिरातील ७ प्रकारची चक्रे यांची माहिती दिली. या शिबिराचा २२ महिलांनी लाभ घेतला. हे शिबीर एक दिवसीय न घेता यापुढे सप्ताहाचे घ्यावे, अशी सूचना उपस्थित महिलांनी केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. निवेदिता जोशी यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ. भारती पंडित, भावना कदम, सौ. वनिता पाटील, सौ. रजनी आव्हाड आदींनी परिश्रम घेतले.

एकाच्या धर्मांतराशिवाय हिंदु-ख्रिस्ती विवाह अवैध !

     मदुराई - जोडप्यातील किमान एकाने धर्मांतर केल्याशिवाय हिंदु-ख्रिस्ती विवाह कायदेशीररित्या वैध मानला जाणार नाही, असे चेन्नई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. 

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 ISISke sath internetse samparkme 
rahete hai Bharatke 150 yuva !- Guptachar Sansthaonka dava 
 Inpar kathor karvai kab hogi ? 

जागो ! 
 आय.एस्.आय.एस्. के साथ इंटरनेट से संपर्क
 मे रहते है भारत के १५० युवा ! - गुप्तचर संस्थाओका दावा
 इन पर कठोर कारवाई कब होगी ?

पाकप्रेमी हुतात्मे आणि फोर्डप्रेमी महात्मे यांच्यातील संबंधाचे रहस्य उलगडायला हवे !

१. पाकिस्तानमध्ये मुशर्रफ यांच्यासमक्ष जाहीर कार्यक्रमात मोदी यांना पंतप्रधानपदावरून 
हटवण्याचे वक्तव्य करणारे काँग्रेसचे देशद्रोही नेते मणिशंकर अय्यर !
श्री. भाऊ तोरसेकर
       पाकिस्तानात जाऊन मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या पंतप्रधानांना हटवायची मागणी करावी, याचा अनेकांना राग आलेला आहे; पण त्यात नवे असे काय आहे ? मणिशंकर अय्यर हे काँग्रेसचे नेते आहेत आणि हेच मागील काही वर्षांत काँग्रेसचे धोरण राहिलेले आहे. सत्तेच्या पुढे त्यांना देश वा भारतीयत्व यांचा अभिमान वगैरे काहीही राहिलेला नाही. तसे नसते, तर त्यांची सत्ता असतांना परदेशात मोदींना प्रवेश मिळू नये, असे प्रयास त्यांनी थांबवले नसते का ? गुजरातचा दोनदा निवडून आलेला मुख्यमंत्री आणि कुठल्याही न्यायालयाने गुन्हेगार न ठरवलेल्या व्यक्तीला अमेरिकेने प्रवेश देऊ नये, असे आवाहन येथील अनेक खासदारांनी संयुक्त पत्र लिहून केलेले होते. त्यांच्या संदर्भात तेव्हा युपीए (संयुक्त पुरोगामी आघाडी) शासनाने वा त्याचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेस पक्षाने कोणती कारवाई केली होती ? आता ज्या वक्तव्यासाठी अय्यर यांना दोष दिला जात आहे, ते वक्तव्य दोन आठवड्यांपूर्वीचे आहे.

मुंबई आणि ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनातील मागण्या
  • सांताक्रूझ विमानतळाच्या A.T.C. टॉवरखाली अनधिकृत शेड बांधून अवैधरित्या नमाजपठणकरणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी !
  • आय्.एस्.आय्.एस्. या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे भिवंडीमधील २० बांगलादेशीमुसलमान आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कठोर कारवाई करावी !
  • सर्व गोरक्षकांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्यास अनुमती मिळावी !
  • बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. प्रशांत पुजारी यांची हत्या करणार्‍यांवर त्वरित

नागालॅण्डमधील ख्रिस्तीकरणाच्या विरुद्ध हिंदु पंथांकडून जागृती !

१. नागालॅण्डमध्ये आठ वर्षे पाद्री म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने ख्रिस्ती हा धर्म नसून ते एक राजकारण 
आहे आणि तेथील चर्चमध्ये बायबल या ग्रंथापेक्षा ख्रिस्तीकरण अन् इतर धर्मांविरुद्ध षड्यंत्र यांचीच 
चर्चा केली जाते, असे सांगणे
     ख्रिस्ती हा धर्म नसून ते एक राजकारण आहे, असे निवेदन नागालँडमध्ये ८ वर्षे पाद्री म्हणून काम केलेले सेशो जेलियांग यांनी केले आहे. सेशो हे कार्यकर्त्यांच्या जनजागरण अभियानात राज्यातील फाईगीम गावात बोलत होते. ४० वर्षांपूर्वी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. दीड वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा हिंदु धर्माचा स्वीकार केला. ४० वर्षांचा अनुभव सांगतांना ते म्हणाले, चर्चमध्ये ख्रिस्तीकरण आणि इतर धर्मांविरुद्ध षड्यंत्र यांचीच चर्चा केली जाते, तसेच तेथे बायबलविषयीही माहिती देत नाहीत.

देशात समान नागरी कायदा लागू व्हावा ! - न्यायमूर्ती पानाचंद जैन

     हे अतिशय खेदजनक आहे की, काही संप्रदाय धर्माच्या नावावर समान नागरी कायद्याचा विरोध करत आहेत. ते घटनेच्या विरुद्ध आहे. देशात असा कायदा झाला पाहिजे, जो सर्व नागरिकांना समान पद्धतीने लागू होईल. समान व्यवहार, समान मैत्री आणि जातीबंधन, तसेच धर्माचा भेदभाव नसलेला समाज निर्माण झाला पाहिजे. आमच्या घटनेतील दिशादर्शक सिद्धांतात समान नागरी संहितेचे (कायद्याची) प्रावधान (तरतूद) आहे. असमान नागरी कायद्यामुळे राष्ट्र कल्याणकारी कसे बनू शकेल ? या प्रगतीशील युगात आपल्याला काळानुसार परिवर्तन आणावे लागेल. मुस्लिम राष्ट्रांतही बहुविवाह करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. धर्माच्या आधारावर समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध करणे चुकीचे आहे. समान नागरी कायदा सर्वांना लागू करण्यासाठी धर्माच्या व्यवस्थेत पालट केला जाऊ शकतो. असे पालट अवैधानिक असणार नाहीत. (संदर्भ : आर्य नीति, १०.४.२०१५)

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या दोन साधकांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलीस चौकशीचा वाढता ससेमिरा
     डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एका अधिकार्‍यांनी सनातनच्या दोन साधकांची नुकतीच चौकशी केली. या वेळी पहिल्या साधकाची सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत सुमारे अडीच घंटे चौकशी केली. पोलीस अधिकार्‍यांनी सनातनच्या कार्याविषयी विविध प्रश्‍न विचारले. या वेळी झालेले संभाषण येथे देत आहोत. 

बालगुन्हेगारी का बळावते ?

आज असलेल्या बाल अधिकारदिनाच्या निमित्ताने...
१. मुलांना एकमेकांचे स्पर्धक (प्रतियोगी) सिद्ध करण्यात 
साहाय्य करणारी आजची परीक्षापद्धत 
     आजची परीक्षापद्धत विद्यार्थ्यांना एकमेकांचे स्पर्धक होण्यात साहाय्य करते. एका बाजूला मुले पुष्कळ अभ्यास करतात, तर दुसर्‍या बाजूला त्यांना दिल्या जाणार्‍या प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी त्यांचे भविष्य ठरवण्यात पुष्कळ दोषी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांतील स्पर्धा तीव्र होते; पण विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील तणावही वाढतो. परीक्षेच्या तीन घंट्यांतच उत्तरपत्रिकेतून योग्यता दाखवावी लागते. यात त्यांच्या योग्यतेचे पूर्ण प्रदर्शन होत नाही.

महाभारताला धर्मयुद्ध का म्हणतात ?

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
१. दुर्योधनाचे अनेक कौरवबंधू आणि शूर योद्धे पांडवांकडून मारले गेल्याने त्याने संतापून भीष्माचार्यांना त्याचा जाब विचारणे : महाभारताच्या पहिल्या ३ दिवसांत दुर्योधनाचे बरेच कौरवबंधू आणि कौरवांच्या बाजूने लढणारे इतर शूर योद्धे पांडवांकडून मारले गेले. पांडवांच्या आणि त्यांच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यांपैकी कोणीही मारला गेला नव्हता; म्हणून दुर्योधन संतापला आणि त्याने कौरवांचे सेनापती भीष्माचार्य यांना याविषयी खडसवले. तेव्हा भीष्माचार्य म्हणाले, उद्या मी ५ बाणांनी ५ ही पांडवांना मारीन. दुर्योधन म्हणाला, तसे नाही, कुठल्या ५ बाणांनी पांडवांना मारणार आहात, ते बाण मंत्रून माझ्या कह्यात द्या. ते बाण मी उद्या सकाळी युद्धावर जाण्याच्या आधी तुम्हाला आणून देईन. भीष्माचार्यांनी ५ बाण मंत्रून दुर्योधनाला दिले. दुर्योधन ते बाण घेऊन आपल्या शिबिरात आला.

भ्रष्टाचाराचा रोग !

      भ्रष्टाचाराचा रोग पुरातन काळापासून आहे. भ्रष्टाचाराचे सध्याचे स्वरूप अक्राळ-विक्राळ आहे. त्याचे समूळ उच्चाटन लगेच (त्वरेनेे) करणे शक्य नाही. एखादा रोग जेवढा जुनाट असतो, तेवढीच त्याची उपाययोजनाही दीर्घकाळ करावी लागते. केवळ औषध घेऊन भागत नाही, त्याला कडक पथ्याची जोडही द्यावी लागते. भ्रष्टाचाराचा रोग पुराणकाळापासूनच समाजाचा घात करत आहेत. कौटीलीय अर्थशास्त्र या ग्रंथात आर्य चाणक्य यांनी शासकीय सेवेत घडणारे भ्रष्टाचाराचे प्रकार दिले आहेत. आता झालेल्या प्रगतीमुळे या प्रांतातील ही आकडेवारी आता शतपटींनी वाढूही शकते.

रामसेतू काल्पनिक आहे, असे म्हणणार्‍यांना वैज्ञानिक संशोधकांची चपराक !

१. रामसेतूच्या संशोधनाद्वारे रामसेतू मानवनिर्मित आहे आणि त्याचे वय ७००० ते ७,३०० वर्षे (म्हणजे रामायणकाळातील) आहे, असे सिद्ध होणे 
अ. डॉ. बद्रीनारायणन् (निवृत्त भूगर्भ संचालक) आणि डॉ. पी.के. बॅनर्जी (कोरल तज्ञ) यांनी रामसेतूचे वैज्ञानिक परीक्षण अन् संशोधन केले. तसेच त्यांनी रामसेतू मानवनिर्मित आहे, असा अहवाल वर्ष २००४-२००५ मध्ये केंद्रशासनाला दिला. 
आ. नासा आणि इस्रो यांच्या परीक्षणातही सेतू मानवनिर्मित आहे, असे म्हटले आहे. त्याचे वय ७००० ते ७,३०० वर्षे असल्याचे निश्‍चित झाले आहे. हाच काळ रामायणाचा आहे. 

विज्ञापन विश्‍वाची अधोगती !

     एका जोडप्याचे लग्न ठरलेले असते; परंतु उभयतांमध्ये काहीतरी वितुष्ट येते आणि होणारी वधू क्रोधामुळे तिच्या बोटातील अंगठी वरास परत करते. घरातून बाहेर पडतांना वर पक्षाच्या घरातील अत्याधुनिक शौचकूप तिच्या दृष्टीस पडते आणि तत्क्षणी वधू आपला निर्णय पालटून विवाहास संमती देते, असे एक अर्थहीन विज्ञापन सध्या दूरचित्रवाहिनीवर पहावयास मिळते. विषय कोणता, दाखवायचे काय आणि कल्पकता कशाशी जोडली जाते, याचा काहीच ताळमेळ सध्या कित्येक विज्ञापनांमध्ये नसतो. अशा प्रकारच्या अनेक विज्ञापनांनी सर्वसामान्य माणसाचे आयुष्य व्यापले आहे. कोणतेही उत्पादन असो, त्याच्याशी संबंध नसलेले तर्क आणि अश्‍लीलता याच्या मसाल्याने विज्ञापन सिद्ध केले जाते. आज काही तरी उच्च मूल्यांची जपणूक करणारी विज्ञापने अभावानेच दिसतात.

इंटरनेटचा अतीवापर केल्यामुळे तरुणांना नेटब्रेन या नवीन रोगाने ग्रासणे !

तरुणांनो, सावधान ! 
इंटरनेटचा अतीवापर टाळा !
       सध्या सर्वत्र इंटरनेटचा वापर इतका वाढलेला आहे की, लोकांचे परस्परांना भेटण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅॅप्लीकेशन, व्हॉटस्-अ‍ॅप यांसारख्या माध्यमांचा वापर करून अनेकजण एकमेकांच्या संपर्कात रहातात; परंतु सर्वांचे प्रिय इंटरनेट सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. इंटरनेटचा अती वापर केल्यामुळे समाजात मानसिक विकारांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे. एका सर्वेक्षणानुसार, जगातील सुमारे २० कोटी लोकांना इंटरनेटचा अनावश्यक वापर करण्याची वाईट सवय लागलेली आहे. यांत सर्वात अधिक प्रमाण तरुणांचे असल्यामुळे ते नेटब्रेन नावाच्या नवीन व्याधीने ग्रसित होत आहेत. या व्याधीमुळे व्यक्ती समाजापासून दूर जाणे आणि मानसिक स्तरावर अस्थिर होणे, अशा मानसिक अन् सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 
- (संदर्भ : मासिक समाज प्र्रवाह, १५ जुलै, २०१५)

महापुरुषांच्या वाणीतून मौनाचे महत्त्व

१. भर्तृहरी : ज्ञानवंतांच्या सभेत मौन अज्ञान्यांचे भूषण आहे. 
२. कार्लाइल : मौनात शब्दांपेक्षा अधिक वाक्शक्ती असते.
३. ड्रायडेन : दुःखात मौन रहाणे अती श्रेयस्कर आहे.
४. रवींद्रनाथ टागोर : जसे घरटे झोपायला येणार्‍या चिमण्यांना आश्रय देते, तसेच मौन तुमच्या वाणीला आश्रय देते. 
५. अनामिक : क्रोधाला जिंकण्यासाठी मौन जितके साहाय्यक असते, तितकी दुसरी कोणतीच वस्तू नाही. 
(संदर्भ : मासिक ऋषीप्रसाद, नोव्हेंबर १९९९)

गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घ्यायला जाण्याचा विचार मनात आल्याक्षणी तोंडातून दुर्गंध येणे आणि दर्शन घेतल्यावर पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवणे

     मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला सायंकाळी ६ वाजता पोचले. प्रवचन संपल्यावर एका ताईने मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्याची आठवण केली. माझ्या मनात दर्शन घ्यायला जाण्याचा विचार आला आणि त्याच क्षणी माझ्या तोंडातून दुर्गंध आला. त्या वेळी माझ्या तोंडातून काहीतरी बाहेर पडल्यासारखे जाणवून मला किळसवाणे वाटले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यावर मला पुष्कळ शांत वाटले आणि आनंद जाणवला. माझ्या शरिरातील काळी शक्ती निघून गेली, असे जाणवून मला समाधान वाटले. मी श्री गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. - सौ. संजीवनी कदम, मिरज, जि. सांगली. (१.९.२०१५)

आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने काढून टाकलेले पायात बांधलेले तांबडे धागे हातातून आणतांना दुसर्‍या साधिकेला हात जड होणे, मळमळणे आणि धागे हातात धरू नये, असे वाटणे

     एके दिवशी खोलीत असतांना मी माझ्या पायात बांधलेले तांबडे धागे रात्री पालटले आणि सकाळी अग्निविसर्जन करण्यासाठी घेऊन जाऊया, या विचाराने ते खोलीत कट्ट्यावर ठेवले; परंतु सकाळी विभागात येतांना न्यायला विसरले. नंतर खोलीतील सहसाधिका कु. श्‍वेता पट्टणशेट्टी ते अग्निविसर्जन करण्यासाठी घेऊन गेली. त्या वेळी तिला पुढीलप्रमाणे त्रास जाणवले.

अहमदनगर येथील श्रीमती शेवूबाई लोखंडेआजींना देवद आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती !

     माझी आजी (आईची आई) श्रीमती शेवूबाई लोखंडे यांचे वय ८० च्या पुढे आहे. आजी सर्वांशी प्रेमाने वागतात. घरी साधक आले, तर त्यांच्यासाठी जेवण बनवतात. घरातील सर्व कामे करतात. या व्यतिरिक्त देवपूजा करणे, तुळशीला पाणी घालणे, गाईला चारा देणे, अशा अनेक कृती त्या भावपूर्ण करतात. त्या देवद आश्रमात काही दिवस रहाण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

होता तो सोनियाचा दिन ।

होता तो सोनियाचा दिन ।
जेव्हा प.पू. गुरुदेवांनी दिले आम्हा दर्शन ॥ १ ॥
दर्शन होता विसरले भान ।
गुरुचरणी आम्हा लागले ध्यान ॥ २ ॥

मठ, जि. सिंधुदुर्ग येथील बालसाधक कु. प्रणव वामन परब (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी झालेल्या सत्काराच्या वेळी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना आलेल्या अनुभूती

कु. प्रणव वामन परब
१. पू. रेडकरआजींकडून श्रीकृष्णाची प्रतिमा घेतांना श्रीकृष्णरूपी 
प.पू. डॉक्टरच ती देत असल्याचे जाणवून आनंद होणे
     व्यासपिठावर सत्कार स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर पू. रेडकरआजींकडे बघून मला प्रसन्न वाटत होते, तसेच मनाला पुष्कळ आनंद होत होता. पू. रेडकरआजींकडून श्रीकृष्णाची प्रतिमा घेतांना प.पू. गुरुदेवबाबाच ती मला देत असल्याचे जाणवले. संपूर्ण कार्यक्रमात मी पूर्ण आनंदी होतो. सत्कारानंतर त्या दिवशी रात्री मला शांत झोप लागली. इतर वेळी मला मध्येच जाग येते. - कु. प्रणव वामन परब .

देवा, ने मजला तू गुरुचरणांशी !

कु. मानसी प्रभु
     २२.७.२०१५ या दिवशी रात्री स्वभावदोष सारणी लिखाण करत होते. त्या वेळी मला माझ्याकडून घडलेल्या चुकांची पुष्कळ खंत वाटत होती. तेव्हा मी देवासाठी काय करू आणि काय नको ?, असे विचार येत होते आणि त्या वेळी देवाने मला पुढील काव्य सुचवले. मी टंकलेखन करता करता कडवी आपोआप सुचत गेली आणि शेवटचे कडवे टंकलेखन झाल्यानंतर डोळ्यांतून अश्रू आले. 
 देवा, लवकर दोष घालवून घे तुझ्या चरणांसी ।
मुक्त कर मला या मायेतूनी ॥
आणि या जिवाला ।
घे तुझ्या कोमल चरणांसी ॥ १ ॥

आध्यात्मिक उपायांचा हाही लाभ लक्षात घ्या !

 
परात्पर गुरु डॉ. आठवले
    आध्यात्मिक त्रास होत असतांना उपाय केले, तरी लाभ झाला नाही, असे काही जणांना वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांनी उपाय केले नसते, तर त्यांचे त्रास आणखीन वाढले असते. ते वाढले नाहीत, हाच उपायांचा लाभ ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.९.२०१५)

बालवयापासून सात्त्विकतेची आवड असणारी आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. संजना संकेत कुलकर्णी (वय १० वर्षे) !

कु. संजना संकेत कुलकर्णी
     लहानपणापासूनच नामजप, भजने, सेवा यांची आवड असलेली आणि विविध गुणांनी इतरांना आकर्षित करणारी अंगी साधकत्व असलेली पुणे येथील बालसाधिका कु. संजना कुलकर्णी हिची तिच्या आईला (सौ. प्रीती कुलकर्णी) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
पालकांनो, हे लक्षात घ्या !
     तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (प.पू.) डॉ. आठवले (१६.१०.२०१४)

एका साधिकेतील वाईट शक्तीने स्वतः दैवी शक्ती असल्याचे भासवून एका संतांशी युद्ध करणे; पण तिची शक्ती निष्प्रभ झाल्यावर तिने त्यांना शरण जाऊन ज्ञानाची याचना करणे

१. प्रसिद्ध आध्यात्मिक साधक असलेल्या एका स्त्रीने तिच्या घरी एका 
संतांसह दोन जणांचे अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करणे
     एका ठिकाणचा हा अनुभव. तेथील यजमान प्रसिद्ध आध्यात्मिक साधक होत्या. त्यांनी आमचे अतिशय आनंदाने स्वागत करून आम्हा तिघांसाठी आसन घातले आणि त्या म्हणाल्या, चहा करून आणते. आत जातांना त्यांच्या तोंडवळ्यावर (चेहर्‍यावर) अत्यंत आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत होता.

ईश्‍वरावर सर्वकाही सोपवले की, तो काळजी घेतो, याची आलेली अनुभूती

     लघवीच्या त्रासावर घरगुती उपचार करूनही त्रास न्यून न होणे आणि एका संतांनी सांगितल्याप्रमाणे सेवेला गेल्यावर त्रास दूर होणे : ५.६.२०१५ या दिवशी सकाळी मला अकस्मात् लघवी करतांना त्रास होऊ लागला आणि लघवीद्वारे रक्त येऊ लागले. मी त्वरित सुरतचे धर्माभिमानी आणि आधुनिक वैद्य जयेश शहा यांना भ्रमणभाषवर याविषयी विचारून साधे घरगुती उपाय केले; पण त्रास तसाच होता. सकाळी ११ वाजता मला सेवेसाठी जायचे होते. माझे वडील आणि आधुनिक वैद्य यांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली होती.

धर्माप्रती अत्त्युच्च तळमळ आणि व्यष्टी-समष्टी साधनेच्या अनेक गुणांचा समुच्चय असलेले शिवमोग्गा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे येथील श्री. योगीश गोविंदराजु !

श्री. योगीश गोविंदराजु
     श्री. योगीश गोविंदराजु हे शिवमोग्गा येथील असून गेल्या ३ - ४ वर्षांपासून ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. तेे सध्या धर्माभिमान्यांना संपर्क करणे, सनातन प्रभातचे वर्गणीदार करणे या, तसेच प्रसारातील अन्य सेवाही करतात. त्यांची व्यष्टी आणि समष्टी गुणवैशिष्ट्येे पुढेे देत आहे.
१. साधनेविषयीची जिज्ञासा
     शिवमोग्गा येथील श्री कोटे अंजनेयस्वामी देवस्थानात धर्मशिक्षण फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी धर्मशिक्षण फलकही लिहिले जातात.

साधकाविषयी नकारात्मक विचार आल्याने होणारी आध्यात्मिक हानी आणि ती टाळण्याच्या संदर्भात प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मौलिक मार्गदर्शन !

प.पू. पांडे महाराज
     एखाद्या साधकाला जेव्हा एखाद्या चुकीविषयी सांगितले जाते, तेव्हा काही वेळा तो ती चूक मनापासून स्वीकारत नाही. त्याच्या मनात ही चूक स्वतःची नसून अन्य साधकाची आहे, असे विचार येतात. अन्य साधकाविषयी नकारात्मक विचार येऊन तो निराश होतो. अशा प्रकारचे प्रसंग अनेक साधकांनी अनुभवले असतील. साधकांनी अशा प्रसंगांत कसा दृष्टीकोन ठेवावा, याविषयी प.पू. पांडे महाराजांनी केलेले मार्गदर्शन पुढे देत आहे.
१. मनाची स्थिती नकारात्मक झाल्यास प्रार्थना करावी !
     मनाची स्थिती नकारात्मक झाल्यास प्रार्थना करावी, हे भगवंता, माझ्यावर झालेल्या आरोपांद्वारे तू साधनेसाठी पुष्कळ अनुकूलता निर्माण केलीस.

तळमळीने आणि दायित्व घेऊन सेवा करणारे वेंगुर्ला येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रेय (वय ६७ वर्षे) आणि सौ. दक्षता तुळसकर (वय ५८ वर्षे) !

सौ. दक्षता तुळसकर

श्री. दत्तात्रेय तुळसकर
    वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथील श्री. दत्तात्रेय तुळसकर आणि सौ. दक्षता तुळसकर यांनी उतारवयात साधनेत येऊनही व्यष्टी समष्टी साधनेत सर्वांसाठी आदर्श ठेवला आहे. त्यांची सवेची तळमळ तरुणांनी शिकण्यासारखी आहे. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सत्संगातून सेवेचे महत्त्व कळल्यावर
 सेवेत सहभागी होणे
     श्री. दत्तात्रेय तुळसकर आणि सौ. दक्षता तुळसकर गेल्या चार वर्षांपासून साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक आहेत.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'सनातन संस्थेमध्ये तन-मन-धनाचा त्याग केलेले शेकडो साधक आहेत. एकाही राजकीय पक्षाकडे एकतरी असा कार्यकर्ता आहे का ?' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.११.२०१५)   

॥ हरि ॐ तत्सत् ॥


संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद 
अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला 
जिथूनकोणी 'ऊठ' म्हणून सांगणार नाही. असे
 बोला की, 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही
भावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर 'ऊठ 'असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शिक्षणक्षेत्र सुधारणार तरी केव्हा ?

संपादकीय
     भारतीय जनता पक्षाचे शासन आल्यावर ते ज्या काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांपैकी एक म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या हेतूने आखत असलेले नवीन शैक्षणिक धोरण. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यानेही शैक्षणिक धोरणांचा एक मसुदा सिद्ध करावयास घेतला होता; परंतु दुर्दैवाने त्याने मूर्त रूप घेण्यापूर्वीच तो लयाला गेला आहे. काही विघ्नसंतोषींनी त्यात खो घातला. त्यामुळे हा मसुदा संकेतस्थळावरून सध्या तरी मागे घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn